जालावरील मजकुरावर 'मालकीहक्क' कोणाचा?

मराठी लोक मोठ्या प्रमाणावर फेसबुकवर लिहायला लागले आहेत.

ऑर्कुट वगैरे प्रकरणं भारतात जोरदार चालली, पण दशकापूर्वी ऑर्कुट जोरदार होतं तेव्हा इंटरनेटची उपलब्धता कितपत होती हे पाहता ते सोडून द्यायला हरकत नाही. त्यापुढे ब्लॉग आले. मराठी संस्थळं आली. आता फेसबुक आलं. मराठी लोकांनी ट्विटर फार मनावर घेतलंय असं मला वाटत नाही. हे माझं मत, विदेतून काढलेला निष्कर्ष वगैरे नव्हे. तर फेसबुकवर लिहिण्याचा मोठा फायदा असा की आपल्या मजकुरावर अनेकदा आपला ताबा असतो. आपल्या भिंतीवर लिहिलेला मजकूर आपला.

मी माझ्या भिंतीवर काही लिहिलं, ते काही कारणांनी नष्ट करावंसं वाटलं, तर दिले ते उडवून. किंवा मजकुराचं प्रायव्हसी सेटिंग बदलून Visible to only me असं केलं. तर मी मुळात लिहिलं होतं ते इतरांना दिसणं बंद होईल. त्याशिवाय तिथे इतरांनी लिहिलेल्या प्रतिक्रियाही इतरांना दिसेनाश्या होतील. म्हणजे कोणावर गरळ ओकण्याची किंवा बेजबाबदार विधानं करण्याची सोय झाली वर त्याची जबाबदारी घेण्याचीही गरज नाही.

त्याउलट मराठी संकेतस्थळांवर वेगवेगळे प्रकार दिसतात. 'ऐसी'वर आपले धागे आणि प्रतिसाद संपादित करता येतात. पण इतरांचे प्रतिसाद उडवण्याची किंवा झाकून ठेवण्याची परवानगी आपल्याला नाही. मिसळपाववर एके काळी तरी आपल्या धाग्याचा मजकूरही आपल्याला संपादित करता येण्याची सोय नव्हती. (आताचं मला माहीत नाही.) मात्र इतरांचं लेखन आपल्याला झाकता, उडवता येत नाही. आपल्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांवरही आपला ताबा नसतो.

पुन्हा फेसबुककडे वळताना, समजा मी काही मजकूर फेसबुकवर लिहिला. कोणी तरी त्याची प्रत स्वतःकडे ठेवली; हे हातानंही करण्याची गरज नाही. 'गमभन'वाल्या ओंकार जोशीनं स्क्रिप्ट लिहिलेलं आहे, तसले स्क्रेपर्स लावून लोकांच्या भिंतींवरचा मजकूर आपल्याला सहज उतरवता येईल. पुढे मी तो मजकूर उडवून दिला, मात्र कोणी तरी तो मजकूर तरीही जाहीर केला. माझ्या नावासकट. तर अशा ठिकाणी छापलेला आपला मजकूर उडवून लावा, असं सांगण्याचा अधिकार मला असतो का?

हे एक झालं कायद्याचं. मात्र दुसरा प्रश्न येतो तो जबाबदारी घेण्याचा. आपण काही लिहिलं तर त्याची जबाबदारी आपली असते. हे समजून उमजून आपण लिहितो का? जालावर लिहिलेला कोणताही मजकूर खाजगी नसतो, असं आमचे जुनेजाणते सर्किटकाका आम्हाला कोणेएकेकाळी सांगत होते. ठरावीक गोष्टी इमेलीतून लिहीण्याजागी फोनवर किंवा प्रत्यक्षात बोलण्यासाठीच बऱ्या. इमेलींमध्ये लिहिलेल्या मजकुरावर कोणाचा हक्क असतो? मी लिहिलेलं इमेल म्हणून मालकी माझी का मला आलेलं इमेल म्हणून माझी मालकी, का इमेल लिहिणाऱ्या आणि पावणाऱ्या दोन्ही लोकांची मालकी? खाजगी इमेलं जाहीर करण्याबद्दल काय कायदा आहे?

