आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - ६
दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.
काही वेळा आपल्याला एखाद्या सिनेमाला, नाटकाला, भाषणाला जायची इच्छा असते. काही वेळा ऐसीवरचेच काही लोक एखादा कार्यक्रम सादर करणार असतील. आपल्या बरोबर कोणी जाणार असेल तर उत्तमच, नाहीतर आपला कार्यक्रम ठरलेला असतो. अशा वेळी 'मी/आम्ही अमुक अमुक कार्यक्रमाला जात आहोत' असं जाहीर आमंत्रण द्यायचं असेल तर या धाग्यावर टाका. ज्या काही लोकांना जमायचं असेल ते धाग्यावर जाहीर करून येतील - एकमेकांशी व्यनिसंपर्क करतील अशी अपेक्षा आहे. जमल्यास कार्यक्रम कसा झाला याबद्दल चार शब्द जर त्यांपैकी कोणी नंतर लिहिले तर ज्यांना यायला जमलं नाही त्यांनाही जळवण्याची संधी साधता येईल.
या धाग्यावरच्या प्रतिसादांत कार्यक्रम जाहीर करणारांनी खालील माहिती पुरवावी.
कार्यक्रम -
अपेक्षित शुल्क -
स्थळ -
तारीख व वेळ -
कुठे भेटायचं -
आधीच्या धाग्यांवर १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा केला आहे.
---
मंगल दिन नंदन दिन
नंदनभाऊंच्या सहवासाचा लाभ पुणेकरांना मिळणार मिळणार मिळणार!!!
शनिवार दिनांक ८ डिसेंबर
वेळ : दुपारी सुमारे १२ ते २
स्थळ : डेक्कन राँदेव्हू, आपटे रस्ता.
खानपान, इ. : आपापल्या खर्चाने.
अगत्य : पुणेकरांना साजेसे
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मनोबा बॅटमॅन येत आहेत. मी
मनोबा बॅटमॅन येत आहेत. मी जंतु आणि नन्दन शेठ आहोत.ढेरे धनुष येणार ना ? आणि अजून कोणकोण ?
येतो.
येतो.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
नकार
रॉन्देवु हे ते काये म्हणे? इतके हयफय हाटेल?
तुम्ही काय फारिनची लोकं, आम्ही खेड्यातले गरिब लोक्स आहोत हो,
हाटेलाचं नाव पाहुन दचकायला होतय. त्यात ती काचाबिचाची बिल्डिंग. रेट पण दाबून असणार.
जरा परवडेबल अशा ठिकाणी कट्टा काढा की. सर्वसमावेशक वगैरे टाइपचा विचार करा की.
रॉन्देवु हे ते काये म्हणे?
पूर्ण स्पेलिंग पाहून तर खेड्यातले लोक आणखीनच शंकित होतात.
इमान चालवणारे गवि जेव्हा
इमान चालवणारे गवि जेव्हा खेड्यातील लोकांची अशी बाजू घेतात तेव्हा ....... असो.
हमभी खेडेसे आये है.
हमभी खेडेसे आये है.
जुन्या काळी पुण्यात (आमचं सगळं जुनं) भांडारकर रोडवर (चुभूदेघे) एका "बुरगेऑइस" असं लिहिलेल्या टपरीवर अनेक महिने खाऊन पिऊन झाल्यावर त्यास बूर्ज्वा म्हणतात हे कळलं. बरं बुर्जी वगैरे काही मिळत नसताना.
"म्हणजे फादर तुम्ही मला कधीकधी डुक्कर म्हणता ते हे?" असं विचारणाऱ्या शंकऱ्यासारखी माझी पुणेकर शहरी मित्रांत अवस्था झाली.
होय होय , ते बुरगेऑईस आठवते.
होय होय , ते बुरगेऑईस आठवते. त्यात किंवा त्याशेजारी एक स्वघोषित होरारत्न पडीक असत ना ? ( पुलोत्सवाची मागची पिढी ?)
