मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९७
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---
जोरदार सहमती ओ ढेरेशास्त्री.
जोरदार सहमती ओ ढेरेशास्त्री.
.
सॉवेल म्हणाला होता की - अनेक डाव्या, फुर्रोगामी, नवफुर्रोगामी, मानवतावादी (उदा. अरुंधतीबाई) विचारवंतांना असं वाटतं की संपत्ती ही समहाऊ अस्तित्वातच असते व तिचे समसमान वितरण हीच एकमेव व मुख्य सोडवण्यासारखी समस्या उरलेली आहे.
.
दोन भाऊ संसारी. एकाकडे
दोन भाऊ संसारी. एकाकडे संपत्ती खूपच. आईला दोन्ही मुले सारखीच, किंबहुना मागे पडलेल्याचं भलं व्हावं हीच चिंता करत ज्याचं बरं चाललय त्याच्याकडे राहाते. त्याला आर्थिक मदत कर म्हणते. त्यातून भांडणं होतात.
देशातही हा डावा प्रवाह अधुनमधून जोर धरतो.
तर श्रीमंतांनी त्याच्या कष्टाने/ आयोजनाने/ इतर कारणांनी मिळवलेली संपत्ती किती प्रमाणात घेऊन वाटावी?
डाव्या विचारसरणीचे ९५%लोकांस आमिष दाखवून नेते निवडून येतात.
संपूर्ण डाव्या विचारांची सत्ता कोसळलल्याची उदाहरणे आहेत. नवया प्रकारचा समाजवाद नावाची लोकशाही चीन २०५० पर्यंत आणणार आहे. तीस टक्के साध्य केलं आहे. लोक म्हणतात पुर्वीची कॅाम्युनिस्ट पार्टी आता राहिली नाही.
श्रेणी सुविधा
श्रेणी देण्याची सुविधा काही मंडळीना आहे.
हेतू पुर्वक विशिष्ट लोकांना निरर्थक आणि पकाऊ श्रेणी वारंवार दिली जाते.
यामुळे योग्य प्रतिसादांना सुद्धा विनाकारण खालचा दर्जा देऊन वर्गभेद वाढवला जात आहे.
तरी श्रेणी देण्याची सुविधा सर्व सदस्यांना असावी अशी मागणी आहे.
सर्वांचे मत घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी व्यवस्थापनास हात जोडून नम्र विनंती.
आहे ती परिस्थिती तशीच राहिली तर अडणार नाही, पण उगाच जे डांबरट श्रेणी प्रदाते आहेत त्यांची मिजास कमी होईल ही अपेक्षा असल्याने हा मागणीचा घाट. अन्य काही कारण नाही.
श्रेणीसुविधा ही ऐसीची धोरणं
श्रेणीसुविधा ही ऐसीची धोरणं नुसती पाळणारांनाच नव्हे, तर ती आपली समजून ऐसीवर काही भरीव योगदान देणारांना मिळते.
योगदान म्हणजे काय?
चांगलं, वाचनीय, माहितीपूर्ण, दर्जेदार लेखन करणं.
चर्चांमध्ये सकारात्मक भाग घेणं.
'ऐसीच्या माध्यमातून मराठी लेखक वाचकांचं आयुष्य किंचित का होईना, प्रगल्भ करणं' हा ऐसीचा मुख्य हेतू आहे. जे या ध्येयाला हातभार लावताना दिसतात त्यांना श्रेणीसुविधा दिली जाते.
ज्यांना ही सुविधा हवी आहे त्यांनी आपल्या योगदानांची यादी पाठवावी. आम्ही जरूर विचार करू.
ऐसीचा मुख्य हेतू
ऐसीचा मुख्य हेतू
ही फ्रेज खूप चिंतनीय आहे.
========================================================
काही संकल्पनांच्या एकही शब्दाने विरुद्ध बोललं तर जिथे अजिबात खपवून घेतलं जात नाही ती जागा कोणाला प्रगल्भ कशी करणार आहे?
तर मंडळी प्रगल्भ करणे याबद्दलची ऐसीची संकल्पना काय ते पहा:
१. थेरपुरोगामी बनवणे - मंजे समाजावश्यक पुरोगामीत्व सोडून उगाच काहीही थेरं उचलून धरता आली पाहिजे.
२. नास्तिकाकडून अपमान सहन करून घेण्याची सहनशक्ती विकसित होणे.
३. कोणत्याही महान माणसाच्या चरित्राची खिल्ली उडवलेली असण्याची सवय होणे.
४. भारतीय संस्कृती फक्त आणि फक्त नीचच होती या बाजूने विचार झुकत जाणे.
५. संघ, भाजप आणि मोदी यांचेबद्दल ताळतंत्र सोडून काहीही बोलता येणे.
६. भारतीय असल्याचा न्यूनगंड निर्माण होणे.
७. काही विशीष्ट मतांचे लोक संस्थळावरून हाकलून लावण्यात कौशल्य प्राप्त असणे.
८. ईश्वरप्रणित, धर्मप्रणित व्यवस्था नाहीतच वा असल्यास त्या बूडवून प्रश्न कसे सोडवायचे याची सवय होणे.