पुन्हा एकदा, कायदा काहीही असेल. अंगाला तेल लावून जालावर वावरण्याचा फायदा मिळवायचा असेल तर जे काही गरळ ओकायचं आहे ते खाजगीत, जवळच्या लोकांसमोर आणि फोनवर ओका. फेसबुकवर लिहिणाऱ्या मोठ्यामोठ्या लोकांनीही तंत्रज्ञान कसं वापरावं, नामानिराळं कसं राहावं, आपला मजकूर म्हणजे काय, फेसबुकाच्या सेवेबद्दल पैसे का द्यावे लागत नाहीत, याबद्दल फार काही माहिती आहे असं दिसत नाही.

field_vote: 
0
No votes yet

यावरून एक पुस्तक वाचल्याचं आठवलं. फोटोग्राफर ( बहुतेक बागुल) त्यांचे म्हणणे त्यांनी काढलेल्या फोटोंवर त्यांचा ( फोटोग्राफरचा) हक्क असतो. एका गायिकेने फोटो काढून घेतले यांच्याकडून पैसे देऊन. मग त्या बाईंनी त्यापैकी एक फोटो त्यांच्या लेखाला डकवला. तर बागुलची परवानगी घेणे आवश्यक आहे/होती कारण कलाकृती त्या फोटोग्राफरची असते. पुढे काय झालं माहीत नाही. ('८० -९० मध्ये पुस्तक वाचवल्याचं आठवतय. )

२) मायबोलीवर ( बरीच वर्षं) पाककृती टाकणाऱ्या 'दिनेश' नावाच्या लेखकाने ट्रोल प्रतिसाद येतात या कारणास्तव सगळेच लेख डिलिट केले. पाककृती लेख नाही पण खाली लटकलेले प्रतिसाद आहेत. मग त्यावर दोन लेख आले. हक्क कुणाचा? हक्काबरोबर जबाबदारी आली वगैरे. पण त्यातून लेखाला आणि प्रतिसादांना मर्यादित काळ संपादन आलं.
३) फेसबुकवर ( माझ्या मित्र यादीत नव्हे) एक व्हिडिओ आला - अंदमानच्या सावरकरांच्या कोठडितला बासरीवर जयोस्तुते वाजवण्याचा. तो मी लगेच डाउनलोड केला. चारपाच तासांनी लेखकाने उडवला तरी माझ्याकडे आहे चार वर्षं. हे एक माझंच उदाहरण.
४)मराठी लेखक म्हणजे लेखक म्हणता येतील इतके चांगले लिहिणारे या फेसबुक माध्यमामुळे तयार झाले. मित्र आणि नातेवाइकांच्या प्रोत्साहनांमुळे पुस्तक लिहिण्याचं मनावर घेतात. पुर्वी वर्तमानपत्र हे एकच माध्यम होतं लेखन फुकट प्रसिद्ध केलं जाण्याचं. त्यातून प्रसिद्धी मिळाल्यावर पुस्तकासाठीचे प्रकाशक 'डील' करायला तयार होतात. पेपरवाल्याकडून अगोदर प्रसिद्ध झाले्ल्या लेखनाची लेखी अनुमति आणल्याशिवाय प्रकाशक त्या पुस्तकाच्या कामात 'हात घालत नाही.' याचं कारण प्रकाशकाला छापील मजकुराचे मालकीचे हक्कनियम पक्के माहीत असतात.
५) नवीन जालीय माध्यमांतून झालेल्या लेखनाचे काय? तर ती माध्यमं त्या प्रसिद्ध झालेल्या लेखनावर हक्क सांगत नसली तरी आता ते आपण स्वत:च नष्ट केल्यावर दुसऱ्याने उतरवून घेतले असल्यास तो माझेच म्हणाला तर मूळ लेखकाकडे पुरावा काहीच शिल्लक नसतो की ते त्यानेच एकदा लिहिले होते. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे.
६) मी असा विचार करेन की झालं गेलं ते राहू दे. त्या पुराव्यावरच आणि लेखनक्षमतेवरच हा प्रकाशक माझ्या पुस्तकाचे काम अंगावर घेत आहे. अशा पद्धतीचंच मी तुला दुसरं नवीन लिहून देईन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला अनेकदा असा अनुभव आलेला आहे की फेसबुकवर चर्चा झाली तर मूळ चर्चा करणारी किंवा प्रतिसाद देणारी व्यक्ती, चर्चा गैरसोयीची झाली की ती कमेंट उडवून टाकून सोयीस्करपणे काही झालंच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करते. माझ्याच भिंतीवर एकदा असं झालं होतं. सुदैवाने मी स्क्रीनशॊट घेऊन ठेवल्यामुळे नक्की काय झालं हे मला मांडता आलं. नाहीतर माझ्या भिंतीवर जे प्रसिद्ध झालं त्याची मालकीही माझी नाही, असं मानत इतिहासातच बदल झालेला मला मान्य करावा लागला असता.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1595311953824252&id=10000036...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जालावरील मजकुरावर 'मालकीहक्क' कोणाचा?

