!!

शुकशुक!!
किती?
पाश्शे.
२००?
चला.
कुठाय?
इथच १० पावलावं.
वाकुन या सायेब. हां हंगाश्शी!
चल उतर कपडे - माझेही , तुझेही. मला वेळ नाय.
.
.
(खसफस )
.
.
( खोलीत खूडबूड)
.
(घाबरुन) ए कोणाय पलंगाखाली? बाहेर नीघ.
ओ ओ सायेब कोन नाय तिथं. उरका तुमचं. कुठुन येतात!!! नाय तर चल नीघ भायेर. नको तुजं पैसे, चल नीघ.
.
.
ओ ओ ओ सांगीतलं नं कोन नाय!!! चल निघ इथुन मुडद्या, हलकटा.
.
.
तुझा का?
.
नाय! आख्ख्या गावचा!! वर त्वांड करुन विचार्तय!! कशाला अब्रू चव्हाट्यावर आणता? तुमाला काय फरक पडतोय? ह्यो असतो इथं पडून. ना आध्यात ना मध्यात. < डोळ्यातून झरझर अश्रुंची संततधार>
.
गिर्‍हाईक ५०० ची नोट टाकून सुन्नपणे निघून जातो.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet