अलीकडे काय पाहिलंत? - ३३

आधीच्या धाग्यात १०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू केला आहे.

-------

field_vote: 
0
No votes yet

'हैदर' पाहतो आहे. खूप अस्वस्थ करणारा सिनेमा. कधीतरी तपशिलात लिहीन म्हणून इथे जागा अडवून ठेवतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

"गेट आउट" नावाचा जबरदस्त थ्रिलर पाहिला. ट्रेलर बिलर न बघता डायरेक्ट पिक्चर बघा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुण्यात आल्या आल्या आधी हॅम्लेट आणि आज 'जरा समजून घ्या' चे प्रयोग पहायला मिळाले. त्यात हॅम्लेट ने पुष्कळ निराशा केली. नेपथ्य , संगीत , वेशभूषा आणि प्रकाशयोजना या आघाड्यांवर कुठलीच खास समज नव्हती. सुमित राघवन एक रोचक आणि दिलचस्प अभिनेता आहे पण त्याच्यामधल्या अनेक शक्यता नुसत्या दिलखेचक ( कधी कधी तर वगनाट्य श्टाईल मध्ये ) ड्वायलाग टाकून टाळ्या मिळवण्याच्या भानगडीत वापरून घेता आलेल्या नाहीत. अजूनही पुष्कळ लिहिता येईल , पण हॅम्लेट चे अनेक पदर या प्रयोगाला सापडलेले नाहीत आणि त्यामुळे एक अत्यंत बहुपेडी नाट्य-कथानक इथे सपाट करून देतात. संगीत ऐकून तर वैतागून गेलो ! हॅम्लेट आणि लिआर्ट्स मधील द्वंद्वयुद्धाची कोणतीही शारीरिक तयारी दिसत नव्हती ! आणि तलवारी वगैरे खऱ्या , तलवार म्यानातून काढल्याचा फुल्ल -हत्ती गणपती मंडळ - इश्टाईल -खांनननणण असा साऊंड इफेक्ट होता पण तलवार खुपसल्यानंतर रक्त वगैरे काही आलेलं नव्हतं! नाटकातील नाटक हा इतका जबरदस्त आणि स्ट्रॉंग आणि दुर्मिळ प्लॉट असलेलं हे नाटक आहे , पण त्याचा देखील प्रभावी वापर -म्हणजे अभिनय शैलीमध्ये काही बदल , उत्तम आणि लाईव्ह गाणी - नव्हता !! एक ना दोन अनेक तक्रारी आहेत ! हे झालं मंचावर घडणाऱ्या गोष्टींचं ! प्रेक्षक ही कमी नव्हतेच ! हशा आणि टाळ्या कुठे द्याव्यात याचं एक ट्रेनिंग सेशन घ्यावं का प्रेक्षकांचं असं वाटण्याइतपत लोक कुठेही हशा आणि टाळ्या देत होते ! असो !

जरा समजून घ्या - आत्ताच पाहून आलो. मुळात या प्रकारचं चर्चा नाट्य हा माझा आवडता प्रकार नाही, तरीही मोहन आगाशे यांचा करिष्माच भारी आहे. चटपटीत , मनोरंजक , ८० च्या दशकांतील नाट्य दिग्दर्शनाचा थोडासा पोत असलेलं ( मला किंचित संजय पवारांची आठवण होत होती , पण तो पूर्वग्रह असू शकतो) , तरीही आजच्या दैनंदिन आणि घरोघरी आत्यंतिक परिचित असणाऱ्या टीव्ही पे चर्चा फॉरमॅटचा चतुर आणि योग्य दृक-श्राव्य वापर करून हा प्रयोग छान लय घेतो ! आता यातली चर्चा , त्याचा विषय , त्यातले ताणेबाणे यावर खूप बोलावं , लिहावं लागेल , त्यातही सर्वच गोष्टी आवडल्या , पटल्या असं नाहीच; तरीही मोहन आगाशे अखेरपर्यंत त्यांची जादू पसरवत राहतात आणि इतर कलाकार त्यांना योग्य साथ देतात ! वा ! मजा आया!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

शास्त्रीय समजुती किती खऱ्या किती खोट्या -
लिंक:https://youtube.com/watch?v=GtE6l1_Pl5s
( docu. 42:00)
__________________

