कंकणाकृती सूर्यग्रहण - मे 2012

नुकत्याच सुर्यग्रहणाचा टेलिस्कोप वापरून काढलेला एक फोटो इथे देतो आहे. फोटो सोलर फिल्टर वापरून घेतला. नंतर फोटोतील ब्राईटनेस आणि टेंपरेचर विंडोज फोटो इडीटरने अ‍ॅडजस्ट केले.

चित्र सर्वांना दिसेल अशी आशा आहे. चित्र फार मोठे असल्यास इथे पहावे.

चित्र कसे काढले इ. बद्दल माहिती देण्याचा लवकरच प्रयत्न करतो.

महत्त्वाची सुचना: टेलिस्कोप अथवा इतर कोणत्याही उपकरणातून सुर्याकडे पाहू नये. योग्य अशा फिल्टरचा वापर करूनच पहावे.

4
Your rating: None Average: 4 (5 votes)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

पाहिला तो फोटो.मस्तय.कुठे

पाहिला तो फोटो.मस्तय.कुठे पाहिले? भारतातले शेवट कंकणाकृती २०१० जानेवरी संक्रांतीला होते.

पुढिल कंककणाकृती दक्शिण

पुढिल कंककणाकृती दक्शिण भारतातून २६ डिसेम्बर २०१९ ला दिसेल

पुढिल खग्रास मला माझ्या हयातीत भारतातून नक्की दिसणार नाही Sad (भारतात दिसणारे पुढिल खग्रास ग्रहण June 3, 2114)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नेमका चंद्र

मधे आलाय या सूर्याच्या फोटोमधे (जीभ दाखवत)
कंकणाकृत स्थितित चंद्र एज टू एज किती वेळात गेला?
६ जून ला पण फोटो काढणार असशील...... I hope. झकास आलाय फोटो.
६ जूनच्या फोटोत पण ग्रहावरच डकवा वॉटरमार्क - एक का, चार लाव हो!!

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

हॅ हॅ हॅ

६ जूनच्या फोटोत पण ग्रहावरच डकवा वॉटरमार्क - एक का, चार लाव हो!!

कळतात म्हणलं तुम्हा पुणेरी लोकांची कुजकी बोलणी! (डोळा मारत)
चंद्र जस्ट कंकण होऊन जस्ट कंकणाच्या बाहेर जाईपर्यंतचा काळ ५-१० मिनिटे असावा अंदाजे. फोटो पाहून एक्झॅक्ट वेळ सांगता येईल. पाहून सांगतो.

कळतात म्हणलं तुम्हा पुणेरी

कळतात म्हणलं तुम्हा पुणेरी लोकांची कुजकी बोलणी!

अरे वा, निळ्या हुशार झाला!

चंद्र जस्ट कंकण होऊन जस्ट कंकणाच्या बाहेर जाईपर्यंतचा काळ ५-१० मिनिटे असावा अंदाजे.

या वेळेला ४ मिनीटं ३० सेकंद असा कायसासा होता.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फोटो मस्त आला आहे

शिवाय वॉटरमार्क लावल्यामुळे सदस्य निळे यांनी सूर्याला गिळणारे राहू, केतू आपणच आहोत हे जगजाहीर केलं आहे असं वाटतं.

हाहाहा

राहू केतू आणि शनी, तिन्ही आमचीच रुपे. (डोळा मारत)

सुरेखच!

सुरेखच!
फक्त ते वॉटरमार्किंग काढून टाक किंवा अन्यत्र (सूर्यबिंबाबाहेर) हलव!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वॉटरमार्क

वॉटरमार्कचा मुद्दा येईल असे वाटले होतेच. वॉटरमार्क वेगवेगळ्या ठिकाणी ठेऊन पाहिला, विना वॉटरमार्कही चित्र पाहिले. मला स्वतःला वरचे चित्र सर्वात जास्त आवडले. त्या वॉटरमार्कमुळे चित्रात व्हॅल्यु अ‍ॅडीशन होते आहे असे माझ्या डोळ्यांना वाटले. वॉटरमार्क नसलेले चित्र तुलनेसाठी लवकरच लावतो.

