सविता दामोदर परांजपे - 'अठ्ठी' चिकित्सा

अठ्ठीचा संदर्भ इथे.

काही सिनेमे मी का बघते, असे प्रश्न विचारू नयेत. 'बकेट लिस्ट', 'मुरांबा', वगैरे. अपमानास्पद उत्तरं अजून सुचलेली नाहीत. खरं कारण चारचौघांत सांगण्यासारखं नाही. सध्यापुरतं एवढंच जाहीर करते की अत्यंत किचाट सिनेमेही मी बघितले आहेत. असे सिनेमे बघण्यासाठी जो सराव करावा लागतो, स्टॅमिना कमवावा लागतो, तो कमावून मी 'सविता दामोदर परांजपे' बघितला. (वाचकांनी इथे स्वतःच्या भोंगा आवाजात 'आमी माँजुलिका' असं म्हणावं. संदर्भ - 'भूलभुलैया' चित्रपट.)

सिनेमाची गोष्ट तशी साधी आहे. साधी म्हणजे 'गोड गोष्ट' नव्हे. प्रेमाला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्यानं सविता दामोदर परांजपे या मुलीनं आत्महत्या केली; तिचं भूत आता तिच्या प्रेमपात्राच्या बायकोच्या शरीरात घुसलं आहे. त्यातून काय-काय 'गंमत' होते असा हा सिनेमा. म्हणजे ह्या सिनेमाची गोष्ट मानवी मनाचा तळ गाठते, असं दाखवण्याचा कितीही क्षीण प्रयत्न दिग्दर्शिका आणि पटकथाकारांनी केला असला तरीही ही गोष्ट साधी सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे, जे जॉन अब्राहमच्या तोंडून साक्षात भगवंतच वदले आहेत. सिनेमात जे दाखवतात त्यावर अंधविश्वास ठेवू नये.

सविता दामोदर परांजपे

बरोबर! निर्माता जॉन अब्राहम असल्यामुळे सिनेमा बघण्याला पर्याय नव्हताच. तुम्हाला जॉन अब्राहम आवडत नसेल तर तृप्ती तोरडमलकडे पाहा. ती दिसायला छान आहे. तिची फिगरही छान आहे, तिचे गालसुद्धा सुबोध भावेसारखे सुटलेले नाहीत. सुती साडी नेसून, हिरव्या बांगड्या घालून आणि केस लांब असूनही ती काकूबाई दिसत नाही. ती सिनेमाची सहनिर्मातीसुद्धा आहे. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपिका घ्या.

तर मुद्दा असा की, विज्ञान आणि मानवी मर्यादा पाळून आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधणारं ललित लिहिणं कठीण काम असतं. 'बकेट लिस्ट' किंवा 'मुरांबा'सारखे सिनेमे असले प्रयत्न करतात. या लोकांना आपल्याला हे झेपत नाही हेसुद्धा झेपत नाही, आणि मग 'सावकाश घाण' करतात. (जिज्ञासूंनी 'अवकाश ताण सिद्धांत' मुळातून वाचावा. मला सध्या एवढाच संदर्भ सापडला.) आपण कूल दिसावं यासाठी जी मठ्ठ धडपड चालते, (उदाहरणं - सचिन खेडेकर, अमेय वाघ, माधुरी दिक्षीत वगैरे) त्यातला विनोद आकळण्यासाठी उच्च दर्जाची साधना आवश्यक असते. माझी तेवढी साधना नाही; विपश्यना वगैरे केलेल्यांनी याबद्दल माझं प्रबोधन करावं. असल्या कठीण गणितांच्या पाठी 'सविता दामोदर परांजपे' लागत नाही. आपल्याला partial differential equations जमणार नाहीत, आपण quadratic equationsमध्ये समाधान मानावं; हे ज्यांना समजतं त्यांना हुशार म्हणण्याची वेळ येत हो!

सीरीयसली, जॉन अब्राहम दोन वाक्यं मराठी बोलला तरी त्याला शोभेलशी मराठी बोलतो. (यूट्यूबवर दीड मिनीटांची मुलाखत आहे.) माधुरी दिक्षित सिनेमाभर मराठी बोलली तरी तिला म०म०व० गृहिणीची भाषा, लहेजा, पद्धत जमत नाही. तिच्यापेक्षा श्रीदेवीची शशी गोडबोले अधिक जास्त म०म०व० वाटते. आणि हो, 'मुरांबा' सिनेमा किळसवाणा आहे. त्यापलीकडे त्याबद्दल बोलण्याची गरज नाही.