९. पुरोगामी असल्यास कोणत्याही शास्ताचा कोणताही तांत्रिक अभ्यास असण्याची काहीही गरज नसते याची खात्री होणे.
१०. आपल्या कल्पनाविश्वातून काहीही दृढविश्वास विकसित करणे.
११. अन्य सार्वत्रिक चांगले, वाईट संस्थळांचे गुण.
=========================================================
काही प्रभूतींना आपला समाज-निरुपयुक्त माज व्यक्त करता यावा हा ऐसीचा मुख्य हेतू असावा.
योगदान
अर्थातच श्रेणी सुविधा हवी आहे. शिवाय माझ्या प्रत्येकच प्रतिसादाला निरर्थक श्रेणि देणारांची सुविधा काढून घेतलेली हवी आहे. किमान त्यांची नावे मला सांगण्यात यावीत मंजे मला कोणाला इग्नोर मारायचे ते कळेल.
============================
योगदानांची यादी:
कृपया सदस्याचे लेखन मधे जाऊन पहा.
१. १०-१२ वैचारिक लेख
२. २-३ सामाजिक विषयांवरील लेख
३. ५-६ ललित लेख
४. ऐसीवरील पुरोगामीत्वाची तावून सुलाखून परीक्षा घेत आलो आहे. मी इथे सतत विरोधी पक्ष नेता राहिलो आहे. (तो कॅबिनेट दर्जाचा असतो हे तुम्हाला माहित असेलच. हा हा.)
५. कोणतेही आधुनिकतावादी विधान आगा पिछ्छा न पाहता करायची प्रथा मी इथे बंद केली आहे.
६. मनातले छोटे मोठे विचार ही धागा मालिका मीच सुरु केली आहे.
७. ५०-६० प्रतिसादाला महाग असलेल्या ऐसीवर २००-३०० प्रतिसाद असलेले धागे मीच पाडलेले आहेत.
८. विरोध व निरर्थकता यातील फरक न कळणाऱ्या पुरोगामी लॉबीने भयंकर विचित्र वागूनही मी सुरुवातीला अनेक वर्षे भाषा नि विचार दोन्ही अत्यंत सभ्य नि सयंत ठेवले होते.
९. ऐसीच्या कट्ट्यांना इ हजर होतो.
१०. लोकांच्या धाग्यांवर कितीतरी प्रतिसाद.
११. ऐसीवर भारत, भारतीय संस्कृती, परंपरा, तत्त्वद्न्यान, धर्म, अस्तिकता, इतिहास, ग्रामीण, गरीब, इ इ चा पक्ष मांडला आहे.
१२. पुरोगामीतेच्या नावाखाली पुढे रेटलेल्या अनेक विकृतींचा विरोध केला आहे.
=============================
माझ्या प्रत्येकच लेखनाला पुन्हा भडकाऊ, पकाऊ, निरर्थक इत्यादी श्रेण्या (७-८ मधे १ ठिकै) देणाऱ्या लोकांचा अधिकार काढून घ्या.
वा ! अगदी मसापच्या कार्यालयात
वा ! अगदी मसापच्या कार्यालयात आल्यासारखं वाटलं.
अहो अण्णा जरा चार चहा आणि बिस्कीटं पाठवा पाहूण्यांना ! लांबून आलेत ते.
हं तर काय म्हणत होता? सदस्य व्हायचंय ? पण त्यासाठी लेखक असावं लागतं हो मुळात आणि ते असं शिकवून होत नाही.
आणि शाखा म्हणाल तर तीस चाळीस लोकांसाठी कुठे शाखा उघडणार तुमच्या गावात? एक तर सगळे वाचक
तुमच्यातले दोनचार जण वाचकांची पत्रे लिहीणार कुठल्यातरी सायं दैनिकात नाहीतर साप्ताहीकात !
अहो किमान मटा नाहीतर लोकसत्तेत तरी लेखन असायला हवं तर विचार केला असता
असो. तर या केव्हाही पुण्यात आला की दोन क्षण तेवढेच गावाकडची माणसं भेटली की बरं वाटत
या ! स्वागत आहे !
अरे काय झालं चहाचं? नाही तयार का ? असु दे ! यांना सुद्धा जायची घाई आहे. एस्टी चुकायची.
काहीही हं ... संयमित आणि
काहीही हं ... संयमित आणि सेन्सिबल म्हणवून घेणार लोक कायम तसेच वागत असल्याचा इतिहासात पुरावा नाही, वर्तमानात दिसत नाही, भविष्यात शक्यता नाही.
तुमच्या तथाकथित बुद्धीचे ढोल वाजवायचे तर वाजवा, पण आवाज टिमकीचा येतो त्याला तुमचा सुद्धा इलाज नाही याची खात्री आहे.