ते काय माहीत नाय. कॉफी बरी
ते काय माहीत नाय. कॉफी बरी असे.
पुढे (कै.) लकी आणि गुडलक आढळल्यावर बुरगे* आहारगृहात जाणे कमी झाले. तेही आता कै. झालं का?
* चिमणरावांच्या "दोडगे बंधू" सर्व्हिस मोटारचे स्मरण करुन.
बुरगॉईस बहुदा कै० झालं. परवा
बुरगॉईस बहुदा कै० झालं. परवा तिकडसून जाताना दिसलं नाही.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
बूर्ज्वा
जुनी इमारत पडून नवी झाली त्यानंतर बूर्ज्वा परत आलं नाही. पहिल्यांदा त्याचं नाव पाहिलं तेव्हा मला मोठी मौज वाटली होती. कारण, मोलिएरच्या काळापासून हा शब्द फ्रेंचमध्ये फाशिस्टच्या जवळपास जाणारी शिवी म्हणून वापरायचा प्रघात आहे.
असो. नव्या इमारतीत आता एक थाय, एक कोकणी मराठा सामिष आणि काही सँडविच-ज्यूस टैप प्रकरण आहे.
जाता जाता : बूर्ज्वा (बहुतेक पोलिसांना हप्ता चारून) रात्री उशीरापर्यंत चालू असे ही एक माझ्यासाठी महत्त्वाची बाब होती. अर्थात, लकीला जो कळकट भकास फील होता त्याची मौज न्यारीच होती.
अ-जाणकारांसाठी - उपरनिर्दिष्ट कट्टास्थान एके काळी सूर्या नावाने ओळखले जात असे. त्याच्या रेटकार्डाला कितीही बोल लावा, पण नावात फ्रेंच शब्द टाकल्याने उच्चभ्रू होता येत नाही ह्याचं ते जिवंत उदाहरण आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सर्वसमावेशक
त्यांना मोलियरच्या फाशिष्ट शिव्या खायच्या नसतील. त्यामुळे ही त्यांची सर्वसमावेशकता असेल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
बरोबर. पूर्वी सूर्या होतं.
बरोबर. पूर्वी सूर्या होतं. टिपिकल उडुपी बार रेस्टॉरंट छाप . मग नवीन बिल्डिंग. मॅनेजमेंट एक्स ब्लु डायमंड वाली. मराठी नाव असलेले पण मराठी न बोलणारे वेटर्स , उत्तम फाईन डाईन मेन्यू वगैरे (होता)
पाच वर्षांनंतर पुन्हा आगरवालाचं हाटेल झालं .वगैरे. आता मराठी वेटर्स मराठी बोलतात वगैरे. चांगली शांत जागा .
कोरेगाव पार्कात / बालेवाडी हाय स्ट्रीट मध्ये हादडणार्या लोकांना स्वस्त वाटेल.
असो.
'अनेक महिने खाऊन झाल्यावर
.
वय झालं तुमचं अण्णा ...
... किंवा जंतूच्या प्रेमात पडला आहात.
ते वाक्य गविंनी लिहिलंय.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
स्पष्टीकरणार्थ:
स्पष्टीकरणार्थ:
महिनोन महिने रोज संध्याकाळी खानावळीप्रमाणे नव्हे. अत्यंत ऑकेजनल. एरवी उच्चार कळण्याची शक्यता वाढली असती.
कोणी सोबत घेऊन गेल्यास ती व्यक्ती उच्चार सांगू शकते, तसं घडल्यावरच (लोकल मित्रांसोबत असताना) उच्चार कळला.
तिथे उभे असलेले लोक अहो बुर्ज्वाचे मालक, एक कॉफी द्या, किंवा अरे मित्रांनो, आपलं हे बुर्ज्वा नावाचं हॉटेल किती छान आहे ना रे? असं रेडिओ श्रुतिकेप्रमाणे एकमेकांच्यात बोलत नव्हते.
मराठी पाटी सक्ती उदयास आली नव्हती.
