बागकामप्रेमी ऐसीकर २०१८ | ऐसीअक्षरे

बागकामप्रेमी ऐसीकर २०१८

घरी मोगरा कुंडीत लावला आहे. जमिनीत लावायला आवडलं असतं, पण आमच्याकडे दोन-चार दिवस थंड होतं त्यात तो टिकणार नाही. त्या दिवसांमध्ये मोगऱ्याच्या कुंड्या उचलून आत आणावं लागतात. त्यामुळे फार मोठ्या कुंड्यांमध्ये मोगरा लावताही येत नाही.

तर प्रश्न असा आहे की आता तो फार मोठा झालाय. मुळं कुंडीत जेमतेम मावत आहेत. फांद्यांची छाटणी केली (आणि त्यांची कलमं करायला घातली आहेत). पण मुळांचं काय करावं? नवी माती, कंपोस्ट घालायलाही जागा नाहीये.

बाकी आवारात एक ८ बाय ८ फुटाचा पॅच तणानं भरलेला होता. ते तण उपटून पाहिलं, तणनाशक वापरून पाहिलं, काही फरक नाही. हिवाळ्यात तो भाग फूटभर खणला, माती बदलली. म्हणजे जुनी माती काढून, आवारातली पानं चुरून पसरलीत. थोडं कंपोस्ट. त्यात एक डाळिंबाचं झाड लावलंय. आणि इतर बरीच फुलं लावलेली आहेत. जंतू, तुझ्यासाठी रोजमेरीही लावल्ये त्यात; तुला काड्या पुरतील. टिंगल करणाऱ्यांसाठी झेंडू लावलाय. त्याचे फोटो लावते लवकरच. बाकी इतर बरीच फुलझाडं लावल्येत. ती फुलली तरच फोटो लावेन.

भाज्यांमध्ये चार टोमॅटो, दोन मिरच्या बऱ्यापैकी वाढल्या आहेत. दोन-दोन फुलं दिसत आहेत. भेंडी नुकतीच पेरल्ये. फार्मर्स मार्केटात चांगली कोथिंबीर मिळाली. तिच्या काड्या पाण्यात ठेवल्या आहेत. मुळं फुटली तर बाहेर लावेन.

गेल्या वर्षी दोन कुंड्यांत कॅटनिप लावलं होतं; हिवाळ्यात ते मरायला टेकलं आणि आता पुन्हा टरारून वर. शेवंतीसारखंच. ती एकाच जातीची झाडं. आजूबाजूच्या सगळ्या मांजरी आणि बोके कॅटनिपवर जमा होतात. आमच्या तिर्रीबाई बाकीच्या मांजरी आवारात बघून करवादायला सुरुवात करतात. शक्य झालं तर तिच्या करवादण्याचा व्हिडिओही लावेन. बरा अर्धा तिच्यासारखे आवाज काढून तिला छळतो.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

प्रयोग आवडले.
तिकडचे हवामान पाहता - थंडी संपता संपता मुळांभोवती शेणखत (भरपूर घाला) घालून पाणी द्या. नंतर मात्र कुंडीतले पाणी बाहेर वाहिल इतके नको. पानं काढलीत हे बरोबर. उन्हाचा तडका लागला की नवीन फुटवे अधिक कळ्या येतात. कळ्यांचे प्रमाण मूळ रोपाच्या वाणावरच अवलंबून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पानं काढली, फांद्याही छाटल्या. पण प्रश्न तसाच आहे. कुंडीतली बहुतेकशी जागा मुळांनीच व्यापली आहे. खत द्यायचं तरी कसं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१) कुंडी मोठी घेणे./
२) मुळं छाटणे. सर्वच मुळांची टोके न छाटता काही मोठी मुळे कापून जागा करायची. मोगरा दणकट असतो मरत नाही, उकाडा ऊन आवडणारे झाड आहे. पोकळ जागेत खत भरायचे. मुळे सुरू होतात खोडापासून ती गाठ मातीच्या किंचित वर राहील असे बसवायचे.