आय लव यू
आयकल का ? धर्मग्रंथाच्या चौकटीत बुद्धिवाद करत बसणे हा मुर्खपणा आहे. तो तसाच चालू ठेवायची माझी बिलकुल इच्छा नाही . मुहम्मद पैगंबर जगाच्या इतिहासावर प्रभाव टाकणारे थोर आणि कर्तुत्ववान पुरुष होते. हे मला मान्यच आहे पण . बस्स . पण .अल्ला , त्याचे देवदूत , ते देवदूत खाली येउन पैगंबराला सांगतात ते कुराण , कयामतचा दिवस , त्यादिवशी थडग्यातून उठणारे ते मृतदेह ,ते स्वर्ग ,ते नरक यापैकी कशावरही माझा विश्वास नाही . आणि यावर विश्वास ठेवतो तोच मुसलमान यावरही माझा विश्वास नाही . आणि धार्मिकतेतून मुस्लिमांचे भले होईल किंवा धर्माचा उपयोग मुस्लिमांच्या भल्यासाठी करता येईल हि मी अंधश्रद्धा मानतो .(1-122) आणि हे डरपोक हिंदू ! पुरोगामी हिंदुंची एक शोकांतिका आहे. नेमक्या कसोटीच्या निर्णयाच्या वेळी हा प्राणी आपण मुसलमानांहूनहि अधिक मुसलमान असण्याची बतावणी करतो आणि मुसलमानाला जरा कमी मुसलमान करण्याचा प्रयत्न करणार्या माझ्यासारख्याला तोंडघशी पाडतो ! (3-16)
हमीद भाई, आय लव यू!!
काय पुरोगामी हिंदूंची घेतलीत, मजा आ गया!!!!
वैयक्तिक आणि राष्ट्रीय
वैयक्तिक आणि राष्ट्रीय स्तरावरच्या अभिमान कुबड्या स्वाभिमान यांचे पैलू आणि अर्थ भिन्न असतात.
म्हणून स्वराज्याचा विचार करुन शिवाजी अफजलखानाला मी तुम्हाला खुप घाबरतो असं सांगतो, औरगजेबाला माझं चुकलं माफ करा सांगतो आणि वेळ आली की राज्याभिषेक करुन घेतो. (इथे सावरकरांचे सुद्धा उदाहरण चपखल असते पण पुरोगामी लोकांना सावरकर आवडत नाहीत.)
थर्ड वर्ल्ड म्हणजे थर्ड क्लास
थर्ड वर्ल्ड म्हणजे थर्ड क्लास असे बऱ्याच जणांना वाटत असते ते साफ चूक आहे. मुळात ती वर्गवारी खालीलप्रमाणे आहे:
फर्स्ट वर्ल्ड: अमेरिका विरुद्ध रशिया शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेचे साथीदार देश
सेकंड वर्ल्ड: अमेरिका विरुद्ध रशिया शीतयुद्धाच्या काळात रशियाचे साथीदार देश
थर्ड वर्ल्ड: अमेरिका विरुद्ध रशिया शीतयुद्धाच्या काळात अलिप्त देश
भारत अलिप्त आहे म्हणून तो थर्ड वर्ल्ड देश आहे. गरीब किंवा मागासलेला आहे म्हणून नाही. उद्या भारताचा जीडीपी १०० ट्रिलियन डॉलर्स इतका झाला तरीही तो थर्ड वर्ल्ड देशच राहील. कारण त्या व्याख्येत गरीबी इ. गोष्टींचा संबंधच नाही.
अलिप्त नव्हतं पण..
पाकिस्तान कधीच अलिप्त नव्हतं. ते अमेरिकेच्या गोटात होतं. तरीही त्या देशाला कोणी फर्स्ट वर्ल्ड म्हणू धजणार नाही. एक नंबर दोन नंबर तीन नंबरच्या व्याख्या तितक्याश्या काटेकोर नसाव्यात. किंवा हे वाक्प्रचार ज्या काळात निर्माण झाले त्या काळी कदाचित तसा अर्थ असावा पण आता कालौघात तो बदलला आहे. अलिप्त राष्ट्रगटाची एक अनधिकृत संघटना नेहरू, नास्सर, (टिटो?) वगैरेंनी बांधली होती तिचा आज मागमूसही नाही.
ता. क. : असे बघितले आहे की साधारणत: अमेरिकन भारतीयवंशी लोक थर्ड वर्ल्ड हा शब्द 'गरीब/ अविकसित/अर्धविकसित देशांचा समूह' अशा अर्थी वापरतात. गैरभारतीयवंशी पिढीजाद अमेरिकन लोकसुद्धा बहुधा याच अर्थाने हा वाक्प्रचार वापरीत असावेत.
सेॲटो
पाकिस्तान नाटोचा सदस्य नव्हता पण सेॲटो (South East Asia Treaty Organization)चा होता. ही संघटना कम्यूनिझ्मला अटकाव करण्यासाठी अमेरिकेने बांधलेली होती.
नाटो मध्ये अमेरिकेबरोबर कॅनडा आणि उत्तर यूरप सामील होते तर त्यानंतर(१९५४)साली बांधलेल्या सेॲटोमध्ये आग्नेय आशियायी देश सामील होते.
प्रिसाइजली
पाकिस्तान नाटोचा सदस्य नव्हता पण सेॲटो (South East Asia Treaty Organization)चा होता. ही संघटना कम्यूनिझ्मला अटकाव करण्यासाठी अमेरिकेने बांधलेली होती.