याखेरीज मला आता असं वाटतंय की आपण वेगवेगळ्या जागांबद्दल बोलत असावोत, कारण मला बिल्डिंग, बांधकाम, हॉटेल असं अजिबात दिसलं नसून मी काहीवेळा गेलो तेव्हा रस्त्यालगत एक काहीशी बरी टपरी (काउंटर असलेली आणि रस्त्यात उभे राहून कॉफी पिणे अशा प्रकारची) आठवते.
फारच धूसर किंवा मिक्स अप झाली असेल आठवण.
कल्पना
हल्ली मराठी मालिका, सिनेमांमध्येही असेच बोलतात.
मात्र प्रत्यक्षात, मुद्दाम असं बोललं तर काय मज्जा येईल; लोक किती वैतागतील याची कल्पना करून मजा आली. विशेषतः मराठी मालिका वगैरे हौसेनं बघणाऱ्यांशी असं बोलायचं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हेच लिहायला आलो होतो. या
हेच लिहायला आलो होतो. या हाटेलाला त्याच्या फोनेटिक नावानेच मित्रमंडळात जास्त प्रसिद्धी आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अभ्या, उगा नाही ती कारणं देऊ
अभ्या, उगा नाही ती कारणं देऊ नको. आगरवालाचं हाटेल सांगितलं असतं तर उगा हा दंगा केला नसतास ना तू ?
आगरवालाचंच हाटेल आहे ते. नाव काहिबी असु देत .
तेव्हा कारणे देऊ नकोस.
सर्वसमावेशक परडाईज मध्ये कट्टा केला होता तेव्हा तू वेगळी कारणं सांगून आला नव्हतास.
कट्ट्याचा फोटो
आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.
ओळखू आले.
उजवीकडुन - ढेरेशास्त्री, मनोबा, तिमा, बॅट्या, नंदन,जंतू नी बापटण्णा.
शेवटचे २ सदस्य माहीत नाहीत. धनुष व नील लोमस का?
Embrace your inner sloth.
अय्यय्यो
अत्यंत माहितीपूर्ण फोटू. जंतू बरेच 'कूल' दिसतात. माझा त्यांच्याबद्दलचा अंदाज पाऽर आपटलाय.
अबापट लै फ्रेंडली दिस्तात. क्रिकेट खेळताना त्यांच्या घरात बॉल गेला तर (अखंड) परत फेकतील इतके फ्रेंडली.
बाकी लोकांना पाहिल्यासारखं वाटतं. मनोबा अजिबात फ्रेंडली दिसत नाहीत.
हॉटेल लईच हायफाय दिस्तं. बरं झालं नाही आलो.
किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||
डे. रॉ.
हॉटेलची निवड उत्तम होती. तीन-साडेतीन तास निवांतपणे गप्पा हाणत बसता आलं. मध्यवर्ती ठिकाण, गर्दी अजिबात नाही आणि उगाच मध्येमध्ये येणारा स्टाफही नाही. मेन्यूत पूर्वीइतकं वैविध्य नाही असं अबापट म्हणत होते - तरीही शाकाहारी/नॉन-शाकाहारी/मिश्र-नॉन-शाकाहारी मंडळींना बरेच पर्याय उपलब्ध होते.
ब्लॅकमेल
आणखी एक फोटो निघाला आहे तो मला ब्लॅकमेल करण्यासाठी वापरता येईल असा आहे. कुणाच्या फोनवर ते मी सांगणार नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आता दिसतोय फोटो, काय केला बदल
आता दिसतोय फोटो, काय केला बदल?
बदल
तुमच्या लेखाप्रमाणे गुगल ड्राईव्हवर फोटो अल्बम जोडला.
आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.
हो
बापटांच्या शेजारचे नील लोमस. पण शेवटचे धनुष नाहीत, ते ऐसी चे ग्राफिक डिझाईन करणारे संदीपशेठ(नांव बरोबर ऐकले असेल तर) आहेत.
आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.
आयला!