आदूबाळ आणि सर्व_संचारी यांच्या पुढच्या खरडींवर लक्ष ठेवून आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरेच दिवस मराठी चॅनेलवर अर्धवट बघितलेला, गजेंद्र अहिरेंचा अनुमती, हा मराठी चित्रपट संपूर्ण पाहिला. त्यानंतर या दिग्दर्शकाचे नांव, अजेंद्र गहिरे ठेवावे, असे वाटले. बाळ गाडगीळांनी वापरलेला 'मेलोमेलोड्रामा' हा शब्द या चित्रपटाला चपखल बसतो. बायको कोमात, निवृत्त शिक्षकाकडे तुटपुंजे पैसे, उच्च शिक्षण न घेतल्यामुळे मुलाची साधारण नोकरी, जावयाची फारशी आर्थिक मदत करण्याबद्दलची अनिच्छा, बापाची आणि मुलीची घुसमट आणि बायकोला कृत्रिम रीत्या जिवंत ठेवायचे की नाही याची अनुमती द्यायला नायकाचा विरोध, याभोवतीच चित्रपट फिरतो. त्यांत नायक विक्रम गोखले असल्यामुळे, भावनांचे ओव्हरॲक्टिंग करतानाच अंडरप्ले केल्याचा अभिनय स्वाभाविकच. नटसम्राट टाईप भावनिक कांगाव्याचे क्षणोक्षणी दर्शन घडते. त्यांतल्या त्यांत, रीमा लागूने नॉर्मल अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे, पण तिलाही, मराठी नाटकातील टिपिकल, 'मस्तपैकी कॉफी', हा वाकप्रचार काही टाळता आला नाहीये. बाकी सई ताम्हणकर, सुबोध भावेला घेतलंय एवढंच!
हल्ली माझ्या मेंदूतली एकामागोमाग अनेक केंद्रे, असंवेदनशील, झाली असल्यामुळे, हा चित्रपट बघताना मी निर्विकारच राहिलो. चित्रपटभर, तो दाढीचे पांढरे खुंट वाढलेला, पाणावलेल्या डोळ्यांचा, भप्प चेहेराच माझ्या डोळ्यांवर आदळत राहिला. त्यावर उतारा म्हणून, पाठोपाठ सुरु झालेला, 'मुंबई-पुणे-मुंबई भाग १' पण बघून टाकला.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

विक्रम गोखले यांचा ओव्हर ऍक्ट करतानाच अंडरप्ले करण्याचा स्वाभाविक अभिनय' हे आवडलं. बादवे मेलो मेलो ड्रामा हे मुकुंद टाकसाळे यांचं आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"नायक विक्रम गोखले असल्यामुळे, भावनांचे ओव्हरॲक्टिंग करतानाच अंडरप्ले केल्याचा अभिनय स्वाभाविकच." हे मलाही फार आवडलं. "नटसम्राट टाईप भावनिक कांगावा" हेही भारी आहे. त्याच मुशीतून आलेली "मस्तपैकी कॉफी" माझ्याही डोक्यात जाते. कडवट लोकांनी पिण्याचं पेय आहे ते, "मस्तपैकी" कसली डोंबलाची!

'मुंबई-पुणे-मुंबई'बद्दल तुमचं काय मत पडलं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुंबई-पुणे-मुंबई १'

उगाचच कानाखाली काढाविशी वाटावी असा सिनेमा आहे. बोअरिंग आणि मद्दड!!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगी घाण अन चिखलची सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा,
पदोपदी मज कमळ घालते, गुणगंधाचा नवा उखाणा

>>> पण तिलाही, मराठी नाटकातील टिपिकल, 'मस्तपैकी कॉफी', हा वाकप्रचार काही टाळता आला नाहीये.
--- खी: खी: खी:! मराठीतले एक सदैव 'कार्यरत' असणारे लेखक आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन आपण कसे भरभरुन जगणारे रसिक आहोत याचं फेसबुकवर प्रदर्शन मांडणारे किञ्चितलेखक यांच्या स्वच्छंदपणे जगण्याच्या लक्षणांत सदैव 'बाहेर पडणारा पाऊस - अहाहा - टेकडीवर फिरायला जाणं - अहाहा - मस्तपैकी वेलची घालून केलेल्या कॉफीचा वाफाळता मग - अहाहा - आयुष्य सुंदर आहे - अहाहा' असं डोकावत असतं, ते आठवलं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...पुण्यात आता स्टारबक्स, झालेच तर गेला बाजार सीसीडी नाहीतर बरिस्ता पोहोचले आहेत ना?

(इफ आय अॅम नॉट मिष्टेकन, मागच्याच भेटीत फ.कॉ.रोडवर की कुठेशीक स्टारबक्षात डोकावल्याचे अंधुकसे आठवते. आणि एक-दोन भेटींमागे कुठेशीक सीसीडीतही टपकलो होतो असे वाटते. सो, अनलेस आय वॉज़ हॅल्यूसिनेटिंग, पुण्यात स्टारबक्स नि सीसीडी आहेत.)

बरे, स्टारबक्स/सीसीडी मरूद्यात, वैशाली/रूपाली/पुण्यातली तमाम उडपी रेष्टारण्टे वारली तर नाहीत ना?

नाही म्हणजे, डोंट गेट मी राँग. मस्तपैकी वेलची घालून केलेल्या कॉफीच्या वाफाळत्या मगाशी - ज्या काहीशा पारंपरिक कॉफीस, इफ आय अॅम नॉट मिष्टेकन, मागल्या पिढीत 'मैफिलीतली कॉफी' किंवा 'संगीत कॉफी' म्हणून ओळखले जात असे - आपले काहीही वाकडे नाही. इट हॅज़ इट्स ओन प्लेस. आपल्याला आवडते ब्वॉ. ("कारण शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार?" - पु.ल.) गोग्गोड असते, दुधाळ असते, परंतु तरीही आवडते. (पण त्या ठराविक माहौलातच. एरवी आवर्जून पिईनच, अशातला भाग नाही.) (आख़िर रूट्स का मामला है, बाबा!)

तर आपला आक्षेप 'मस्तपैकी' वेलची घालून केलेल्या वाफाळत्या कॉफीस नाही, तर तीस अंतिम सत्य मानण्यास, कॉफीजगतात त्यापलीकडेही काही असू शकते, हे नाकारण्यास वा त्याकडे ढुंकूनही न पाहण्यास आहे. माणसाने संगीत कॉफी प्यावी, उडप्याकडची प्यावी, दोन भांड्यांतून खेचूनखेचून मद्राशीष्टाइल प्यावी, एस्प्रेसो प्यावी नि कडक काळीकुट्ट तुर्कीसुद्धा प्यावी. जायफळ घालून प्यावी, वेलची घालून प्यावी, दालचिनीची पूड घालून प्यावी नाहीतर काहीही न घालता प्यावी. बिनदुधाची प्यावी, दूध घालून प्यावी, फेसाळती प्यावी, नाहीतर वरून फेस टाकून प्यावी.

असो चालायचेच.

..........

हीतसुद्धा अनेकदा वेलची घालतात, बरे का! पण साखर (असलीच तर) बेताचीच असते, नि दूध अजिबात नसते.

, इटालियन कापुचिनोवर वरून जायफळाची किंवा दालचिनीची पूड शिंपडली, तर ती अपस्केल. तुर्की कॉफीत वेलची घातली, तर ती एक्सॉटिक. खुद्द इटालियन कापुचिनोत वरून घातलेले फेस आणि वाफाळते दूध यांचे मिश्रण म्हणजे क्या कहने! पण आमची भटांची, 'मस्तपैकी' वेलची घातलेली 'वाफाळती' कॉफी तेवढी डौनमार्केट? यह कौन सी बात हुई?

(आणि गोग्गोडचेच म्हणाल, तर कधी खाली मायॅमीच्या बाजूला गेला असाल, तर तेथील क्यूबन उल्हासनगरात जे 'काफे कुबानो' नामक एवढ्याशा कपातले एस्प्रेसोमधले साखरेचे संपृक्त द्रावण मिळते, ते तेवढे 'एथ्निक' म्हणून लै भारी होय?)

टिपिकल अमेरिकन ब्लॅक कॉफी हा प्रकार मला व्यक्तिशः तितकासा आवडत नाही. वेळप्रसंगी चालवून घेतो झाले. परंतु तरीही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आंबेमोहोराचा मऊ गुरगुट्या तोही वाफाळता वगैरे भात.
वाफाळता भात वर पिवळे धम्मक वरण. त्यावर तुपाची ( नुसते तूप नव्हे, साजुक तूप) धार. लिंबाची फोड वगैरे
नवीन आठवणी: भुट्टा वुइथ पाऊस (रिमझिमता- हातात हात , धुवांधार कोसळता वगैरे). ऑर भुट्टा वुइथ कडाक्याची थंडी धुके वगैरे. मगदुराप्रमाणे पेग वगैरे.सोनेरी फसफसते कडवट घसा जाळीत इ.
अति जुन्या आठवणी: धारोष्ण निरसे दूध कडब्याच्या वासासकट, वैलावरचे खरपूस सायवाले दूध
क्वचित कधीमधी फडफडते मासे, कालवण हुमण सुक्के वगैरे.
बाकी अधून मधून मऊसूत पोळ्या-तुपाची वाटी, ' थाल्पिट' , निखारा चूल भाकरी.. आंबाडीची भाजी वर जिवंत किंवा कशीही लसणी/णाची फोडणी...

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"ᴴᴰ [Documentary] Fukushima - Radioactive Forest" युट्युबवर.
आपण सुटलो/ पळालो, प्राण्यांचं काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मागच्या आठवड्यात कधी तरी 'मुरांबा' नामक मराठी चित्रपट नेटफ्लिक्सवर बघितला. तो बघितला एवढी शिक्षाच माझ्यासाठी पुरेशी आहे का चमचाभर पाण्यात जीव देण्याशिवाय गत्यंतर नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अगदी कंटाळवाणा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगी घाण अन चिखलची सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा,
पदोपदी मज कमळ घालते, गुणगंधाचा नवा उखाणा

मुरांबा आणि तत्सम चित्रपट फक्त ममवं साठी असतात. ऐसीकर, कंपुबाज आणि तत्सम लोकांसाठी नसतातच ते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

महाबोर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र पिक्चर. सतत बद्धकोष्ठी पेन्शनराचे भाव वागवत हिंडणारा च्युत्या हिरो, त्याचे मूर्ख आणि भोचक आई-बाप, चिकणी पण ह्या भोप्याचा पिच्छा न सोडवू शकणारी हिरोईन, पानचट संवाद.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

हाहाहा अगदी अगदी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगी घाण अन चिखलची सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा,
पदोपदी मज कमळ घालते, गुणगंधाचा नवा उखाणा

काय? म्हणजे हा चित्रपट नितांतसुंदर नाही????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

कौशल्य आणि कला यांतला फरक न समजणारे गोग्गोड लोक अाणि त्यांचा गोग्गोडपणा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरंच कसे सुचतात असे सिनेमे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सिनेमाने स्वप्ने विकावी, प्रचार करावा, लोकजागृती करावी, प्रेक्षकाला अस्वस्थ करावं. यापैकी एकही करत नाही हा सिनेमा. मग काय पहायचं काय त्यात????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगी घाण अन चिखलची सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा,
पदोपदी मज कमळ घालते, गुणगंधाचा नवा उखाणा

