Skip to main content

शेजारच्या काकूंनी डेल्टा कोव्हिडचे आभार मानले.

आपल्या दोस्मन काकूंना लागण करण्याबद्दल शेजारच्या काकूंनी करोनाच्या अधिक पसरणाऱ्या डेल्टा व्हेरियंटचे आभार मानले. त्या आपल्या मैत्रिणीशी बोलत होत्या; तिथून जाणाऱ्या वरच्या मजल्यावरच्या डॉक्टरच्या मैत्रिणीला थांबवून त्यांनी आणखी माहिती दिली.

"माझी ही दोस्मन बरेच दिवस फेसबुकवर दिसली नव्हती. त्यामुळे माझ्या कॉमेंट्सची सतत री ओढायला कुणी राहिलं नाही. मी काहीही मीम शेअर केला की बाकी सगळे हसले की ही बाई फक्त लाईक हाणायची. आमच्या भिशी मंडळापैकी कुणीही काहीही विषय काढला की ती त्याबद्दल स्वतःचं काही तरी नेहमी म्हणायची.

पेठेघाटी डबा

त्यामुळे गेले काही दिवस जेव्हा माझ्या कॉमेंट्स आणखी वाढीव शब्दांत कुणी पुन्हा लिहून काढल्या नाहीत तेव्हा मला भीती वाटायला लागली की ती पूर्णच वाया गेली का काय! तिनं फेसबुक सोडून प्रत्यक्ष आयुष्यात इंट्रेस्ट घ्यायला सुरुवात केली असेल अशीही भीती मला वाटायला लागली. एवढा वेळ फेसबुकवर काढूनही कुणी बरं होऊ शकतं, हे मला मान्य नव्हतं; पण मन चिंती ते वैरी न चिंती! आपण भरल्या फेसबुकवर एकटे पडलो आहोत, अशी स्वप्नं मला पडायला लागली होती."

पण आपल्या मैत्रिणीकडे बोट दाखवून काकूंनी पुढे सांगितलं की,हिच्यामुळे मला समजलं की तिला कोव्हिड झाला आहे. मी सगळ्यात आधी देव पाण्यातून काढले, आणि गणपतीसमोर नारळ फोडला. माझ्या दोस्मनला फक्त कोव्हिडच झालेला आहे; तिला ब्लॅक फंगस झालेलं नाही आणि फेसबुक सोडून जाण्याएवढं तिचं डोकं फिरलेलं नाही, म्हणून माझा देवावर पुन्हा विश्वास बसला आहे."

शेजारच्या काकू भेटल्या तेव्हा त्यांच्या हातात खोबऱ्याच्या वड्या भरलेला पेढेघाटी डबा होता.

सामो Tue, 20/07/2021 - 23:09

:) बऱ्याच दिवसांनी मौजमजा सदराला पालवी फुटली. काकू आवडल्या.