आयला, तो संदीप आहे! मी भेटल्ये त्याला अनेकदा ... आठ वर्षांपूर्वी. आणि दरवर्षी निदान दिवाळी अंकाच्या निमित्तानं आम्ही गप्पाही मारतो.
तिरशिंगरावांची मुद्रा फारच आवडली. "फोटो काढताय का, काढा, काढा. मला माहित्ये, तुम्हां लोकांना कसं गंडवायचं ते!"
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
फोटो दिसत नाही
फोटो दिसत नाही. चक्क अैसीवर सेन्सारशिप.
+१ मला पण नाही दिसला फोटू.
+१ मला पण नाही दिसला फोटू.
फोटो
कट्ट्याचा फोटो गुगल फोटोंवर शेअर करुनच चढवला आहे. तो क्रोम मधून दिसतो आहे. पण तरी काही जणांना आणि ॲन्ड्रॉईड फोनवरुन दिसत नाहीये. तरी कोणीतरी मार्गदर्शन करावे.
आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.
गंमत
मला काल लिनक्स-फाफॉतून दिसत होता. आज दिसत नाहीये. गूगल झिंदाबाद.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
दोन फोटो आलेत ग्रुपवर ( पण
दोन फोटो आलेत ग्रुपवर ( पण एकच आहेत)
aise rasik group मधून
१)
पहील्या फोटोत ढेरेशास्त्री व
पहील्या फोटोत ढेरेशास्त्री व नंदन हसत नव्हते. या फोटोत हसताहेत. बाकी सर्वजण डिट्टो तसाच चेहरा.
Embrace your inner sloth.
छान
छान
तिरशिंगराव, तुम्ही बदल करून
तिरशिंगराव, तुम्ही बदल करून दुपारी दिलेला फोटो परत गायब झाला आहे.
लेखात दिलेलल्या सर्व पायऱ्या चेक करा॥ अल्बम 'शेअर्ड अल्बम' दिसल्यावरच त्यातला फोटो क्लिक करून पुन्हा लिंक घ्यावी लागते.
तो फोटो फेसबुकवरून >>view full size >> address bar मधली लिंक वापरून >>

पिफ २०१९
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) जानेवारी १०-१७ दरम्यान होणार आहे. त्यासाठी सदस्यनोंदणी चालू झाली आहे. (अधिक तपशील इथे)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
र. कृ. जोशी
चित्र संवाद भाग ५९ - अक्षरलेखनकार र. कृ. जोशी यांच्याविषयी
सहभाग - माधुरी पुरंदरे (अरुण खोपकर यांच्या लेखाचे अभिवाचन), प्रमोद रिसवडकर, प्रसन्न हळबे
रविवार २३ डिसेंबर सकाळी ११ ते १२:३०
सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे
अधिक माहिती इथे
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
माधुरी पुरंदरे (अरुण खोपकर यांच्या लेखाचे अभिवाचन)
चित्रव्यूह की चलतचित्रव्यूह मध्ये आहे ना हा लेख?
प्रमोद रिसवडकर, प्रसन्न हळबे हे लोक कोण आहेत?
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
रकृ
हो. इथे उल्लेख आहे.
हे र.कृं.चे विद्यार्थी होते.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
वा व्वा!
धन्यवाद!
ह्या कार्यक्रमाचे चित्रीकरण होणार आहे का?