कुणी नंदिता दासचा 'मंटो' पाहिला का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बहुचर्चित तुंबाड पाहिला. धारपांचा आत्मा सापडेल अशा आशेनं गेलात तर निराश व्हाल. सोहम शाह तुम्हाला आय कँडी वाटत असला तर मोठ्या पडद्यावर ओलेत्या आणि अर्धनग्न अवस्थेत तो बराच काळ बघायला मिळेल ह्या कारणासाठी जाऊ शकता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जंतूजी तुम्ही दोन वाक्यांत तुंबाडला उडवून लावलंत!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

नारायण धारपांचं काहीही वाचलेलं नाही. पण आता एवढी रसभरीत वर्णनं केल्यावर तुंबाड बघावा लागणार. कधी येईल तो नेटफ्लिक्सवर? घरचा, मोठ्या टीव्ही सोफ्यावर बसून बघितला की मोठ्या पडद्याचा आनंद ऑलमोस्ट मिळतो. सिनेमा चालतोय का बराच, तसं असेल तर कदाचित नेटफ्लिक्सवर इतक्यात येणार नाही. ख्रिसमसची सुट्टी कारणी लावता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भयपट पहायची हिंमत होणार नाही पण धारपांनी रंगविलेले समर्थ (समर्थच ना?) पहावेसे वाटतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगी घाण अन चिखलची सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा,
पदोपदी मज कमळ घालते, गुणगंधाचा नवा उखाणा

कुठेतरी श्री राही अनिल बर्वे यांची मुलाखत वाचली. ते म्हणाले की तुंबाडची कथा त्यांना एका मित्राने फार पुर्वी नागझिऱ्याला सांगितली. नंतर त्यांनी जेव्हा धारपांची कथा वाचली तेव्हा त्यांचा अपेक्षाभंग झाला. नेमके शब्द आठवत नाही पण त्यांना कथा फारच उथळ वाटली. मी स्वत: धारपांची दोन-तीन पुस्तके वाचली आहेत आणि धारप हे सामान्य दर्जाचे लेखक आहेत असे माझे मत झाल्याचे स्मरते. कदाचित पुन्हा वाचतांना मत बदलेल. पण रत्नाकर मतकरी आणि धारप हे उगाचच उचलुन धरलेले लेखक आहेत हे मत मी ठामपणे मांडतो. आणि या मताच्या पुष्ट्यर्थ काही लिहीण्याची जबाबदारी निर्लज्जपणे नाकारतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राही स्वत: अनिल बर्व्यांच्या लिखाणाला बोअर म्हणून निकालात काढतो. त्याच्या मते मराठीतला पहिला आणि शेवटचा जागतिक दर्जाचा लेखक म्हणजे जी. ए.
त्याची पुढची मेगा-बजेट फिल्म ही जी. एं. च्या विदूषक कथेवर आहे. रक्तब्रम्हांड म्हणे!
कालच विदूषक पुन्हा वाचली. ह्या शब्दबंबाळ डायलॉगी कथेला पडद्यावर कसे दाखवणार हे फार औत्सुक्याचे आहे.
विदूषकात अभयराज आणि विजयराज प्राथमिक दिव्ये ऑलरेडी पार करून आलेली असतात. ही दिव्ये सामान्य प्रजाजनांनी सुचवलेली असतात. ही दिव्ये उदा. पर्वताच्या एका कड्यावरून दुसऱ्या कड्यावर लोंबकळत जाणे इत्यादी टाइपची आहेत. आता चित्रपट जर ही प्राथमिक दिव्ये दाखवणार असेल तर त्याचा बाहुबली होऊ नये म्हणजे झालं!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

नंतर त्यांनी जेव्हा धारपांची कथा वाचली तेव्हा त्यांचा अपेक्षाभंग झाला. नेमके शब्द आठवत नाही पण त्यांना कथा फारच उथळ वाटली.

धारप हे सामान्य दर्जाचे लेखक आहेत असे माझे मत झाल्याचे स्मरते.

इथे मुद्दा तो नाही. जर चित्रपटाचं कथाबीज धारपांच्या कथांवरून घेतलेलं आहे अशी जाहीर सूचना त्यात दिलेली असली, तर धारपांच्या कथांचा चित्रपटाशी कसा संबंध लागतो ते पाहण्यासाठी धारप आवडावेत किंवा श्रेष्ठ दर्जाचे वाटावेत अशी गरज नाही. दिग्दर्शकाला धारपांची कथा जर उथळ वाटली असेल, तर मग त्यात तिला पडद्यावर आणावं असं काय त्यात दिसलं हेसुद्धा पाहावं लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तेव्हा ग्रंथालयात त्यांची पुस्तके शोधतांना कसले जाम थ्रिलींग फील यायचे.
नावे आठवत नाहीत आता पुस्तकांची, पण तो उत्साह अजुनही आठवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मलाही फार आवडायची धारपांची पुस्तके.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगी घाण अन चिखलची सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा,
पदोपदी मज कमळ घालते, गुणगंधाचा नवा उखाणा

अंधाधून व तुंबाड हे दोन सिनेमे पाहिले. दोन रविवार मस्त गेले.
अफाट मेहनत घेतलीये दोन्हीही दिग्दर्शकांनी हे दिसतं. डिटेलिंग, स्ट्राँग कथा, पदोपदी उत्कंठा वाढवणारं संगित आणि मुख्य कलाकारांचा संयत, समजुतदार अभिनय यामुळे पिक्चर्स जबरदस्त झालेत. राघवन आणि राही यांच्या पुढच्या प्रोजेक्ट्सवर लक्ष असेल यापुढे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अफाट मेहनत घेतलीये दोन्हीही दिग्दर्शकांनी हे दिसतं. डिटेलिंग, स्ट्राँग कथा, पदोपदी उत्कंठा वाढवणारं संगित आणि मुख्य कलाकारांचा संयत, समजुतदार अभिनय यामुळे पिक्चर्स जबरदस्त झालेत.