मात्र 'सविता दामोदर परांजपे' तसा ठीकठाक सिनेमा आहे. सिनेमाची साधारण कथा अशी. सुबोध भावे - हा नेहमीच सुबोध भावे असतो - आणि त्याची चाळकरी मैत्रीण असतात. दोघेही वयानं आणि अंगानं आडमाप वाढलेले असल्यानं यांची मैत्री कशी झाली, याची निम्न मध्यमवर्गीय उत्तरं दृश्यरूपात समोर असतातच. मात्र सुबोध भावेला तिची मैत्रीण आवडते. ती तृप्ती तोरडमल. अर्थातच! दिसायला आकर्षक, राहणीमान वरच्या स्तरातलं, गोरीगोमटी, चेहऱ्यावरूनच समजतं की ही मठ्ठ-सुंदर नाहीये; सुबोध भावेला जर बालमैत्रीण सोडून तृप्ती तोरडमल आवडली नसती तर त्याच्यावर जरातरी बुद्धी असण्याचा आरोप झाला असता. असले आरोप होणं तो कटाक्षानं टाळत असणार.

आता ही मुलगी सुंदर-हुशार असली तरीही ती मनुष्यच आहे. तरुण वयात तिच्याकडूनही चुका होणं अपेक्षितच. ती सुबोध भावेशी लग्न करते. लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिच्या लक्षात येतं की, काय ही चूक करून ठेवली मी! मानवतावाद म्हणजे प्रपोज करणाऱ्या पहिल्या पुरुषाशी लग्न करणं नव्हे. ज्यांना आपण झेपणार नाही, त्यांच्याशी संबंध न ठेवणं - प्रेमाचे असोत वा वादाचे - हा खरा मानवतावाद! तर तिच्या अंगात भूत शिरतं. सिनेमा सुरू झाल्यावर तिला आणि आपल्यालाही लक्षात येतं, की हा जाडगेला नवरा आणि घारा-गोरा, मेणचट डॉक्टर वगळता महाराष्ट्रात हँडसम ब्राह्मण पुरुष असतात की! सगळ्यांनी मिलिंद सोमण असायची गरज नाही; कोणी राकेश बापटही असू शकतात. आडनावावर जाऊ नका, बापट म्हणून जन्माला आला असला तरीही तो आता 'Raquesh वसिष्ठ' असं नाव लावतो. (हँडसम, मराठी, ब्राह्मण पुरुषांवरही आंबेडकरांचे अनंत उपकार आहेत; आठवा, 'हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही.' मागे एक कोणी आविष्कार नामक इसम दारव्हेकर आडनाव सोडून कपूर असं आडनाव लावायला लागला होता.)

तर तो राक्वेश बापट सिनेमात आल्यावर मार्ग सापडतो. अंगात आलेल्या बाईला सुटकेचा मार्ग दिसायला लागतो. लग्न केलं तरी काय झालं, मजा मारायला राक्वेश मिळाला की झालं. महत्त्वाचं काय आहे! अं? मात्र तो बापट आडनावाला जागतो. पापाच्या वगैरे गोष्टी करतो. सिनेमातलं भूतही कमी नसतं; कनिष्ठ मध्यमवर्गीय असलं तरी महत्त्वाकांक्षी असतं. सिनेमाच्या शेवटी राक्वेशच्या प्रेमपात्राच्या शरीरातच घुसतं. आता पाप काय आणि काय काय! सिनेमा संपतो.