नाटो मध्ये अमेरिकेबरोबर कॅनडा आणि उत्तर यूरप सामील होते तर त्यानंतर(१९५४)साली बांधलेल्या सेॲटोमध्ये आग्नेय आशियायी देश सामील होते.
हाच फरक आहे. पहिल्या जगातल्या देशांनी मांडलिक देशांसाठी तयार केलेली ती संघटना होती. तशीच मध्य पूर्वेसाठी मेडो होती.
तेच तर
नाटो/नेटो - सीटो- सेंटो या सर्व संघटना मुख्यत्वे करून अमेरिका, ग्रेट ब्रिटन आणि काही ठिकाणी फ्रान्स यांच्या पुढाकाराने स्थापन झाल्या होत्या. त्यातील कित्येक सदस्य देश हे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या अप्रगत, अविकसित होते. पण त्यांच्यामध्ये सामायिक संरक्षण करार होता. ते अमेरिकेच्या गोटातले, अमेरिकेच्या बाजूचे आणि अमेरिकेच्या लष्करी छत्रछायेखाली वावरणारे देश होते तरीही त्यांची गणना फर्स्ट वर्ल्डमध्ये होत नव्हती.
बकवास नाही, ठीकठाक धोरण होतं.
बकवास नाही, ठीकठाक धोरण होतं. तुम्हा दोघांपैकी एकाच्या जनानखान्यात सामील होण्याऐवजी तुम्हा दोघांपैकी हवं तेव्हा हवं त्याच्याशी डेट करू, अशी काहीशी ताठर भूमिका होती. आत्ता या घडीला अमेरिकन किंवा रशियन सैन्याचे बेसेस आहेत का भारतात? एका बाजूला गेलो असतो तर इतक्या लवकर अण्वस्त्रं तयार करता आली असती का?
एका बाजूला गेलो असतो तर
एका बाजूला गेलो असतो तर इतक्या लवकर अण्वस्त्रं तयार करता आली असती का?
.
.
अलिप्त राष्ट्र परिषदेची स्थापना १९५६ मधे झाली.
चीन तिचा सभासद नव्हता. ऑब्झर्व्हर आहे.
चीन हा वॉर्सॉ पॅक्ट चा सदस्य नव्हता.
चीन् नेटो चा सदस्य नाही व नव्हता.
चीन ने १९६४ मधे अण्वस्त्र चाचणी केली.
म्हंजे आपल्यापेक्षा सुमारे १० वर्षे आधी.
.
.
तेव्हा आपली अण्वस्त्रचाचणी व अस्त्र निर्मीती ही अलिप्त राष्ट्र परिषदेच्या सभासदत्वामुळे किंवा एका बाजूला गेलो असल्या/नसल्यामुळे शक्य झाली असं म्हणायला फारसा वाव नाही.
.
.
----------------
.
.
आत्ता या घडीला अमेरिकन किंवा रशियन सैन्याचे बेसेस आहेत का भारतात?
.
.
(१) क्युबा हा अलिप्त राष्ट्र परिषदेच्या १९६१ मधल्या सभेस सभासद म्हणून् उपस्थित होता. १९६२ मधे सोव्हिएत युनियन ने त्यांचा क्युबा मधे तळ उभा करायला सुरुवात केली व त्यातूनच क्युबन मिसाईल क्रायसिस घडला. त्यापूर्वी बे ऑफ पिग्स् चे आक्रमण पण झालेले होते.
(२) दुसरे उदाहरण फिलिपिन्स हा १९९३ पासून अलिप्त राष्ट्र परिषदेचा सभासद आहे. पण १९४५ पासून अमेरिकेचे फिलिपीन्स मधे लष्करी तळ आहेत. १९४५ मधे करार झाला होता.
(३) १९६१ मधे अफगाणिस्तान अलिप्त राष्ट्र परिषदेचा सभासद झाला. १९७७ मधे सोव्हिएत युनियन ने अफगाणिस्तानवर हल्ला केला व तिथे सुमारे १० वर्षे होते.
(४) बहारिन मधे अमेरिकेचा नौदल तळ १९७१ पासून आहे व बहारिन हा १९७३ पासून अलिप्त राष्ट्र परिषदेचा सभासद आहे. तिथे अमेरिकेचे पाचवे आरमार (Fifth Fleet) आहे.
सबब अलिप्त राष्ट्र परिषदेचे सभासदत्व हे महासत्तांचे भारतात तळ असण्याप्पासून रोखण्यासाठीचे कवच नाही.
.
.
A=>B does not mean opposite(A
A=>B does not mean opposite(A) => opposite(B).
संलग्न असल्यामुळे बेस होतात, याचा अर्थ संलग्न नसल्यामुळे (अलिप्त असल्यामुळे) होत नाहीत असा नाही. पण संलग्न असल्यावर नक्की होतात.
चीन परिषदेचा सभासद नसला तरी अलिप्तच होता आणि आहे. क्यूबा सभासद असला तरी अलिप्त नाही/नव्हता. अलिप्त असणं आणि सदस्य असणं यातली गल्लत टळली की तुमचे युक्तिवाद माझ्या बाजूचे होतात.