अंधाधुनबद्दल हे विधान ठीक आहे, पण स्ट्राँग कथा आणि मुख्य कलाकारांचा संयत, समजुतदार अभिनय हे तुंबाडचं वैशिष्ट्य खरंच वाटलं का? मला तर सोहम शाहनं पैसा घालून स्वतःला सगळ्या अंगांप्रत्यंगांनी दाखवत ठेवण्याचा अट्टहास केलाय असं वाटलं.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सहमत, मला तर हस्तरपेक्षा जास्ती डेंजर तो सोहम शाहच वाटला, साला हावरट मेक्स अ डील विथ द डेव्हिल हिमसेल्फ. त्याची ती आज्जीही तितकीच डेंजर आहे बायदवे....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पंजाबी कौटुंबिक मूल्यांचा उदोउदो करणारा फील-गुड सिनेमा पाहायला आलो आहोत हे एकदा मान्य केलं तर 'बधाई हो' गंमतीशीर आहे. किंबहुना, मराठी मध्यमवर्गीय मूल्यांचा उदोउदो करणारा फील-गुड सिनेमा बनवणारे लोक त्यापासून बरंच काही शिकू शकतील. उदा. सेंटी क्लायमॅक्सपर्यंत जाण्याआधी ममवंची चांगली खिल्ली कशी उडवायची, टोकदार संवाद कसे लिहायचे, प्रसंगांना चढउतार कसे द्यायचे, भाषेची गंमत कशी साधायची, पात्रांमध्ये रंग कसे भरायचे, आणि हे सगळं कमी बजेटमध्ये कसं साधायचं, इ. इ. थोडक्यात, आजच्या ममवसाठी बनवला जाणारा सिनेमा किती कल्पनादरिद्री आहे त्याची कल्पना येण्यासाठी आणि कोथरूडमधला ममव मधल्या वारीही गर्दी करून फुल एन्जॉय करेल असा सिनेमा कसा असतो ते पाहण्याचा हा उत्तम मार्ग आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

थोडक्यात, आजच्या ममवसाठी बनवला जाणारा सिनेमा किती कल्पनादरिद्री आहे त्याची कल्पना येण्यासाठी आणि कोथरूडमधला ममव मधल्या वारीही गर्दी करून फुल एन्जॉय करेल असा सिनेमा कसा असतो ते पाहण्याचा हा उत्तम मार्ग आहे.

आमच्या गरीब गावात पूर आला, पण 'तुंबाड' नाही आला. पुराबरोबर 'बधाई हो'मात्र आला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मराठी मध्यमवर्गीय मूल्यांचा उदोउदो करणारा फील-गुड सिनेमा बनवणारे लोक त्यापासून बरंच काही शिकू शकतील.

हे एकदम मस्त. हलली मला मराठी ममव चित्रपटांमधली ममव घरे म्हणजे अँटीक गोष्टींचे वस्तुसंग्रहालय आहे का काय असे वाटते.

- ओंकार.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नीना गुप्ता कितीही चांगली नटी असली तरी ती साठीची आहे. आणि दिसतेही तेवढी. चित्रपट माध्यमात दृक आणि श्राव्य बाजू कशीही धकवून कसं चालेल ? हे म्हणजे लिमिटेड माणुसकीमधे रजत कपूरने मुळीच मेहनत न घेतलेलं अ-मराठी ऐकावं लागण्यासारखंच आहे. रेणुका शहाणे अधिक शोभली असती. मी नाही पाहिलाय हा सिनेमा पण माझ्या स्त्री कलीग्जना त्यात काही जीव आहे असं वाटलं नाही. प्रौढांचे कामजीवन या विषयासाठी एवढं शर्करावगुंठन लागावं हे त्यांना पटलंच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

हेच म्हणतो! ठीकठाक सिनेमा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

पुन्हा रिव्हर आॅफ नो रिटर्न पाहीला. आवडता सिनेमा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगी घाण अन चिखलची सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा,
पदोपदी मज कमळ घालते, गुणगंधाचा नवा उखाणा

बधाई हो हा चित्रपट मुळात कामजीवनाविषयी नाहीच. उत्तर हिंदुस्थानी कुटुंबात, जिथे घरच्या कर्त्या स्त्रीला दुय्यम दर्जा मिळतो (किंवा ममव चा तसा समज आहे ) अशा कुटुंबातल्या विविध नात्यांविषयीचा हा चित्रपट आहे, असं मला वाटलं. नीनाची सासू आणि दोन्ही मुलगे शेवटी तिच्या बाजूने कसे उभे राहतात ही कथेतली मजा आहे. बाकी पंजाबी माहोल वगैरे मान्य. आणि आमिर खान इ. पन्नाशीतले हिरो चालतात तर नीना चालवून घ्यायला माझी हरकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'Bohemian Rhapsody' बघितला.सामान्य चित्रपट आहे. क्वीन बद्दल थोडीफार माहिती असलेल्या मंडळींना या चित्रपटात काही विशेष मिळणार नाही. ओरिजिनल गाणी मोठ्या पडद्यावर आणि चांगले अकॉस्टिक्स असलेल्या थिएटर मध्ये बघायला मिळणे हा आनंद. शेवट लाईव्ह एड मधील परफॉर्मन्सने केली हे उत्तम.
( हा चित्रपट उत्तम वाटावा म्हणून की काय , याच्या समोरच्या स्क्रिनवर घाणेकर लावले होते).
आडयन्स पण सुमार.घसा साफ करून घेण्यासाठी हा योग्य चित्रपट होता. पण सगळी जनता गप्प होती.
माझ्या दोन्ही बाजूला सभ्य आदरणीय, ज्यांच्या संगतीत मी सभ्य वागण्याचा प्रयत्न वगैरे करतो अशी मंडळी बसलेली असल्याने मी गप्प होतो. रॉकप्रेमीमॉब बरोबर जाऊन गाण्यांना मनसोक्त कोकलण्याचा आणि उरलेल्या वेळी दंगा करत टीपी करण्याचा चित्रपट.
आमच्या वेळचं पुणं नाही राहिलं.
असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्यासारख्या अजाण लोकांसाठी - क्वीन म्हणजे कंगना राणावत नव्हे. क्वीन नावाचा रॉक बँड.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा हा हा. मी अण्णांनी क्वीन केव्हा पाहिला याचा विचार करत होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

वरची खवचट श्रेणी मीच दिली आहे , हुकुमावरून ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नीलचा हा प्रतिसाद बघून : मला 'अनब्रेकेबल किमी श्मिड्ट' दोन-तीन भागांपुढे सहन झाली नाही. '३० रॉक'चाही कंटाळा आला. आता टीना फे म्हटलं की मी दूर राहते.

तिचं मेम्वॉर वाचलं होतं, ठीकठाक आहे. बराच काळ ती 'मी कशी सुंदर नाही' म्हणून उगाच रडारड करते. ग्रीक वंशाची असल्यामुळे कल्ल्यांचे केस गोऱ्या मुलींपेक्षा मोठे; केस तपकिरी आहेत, भुरे नाहीत; वगैरे. टीना फे आपण जाड असण्याबद्दल तक्रार करते आणि ती छापली जाते. मॉडेलिंग व्यवसायाबद्दल, त्याच्या बेगडीपणाबद्दल लिहिण्याची चांगली संधी, ती वाया घालवते. दोन्ही मालिका तशाच वाटतात; बेगडीपणावर विनोद करण्याची संधी घालवणं म्हणजे निगुतीनं स्वयंपाक करायचा आणि मग ऐन वेळी जेवायचंच नाही! आणि मग भरलेल्या ताटाला हिणवून दाखवायचं, "कसं फसवलं!"

दोन्ही मालिकांमधले विनोद अगदीच उठवळ वाटतात. साटल्य दिसलं तर पैसे वापस! थोडं बघून सोडून दिलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

व्हेरी सिक्रेट सर्व्हिस

नेटफ्लिक्सवरची मालिका - 'अ व्हेरी सिक्रेट सर्व्हिस' बघायला सुरुवात केली आहे. दोनच भाग बघून झालेत. फारच आवडत्ये ही मालिका.

१९६० सालात मालिका सुरू होते. आपण महायुद्ध जिंकलं, आपण मानवाधिकारांच्या बाबतीत अतिशय प्रगत आहोत आणि आपण फार प्रगत आहोत, असं फ्रेंच जनतेला वाटत आहे. त्याच काळात शीतयुद्ध सुरू आहे. आफ्रिकेतल्या कॉलन्यांमध्ये स्वातंत्र्ययुद्धं अंतिम टप्प्यांत आलेली आहेत. म्हणजे फ्रेंच जनता आपापल्या फेकांमध्ये रममाण आहे.

तेव्हा एका तरुणाची सिक्रेट एजंट म्हणून नियुक्ती होते. मध्यमवयीन, बेरड, बूर्ज्वा फ्रेंचांच्या नाटकी चाळ्यांमध्ये हा साधासा, गावंढळ तरुण थोडा हडबडलेला असतो. पण ते लोक त्याला महत्त्व देत आहेत म्हणून तो तिथे नोकरी सुरू करतो.

पहिल्या दिवसाच्या शेवटी तो बाथरूममध्ये जातो. तिथे एक उच्चभ्रू स्त्री, चेहऱ्यावर बेदरकारपणा घेऊन येते. "तुला भलत्या ठिकाणी आला आहेस, असं वाटत असणार", ती त्याला म्हणते. आपली मनस्थिती हिला बरोबर समजली असं त्याला वाटतो. तो तिचे आभार मानतो. "तुला माझा कळवळा आलेला पाहून बरं वाटलं," तो म्हणतो. तिच्या चेहऱ्यावरची बेदरकारी अजिबात कमी न करता म्हणते, "तू बायकांच्या बाथरूममध्ये आला आहेस."

फ्रेंचांची लाचखोरी, सुंदर बायकांपुढे पुरुषांनी लाळ गाळणं, बायकांनी त्यांचा उपयोग करून घेणं, थोडक्यात बूर्ज्वा आणि मध्यमवयीन-म्हाताऱ्या फ्रेंचांकडून जे चाळे अपेक्षित असतात, ते सगळे विनोद करण्यासाठी साटल्यानं वापरले आहेत. (ममव लोक चाळे करण्याच्या बाबतीत बाळू ठरतात. मग ममव विनोदही बाळू छापाचे होतात.)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरंच मजा आली कट्ट्याला. नंदन, नील, तिमा, संदीप हे लोक प्रथमच भेटले. जागा खरंच छान होती. नंतर विडीकाडी करताना अंगमलय डायरी वगैरे सिनेमांबद्दल गप्पाही छान झाल्या.