मुद्दा असा आहे की, तुम्हाला बायका बघायला आवडत असतील तर तृप्ती तोरडमल झकास आहे. दिसायला, वागायला आणि कामही चोख आहे. पुरुष बघायला आवडत असतील तर राकेश बापट आहे. त्याचे दाढीचे खुंटही व्यवस्थित आहेत, कानांच्या खाली गालफडांचा चौकोनी आकारही छान दिसतो. त्याला शोभतो. अध्येमध्ये सुबोध भावे, अंगद म्हसकर (डॉक्टर), आणि दोन दुर्लक्षणीय बायका आहेत. पण बघा, संपूर्ण पोषण मिळवायचं तर इडली-सांबार किंवा पापलेटच्या जोडीला गवार किंवा गुलाबजाम खावे लागतात. सगळंसगळं मिळत नाही. कुछ पाने के लिये कुछ सहना पडता है।

बाकी फार काही पोषण वगैरे शोधायला जाऊ नका. म्हणजे मी इथे आंबेडकरांचा उल्लेख केला असला तरी सिनेमात पुरोगामीपणा नावालाही नाही. 'भूलभुलैय्या' सिनेमाची कथा या कथेसारखी असली तरी निदान त्यात भजन-कीर्तनाचा प्रयत्न करण्याला फार भाव दिलेला नाही; हिंदी सिनेमात अधूनमधून रसिका जोशीनं कॉमिक रिलीफ दिलाय. मराठी सिनेमात त्याऐवजी 'तेरा इमोसनल अत्याचार' आहे. पुरोगामी महाराष्ट्रातली, पुरोगामी समजली जाणारी ब्राह्मण जमात 'सविता दामोदर परांजपे'मध्ये भोळसट आणि बावळटच दाखवलेली आहे. चतुराईनं राक्वेश बापट या हँडसम पात्राचं आडनाव दाखवलेलं नाही.

बाकी या 'सविता दामोदर परांजपे' सिनेमातल्या अभ्यंकर लोकांच्या घरात व्हिन्सेन्ट व्हॅन गॉ आणि एम. एफ. हुसेन या दोघांच्याही चित्रांचे प्रिंट्स आहेत. सायकॉलॉजिकल थ्रिलर असल्यामुळे व्हॅन गॉचं 'स्टारी नाईट' डकवलं, असा बटबटीत संदर्भ लावता येईल. पण मग तिथे हुसेनचं काय काम? त्यातही हुसेननं चितारलेल्या पंढरपुरी स्मरणरंजनाचं उबदार चित्र आहे, तसं त्याच्या डार्क पिरियडमधलं, पिकासोची आठवण येईल असंही एक चित्र आहे. नक्की म्हणायचंय काय?

बाकी कितीही बावळट असोत, म०म०व० लोकांना मिरवण्याचा असा बटबटीत षौक मराठी थ्रिलर-चित्रपटात नसतो हो! ते असली कामं हिंदीत जाऊन किंवा मराठीत फक्त चरित्रपटांत करतात.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तर इडली-सांबार किंवा पापलेटच्या जोडीला गवार किंवा गुलाबजाम

नॉण्सेन्स्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

तुम्ही छुप्या ममव असून लपूनछपून तुपारे बघता असा सौंशय आहे.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पट्टीचे समीक्षक असलात तर असं म्हणाल - तुम्ही ममव म्हणून जन्मलात आणि ममव म्हणूनच मरणार. तुम्हाला आंबेडकरांचा काही फायदा नाही.

तुपारे नाही बघत मी. मात्र फेसबुकवर मी फक्त तुपारेच्या चर्चा वाचण्यासाठीच जाते. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

किती शालजोडीतले, लावुन दिलेत. सॉलिड स्टाईलिने समीक्षा केलेली आहे. खूप आवडली.
चित्रपट मात्र विशेष पहावासा वाटला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

या ताईंचं काय करावं ?
झकास आहे रिव्ह्यू. आवडला (जमेल तेव्हा बापट आडनावाचा उद्धार करायला आवडतं यांना , याची त्या डीसी मधील मालकांनी नोंद घ्यावी.)
जंतु यांच्या कार्यकक्षेत आक्रमण उत्तम जमलं आहे.
अजून चॅन चॅन पिक्चर बघा आणि लिहा.
लिहिण्यात उच्च पातळीचा हलकटपणा जमल्यामुळे त्यांना दोन डबल एकारांत आडनावे पदव्या म्हणून बहाल करण्यात येत आहेत . बघा, काय घेताय ? लेले की नेने ? चॉईस तुमचा आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिक्रिया वाचल्यावर लक्षात आलं, की आपल्याला लेखातलं काहीसुद्धा कळालेलं नाही. मला ‛विक्षिप्त’ यांचं लेखन समजून घ्यायला अजून किती साधना करायला लागणार; कोण ‛विक्षिप्त’च जाणे.

