कथा

पाकिस्तान-८

“आम्ही काश्मीरसाठी हजार वर्षे लढू. आम्हाला गवत खावे लागले तरी चालेल. आम्ही अणुबॉम्ब बनवू.”

- झुल्फिकार अली भुट्टो.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाकिस्तान- ७

.

“पाकिस्तानने भारताला सहज पराभूत केले आणि केवळ संयुक्त राष्ट्रांच्या युद्धविरामामुळे युद्ध थांबले."
- जेम्स विनब्रँड (1965 कच्छ रण युद्धासंबंधी. पाकिस्तान आणि मध्य आशिया तज्ञ)

"कोण जिंकतो आणि कोण हरतो याने काय फरक पडतो? त्यांना कश्मिर हवे होते. ते मिळाले का? नाही. आम्ही आमच्या सीमांचे रक्षण केले. आम्ही तर हल्लाही केला नव्हता की जिंकणे महत्त्वाचे ठरले असते.”
- ब्रिगेडियर चित्तरंजन सावंत.
.

ललित लेखनाचा प्रकार: 

विचित्र स्वप्न: स्वप्नात आली ती आणि....

( काही सत्य काही कल्पना)

रात्रीचे स्वप्न:

ललित लेखनाचा प्रकार: 

राधेभय्या आणि कंपासबॉक्स मधली भूमिका चावला

आठवीत आमच्या क्लासमध्ये "राधेभय्या" होता. म्हणजे त्याचं खरं नाव काहीतरी कृनाल की कुणाल होतं पण त्याला सगळेच राधेभय्याच म्हणायचे. तो दिसायला अप्सरा पेन्सिल सारखा सरळसोट. हडकुळा. अंगावर कुठेही उंचसखलता नाही. बेंबीच्या खालपर्यंत पॅन्ट घालायचा. पोटाच्याखाली दोन बाहेर आलेल्या टोकदार हाडांवर ती पॅन्ट लोंबकळायची. व्यवस्थित धुतलेल्या आणि इस्त्री केलेल्या त्याच्या शर्टचा एक भाग बाहेर आणि एक आत राहायचा. चालताना पाठीला किंचित बाक आणून चालायचा. दर महिन्याला नवीन कुठल्यातरी हटके रंगाचा गॉगल घेऊन यायचा. कधी टायच्या नॉट मध्ये तर कधी बेल्टला गॉगल अडकवायचा.

ललित लेखनाचा प्रकार: 

गो केकू गो!

गो केकू गो!
“रावडी केशव कुलकर्णी(केकू)”
Fully Configured.
Level 3 entered. Scene 1. ready to go. Start New Session.
ID No. ID zx 120 2792023 T=00
“Go Keku. Go.”

ललित लेखनाचा प्रकार: 

बस्स तुझं असणं..........

तु कोण, काय, तुझं गावं कोणतं, तुझं येणं कुठलं हे काहीच माझ्यासाठी महत्त्वाचं नव्हतं... नाहियेय...तुझं माझ्या आयुष्यात असणचं माझ्यासाठी बहारदार होतं वसंतातल्या लालट गुलमोहरासारखं......मला टवटवीत करणार.....तसं म्हटलं तर आपली ओळख दोन वर्षांपूर्वीची आणि म्हटलं तर जन्माजन्माची म्हणूनच तर हा अनुरागी बंध जुळला ना !  जो आजच्या क्षणापर्यंत कायम आहे....मनाच्या कप्प्यात.

ललित लेखनाचा प्रकार: 

माजी पईली बायकु - भाग २

सकालच्याला जाग आली तवा उन कासराभर वर आलेलं. मी पांघरून बाजुला फेकला आन हुटलो. आज घरात कुनीच नव्हतं. चंदी चा बनवत आसल म्हून मी कीचान मदी ग्येलो त कुटं काय. त्वालेतला बसली आसल आसा इचार क्येला आन मंग मी ग्यास पेटीवला आन चाचं आदन ठिवलं. बायकुला सर्पराइज दावू मंजी येकाद मुका घेती का देती त्ये पघु असा इचार केला आन गरम पान्यात साकर आन चाची पौडर टाकली. अवं सर्प-राइज म्हंजी साप हुबा रातो आसं नव्हं, उगा गेर समजुत करून घिऊ नगा. चा उकल्ला तवा त्यामदी दुद वतलं आन मग दोन कपात गाललं. टेबलावं ठीउन चंदीची वाट पाऊ लाग्लो. माजा चा पिऊन जाला तरी बी चंदी येयना.

ललित लेखनाचा प्रकार: 

माजी पईली बायकु-१

कदी कागुद कमी पडला त कदी पेनातली श्याई वालून ग्येली माज्या जिंदगानीची इष्टोरी लिवताना. या इष्टोरी मदलं "माजी पईली बायकु" नाव असल्यालं पर्करन हाये ते लिवतो. मनापर्मान बायकु भेटाय लई बाग्य लागतं राजे हो. गावाकड येक जोतीस व्हता त्याला माजा जनम कागुद दावला न इचारलं की बाबा रे मला बायकु कशी भेटल? त्यो म्हनला तू लई नसीब काडनार हायेस. येक सोडून दोन मिळत्याल पन येकीची बी ग्यारंती नाय. मी त्येला बोल्लो तुज्या थोतरीत देवू का येक? त्यो म्हनला माज्या थोतरीत मारसील पन नसीबाच्या थोतरीत? कसं जगायचं आसा प्रस्न हुबा राईल तवा कोनला माराया जासील?

ललित लेखनाचा प्रकार: 

नाही म्हणजे नाही.

"मी निघते गं मावशी, रेश्मा आली की तिला तो कॅटलॉग आठवणीने दे.. मग ती तो तिच्या मैत्रिणींना दाखवेल."
सोफ्यावरून उठत वसुधा म्हणाली.
"अगं थांब की जरा, इतकी उन्हाची कुठे जातेस? थोडा चहा घेऊन जा, छान आले घालून करते .. माझी चहाची वेळ झालीच आहे." मावशी स्वयंपाकघराकडे जाताना म्हणाल्या.

ललित लेखनाचा प्रकार: 

मेकअप

ब्लँक. Removed for personal reasons.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - कथा