(खरडफळ्यावर चाललेली चर्चा धाग्यावर आणत आहे. -- व्यवस्थापक)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अंगमलय डायरी वगैरे सिनेमांबद्दल गप्पाही छान झाल्या.

काय चर्चा झाली? मी कालच बघितला, आणि आवडला. कट्ट्यावरचं काय मत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नेटफ्लिक्सवर दिसतोय हा सिनेमा. बघेन वेळ झाला की, लवकरच. सध्या 'अ व्हेरी सिक्रेट सर्व्हिस' बघणं सुरू आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यात चित्रित केलेलं लोकल राजकारण/गुन्हेगारी इतर तशा सिनेमांपेक्षा (उदा: वसेपुर) जास्त प्रभावी आहे. ते का? वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

त्यात चित्रित केलेलं लोकल राजकारण/गुन्हेगारी इतर तशा सिनेमांपेक्षा (उदा: वसेपुर) जास्त प्रभावी आहे. ते का? वगैरे.

वगैरे म्हणून उडवू नका ढेरेशास्त्री. तपशीलवार सांगा.

मला आवडलेल्या / जाणवलेल्या गोष्टी :
- एकरेषीय नसलेलं कथानक
- 'अन्न' या घटकाचा प्रभावी दृश्यवापर
- मारामाऱ्यांमधले अत्यंत पर्सनल असे अँगल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

'अन्न' या घटकाचा प्रभावी दृश्यवापर

याच मुद्यावरून चित्रपट आठवला होता कट्ट्यात. पोर्कभोवती फिरणाऱ्या कथानकाचं अप्रूप आणि लोकल ख्रिस्ती धार्मिक पार्श्वभूमी म्हणून रोचक वाटला होता. पात्रं बरीच अतरंगी आहेत, चित्रपट भरपूर गतिमान आहे. Benni chetaa अजगराचं मांस ज्या सहजतेने खाऊ घालतो(त्वचेला चांगलं असतं म्हणून) ते पाहून पिचचर तिथेच जिंकला आहे ते कळालं. लहानपणी मला कंबरेला चांगलं असतं म्हणून आमच्या एका शिकारी आज्ज्याने घोरपड खायला घातली होती. तेव्हा अगदी ditto वाटलं तो प्रसंग पाहून. (गेले ते दिवस!)

याबरोबरच माझ्या मित्रमंडळीत "प्रेमम" सिनेमाची पारायणं करण्याची प्रथा आहे! नावावरून टिपिकल दाक्षिणात्य ब्लॉकबस्टर वाटत असला तरी चित्रपट खूपच साधा सरळ आहे. माझ्यावर बॅन आणलाय तो मी अर्धाच पाहिला म्हणून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

'अंगमली'संदर्भातला आणखी एक मुद्दा आठवला - वेगळे/अपारंपरिक ताल असलेली गाणी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अंगमली'संदर्भातला आणखी एक मुद्दा आठवला - वेगळे/अपारंपरिक ताल असलेली गाणी.

येस येस. शिवाय अचानकच आलेलं दो नैना परिंदे हे गाणं. तेही किंचित दक्षिणी हेलात. नाहीतर आपल्याइथे हिंदी/ऊर्दूचा वापर कसा करतात गाण्यात ते ठाऊकच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

पलिकडेच बसून 'अंगमली' बघणाऱ्या माझ्या आईचा अभिप्राय : "एवढ्या मारामाऱ्या करून लुंग्या बऱ्या सुटत नाहीत यांच्या!"

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आदिती, रिव्हर पाहायला सुरू केलीय. पहिला एपिसोड पाहिला पण अजून पकड घेतली नाही मालिकेने. पुढे 'रोचक' आहे का? लीड तर जबरा अभिनय करतोय. सिक्रेट सर्व्हिस इकडे दिसत असेल तर नक्कीच पाहीन.

वन डे ऍट अ टाइम बिंजली. आवडली, डोक्यात जाईल असं वाटलं होतं पण खिदळणं पेरलेला मेलोड्रामा असल्याने बोअर झाली नाही. खरी मजा आली ती THE KOMINSKY METHOD पाहताना. Chuck Lorre मला जाम आवडतो + त्यात दोन मातबर नट. बऱ्याच दिवसांनी अशी मिश्किल मस्त मालिका पाहिली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

नील, धीर धरून रिव्हर बघच. मला बहुदा तिसऱ्या भागात रस वाटायला लागला. फारच छान मालिका आहे.

'अ व्हेरी सिक्रेट सर्व्हिस' बहुदा भारतात दिसेल कारण फ्रेंच आहे, भारतीय नाही. 'द कोमिन्स्की मेथड'चं पोस्टर बऱ्यापैकी आकर्षक वाटलं.