व्हॅल्यू अ‍ॅडिशन +१

वॉटरमार्काने मूल्यवर्धन होते आहे. +१

वॉटरमार्काशिवाय चित्रात काहीतरी कमी असल्याचे भासते आहे.

ग्रहणाची अन्य चित्रे, गूगल दुवा

दुव्यावर दिसते आहे, की मला आवडणार्‍या चित्रांत काहीतरी पार्थीव वस्तूसुद्धा चित्रात आहे आणि त्यामुळे कथानक-संदर्भ मिळतो आहे. किंवा अन्य काही वैचित्र्य आहे.

सहमत आहे.

सहमत आहे. पार्थिव गोष्टींमुळे ग्रहण फारच सुंदर दिसतं.

(आम्ही ठरवलेल्या ठिकाणी ऐन वेळी ढग आल्यामुळे भलत्याच ठिकाणी जाऊन ग्रहण पाहिलं. कॅमेरा वगैरे लावायलाही फार वेळ मिळाला नाही. ग्रहणाचा पहिला स्पर्शही कारमधूनच बघावा लागला. त्यामुळे तेलविहीरींच्या पार्श्वभूमीवर ग्रहण असे ठरवल्याप्रमाणे फोटो काढता आले नाहीत. लांबवर एक ट्रेन होती, पण ते फोटोत काही दिसत नाहीये. मी काढलेले फोटो फार काही महान नसल्यामुळे अजूनपर्यंत उघडून बघितलेले नाहीत.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वैयक्तीक मत

वॉटरमार्क चित्राच्या मुळ विषयावर असू नये असे माझे वैयक्तीक मत आहे. {वैट्ट उदा. सुरू} हे म्हणजे गॉगल / चष्म्याच्या काचेवर केस असल्यासारखे वाटते मागचे सारे स्पष्ट दिसते पण तरी केस मधे येतोच. (डोळा मारत) {वैट्ट उदा. संपले}
मधे ठेवायचेच असेल तर वॉटरमार्कचा रंग (आणि+/किंवा) पारदर्शकता अशी ठेवून बघ ज्यामुळे तो 'मार्क' हा बघताना 'डाग' वाटणार नाही.. चित्रात सहज समरस होईल.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काडेचिराईतपणा करायचाच असेल तर ...

चित्राचा आकार थोडा कमी कर, आमचा गरीब लॅपटॉप आहे. आणि मोठ्या चित्राची लिंक चित्रातच देऊन ठेव.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुलना

तुलनेकरता हे चित्र लावले आहे. कोणते चित्र चांगले आहे याबद्दल मतभेद असतील, ते साहजीकच आहे. पण मला स्वतःला वॉटरमार्क असलेलं चित्र चांगलं दिसत आहे. (वॉटरमार्कचे इतर फायदे आहेतच, तो वेगळा मुद्दा)

ऐनवेळी इमेजशॅकने धोका दिल्याने चित्र रिसाईझ केले नाही, त्याबद्दल क्षमस्व.

+

बरोबर आहे. ब्रॅण्डनेम आले की व्हॅल्यू वाढते हे बरोबर.

चित्र झकास आले आहे.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

हाहा

ब्रॅण्डनेम आले की व्हॅल्यू वाढते हे बरोबर.

हा हा हा! आमचं ब्रँड नेम अजून एस्टॅब्लीश नाय झालं हो, थत्तेचाचा! कशाला गरीबाची थट्टा करता. (डोळा मारत)

भारी

(स्माईल)

राधिका

चौथ्या कोपर्‍यात एक सनस्पॉट

चौथ्या कोपर्‍यात एक सनस्पॉट दिसतो आहे. फोटो झकास.

सूर्याची कोर मावळताना फोटो काढला का?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान!

ग्रहण प्रत्यक्ष पाहण्याचा योग नव्हता, पण छायाचित्राची उत्सुकतेने वाट पाहत होते.