नाय पटलं.
नाय पटलं.
.
चीन परिषदेचा सभासद नसला तरी अलिप्तच होता आणि आहे.
.
हे जर तुम्हाला पटत असेल ..... आणि तरीही चीन अण्वस्त्र बनवण्यात यशस्वी झाला व ते सुद्धा आपल्या आधी १० वर्षे - तर संघटना बांधायचे फायदे आपल्याला काय मिळाले - अण्वस्त्र कार्यक्रमात ?
फक्त अलिप्त आहोत असं घोषित केलं असतं तरी काम झालं असतं की.
संघटना बांधल्यामुळे किंवा तिचा सदस्य असल्यामुळे अण्वस्त्र निर्मीतीचा कार्यक्रम जास्त लवकर सुरु करता आला, यशस्वी झाला असं म्हणता येतंय का ?
संघटनेचे फायदे कोणते ?
.
.
भारताने सोव्हिएत युनियन कडून शस्त्रं घेणं १९६७ मधे जोरदार सुरु केलं. १९७२ मधे सोव्हिएत युनियन बरोबर मैत्री करार केला व आपण सोव्हिएत युनियन च्या कँप मधे गेलो. अर्थनीतीच्या दृष्टीने आपण त्यांच्याबरोबर होतोच. पण लष्करी व जिओपोलिटिकल दृष्टीने १९७२ नंतर आपण त्यांच्या कँप मधे गेलो. त्यांनी आपल्याला मदत केली हे सुद्धा तितकेच खरे आहे. तसेच हे सुद्धा खरं आहे की १९६२ च्या भारत चीन युद्धात अमेरिकेने त्यांची एक विमानवाहू युद्धनौका आपल्या मदतीसाठी पाठवली होती.
.
तेव्हा अलिप्त राष्ट्र परिषद हा एक बकवास होता.
.
.
आज तर तो प्रकार अत्यंत केविलवाणा आहे.
.
.
चीनशी तुलना
अनेक वेळा अनेक जण भारताची तुलना चीनशी करून त्यांच्या 'दैदीप्यमान' प्रगतीचे वारेमाप कौतुक आणि आमच्या संथ वाटचालीची हेटाळणी करताना दिसतात. पण हा विकास गाठताना त्यांनी किती निष्ठुर, क्रूर अणि बेदरकार पद्ध्तत अवलंबिली किंवा जाणून बुजून निवडली ते ध्यानात घेत नाहीत. 'कोणत्याही किंमतीत तथाकथित विकास' हे धोरण योग्य वाटत नाही. तसेच शिस्तीच्या नावाखाली बराकीकरण आणि हुकुमशाहीसुद्धा योग्य नाही. शाश्वत विकास हा उत्क्रांतीसारखा संथच असतो. क्रांती त्वरित घडू शकते पण अधिकतर अल्पजीवी ठरते हे वाक्य क्लीशे असले तरी सत्य आहे.
राही
राही तुम्हाला शब्दांची खूप आवड आहे. हे खास तुमच्यासाठी -
https://ccrssorg.securesitefr.com/database/songs.php?location_id=211
उदा -
उगवला नारायण मारोतीच्या कळसावरी
पक्षी गीत गात झाडावरी राम राम
रुकमीण जेवू वाढी निरश्या दुधामधी केळ
इठ्ठयला आवडल मालने जनाच ग ताक शिळ
इटवरी वरी उभा केवडा तान्या लेकरा एवढा
युग झाली अठ्ठावी कुणी म्हणेना खाली बस सख्या माझ्या इठ्ठलाला
पंढरीची वाट कशानी वली झाली
विठ्ठलाची जनी न्हाली केस वाळवीत गेली
सकाळी उठुन येशीकड बघा
मारोतीला लाल झगा अंजान बाईच्या बाळाला
सकाळपारी येशीकडं माझा हात
गडद झालाय सेंदरात देव माझा मारोती
तुम्ही अजूनही ती विशिष्ट
तुम्ही अजूनही ती विशिष्ट संघटना आणि अलिप्त असण्याचं धोरण यात गल्लत करत आहात. संघटनेतले सगळेच धोरण पाळत नव्हते आणि काही ते धोरण पाळूनही संघटनेबाहेर होते हे मुद्दे मूट होऊन जातात.
चीनने आपल्या आधी दहा वर्षं अणुबॊंब तयार केला यात काहीही विशेष नाही. त्यावेळी चीन आपल्याइतकाच गरीब असला तरी शिक्षणाच्या बाबतीत कायमच वीस वर्षं पुढे होता, अजूनही आहे. त्यामुळे दहा वर्षं आधी का? या प्रश्नाला अर्थ नाही. कोणाच्याच नावाचं कुंकू न लावल्यामुळे चीन आणि भारताला गरीब असूनही अण्वस्त्रं निर्माण करण्याबाबत आपल्याला हवं ते करता आलं हा महत्त्वाचा मुद्दा.