कुंडीचा आकार आटोपशिर (आताचा आहे तो)ठेवायचा असेल तर - नर्सरीतून रोप आणल्यावर ते कुंडीच्या तळाशी शेणखताच्या थरावर ठेवायचे, सर्व बाजूंनी शेणखतच (माती कमीच)भरायचे. पाणी खाली वाहील इतके द्यायचे नाही. असे केल्यास सेप्टेंबरपर्यंत तीनदा बहर येतात. नंतर ते रोप विश्रांती अवस्थेत जाते. फुले येत नाहीत. तेव्हा ते जमिनीत लावून टाकणे.
प्रत्येक झाड आपला सामान्य आकार घेण्याचा प्रयत्न करते ,मोगरा चार बाइ चार फुट जागा घेतो. जमिनीत लावलेल्या झाडाच्या लांबलाब वाढणाय्रा फांद्या न कापता/छाटता त्यांची लेअरिंग पद्धतीने नवीन रोपे सहज करता येतात.

फांदीवर एकाच प्रतलात दोन दोन पाने असतील तर वेल मोगरा, एकाड एक विरुद्ध पाने ते झुडुप बुशटाइप.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"There’s rosemary, that’s for remembrance; pray, love, remember"
- ऑफेलिया (हॅम्लेट)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

love, remember.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

बागेत ललित घुसतय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परवा धागा काढला, आणि कालच मॉर्निंग ग्लोरीला कळ्या आलेल्या दिसल्या. दुर्दैवानं पहिला रंग गुलाबी दिसतोय. पण अमेरिकेत मिळणारी फुलझाडं जरा गुलाबी असतात. त्याला इलाज नाही.
मॉर्निंग ग्लोरी

या वेली असतात, त्या चढवण्यासाठी स्टँड आणायचे/बनवायचं बाकी आहे. येत्या विकेण्डला तेही पुण्यकर्म करेन म्हणत्ये. मी पहिल्यांदाच हे झाड वाढवणारे. व‌ार्षिक असतं, बियांपासून वाढवलं. बरेच दिवस बाळरोपं छोट्या डब्यांत अडकल्यामुळे पानं अंमळ मरगळेली दिसत आहेत. लवकरच त्यांचाही रंग सुधारेल, अशी आशा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कृष्णकमळाला भारतात फळं( प्याशन फ्रुट) धरत नाहीत. पोर्तुगीजांनी वेल आणला पण परागीभवनाचा किटक आणायला विसरले. दुसय्रा देशांत फळे धरतात.(सिंगापूर ~~)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किमान २-३ आठवडे वाट बघावी लागेल काम सुरु करण्यासाठी

photo

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थंडीचा उपयोग करा.
१) केशर
२) Truffles
L:https://youtube.com/watch?v=OkSKBRaG5AI

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गच्चीतला / बॅल्कनीतला भाजीपाला -

आपल्या घरापाशी थोडा भाजीपाला वाढवता आला तर अगदी स्वच्छ आणि ताजा मिळेल असा कधीतरी विचार येतो. अपेक्षित कुंड्या / झाडे पाच ते पन्नास. ते कसे साध्य करायचं पाहू.

सुरुवात सोप्या झाडांनी करायची आहे.

१) माठ - लाल आणि हिरवा.

२) पालक ,अंबाडी,मेथी वगैरे.

३)अळू, खायचे आणि वडीचे.

४) मोठी झाडे - शेवगा आणि कढीलिंब.

५) फळभाज्या - कारली, दुधी,घोसाळी इत्यादि.

६) शेंगावर्गीय - चवळी, घेवडा,फरसबी ( फ्रेंच बीन्स), गवार , वाल वगैरे.

७) हिरवा / ओला मसाला - कोथिंबीर, पुदिना, लसूण पात.

८) इतर - गवती चहा,

९) कंद - आले, हळद .