ज्या व्यक्तीकडे कोर्टात जाऊन मालकीहक्क सिद्ध करण्याचा वेळ आणि पैसा आहे त्याचा/तिचा

---

काही लोक फेसबुकवर माझा स्टेट्स याने/हिने चोरला म्हणून बोंब मारत असतात ते पाहून त्यांची दया येते (आणि अर्थातच अशा चोरांबद्दल राग ही येतो).

@अशा बोंबा मारणारे लोक - एवढं महत्वाचं (तुमच्या मते) लिहिलंय तर मग एखाद्या ब्लॉगवर सुद्धा एक कॉपी ठेवा. फक्त फेसबुक प्लॅटफॉर्म वर तुमचं लेखन ठेऊ नका.
@लेखनचोर - तुम्ही जरी मूळ लेखक/लेखिकेचं नाव लपवलेलं असलं तरी तुमच्या मित्रयादीतल्या लोकांचा हे तुम्हीच लिहिलंय यावर विश्वास बसण्याची शक्यता कमी आहे. इतर वेळी फालतू मिम्स टाकणाऱ्याने अचानक एवढं "भारी" कसं काय लिहिलं असा प्रश्न त्यांना पडू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटोग्राफर ( बहुतेक बागुल) त्यांचे म्हणणे त्यांनी काढलेल्या फोटोंवर त्यांचा ( फोटोग्राफरचा) हक्क असतो. एका गायिकेने फोटो काढून घेतले यांच्याकडून पैसे देऊन. मग त्या बाईंनी त्यापैकी एक फोटो त्यांच्या लेखाला डकवला. तर बागुलची परवानगी घेणे आवश्यक आहे/होती कारण कलाकृती त्या फोटोग्राफरची असते.

बागुल यासाठी प्रसिद्ध होते. पण त्यांचा मुद्दा कायद्याच्या चौकटीत बरोबरच होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बागूल यांनी काढलेला फोटो कलाकृती म्हणवण्यास पात्र आहे?

बागूल वॉज राँग (जस्ट लाईक लता मंगेशकर वॉज राँग & रफी वॉज राईट)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बागूल यांनी काढलेला फोटो कलाकृती म्हणवण्यास पात्र आहे?
बागूल वॉज राँग (जस्ट लाईक लता मंगेशकर वॉज राँग & रफी वॉज राईट)

मुद्दा कळला नाही. फोटो कलाकृती म्हणून पात्र असो अथवा नसो; मुद्दा स्वामित्वहक्क कायद्याशी संबंधित असला, तर फोटो प्रकाशित करण्यापूर्वी फोटोग्राफरची संमती आवश्यक असते. (अपवाद : जर फोटो काढताना किंवा नंतर आपला स्वामित्वहक्क सोडल्याचा करार त्यानं केला असेल, वगैरे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी ब्यांकेत के वाय सी ला देण्यासाठी अनेक फोटो काढून घेतले.
ते बँकेत देताना मी फोटोग्राफरची परवानगी घेतली नाही. हा स्वामित्व हक्काचा भंग आहे का?