दोन राष्ट्रांपैकी एकाकडे झुकणं वेगळं आणि एकाला बांधून घेणं वेगळं. अमेरिका त्या काळातही अन्नधान्य, पैसा या स्वरूपात भारताला मदत करत होतीच. त्यामुळे धोरण ठीकठाकच होतं.
एखाद्या क्षेत्रातल्या शेकडो तज्ञांनी मिळून विचारपूर्वक ठरवलेलं, आणि वर्षानुवर्षं राबवलेलं धोरण एखादी बिनतज्ञ व्यक्ती नीट विचार न करता लावलेल्या निकषांवर 'बकवास' म्हणून उडवून लावते तेव्हा तिच्या बौद्धिक धार्ष्ट्याचं मला गंमतमिश्रित कौतुक वाटतं.
चीनने आपल्या आधी दहा वर्षं
चीनने आपल्या आधी दहा वर्षं अणुबॊंब तयार केला यात काहीही विशेष नाही. त्यावेळी चीन आपल्याइतकाच गरीब असला तरी शिक्षणाच्या बाबतीत कायमच वीस वर्षं पुढे होता, अजूनही आहे. त्यामुळे दहा वर्षं आधी का? या प्रश्नाला अर्थ नाही. कोणाच्याच नावाचं कुंकू न लावल्यामुळे चीन आणि भारताला गरीब असूनही अण्वस्त्रं निर्माण करण्याबाबत आपल्याला हवं ते करता आलं हा महत्त्वाचा मुद्दा.
.
माझा मुद्दा पुन्हा एकदा -
तांबड्या मजकूराबद्दलच माझा मतभेद आहे.
कोणाच्याच नावाचं कुंकू - (अ) न लावण्याचा किंवा (ब) लावण्याचा आपल्या अण्वस्त्र बनवण्याच्या इच्छाशक्ती, क्षमता, कौशल्या वर कोणताही परिणाम झाला नाही व नसता.
.
.
.
--------
.
एखाद्या क्षेत्रातल्या शेकडो तज्ञांनी मिळून विचारपूर्वक ठरवलेलं, आणि वर्षानुवर्षं राबवलेलं धोरण एखादी बिनतज्ञ व्यक्ती नीट विचार न करता लावलेल्या निकषांवर 'बकवास' म्हणून उडवून लावते तेव्हा तिच्या बौद्धिक धार्ष्ट्याचं मला गंमतमिश्रित कौतुक वाटतं.
.
.
एखाद्या धोरणाचं समर्थन करणारी व्यक्ती त्या धोरणाचे, धोरण बनवणाऱ्या पार्टीला न होणारे फायदे हे फायदेच आहेत व आहेतच असं ठासून सांगते तेव्हा मला ते - गब्बर, You need to have more humility असं ऐकू येतं - तेव्हा मला "Nobody was ever promoted or given a raise for demonstrating a lot of humility." असं सांगावसं वाटतं.
.
तेव्हा या तुमच्या गंमत- मिश्रीत- कौतुकाचे गणेसोत्सव सुरु होण्याआधीच विसर्जन करूया.
.
बकवास हा झणझणीत शब्द
बकवास हा झणझणीत शब्द वापरण्याचा तोटा असा की तुम्ही उद्धृत केलेलं चूक आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमच्यावर येते. आणि निव्वळ मी दिलेली उदाहरणं खोडून काढल्याचा आव आणून ती टाळता येत नाही. पण गब्बरकडून बर्डन ऒफ प्रूफ सांभाळण्याची अपेक्षा बाळगणं ही कदाचित माझीच चूक असेल.
मी काही तुम्हाला सल्ला देत नाहीये. माझ्या मनःस्थितीचं वर्णन करतो आहे. मनात चांदणं बाळगायचं असेल तर मी कोण हरकत घेणार?
बकवास हा झणझणीत शब्द
बकवास हा झणझणीत शब्द वापरण्याचा तोटा असा की तुम्ही उद्धृत केलेलं चूक आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमच्यावर येते.
.
.
बर्डन ऑफ प्रूफ चं लॉजिक वापरा -
.
(१) अलिप्त राष्ट्र परिषदेची स्थापना आपण केल्यामुळे किंवा नोशनली / सैद्धांतिक दृष्टीने अलिप्त राष्ट्र असल्यामुळे आपल्याला आपल्या देशात महासत्ताचे लष्करी तळ सहन करावे लागले नाहीत - हे तुमचे विधान तुम्ही सिद्ध करायला हवं होतं. माझी भूमिका वेगळी होती. मी माझी भूमिका उदाहरणे देऊन सिद्ध करण्याचा यत्न केला.
(२) अलिप्त राष्ट्र परिषदेची स्थापना आपण केल्यामुळे किंवा नोशनली / सैद्धांतिक दृष्टीने अलिप्त राष्ट्र असल्यामुळे आपल्याला आपण गरीब असूनही अण्वस्त्रे लवकर निर्माण करता आली - हे तुमचे विधान तुम्ही सिद्ध करायला हवं होतं. माझी भूमिका वेगळी होती. मी माझी भूमिका उदाहरणे देऊन सिद्ध करण्याचा यत्न केला.
.
.
----------------
.