आता सप्टेंबरनंतर थंडी सुरू होणार आणि वरच्या यादीतल्या भाज्यांना थंडी मानवते.
महाराष्ट्रात डिसेंबर - जानेवारीत तापमान १० अंश सेंटिग्रेडपर्यंत खाली काही दिवस राहाते. पण शहरांत वाहतुकीमुळे आणि दाट लोकवस्तीमुळे १५-२० पेक्षा वरच राहते. इमारतीच्या दक्षिण भागाकडे येणाऱ्या फ्लॅट्सना ऊन अधिक मिळते असं पूर्वी म्हटलं जायचं परंतू टावर्सची संख्या वाढत गेल्याने तेवढा सूर्यप्रकाश तळाकडच्या घरांच्या बॅल्कनींत येत नाही. त्यामुळे करून पाहा हेच सांगावे लागते.

पालक, माठ,अंबाडी
आपल्या जागेत भाजीपाला होतो का, आपल्याला हे जमेल का हे पाहण्यासाठी या तीन भाज्या ठरवल्या आहेत. बी-बियाणे, खते काही नको. बाजारातून या भाज्यांच्या मुळं असलेल्या छोट्या जुड्या कधीकधी विकायला येतात त्या आणा. चारपाच इंचांची रोपे त्यात असावीत. अंबाडीची पाचसहा इंचांची असतात. भाजीसाठी म्हणून मोठी पाने काढून घ्या. शेंडा , मूळ तसेच ठेवा. ही सर्व रोपे म्हणून कुंडीत लावा. पाणी फार द्यायचे नाही. पंधरा दिवसांत रोपे वाढतील. मोठी पाने येतील ती काढून वापरायची पण झाड उपटायचे नाही. असे तीन वेळा करता येईल फेब्रवारीपर्यंत. याचप्रमाणे कोथिंबीर लावा.
खत अजिबात घालायचे नाही.
पालकाच्या दोन जाती दिसतात. एक मोठ्या गोल पानाची आणि दुसरी छोट्या लांबुडक्या पानांची. दुसरी बरी.
माठ - लालबुंद, हिरवागार,आणि लालहिरव्या पानांचा. हे वेगवेगळे मिळाल्यास छान. राजगिरा लाडू खातो तो राजगिरा पेरल्यासही माठासारखी झाडे येतात. पण भाजीचे बी काळे टणक असते. ती सर्व एकाच वर्गातली झाडे आहेत.
पालकात ए व्हिटमिन, माठात ए व्हिटमिन आणि लोह अधिक असते.
अंबाडीस पुढे मोठी पिवळी पांढरी फुले येऊन बी/ फळ धरते.
पुदिना- पुदिनाची काळसर हिरवी पाने दिसणारी जुडी आणा. मुळं असण्याची गरज नाही. फक्त पाने काढून घ्या. काड्या मातीवर आडव्या ठेवून त्यावर दाबण्यासाठी थोडी माती टाकून पाणी द्या. प्रत्येक गाठीतून दोनदोन शेंडे वर येतात आणि एक दाट गुच्छ तयार होतो. गांडुळ खत एकदोन चमचे टाकल्यास चांगला दर्प येणारी पाने येतात. पुदिन्याची ओली पाने वापरतो शिवाय वाळवून हिरवी पाउडर ही वापरता येते.
मेथी - आता बाजारात जी मेथी आली आहे जाड पानांची तो 'मेथा' आहे. फार कडू असते. थोड्या दिवसांनी पोपटी रंगाची पातळ पाने आणि पांढुरक्या काड्या असणारी मेथी येईल ती लावा. याची त्रिदल पाने खुडुन वाळवून ठेवल्यास कसुरी मेथी होते. अलुमिनम पाउचमध्ये वास चांगला टिकतो. बऱ्याच पदार्थांत शेवटी टाकता येतात. ओली पाने मेथी पराठा किंवा भजीसाठी वापरता येतात. कडुपणा फार नसतो, रंग छान असतो.

