Skip to main content

कंकणाकृती सूर्यग्रहण - मे 2012

नुकत्याच सुर्यग्रहणाचा टेलिस्कोप वापरून काढलेला एक फोटो इथे देतो आहे. फोटो सोलर फिल्टर वापरून घेतला. नंतर फोटोतील ब्राईटनेस आणि टेंपरेचर विंडोज फोटो इडीटरने अ‍ॅडजस्ट केले.

चित्र सर्वांना दिसेल अशी आशा आहे. चित्र फार मोठे असल्यास इथे पहावे.

चित्र कसे काढले इ. बद्दल माहिती देण्याचा लवकरच प्रयत्न करतो.

महत्त्वाची सुचना: टेलिस्कोप अथवा इतर कोणत्याही उपकरणातून सुर्याकडे पाहू नये. योग्य अशा फिल्टरचा वापर करूनच पहावे.

सानिया Wed, 23/05/2012 - 04:20

ग्रहण प्रत्यक्ष पाहण्याचा योग नव्हता, पण छायाचित्राची उत्सुकतेने वाट पाहत होते.

ऋषिकेश Wed, 23/05/2012 - 10:29

सुरेखच!
फक्त ते वॉटरमार्किंग काढून टाक किंवा अन्यत्र (सूर्यबिंबाबाहेर) हलव!

Nile Wed, 23/05/2012 - 11:12

In reply to by ऋषिकेश

वॉटरमार्कचा मुद्दा येईल असे वाटले होतेच. वॉटरमार्क वेगवेगळ्या ठिकाणी ठेऊन पाहिला, विना वॉटरमार्कही चित्र पाहिले. मला स्वतःला वरचे चित्र सर्वात जास्त आवडले. त्या वॉटरमार्कमुळे चित्रात व्हॅल्यु अ‍ॅडीशन होते आहे असे माझ्या डोळ्यांना वाटले. वॉटरमार्क नसलेले चित्र तुलनेसाठी लवकरच लावतो.

नितिन थत्ते Wed, 23/05/2012 - 15:36

In reply to by Nile

बरोबर आहे. ब्रॅण्डनेम आले की व्हॅल्यू वाढते हे बरोबर.

चित्र झकास आले आहे.

Nile Wed, 23/05/2012 - 18:32

In reply to by नितिन थत्ते

ब्रॅण्डनेम आले की व्हॅल्यू वाढते हे बरोबर.

हा हा हा! आमचं ब्रँड नेम अजून एस्टॅब्लीश नाय झालं हो, थत्तेचाचा! कशाला गरीबाची थट्टा करता. ;-)

ऋषिकेश Wed, 23/05/2012 - 16:08

In reply to by Nile

वॉटरमार्क चित्राच्या मुळ विषयावर असू नये असे माझे वैयक्तीक मत आहे. {वैट्ट उदा. सुरू} हे म्हणजे गॉगल / चष्म्याच्या काचेवर केस असल्यासारखे वाटते मागचे सारे स्पष्ट दिसते पण तरी केस मधे येतोच. ;) {वैट्ट उदा. संपले}
मधे ठेवायचेच असेल तर वॉटरमार्कचा रंग (आणि+/किंवा) पारदर्शकता अशी ठेवून बघ ज्यामुळे तो 'मार्क' हा बघताना 'डाग' वाटणार नाही.. चित्रात सहज समरस होईल.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 23/05/2012 - 19:50

In reply to by ऋषिकेश

चित्राचा आकार थोडा कमी कर, आमचा गरीब लॅपटॉप आहे. आणि मोठ्या चित्राची लिंक चित्रातच देऊन ठेव.

Nile Thu, 24/05/2012 - 01:15

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुलनेकरता हे चित्र लावले आहे. कोणते चित्र चांगले आहे याबद्दल मतभेद असतील, ते साहजीकच आहे. पण मला स्वतःला वॉटरमार्क असलेलं चित्र चांगलं दिसत आहे. (वॉटरमार्कचे इतर फायदे आहेतच, तो वेगळा मुद्दा)

ऐनवेळी इमेजशॅकने धोका दिल्याने चित्र रिसाईझ केले नाही, त्याबद्दल क्षमस्व.