मनात चांदणं बाळगायचं असेल तर मी कोण हरकत घेणार?
.
.
(हसले मनी चांदणे ....)
जपुनी टाक पाऊलं !!!
.
.
बकवास हे तुमचं मूळ विधान होतं
बकवास हे तुमचं मूळ विधान होतं. त्यावर 'हे बकवास नाही याची ही शक्य कारणं आहेत' असं मी थोडक्यात पटवून द्यायला गेलो. मला वाटलं होतं की तुमचं तेवढ्याने समाधान होईल. मी चांगुलपणा केला म्हणून तुमचं बर्डन माझ्या गळ्यात येत नाही. Since you made the first statement, you have first burden of proof. Once you deliver on that, then it transfers to my shoulder for my later statements.
Please start by proving that non aligned movement did not achieve anything.
It's not my job to disprove your stupid statements, just because I think they are stupid. It's your job to prove that they are sensible, and only then you get to question my judgement.
बकवास कसं काय म्हणता हा
बकवास कसं काय म्हणता हा प्रश्न अध्याहृत असतो. पहिलं विधान करणारा हायपोथेसिस मांडतो. दुसर्याने नल हायपोथिसिस मांडून दोनतीन कारणं दिली म्हणून बर्डन ट्रान्स्फर होत नाही. खरं तर ती मूळ हायपोथेसिस सिद्ध करण्याची मागणी असते.
Making a provocative statement without any proof, and when questioned with opposing evidence, focusing on the other person's statements and evidence detail, is a standard 'debating' strategy. I would call it 'prove me wrong'-baiting. It involves appearance of proof of burden transfer. But the burden is still firmly on the original statement maker.
भारत खरच नॉन अलाईड होता का?
भारत खरच नॉन अलाईड होता का? रशिया क्यांपमध्ये होता असं वाटतं. आपली डिफेंस आयुध रशियाकडुन आलेली असतात बरीचशी. अनेक वर्ष आर्थिक पॉलिस्या सोव्हियत प्रणीत होत्या. रशिया आपलं हक्काचं व्होट होता सिक्युरिटी कांउंसिलात. या उलट उमेरिकेचा सहभाग कमी होता बराच. तरी भारत अलिप्त होता हे कस्काय.
नेहरू हयात असेपर्यंत बहुधा
नेहरू हयात असेपर्यंत बहुधा भारत प्रॉपर नॉन अलाइन्ड होता.
१९६७-६८ च्या डिव्हॅल्युएशन फियास्कोनंतर* इंदिराबाई डाव्यांच्या कह्यात गेल्या. शिवाय काँग्रेसमधील तत्कालीन राजकीय साठमारीत (रशियावादी) डाव्यांनी त्यांना सहकार्य केले.
*हे अमेरिकेच्या दबावाने केले गेले होते. त्या अटीवर मदत मिळणार होती. डिव्हॅल्युएशन केले. इन्फ्लेशनचा आगडोंब उसळला आणि मदत मात्र वेळेवर आली नाही.
कुरुंदकर म्हणतात त्याप्रमाणे अमेरिकेने भारताला पायाभूत उभारणीसाठी फारशी मदत केली नाही. तिथे रशिया कामास आला.
हा तो लेख परवाचा the girl
हा तो लेख परवाचा the girl before Dutee
खेळाडंची नसलेली क्षमता वाढवायला डोस देत असतील ( जे त्या गावातल्या खेळाडुंना माहीतही नसेल) आणि मग त्याचे हार्मोन्सचे प्रमाण वाढून खेळाडू बाद झाल्यावर जबाबदारी मात्र खेळाडची?
पेट्रोलचे दर जास्त का आहेत
पेट्रोलचे दर जास्त का आहेत याच्या जस्टिफिकेशनसाठी काहीही आकडे पसरवले जात आहेत. सामान्य जनांना सेन्स ऑफ प्रपोर्शन किंवा एकूण आकड्यांचा अंदाज नसतो त्यामुळे खपून जातंय......
उदा. इराणचं ५० हजार कोटींचं थकलेलं बिल मोदी सरकारने चुकतं केलं असा दावा मध्यंतरी केला जात होता. त्यातला ते थकलेलं बिल होतं की कर्ज होतं की केवळ सँक्शन्समुळे दिलं नव्हतं हा भाग सोडला तरी त्यातली मुख्य मेख- तेलाचे दर चाळीस डॉलरला आल्यावर जेवढे पैसे रोज वाचत होते त्या दराने पंधरा दिवसात ती सो कॉल्ड रक्कम जमा झाली असती. उरलेल्या काळात पेट्रोलचे दर जास्त का याचं जस्टिफिकेशन मिळत नाही.
तर असो. बातमीची लिंक असेल तर द्या म्हणजे पाहता येईल.
इथे गोयल म्हणत आहेत ही
इथे गोयल म्हणत आहेत ही काँग्रेसने त्यांच्या काळात केलेली उधारी (/oil bonds) आहे.
काल नेटवर दुसरी बाजू शोधली, तर तुम्ही म्हणताय तसं sanctions (इराण वर अमेरिकेने लावलेले) चं कारण दिसतंय.