आमच्या लग्नाच्या फोटोपैकी काहींच्या प्रती मी नातेवाईकांना दिल्या आहेत. हा फोटोग्राफरचा स्वामित्वहक्क भंग आहे का?

असेल तर कायदा चु* आहे.

*चु हे अक्षर ऱ्हस्व लिहिले आहे याची नोंद घ्यावी. उगाच गोड गैरसमज नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी ब्यांकेत के वाय सी ला देण्यासाठी अनेक फोटो काढून घेतले.
ते बँकेत देताना मी फोटोग्राफरची परवानगी घेतली नाही. हा स्वामित्व हक्काचा भंग आहे का?
आमच्या लग्नाच्या फोटोपैकी काहींच्या प्रती मी नातेवाईकांना दिल्या आहेत. हा फोटोग्राफरचा स्वामित्वहक्क भंग आहे का?

तुम्ही एखाद्या व्यावसायिक स्टुडिओकडे जाऊन असं काम करून घेतलंत तर तो त्यांच्या दिमतीला असलेला फोटोग्राफर आणि तो स्टुडिओ यांच्यातला मामला असतो - म्हणजे स्टुडिओ आणि फोटोग्राफर यांच्यात (पैशाच्या मोबदल्यात) स्वामित्वहक्क सोडण्याचा करार असतो / असायला हवा. तुम्ही तुमच्या परिचयातल्या एखाद्या व्यक्तीकडून असं काम करून घेतलंत तर तो तुम्हा दोघांतला मामला असतो. कागदोपत्री करार नसेल, पैसे दिल्याचा पुरावा नसेल, आणि काही कारणानं (उदा.) तुमच्या परिचयातला फोटोग्राफर आणि तुमच्यात काही वितुष्ट आलं तर तो आपला हक्क बजावण्यासाठी दावा दाखल करू शकतो. आता, तुमच्या लग्नाचे फोटो त्यानं काढले असतील, तुम्ही त्याला पैसे दिले असतील, तर असा दावा कोर्टात टिकणार नाही.

परंतु, बागुलांच्या बाबतीत म्हणा किंवा गौतम राजाध्यक्ष, जगदीश माळी वगैरे फोटोग्राफर्सच्या बाबतीत म्हणा, त्यांच्या कीर्तीमुळे विख्यात लोक (सेलेब्रिटी) खास त्यांच्याकडे येऊन आपले फोटो काढून घेत. त्यांनी फोटो काढून घेताना तसा करार केला नसेल, तर बाय डीफॉल्ट फोटोग्राफरला कायदेशीर हक्क मिळतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आमची कंपनी पैसे देऊन क्लायंटला प्रॉग्रॅम लिहून इम्प्लिमेंट करून देते. क्लायंटकडून पैसे घेऊन करून दिलेल्या कामावर क्लायंटचा स्वामित्वहक्क असतो. आमच्या प्रोग्रॅमरने कितीही ग्रेट ऑप्टिमाइझ्ड, फास्ट चालणारा प्रोग्रॅम लिहिला (इतर कंपन्यांच्या तुलनेत) तरी त्यावर आमच्या कंपनीचा कुठलाही हक्क नसतो. फार तर कंपनी त्या साठी जास्त पैसे घेईल. पण एकदा प्रॉग्रॅम क्लायंटला दिला की कंपनीचा काहीही स्वामित्वहक्क त्यावर नसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एकदा प्रॉग्रॅम क्लायंटला दिला की कंपनीचा काहीही स्वामित्वहक्क त्यावर नसतो.

हे असं असण्यासाठी तो क्लायंट आणि तुमची कंपनी यांत तसा करार हवा. नसेल, तर तुमच्या कंपनीचा स्वामित्वहक्क राहतो. तसंच, तुमची कंपनी आणि तो प्रोग्रामर यांच्यात तसा करार हवा. तसा नसेल, तर प्रोग्रामरचा हक्क राहतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

म्हणूनच अनेक ठिकाणी आता प्रोग्रॅम विकण्याऐवजी सेवा विकतात. ठरावीक काळासाठी तुम्हाला अमुक काम करणारं सॉफ्टवेअर वापरता येईल, अशा छापाची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बागुल यासाठी प्रसिद्ध होते.