आपण कूल दिसावं यासाठी जी मठ्ठ धडपड चालते, (उदाहरणं - सचिन खेडेकर, अमेय वाघ, माधुरी दिक्षीत वगैरे)
वाचताना एवढ्या एकाच वाक्यावर गंभीर झालो नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

You're taking this way too seriously.

दोन-चार मराठी सिनेमे बघून (खरं तर त्यांतल्या भिक्कार सिनेमांचं फेसबुकवर कौतुक वाचून) वैताग आला तो लिहून काढला, झालं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुरांबा सिनेमा आवडलेला मला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लोकांना मोदी आणि ट्रंपतात्याही आवडतात. 'मुरांबा' सिनेमाचं काय घेऊन बसलात! बहुमत तुमच्याच पाठीशी आहे.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हान्तेजायला.
दोन चार ताना घेता नाही आल्या तरी चालते पण दोनचार खुंट्या पिळल्या नाहीत तर प्रकाशक पुस्तक छापायला तयार होत नाहीत.
बरोबर हानलय आपलं जमलय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तृप्ती तोरडमल झकास आहे, म्हणजे फोटो बिटो बघले तिचे.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चित्रपट बघायचा आहे .. पण ही समिक्षा वाचून अगदी हिरमोड झाला.
तरीही बघणार आहेच.

नाव वाचून " कुसुम मनोहर लेले (नाटक)" सारख काही आहे का असं वाटलं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
रूक जाना नहीं - तू कही हारके |
काटोंपे चलके मिलेंगे साये बहारके ||

सिनेमा बघाच; फार अपेक्षा बाळगू नका. हा सिनेमा बघण्याआधी 'मुरांबा' आणि 'बकेट लिस्ट' बघितलेले असल्यामुळे सिनेमा अत्यंत भिकार असणार अशी माझी अपेक्षा होती. तृप्ती तोरडमल आणि राकेश बापटांमुळे पार हिरमोड झाला नाही, एवढंच. बरे दिसतात, बरे बोलतात, कपडे बरे घालतात.

लग्न झालेली बाई परपुरुषाबरोबर झोपण्याची इच्छा व्यक्त करते, तेव्हा आपल्या अपेक्षा वाढतात. पण पुढच्याच वाक्यात, असं केल्यामुळे फक्त तिचं शरीर नासतं, असं तीच म्हणते. असा हा सिनेमा २०१८ सालात बघून टाका. एकदाचा बोळा मोकळा होऊन जाईल. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अपेक्षा नाही फार .. पण मला मराठी चित्रपट बघायला बरे वाटतात.

मराठी बकेटलिस्ट नाही पाहिला ... पण इंग्रजी पहिला आहे. अतिशय सुंदर आहे. बघितला नसल्यास जरूर पहा.

["लग्नं झालेली बाई ....."] *
* हे म्हणजे अतिच आहे की. म्हणजे जवळ जवळ क्रांतिकारकच. तरी बरं फक्तं इच्छाच व्यक्तं केलीय.
आदर्श भारतीय स्त्रीचा प्रतिमाभंग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
रूक जाना नहीं - तू कही हारके |
काटोंपे चलके मिलेंगे साये बहारके ||

चित्रपट बघायला पाहिजे. तृप्ती तोरडमलसाठी बघायला पाहिजे. ट्रेलरवरून घरगुती ममव भूतपट वाटतो आहे- नाटक मात्र चांगलं होतं.
----
मुरांबा पाहिला नाही. बकेट लिस्ट ७ मिनिटं पाहिला- सो ब्याड द्याट ईट इज गुड च्या लायकीचा वाटला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुटलेल्या गालांचा सुभा आणि तत्सम कॉमेंटस वापरुन मनसोक्त हंसलो! बाकी बापट जमातीवर भारी राग हो! अगदी राबांनाही सोडलं नाही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

अदिती मावशी भन्नाट लेख .. एक विनंती -- आणि डॉ घाणेकर या सिनेमाचा रिव्यू लिहा ( त्यातही तुमच्या आवडीचा सुबोध भावे आहे )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0