Skip to main content

...पाऊसगाणे...

धरतीची आस
होउनी उदास
अंतरी भकास
प्रार्थिते देवास

हजार डोळे
आभाळास पहाती
निष्प्राण होउनी
केविलवाणे होती

आस ती मनास
गावे पाऊसगाणे
मनांत रोजचेच
पाण्याचे रडगाणे

मना लागलीसे
धरतीची ओढ
कोसळे आभाळ
पाऊस होऊन