त्यावरुन इतरांनाही या गोष्टीचा बागुलबुवा करता आला असता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

ही प्रकरणं लॅा ओफ टॅार्टस यामध्ये येतात. म्हणजे काही स्पष्ट असा लिखित करार नसतो. वाद आणि मागणीचा खटला दाखल झाल्यावर कायद्याचा कीस पडतो.
लेख पुन्हा वाचला कारण प्रतिसादांचा प्रवाह दुसरीकडे वाहू शकतो. शिवाय दिलेलं उदाहरण लेखातल्या मद्द्यास चपखल बसते का हेसुद्धा ठरवावे लागते.
१) आपणच एखादा मजकूर काढून टाकल्यानंतर त्यासच दुसऱ्या कुणी त्याच्या नावाने प्रकाशित केल्यास भांडता येईल का?
२) फोटो शेअरिंग साइटवर ( इन्स्टाग्राम वगैरे) आपण टाकलेले फोटो आपले राहतात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थशास्त्री हेरॉल्ड डेम्सेट्झ यांनी मालमत्तेच्या अधिकाराची परिभाषा मांडण्याचा यत्न केलेला होता. १९६७ मधे त्यांनी जो पेपर सादर केला होता त्याचा गोषवरा इथे वाचता येईल. मालमत्तेचे अधिकार हे स्पष्टपणे व्यक्त केलेले असणं हे अत्यंत इष्ट. पण हे त्या मालमत्तेला लागू पडतं की जिच्या सीमारेषा, हद्दी व्यवस्थित आखता येतात. उदा. घराच्या भिंती व जमीनीच्या हद्दी सुनिश्चित करणे हे खूप अवघड, जिकीरीचे नाहीये. Search, information, (and to a great extent) negotiation costs are low. Policing & monitoring costs are high in some countries and low in some other countries.

पण जालावरच्या मजकूराचं आणि एकंदरित माहीती या प्रॉडक्ट चं स्वरूपच मुळी, कट्यार काळजात.... मधल्या बाकेबिहारी च्या भाषेत सांगायचं तर, निर्गुण. तिथूनच समस्येस सुरुवात होते. आणखी बोलायचं झालं तर माहीती हे उत्पादनच असं आहे की जे - Costlier to produce than it is to reproduce(copy). व यामुळे समस्या उद्भवतात. समस्या नेमकी कशी - तर तुम्ही एक परिच्छेद लिहिता व नंतर त्याची नक्कलप्रत बनवण्यासाठी अक्षरश: लिहिण्याच्या एक शतांश वेळ लागतो. Copy-and-Paste.
.
सुमारे सव्वासहाशे शब्दात सोशल मिडियावर (जो इंटरनेट चा उपसंच आहे) असलेले तुमचे कंटेंट हे नेमके कोणाच्या मालकीचे आहे त्याचा उहापोह इथे केलेला आहे. आता उहापोहाचा, चर्चेचा हा दृष्टिकोन विचारणीय का आहे - हा प्रश्न लगेचच समोर येतो. त्याचे किमान अंशत: उत्तर हे की - मालमत्तेच्या अधिकाराच्या परिभाषेतील कळीचे वाक्य हे - The "main allocative function of property rights is the internalization of beneficial and harmful effects" (externalities).
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मालमत्तेचे अधिकार हे स्पष्टपणे व्यक्त केलेले असणं हे अत्यंत इष्ट. पण हे त्या मालमत्तेला लागू पडतं की जिच्या सीमारेषा, हद्दी व्यवस्थित आखता येतात. उदा. घराच्या भिंती व जमीनीच्या हद्दी सुनिश्चित करणे हे खूप अवघड, जिकीरीचे नाहीये. Search, information, (and to a great extent) negotiation costs are low. Policing & monitoring costs are high in some countries and low in some other countries.