धनंजय Thu, 24/05/2012 - 01:28

In reply to by Nile

वॉटरमार्काने मूल्यवर्धन होते आहे. +१

वॉटरमार्काशिवाय चित्रात काहीतरी कमी असल्याचे भासते आहे.

ग्रहणाची अन्य चित्रे, गूगल दुवा

दुव्यावर दिसते आहे, की मला आवडणार्‍या चित्रांत काहीतरी पार्थीव वस्तूसुद्धा चित्रात आहे आणि त्यामुळे कथानक-संदर्भ मिळतो आहे. किंवा अन्य काही वैचित्र्य आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 24/05/2012 - 10:04

In reply to by धनंजय

सहमत आहे. पार्थिव गोष्टींमुळे ग्रहण फारच सुंदर दिसतं.

(आम्ही ठरवलेल्या ठिकाणी ऐन वेळी ढग आल्यामुळे भलत्याच ठिकाणी जाऊन ग्रहण पाहिलं. कॅमेरा वगैरे लावायलाही फार वेळ मिळाला नाही. ग्रहणाचा पहिला स्पर्शही कारमधूनच बघावा लागला. त्यामुळे तेलविहीरींच्या पार्श्वभूमीवर ग्रहण असे ठरवल्याप्रमाणे फोटो काढता आले नाहीत. लांबवर एक ट्रेन होती, पण ते फोटोत काही दिसत नाहीये. मी काढलेले फोटो फार काही महान नसल्यामुळे अजूनपर्यंत उघडून बघितलेले नाहीत.)

राजेश घासकडवी Thu, 24/05/2012 - 02:00

शिवाय वॉटरमार्क लावल्यामुळे सदस्य निळे यांनी सूर्याला गिळणारे राहू, केतू आपणच आहोत हे जगजाहीर केलं आहे असं वाटतं.

मिसळपाव Fri, 25/05/2012 - 03:19

मधे आलाय या सूर्याच्या फोटोमधे :p
कंकणाकृत स्थितित चंद्र एज टू एज किती वेळात गेला?
६ जून ला पण फोटो काढणार असशील...... I hope. झकास आलाय फोटो.
६ जूनच्या फोटोत पण ग्रहावरच डकवा वॉटरमार्क - एक का, चार लाव हो!!

Nile Fri, 25/05/2012 - 03:24

In reply to by मिसळपाव

६ जूनच्या फोटोत पण ग्रहावरच डकवा वॉटरमार्क - एक का, चार लाव हो!!

कळतात म्हणलं तुम्हा पुणेरी लोकांची कुजकी बोलणी! ;-)
चंद्र जस्ट कंकण होऊन जस्ट कंकणाच्या बाहेर जाईपर्यंतचा काळ ५-१० मिनिटे असावा अंदाजे. फोटो पाहून एक्झॅक्ट वेळ सांगता येईल. पाहून सांगतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 25/05/2012 - 04:24

In reply to by Nile

कळतात म्हणलं तुम्हा पुणेरी लोकांची कुजकी बोलणी!

अरे वा, निळ्या हुशार झाला!

चंद्र जस्ट कंकण होऊन जस्ट कंकणाच्या बाहेर जाईपर्यंतचा काळ ५-१० मिनिटे असावा अंदाजे.

या वेळेला ४ मिनीटं ३० सेकंद असा कायसासा होता.

ऋषिकेश Mon, 16/05/2016 - 15:07

In reply to by चिमणराव

पुढिल कंककणाकृती दक्शिण भारतातून २६ डिसेम्बर २०१९ ला दिसेल

पुढिल खग्रास मला माझ्या हयातीत भारतातून नक्की दिसणार नाही :( (भारतात दिसणारे पुढिल खग्रास ग्रहण June 3, 2114)