बहुधा नाही
बहुधा नाही. 'चित्र संवाद' हा उपक्रम दृश्यकलांचे काही माजी विद्यार्थी / आजी शिक्षक मिळून हौसेनं चालवतात. व्याख्यात्यांना मानधन वगैरे खर्च त्यांना परवडत नाहीत. तसंच सर्वांना खुला असला तरी तो प्रामुख्यानं कलेच्या विद्यार्थ्यांच्या कक्षा थोड्या व्यापक करण्यासाठी चालवला जाणारा उपक्रम आहे. त्यामुळे बहुधा प्रवेश शुल्कही नसतं. एकंदरीत स्वरूप पाहता त्याचं व्यावसायिक चित्रीकरणही बहुधा होत नसावं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
दस्तावेजीकरण
व्यावसायिक चित्रणाची अपेक्षा अजिबात नाही. स्मार्ट फोन वा डीएसएलाअर कॅमेरे तिवईवर स्थिर लावूनही जमतंच. ते शक्य नसेल तर किमान ध्वनिमुद्रण तरी करता यावं. हेतू दुर्मीळ विषयाचं दस्तावेजीकरण हा आहे. किती चांगल्या दर्जाचं चित्रण वा मुद्रण झालं हा भाग दुय्यम.
मर्यादा
कुणी असं हौशी दस्तावेजीकरण जरी केलं तरी ते त्याच्या मर्यादित व्यक्तिगत वर्तुळापुरतं राहणार. संयोजकांना असा काही उत्साह असल्याचं दिसत नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
' बीटल्स ट्रिब्यूट ' कॉन्सर्ट
उद्या , म्हणजे २५ जानेवारी २०१९ ला शिशा कॅफे , एबीसी फार्म्स , कोरेगाव पार्क येथे विनीत अलुरकर आणि बावधन बूझ बँड , ' बीटल्स ट्रिब्यूट ' कॉन्सर्ट करणार आहेत.
विनीत अलुरकरचे सादरीकरण चांगले असते असा पूर्वानुभव .
इच्छुकांनी लाभ घ्यावा . प्रवेशमूल्य असण्याची शक्यता असू शकते .
ऑस्टिनातली गंमत
सध्या ऑस्टिन, टेक्सास, संयुक्त संस्थाने, एथे (॥तिर्री कृपा॥ होऊन) मराठी लोकांची
मंगळागौरपरिषद भरलेली आहे. तिचे तपशील इथे सापडतील.ऐसीवरचे काही चुकार लोक तिकडे सापडतील.

---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
चोप्य विथ अ डिफरन्स
आता ऑस्टिनवर काही हल्ला वगैरे झाला तर महाराष्ट्राचा अभ्यास करायला फक्त नवी बाजू उरणार बहुतेक.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ऐला
आम्ही पण स्वत:ला Independent Scholar वगैरे ,समजत होतो. पण जगाने आमची दखलच घेतली नाही!
आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.
छानच!
Embrace your inner sloth.
आंतरराष्ट्रीय लघुपट पुण्यात
लघुपटाला पूर्ण लांबीच्या चित्रपटांइतकं वलय आणि प्रसिद्धी मिळत नसली तरीही ह्या माध्यमाचा प्रभावी वापर करून जगभर उत्तमोत्तम निर्मिती होत असते. बर्लिन चित्रपट महोत्सवात लघुपटांसाठी एक स्वतंत्र विभाग असतो. त्यातले आणि इतर महोत्सवांतले काही निवडक लघुपट पाहण्याची संधी पुण्यात ह्या वीकेंडला आहे.
वेळ : १५ जून दु. ४ पासून.
१६ जून सकाळी १० पासून
स्थळ : एनएफएआय फेज २ (कोथरुड)
ठिकाणाचा नकाशा आणि इतर माहिती फेसबुक इव्हेंट पानावर
प्रवेशमूल्य : नाही. अठरा वर्षं पूर्ण असलेल्यांना ओळखपत्र दाखवून 'प्रथम येणारास प्रथम प्रवेश' तत्त्वानुसार प्रवेश मिळेल.
महोत्सवाचं वेळापत्रक इथे
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
जमतंय
शनिवारी जाईन. इकडचं कुणी असेल तर भेटू तिकडे.
परवा कोकण एक्स्प्रेसला उत्तम तिसऱ्या थाळी खाल्ली. तुमचा फेस्टिव्हल बोअर झाला तर पुन्हा ताव मारायचा विचार आहे.
मित्राच्या आग्रहाखातर रविवारी सुदर्शनला "वाफाळते दिवस" हा प्रयोग पाहायला जायचंय. त्यामुळे रविवारी नाही जमणार बहुतेक.