दोन्ही बाजूच्या जास्त लिंका मिळाल्या नाहीत, त्यामुळे नक्की काय ते माहित नाही. पण भाजपचं आत्ता पर्यंतचं काम बघता - जे त्यांनी केलेलं नाही त्याचंही श्रेय घेतलेलं आहे. काँग्रेसने केलेलं "पाप" धुउन काढलंय अशी केस जर असती तर पेट्रोल, डिझेल च्या भावावरून एव्हढी मारामारी होईपर्यंत भाजप वाले थांबले नसते. सभांमधून सगळीकडे सांगितलं असतं, प्रचार केला असता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी "काँग्रेसच्या काळातलं ५ हजाराचं कर्ज भाजपने चुकतं केलं" असे मेसेज यायचे. तीन वर्षात ५ हजार, आणि आता एक वर्षात १ लाख ९५ हजार? आणि हे तेंव्हा, जेंव्हा पहिल्या तीन वर्षात बॅरलचे भाव लैच कमी होते. हजम नै होरा.
+१.
+१.
मागचं कर्ज फेडलं असं म्हणण्याचा अर्थ तेव्हा ते फेडायला सरकारकडे पैसे नव्हते आणि आताच्या सरकारने ते जमा करून ते कर्ज फेडलं असा होतो. प्रत्यक्षात ते तसं नव्हतं. सरकार/तेल कंपन्यांकडे ते पैसे जमा होतेच.
मागे दोनेक वर्षापूर्वी काहीतरी सौदी अरेबियाने आपल्याला काहीतरी तेल साठवणुकीची ऑफर दिली होती आणि त्यामुळे आपल्याला तेल खूप स्वस्त मिळेल अशी पण पुडी सोडलेली होती. मोदींनी ती संधी वाया घालवली की काय? कारण आता क्रूडचे वाढलेले भाव हे पेट्रोलच्या उच्च दरांचं कारण सांगितलं जातंय !
गोयल यांची बातमी वाचली. ते ऑइल बॉण्ड्स एनडीए सरकार काही संपूर्ण फेडत नाहीये. त्यातले बहुतांश बॉण्ड्स २०२२-२५ दरम्यान फेडले जाणार आहेत.
तुमच्याकडे फक्त इंटरनॅशनल
तुमच्याकडे फक्त इंटरनॅशनल बिझिनेसची पदवी आहे. इकॉनॉमिक्सची नाही. (माझ्याकडेही नाही).
.
काय ओ थत्ते चाचा ! तुम्ही सुब्बु स्वामींप्रमाणे तलवारबाजी व दाणपट्टा सुरु केलात !
.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी सुब्बु स्वामींनी एका पत्रकाराला मुलाखत देताना - "रघुराम राजन हे खरे अर्थशास्त्री नाहीत कारण राजन यांनी इंजिनियरिंग करून नंतर एम्बीए करून मग अर्थशास्त्रात पीएचडी केलेली आहे" - असं विधान केलेलं होतं.
.
ते खरं आहे.
.
पण ......
.
बहादुरशाह जफर याच्या वंशजाकडून माफीपत्र
कायप्पा फॉर्वर्ड :
दिल्लीचे शेवटचे मुघल बादशाह बहादुरशाह यांच्यापासून सहाव्या पिढीतले वंशज Prince Habeebuddin Tucy यांनी १६ -०९ २०१८ रोजी सही शिक्का केलेले हे माफीपत्र. लेटर हेड आहे : Royal Mughal Family of Hindustan, H.R.H.Prince Yakub Habeebuddin Tucy. पाठवले आहे स्वामी चक्रपाणि महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारत हिंदू महासभा/संतसभा, मंदिर मार्ग, नई दिल्ली, 110001.
यात एचारेच याकुब यांनी बाबरचे सेनापती मीर वाकी यांनी राम मंदिर तोडल्याबद्दल समस्त हिंदू जनांची माफी मागितली आहे. शिवाय हिंदूंनी खुशाल त्या जागी राम मंदिर बांधावे, आमची हरकत नाही आणि अडथळाही नाही. आम्हाला आनंदच हो असेही म्हटले आहे. पत्राच्या उगमस्थानाचा पत्ता हैदराबादेतला आहे.
बादशाह बहादुरशाह यास १८५७
बादशाह बहादुरशाह यास १८५७ च्या उठावात आपण पुन्हा भारताचे सम्राट होण्याची संधी दिसू लागली. त्यावेळी येणाऱ्या इदसाठी मुसलमानांनी गोहत्या करू नये याचे फर्मान काढले. उगाच हिंदू सैनिक यातून फुटून वेगळे होऊ नये म्हणून. हे फर्मान आहे दिल्लिच्या एएसाइच्या संग्रहात म्युटिनी पेपर्स भागात.
लेकिन करे तो क्या करे....
आपण पुन्हा भारताचे सम्राट होण्याची संधी दिसू लागली
.
.
लेकिन करे तो क्या करे....
.
म्हणूनच तर त्याने शायरी लिहिली ना - दो आरजू मे कट गये दो इंतिजार में
यावर काय मत लोकांचं?