कुंड्या, माती
गच्ची असो वा बॅल्कनी, कुंड्यांचा संपर्क जमिनीशी नसतो त्यामुळे पाणी घातल्यावर ते बाहेर पडते ते कुठे मुरत नाही. ही एक मोठी त्रासदायक गोष्ट असते. जास्तीचे पाणी खताचा अंश धुऊन नेते तसेच लाल माती वापरली असल्यास ते लाल ओघळ वाईट दिसतात. कुंडी लहान असल्यास बारा अठरा तासानंतर माती वाळायला सुरुवात होते. भाजीपाल्यास सतत ओलावा/दमट असलेली माती पोषक असते. खूप चिखलही नको आणि माती अधुनमधून कोरडीठाक होता कामा नये. मुख्यत: पानेच उपयोगाची असतात आणि त्यासाठी सतत एकसारखा ओलावा टिकणे गरजेचे आहे. त्यासाठी उत्तम उपाय - प्लास्टिक ट्रे. हे बाजारात दोन आकारात मिळतात.
5x9x2 इंच
9x11x2 इंच
या ट्रेंमध्ये एक इंचाचा मातीचा थर घालून त्यावर कुंडी/ प्लास्टिक पिशवी/ कापडी पिशवी ठेवावी. वाहिलेले पाणी खालच्या मातीच्या थरात साठते आणि झाड ते वापरते. मुळं त्यातही पसरतात आणि
झाड जोमदार वाढते. दोन दिवस पाणी घातले नाही तरी रोपे लगेच वाळत नाहीत. साठलेले पाणी मातीत असते, डास होत नाहीत. एक विशेष काळजी प्लास्टिक ट्रे'ची घ्यावी लागते ती म्हणजे उन्हाने फाटू नयेत यासाठी काळ्या प्लास्टिक कापडाच्या पट्टीने काठ झाकणे. तळावर माती असल्याने तिथे ऊन लागत नाही. काळ्या प्लास्टिकचे ट्रे मिळत नाहीत. कापडी पिशव्या म्हणजे पॅालिएस्टर कापडाच्या. या उन्हाने फाटत नाहीत, पाण्याने कुजत नाहीत आणि मुळांना चांगला गारवा देतात. छोट्या ट्रेमध्ये अर्धा/एक किलोच्या पिशव्या राहतात, मोठ्या ट्रेमध्ये पाच किलोची पिशवी ठेवता येते. कढीलिंब आणि शेवगा यासाठी उत्तम. वेलभाज्यांसाठीही.

छोटे आणि मोठे दोन्ही आकाराचे ट्रे बॅल्कनीस/ खिडकीस केलेल्या बॅाक्सटाइप ग्रिलमध्ये बसतात. पाणी न वाहल्याने इतरांच्या तक्रारी येत नाहीत. छोटा ट्रे थोडी खटपट करून ( चार नाइलॅान दोऱ्या बांधून, दोरीचा वळसा तळाखालून घेणे) टांगता येतो. यामध्ये पुदिना लावावा. खूप झान झुपकेदार दिसतो. कामपण, शोभापण.

बी-बियाणे
या भाज्यांसाठी आपण बाजारातल्या बी-बियाणांवर अवलंबून राहात नाही.

कीड निर्मुलन
कोणतेही रासायनिक फवारे वापरायचे नाहीत. याचसाठी आपल्या जागेत भाजीपाला लावतो. रोगटपणा दिसल्यास उपाय - झाड अधिक उन्हात ठेवणे/ पाणी कमी देणे /अथवा उपटून टाकणे / उन्हाळी लागवड करणे.
काही रोग - पांढरा मावा, पांढरी माशी, तुडतुडे यांचा प्रकोप थंडीत फार असतो. कारण धुकेमिश्रित ओली थंडी. फेब्रुवारी १५ / महाशिवरात्रीनंतर लागवड करा.