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
रविवारी सुदर्शनला "वाफाळते
प्लीज आल्यावर परीक्षणटैप काही लिहाल का? याबद्दल खूप ऐकलंय (बरंही आणि वाईटही), पण पाहायचा योग आला नाही.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
चुकला
आबा, प्रयोग 14 जूनला की 16 जूनला होता हे कळलं नाही. मित्राने गंडवलं.
मित्रही स्कॅट लव्हर प्रकारातला असल्याने तो हा शो पाहायला कोणत्या हेतूने नेणार होता हे कळणार नाहीच, पण आता हा पाहावाच लागणार!
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
नकाशा
त्यांच्या पेजवरच्या नकाशावर फेज २ कोथरूड शनिवारवाड्याजवळ आहे.



टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
इमोशनल कॉरडीनेटस वापरले
इमोशनल कॉरडीनेटस वापरले असतील नकाशा बनवताना.
.
.
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
गिरीश कार्नाड आदरांजली सभा
गिरीश कार्नाड यांच्या भाषणाचे व लेखाचे वाचन
मकरंद साठे यांचे व्याख्यान
विषय : स्वातंत्र्य, समकालीन पेच आणि राष्ट्रवाद
वेळ : २९ जून २०१९ सं. ७ वाजता
स्थळ : पत्रकार भवन सभागृह, नवी पेठ, गांजवे चौकाजवळ, पुणे
प्रवेशमूल्य नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
रेकॉर्डिंग?
ह्या भाषणाचा व्हिडिओ किंवा काही मिळेल काय?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
निर्भयता - अतुल दोडिया
चित्रकार अतुल दोडिया यांचे व्याख्यान : विषय 'निर्भयता'
आज दु. १२ वा. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता, पुणे
प्रवेश विनामूल्य
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
कोथरुडात वॉटरमार्क फिल्म क्लब
'वॉटरमार्क फिल्म क्लब' गेले काही महिने कोथरुडात सुरू आहे. त्याविषयी :
नेटफ्लिक्स आणि इतर साधनांचा सुकाळ असतानाही अनेक सिनेमे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. देशोदेशींचे विविध प्रकारचे, विविध विषयांवरचे आणि विविध शैलींतले नवेजुने सिनेमे दाखवून आणि त्यावर चर्चा करून प्रेक्षकांची जाण वाढवण्यासाठी कोथरुडात (महात्मा सोसायटीजवळ) हा फिल्म क्लब चालू केला आहे. विविध सांस्कृतिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमीचे लोक त्याद्वारे सिनेमाचा आस्वाद घेत आहेत. चित्रपटांची निवड मी करतो आहे. क्लबचे स्वरूप खाजगी आणि सभासदांसाठी आहे. सभासदत्वासाठी १८ वर्षं पूर्ण होणं आवश्यक आहे. मोठा पडदा आणि सुसज्ज ध्वनियंत्रणा वापरून HD दर्जाचे सिनेमे दाखवले जातात. आगामी सिनेमाची माहिती इमेल आणि व्हॉट्सॲपवर पाठवली जाते.
अधिक माहिती आणि सदस्यत्वाच्या फॉर्मसाठी संपर्क : 9422016044 watermarkfilmclub@gmail.com
फॉर्म भरून दिल्यावर चार सिनेमे विनाशुल्क पाहता येतील. त्यानंतर सभासदत्व शुल्क भरण्याचा निर्णय घेता येईल.
वेळ : दर महिन्याच्या विषम शनिवारी दुपारी चार वाजता
स्थळ : २६ नवविनायक सोसायटी, गांधीभवनामागे, कोथरूड. बंगल्याच्या ६०० चौ. फूट तळघरात थिएटरची सोय आहे.
सभासद होण्यासाठी वर्गणी रु. १५०० वार्षिक आणि ७५० सहामाही (जुलै ते डिसेंबर) आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||