टेड टॉक वरती मागे एक भाषण ऐकले होते. त्या वक्त्याच्या मते आता 'ॲमेझॉन ड्रोन्स' वगैरेंमुळे, अवकाशातील सद्दी, घराच्या वरील अवकाशावर, किती उंचीपर्यंत त्या व्यक्तीचा मालकीहक्क असावा व त्या व्यक्तीच्या खाजगीपणावरती गदा येऊ नये वगैरेदेखिल ठरवावे लागणार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

रिलेव्हन्ट

https://writing.stackexchange.com/questions/17025/can-i-copyright-my-facebook-status-post

आणि दुसरी लिंक
https://www.facebook.com/help/1020633957973118

3. तुम्ही आम्हाला देत असलेल्या परवानग्या
आमच्या सेवा प्रदान करण्यासाठी आम्हाला तुमच्याकडून विशिष्ट परवानग्यांची आवश्यकता आहे:

तुम्ही तयार करत असलेली सामग्री वापरण्याची व शेअर करण्याची परवानगी: तुम्ही Facebook वर आणि तुम्ही वापरत असलेल्या इतर Facebook उत्पादनांवर तयार करत असलेल्या आणि सामायिक करत असलेल्या सर्व सामग्रीचे तुम्ही मालक आहात आणि त्यावर तुमचे अधिकार या अटींमधील कशानेही हिरावून घेतले जात नाहीत. तुमची सामग्री तुम्हाला हवी तिथे इतर कोणाही बरोबर सामायिक करण्यास तुम्ही मुक्त आहात. तथापि, आमच्या सेवा प्रदान करण्यासाठी, ती सामग्री वापरण्याकरिता तुम्ही आम्हाला काही कायदेशीर परवानग्या देणे आवश्यक आहे.
विशेषतः, आमच्या किंवा त्यांच्याशी संबंधित उत्पादनांवर जेव्हा तुम्ही बौद्धिक मालमत्ता अधिकार समाविष्ट असलेली सामग्री सामायिक, पोस्ट किंवा अपलोड करता (जसे की छायाचित्रे किंवा व्हिडिओ), तेव्हा तुम्ही तुमची सामग्री होस्ट करणे, वापरणे, तिचे वितरण करणे, त्यामध्ये सुधारणा करणे, तिची नक्कल करणे, सार्वजनिकरित्या पार पाडणे किंवा प्रदर्शित करणे, भाषांतर करणे आणि त्यातून साधीत कार्ये निर्माण करणे यासाठी (तुमच्या गोपनीयता आणि अनुप्रयोग सेटिंग्जशी सातत्यपूर्ण) एकाधिकार नसलेला, हस्तांतरणीय, उप-परवानायोग्य, स्वामीत्व-मुक्त, जगभरातील परवाना मंजूर करता. याचा अर्थ, उदाहरणार्थ, तुम्ही जर Facebook वर एखादे छायाचित्र सामायिक केले तर, ते संग्रहित करण्याची, कॉपी करण्‍याची आणि इतरांसह (पुन्हा, तुमच्या सेटिंग्जशी सातत्यपूर्ण) सामायिक करण्‍याची, जसे की आमच्या सेवांना सहाय्य देणार्‍या सेवा प्रदात्यांसह किंवा तुम्ही वापरत असलेल्या इतर Facebook उत्पादनांसह, सामायिक करण्याची तुम्ही आम्हाला परवानगी देता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रणव,
बरोबर आहे. अकाउंट उघडताना आपण मान्य करून हो मी सहमत म्हटल्यावर ते न वाचलेले नियम लागू होतात. फोटो, लेखन टाकण्याची किती घाई असते.

एकच उपाय - आपण काही फार काही चांगलं आणि नवीन लिहितो आहे असा समज असेल तर दोनचार ओळी लिहून - आणखी वाचा माझ्या ब्लॅागवर असं ठेवा.
वर्डप्रेसवर ***डॅाटवर्डप्रेसडॅाट कॅाम आणि सशुल्क ***डॅाट कॅाम ( पावर्ड बाइ लर्डप्रेस) हे शिवाय नेहमीचा ब्लॅागर- ***ब्लॅागस्पॅाट डॅाट कॅाम आहेच.
जुनी तारीख टाकून ब्लॅाग लिहिता येत नाही त्यामुळे तो एक मालकीचा पुरावा ठरू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0