( लेखन बाकी आहे.)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनेकानेक धन्यवाद अ.बा. फारच माहितिपुर्ण Smile लगेच सुरुवात करून लवकरात लवकर कळवतो Smile

एक विशेष काळजी प्लास्टिक ट्रे'ची घ्यावी लागते ती म्हणजे उन्हाने फाटू नयेत यासाठी काळ्या प्लास्टिक कापडाच्या पट्टीने काठ झाकणे. तळावर माती असल्याने तिथे ऊन लागत नाही. काळ्या प्लास्टिकचे ट्रे मिळत नाहीत. कापडी पिशव्या म्हणजे पॅालिएस्टर कापडाच्या. या उन्हाने फाटत नाहीत, पाण्याने कुजत नाहीत आणि मुळांना चांगला गारवा देतात. छोट्या ट्रेमध्ये अर्धा/एक किलोच्या पिशव्या राहतात, मोठ्या ट्रेमध्ये पाच किलोची पिशवी ठेवता येते.

जमल्यास वर दिलेल्या माहितीचा एखादा फोटो देऊ शकाल का? नेमका अंदाज येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जबरदस्त ज्ञानवर्धक .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भाग दुसरा
गच्चीतला / बॅल्कनीतला भाजीपाला -
साधने -

अगोदरच्या भागात आपण थोडी कामचलाऊ माहिती घेतली. घराच्या अंगणात किंवा मागे जमिनीत झाडे असतात त्यांच्या अडचणी आणि फायदे वेगळे असतात तसेच बॅल्कनीतल्या/ गच्चीवरील झाडांचेही काही वेगळे असतात.
१) ऊन अजिबात न येणे - उन्हाकडची बाजू बॅल्कनीला नसेल तर एकच उपाय म्हणजे मनी प्लांटसारखी झाडे टांगून वाढवणे. फक्त शोभेची. भाजीपाला वगैरे शक्य नाही.
२) ऊन येते किंवा दुपारनंतरचे फार कडक ऊन मिळते. ही खरीतर सर्वच झाडांसाठी गरजेची चांगली गोष्ट आहे. परंतू बॅल्कनीतली झाडे कुंड्यांमध्ये असतात आणि कुंड्याही तापतात. मातीच्या कुंड्यांतले पाणी लगेच सुकते,माती वाळते, रोपांवर ताण पडतो. प्लास्टिकच्या फार तापतात. कार्बन ब्लॅक घातलेले प्लास्टिक - काळे प्लास्टिक ( ओवरहेड टाक्या असतात ते) उन्हाला टिकते, फाटत नाही. इतर रंगीत प्लास्टिकचा चुरा होतो. शिवाय कुंडीच्या बाजूने पाण्याचा निचरा होत नाही.

३) गच्ची फार मोठी ओपन टेरेस असेल तर झाडांची हौस वाढत जाते. फळझाडेही लावली जातात. यांना मोठ्या कुंड्या लागतात. पाणी फार लागते. कधी पुढे गच्चीत कार्यक्रम करायचा म्हटल्यास मोकळी जागा मिळेल याचा विचार करूनच मोठ्या कुंड्या वाढवाव्यात. पंचवीस किलोंच्यावर वजन झाले आणि अशा बऱ्याच झाल्या तर त्या खालच्या सिलिंगवर न ठेवता तुळईच्या भागावर ठेवाव्या लागतात. कधी दहा बारा दिवस बाहेर परगावी गेलो तर पाणी देण्याची व्यवस्था करावी लागेल. कुणाला सांगावे लागेल. ठिबक सिंचन पसारा व्यवहार्य वाटत नाही. पुढेमागे गच्ची गळते म्हणून छप्पर घालावे लागल्यास बागकाम गुंडाळावे लागते आणि महागड्या मोठ्या कुंड्या फेकून द्याव्या लागतात.

४) बॅल्कनीतल्या कुंड्यांतून गळलेले पाणी खालच्या भिंतींवर लाल ओघळ सोडतात. एकाने केले की सोसाइटी सर्वांनाच झाडे काढायला लावते. थपकथपक पाणी खाली पडत राहाते ते वेगळेच.
४) हौस तर करायची, आवाक्यात ठेवायची, इतरांना त्रास नको या सर्वांचा विचार करता काही प्रयत्न केले आहेत ते पाहा.