'नार्कोस - मेक्सिको', हा पुढचा अध्याय आलेला आहे, आणि आपद्धर्म म्हणून तोही बघेन. मात्र एकंदर चित्रण, दर्शन फार अमेरिकाकेंद्री असल्यामुळे हळूहळू कंटाळा आला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी व्हेनम पाहिला. मस्त टाईमपास आहे.
तुम्ही लोक ते वायर वगैरे अति इंटेलेक्च्युअल कसं पाहू शकता कोण जाणे. नार्कोज, सेक्रेड गेम्स, स्ट्रेंजर थिंग्ज इ. (अत्यंत कमी) सोडून नेटफ्लिक्स जाम ओव्हररेटेड वाटलं.
वायर जाम बोअर झाली. अतिच वास्तववादी वगैरे ठीक आहे म्हणा, फक्त कथेच्या उत्कंठेमुळे पहावी लागली. नीचभ्रू म्हणा की काहीही म्हणा.
(रॅंट लेख इन्कमिंग.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss

नार्कोज, सेक्रेड गेम्स, स्ट्रेंजर थिंग्ज इ. (अत्यंत कमी) सोडून नेटफ्लिक्स जाम ओव्हररेटेड वाटलं.

नेटफ्लिक्सचा मोठा उपयोग म्हणजे मला सब स्वतंत्ररित्या उतरवावी लागत नाहीत. मिडनाईट डिनर, वुड जॉब, सामुराई गुरुमे, डॉक मार्टिन, बिग सिक, हॅपी व्हॅली, माईंडहंटर, फार्गो, ओजे असली रत्नं सापडली. संदर्भासाठी काही चित्रपट पटकन पाहता येतात. शेरलॉक, orphan black, black mirror वगैरे यशस्वी कलाकार आहेतच. भारतीय भाषेतला चांगला चित्रपट टोरेंटवर मिळणे अवघड असते. ती खाज कधी कधी भागते. प्राईम आणि हे असे मिळून वापरले तर मला टोरेन्ट्स पालथे घालावे लागत नाही. क्लासिक animie फार कमी आहेत, पण सध्यापुरतं भागतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

उठवळ खरेदीसाठीही नेटफ्लिक्स चांगलं आहे.

उठवळ खरेदी - दुकानात जायचं आणि भाराभार वस्तू घेऊन घरी यायचं. कपडे, शोभेच्या वस्तू, ताटं-वाट्या-चमचे वगैरे. मग कोणते कपडे आपल्या अंगाला बसतात; कोणती ताटं आपल्या डायनिंग टेबलाशी जुळतात; कोणत्या शोभेच्या वस्तूंमुळे आपलं घर दिव्यज्योतीमय वाटतं; असं काही घरी येऊन बघायचं. मग उरलेल्या वस्तू परत द्यायच्या; त्यांचे पैसे परत मिळतात.

ही सगळी खरेदी क्रेडिट कार्डावर करायची, म्हणजे नको असलेल्या वस्तू दोन-चार बाळगल्याबद्दल आपल्या खिशातून दमडाही जात नाही.

नेटफ्लिक्स तशा खरेदीसाठी बरं आहे. मालिकेचा अर्धा भाग बघून ठरवलं पूर्ण बघायची का नाही; सिनेमाची पहिली पंधरा मिनीटं बघून ठरवलं; असं काही. शिवाय हे सगळं प्रकरण (आर्थिकदृष्ट्या न्याय्य आहे का नाही माहीत नाही, मात्र) कायदेशीर आहे आणि मध्यमवर्गीयांना परवडतील एवढ्या किंमतीत दर महिन्याला सेवा मिळते.

वस्तू जमा करून घरी ठेवायच्या, हा प्रकार भारतीय लोकांत फार बोकाळलेला नाही. सिनेमांच्या डीव्हिड्या आणि डिस्कां भरभरून सिनेमे ठेवण्यापेक्षा हे सोयीचं असतं.

भारतात सध्या नेटफ्लिक्सवर किती बरं सिलेक्शन येतं माहीत नाही; मात्र दोन-चार वर्षांपूर्वी हा पर्याय भारतात नव्हता; दहा-पंधरा वर्षांपूर्वी कुठेच नव्हता. हळूहळू किमान लोकप्रिय सिनेमे, मालिकाही तिथे दिसतील. कोणास ठाऊक, 'तुपारे'सुद्धा येईल नेटफ्लिक्सवर. मग आदूबाळची मर्जी राखण्यासाठी मी एखादा भाग बिट्टी धरून बघेनही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ॲमेझॉन प्राईमवरसुद्ध बरेच चित्रपट येतायेत.
सायफाय वाल्यांसाठी- फिलिप डिकच्या कथांवर आधारित एक सिरीज आहे, आणि the man in the high castle सुद्धा.

----------------

कुणी गॉडझिलाचे पंखे असतील तर नेटफ्लिक्सावर गॉडझिलाची नवी वेब सिरीज आहे. २ भाग आलेत स्वतंत्र. नक्की बघा, निदान पहिला भाग तरी.
जबरदस्त स्केल आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गॉडझिलाचे पंखे असतील तर नेटफ्लिक्सावर गॉडझिलाची नवी वेब सिरीज आहे. २ भाग आलेत स्वतंत्र. नक्की बघा, निदान पहिला भाग तरी.

पाहतोच. कुणाच्यातरी रेकोची आवश्यकता होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

बकेट लिस्ट पाहीला.
विशेष वाटला नाही. संकल्पना नवीन होती पण ती फुलवता आली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगी घाण अन चिखलची सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा,
पदोपदी मज कमळ घालते, गुणगंधाचा नवा उखाणा