सांब भोळा

रानात सांब भोळा
उघडा असे दुपारी
'देवा कसाही तू रे...!?'
मी एक त्या विचारी

म्हणतो मलाही सांब
'मी खेळ तव मनाचा,
असतो निसर्ग सारा..
कधी देव का कुणाचा..?'

'पडणार साऊली जी
माझेच अल्प रूपं..,
का बांधता तुम्ही हे..
नसते खुळे हिशेबं..?'

'व्यापुनि चराचरी या
मी विश्वरूपं सारे...,
माझेच भोग मजसी..
छळतीलं का कधी रे..?'

'तुमच्या खुळ्या स्वभावी
मज देव-जन्म आहे..,
कुणी 'देवं' का म्हणा ना..?
अंती निसर्ग आहे...!'

'त्याचीच शुद्ध किमया
भासे तुम्हा उन्हाळा,
निर्जीव मूळचा मी
तुमचाच सांब भोळा...!'

फोटो:- घनगडला जाताना काढलेला....

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

साधे, सोपे आणि अव्यक्‍ताची जाणीव करून देणारे शब्द आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! 'एक शुन्य मी' ची जाणीव करून देणारी कविता आवडली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वा ! साध्याच अन थोड्याच शब्दात मोठा आशय मांडलाय. एक सुचवावेसे वाटते.
कुणी 'देवं' का म्हणा ना..?
अंती निसर्ग आहे...!'
निसर्गाच्याही पल्याड
एक चैतन्य आहे,
जाणीव ज्याची तुम्हाला
कधी होणार आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@निसर्गाच्याही पल्याड
एक चैतन्य आहे,>>> निसर्गाच्या पल्याड..? म्हणजे नक्की कुठे..? प्लीज स्पष्ट करा...
जाणीव ज्याची तुम्हाला
कधी होणार आहे ?...आधी स्पष्ट करा,पुरावे द्या... जे अस्तित्वातच नाही,त्याची ''जाणिव'' कशी होणार..?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

आत्मारामपंत कविता आवडली. (आम्ही जालकविता क्वचितच वाचतो कारण आवडाव्या अशा कविता क्वचितच सापडतात. Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

मस्त देवदेव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेदिनी..

आशयपूर्ण कविता...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...............................................................
माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे तर घामाच्या धारांनी

'त्या फुलांच्या गंधकोषी' या काव्याची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या खुळ्या स्वभावी
मज देव-जन्म आहे..,

+१ देवाने माणसाला जन्माला घातलं की माणसाने देवाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माणसाने देवाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता कोणी विचारलं मग माणसाला कोणी निर्माण केलं तर आपण सेफली म्हणू शकतो राघांनी Wink
संदर्भ - विश्वाचे आर्त मालिका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रामाणिक, साधी-सुधी, सांबभोळी, पण (म्हणूनच ) आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0