फोटो १)

एक मोठा प्लास्टिक ट्रे(9x11x2 inches) , त्यात तळाला माती आहे, वर पाच किलोची प्लास्टिक पिशवी, पिशवीस खाली भोके पाडून माती भरून ठेवली आहे. जेव्हा यामधले झाड ( कढीलिंब, जास्वंद, शेवगा वगैरे मोठे होईल तेव्हा त्याची मुळे खालच्य ट्रेमधल्या मातीत पसरतात. तेव्हा पिशवीसह ट्रे हलवायचा, फक्त पिशवी उचलायची नाही.

फोटो २)

छोटा ट्रे( 5x9 x2 inches) त्यात पॅालिएस्टरची कापडी पिशवी, पिशवीतून वेलासाठी आधाराच्या दोऱ्या अगोदरच काढल्या/बांधल्या आहेत. पिशवीची तळाची शिवण बाहेरच ठेवायची आणि लांब टाके टाकायचे. त्यातून मुळे बाहेर खाली जातील. ट्रे'च्या कडा काळ्या प्लास्टिकने झाकल्या आहेत.

फोटो ३)

नेहमी बाजारात मिळणारी प्लास्टिक कुंडी ट्रेमध्ये. याचा बुडाकडे निमुळता होणारा आकार मुळांना पसरायला उपयोगाचा नाही.

फोटो ४)

ट्रे'ला कापडाने झाकून. रंगीत ट्रे झाकला गेला!

फोटो ५)

बाजारात मिळणारे या आकाराचे टब तळाला भोके पाडलेले/ नसलेले दोन्ही मिळतात. भोके नसलेला घेऊन त्यात तळाला थोडी माती घालून एक कापडी पिशवी ठेवली आहे. दोन पिशव्याही बसतात. पालक, कोथिंबीर, मेथी, माठ या भाज्या किंवा ओफिसटाइम (चिनीगुलाब) फुलझाडांसाठी उपयुक्त.

फोटो ६)

वरीलप्रमाणेच छोटा आकार. हे टब बॅल्कनी कट्ट्यावर सहज राहतात. पुदिना आणि लसुणपातीसाठी उपयोगी. पाणी घालताना कडेच्या मातीवर टाकावे. भिजून वर दिसेल एवढेच. खाली भोक नसल्याने टब काठोकाठ भरला जाणार नाही हे पाहावे. उघड्या गच्चीत पावसाचे पाणी साचेल आत आणि झाड कुजेल. हा धोका उथळ ट्रेमध्ये नसतो.
या टबांपेक्षा मोठ्या आकारातले काळ्या प्लास्टिकचे मिळतात.

फोटो ७)

शोभिवंत करायचे झाल्यास चिनी मातीच्या कुंड्या आहेतच. फार जड असतात. पण आतले झाड बदलून एखाददिवशी दिवाणखान्यात ठेवू शकतो. तीन दिवस ऊन न मिळाल्यास पाने पिवळी पडतील. रोज बदलावे.

फोटो ८)

यास खाली भोक असतेच त्यातून पाणी बाहेर वाहते ते भोक सिमेंटने बंद करून त्यात मातीचा थर दिला आहे. एका डब्याला अलुमिनियम पाइप तळाला घट्ट बसवला आहे. त्यात वरती बांबूची काठी घालून वेलाला आधार देता येइल. कुंडी घरात ठेवता येते. पाणी आत साचणार नाही याकडे लक्ष द्यावे.

५) पोर्टेबल आधार -
पिशवीतून आलेल्या दोऱ्या वरती कुठल्या आडव्या आधाराला बांधून वेल पसरवता येतात. पण हाच आधार कुंडीसह फिरेल असा करायचा झाल्यास अशक्य नाही परंतू फार खटपट करावी लागते. कारली, तोंडली अशी छान दिसतील.

करून पाहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण3
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुनिवर, मस्त माहिती. खूप उपयोग झाला. अनेकानेक धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल

अनेकानेक धन्यावाद, फोटोसहित माहितीबद्दल खुप आभार. very helpful!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अचरटबाबा यांच्या कमेंट्स सर्वोत्तम आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं