रा. स्व. संघाच्या हिंदुत्वाचे कवित्व!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डा. केशव बळीराम हेडगेवारांनी नागपुर येथे १९२५ साली केली. हेडगेवार हे मुलत: सशस्त्र क्रांतीचे समर्थक असले तरे नंतर त्यांच्या लक्षात आले कि या खंडप्राय देशात सशस्त्र क्रांती अशक्यप्राय आहे. बाळासाहेब देवरसांनी आपल्या आत्मचरित्रात लिहुन ठेवले आहे कि हेड्गेवारांनी अनेक तरुणांना भगतसिंगाचा मार्ग चोखाळण्यापासुन परावृत्त केले. रा.स्व. संघ हेडगेवारांच्या काळापर्यंत (१९४०) तरी एक आदर्श संघटना होती असे म्हणता येते. म. गांधींनीही या संघटनेची तारीफ केलेली इतिहासात दिसते. परंतु गोळवलकर गुरुजी १९४० मद्धे सरसंघचालक झाले तसे या संघटनेचे खरे दात दिसु लागले.
माधव गोळवलकरांचा जन्म विदर्भात १९०६ साली झाला. म्हणजे ते सरसंघचालक झाले तेंव्हा अवघ्या ३४ वर्षांचे होते. त्यांचा "Bunch of Thoughts" (विचारधन) प्रसिद्ध असुन हा ग्रंथ म्हणजे गोळवलकर गुरुजींनी दिलेल्या विविध भाषणांचा संग्रह आहे. हा ग्रंथ मला १९८६ साली संघवाल्यांनी भेट दिला. निमित्त होते माझा नुकताच प्रसिद्ध झालेला "Ancient Aryans Thought on Religion" हा प्रबंध. मला या मंडळीने संघ परिवारात खेचण्यासाठी असंख्य प्रलोभने दाखवली. परंतु जेंव्हा मी इतिहास संकलन समितीच्या पुण्यातील प्रमुखशी भेटलो व त्यांनी मला सुचवले कि "आर्य बाहेरुन आले नाहीत" हे तुमचे या प्रबंधातील मत मागे घ्या...आम्ही ते प्रसिद्ध करतो,..." एका क्षणात माझे डोळे उघडले. संघवादी हे वंशवादी आहेत हे मला समजले. मी गोळवलकर गुरुजींचे विचारधन मग काळजीपुर्वक वाचले. लोक संघाच्या नादी का लागतात याचीही कारणे समजली. बहुजनांतील नव्याने जन्म घेवु पाहणारे विचारवंत यांचे फुल-टायमर कार्यकर्ते बरोबर कसे हेरतात, त्यांना आपल्या कच्छपी कसे लावतात, कशी आमिषे दाखवतात, तारीफांचे पुल बांधत त्यांना कसे आकर्षित करतात ही त्यांची कार्यप्रणालीही लक्षात आली. हे आजही थांबलेले नाही.
रा,स्व. संघ सावरकरांसारखा फक्त हिंदुत्ववादी नसुन वंशवादी आहे हे सत्य आधी समजावुन घ्यायला हवे. त्यांनी जरी वरकरणी हिंदु धर्माचा बुरखा घेतला असला तरी ते मुळात आर्यवादी आहेत. आर्य बाहेरुन आले व तेच आद्य आक्रमक असुन येथील संस्कृतीचे खरे निर्माते होत असा त्यांचा लाडका सिद्धांत आहे. हिंदु धर्म नव्हे तर "आर्य धर्म, आर्य सिद्धांत, आर्य जीवनशैली" हे त्यांच्या तत्वद्न्यानाचे कळीचे मुद्दे आहेत. आर्य बाहेरुन आले हा सिद्धांत राजकीय दृष्ट्या अडचणीचा ठरतो हे लक्षात आल्यावर गोळवलकर गुरुजींनी "पुरातन काळी उत्तर धृव वाराणशी येथे होता" असा दीव्य सिद्धांतही मांडला होता. नशीब तेंव्हा हा भारत देश अवकाशात लटकत होता असे ते म्हणाले नाहीत.
संघाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेण्याचे पुर्णपणे नाकारले. हेडगेवारांनी किमान स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला हे वास्तव असले तरी त्यांच्यानंतर मात्र ती प्रक्रिया पुर्ण थांबली. याचे मुख्य कारण म्हणजे तत्कालीन मान्य नेते गांधी हे ब्राह्मण नव्हते...कथित आर्य नव्हते. त्यांचे नेतृत्व मान्य करणे आर्यवाद्यांसाठी अशक्यप्राय अशी बाब होती. (सर्व ब्राह्मण आर्यवादी नव्हते व नाहीत हे येथे लक्षात घ्यावे). मनुस्मृती हेच स्वतंत्र भारताचे कायद्याचे आदर्श पुस्तक असेल असे गोळवलकर गुरुजी, सावरकरांच्या पावलावर पावुल ठेवुन म्हनत असत.
दुसरे महत्वाचे असे कि गोळवलकरांचा लोकशाहीवर कधीच विश्वास नव्हता. या संघटनेची आजही "घटना" नाही. ती करण्याची आश्वासने या संघाने सरकारला वारंवार दिली असली तरी ती कधीच अस्तित्वात आली नाही. एवढेच नव्हे तर तिरंगा हा राष्ट्रध्वज असल्याचे या संघाला मान्य नाही. आता ढोंग म्हणुन ते तिरंगा फडकावतात...पण तो केवळ देखावा आहे. प्रात:स्मरनात ते आता गांधी व बाबासाहेबांचेही नांव घेतात पण त्यामागे कितपत ढोंग आहे ते सुद्न्य जाणतातच.
संघाचे हिंदुत्व म्हणजे आर्यवाद असुन मनुस्मृतीचे पुनर्स्थापन हा त्यांचा अंतिम अजेंडा आहे. म्हणुनच हिंदु धर्माची व्याख्या करण्याची त्यांना विशेष गरज भासत नाही. जे मुस्लिम वा ख्रिस्ती नाहीत ते हिंदु अशी सरळसोट व्याख्या आहे. पारशी ज्युंशी त्यांचे काहीएक वैर नाही. तसे तत्वत: ख्रिस्त्यांशीही नाही. पुरातन आर्य असल्याने इंग्रजांना ते आपले पुरातन रक्तबांधवच मानत असत.
हिटलर हे त्यांचे मुलभुत आदर्श आहे हे आता लपुन राहिलेले नाही. एकतंत्रशाही त्यामुळे त्यांना प्रिय आहे. मुस्लिमांचा (हे त्यांना खाजगीत नेहमीच "लांडे" म्हणतात.) हे पराकोटीचा द्वेष करतात, इतका कि हिटलरने ज्युंचा जसा वंशौच्छेद केला तसा मुस्लिमांचाही करावा हे यांचे स्वप्न आहे, तसे प्रयत्न आहेत. मला अनेक संघवादी वाचकांचे फोन येतात तेंव्हा ते "मुस्लमानांना वेचुन ठार करायला हवे" असे म्हणतच असतात.
पण त्यांनी केलेले त्यांच्या दृष्टीने महापवित्र कार्य म्हणजे गांधीजींचा खुन. ते या खुनाला वध म्हणतात. म्हणजे गांधी महापातकीच असले पाहिजेत. सावरकर या कार्याचे बुद्धीवादी प्रणेते होते. कधी संघात तर कधी महासभेत वावरणारा बळीचा बकरा नथुराम त्यांनी निवडला. आर्यवाद्यांनी एका हिंदुचा निघ्रुण खुन केला.
याचा पुरावा असा:
गोळवलकरांनी ६ डिसेंबर १९४७ रोजी गोवर्धन या दिल्लीनजीकच्या ठिकाणी संघाच्या बैठकीत कोन्ग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांना कसे ठार मारायला हवे यावर चर्चा केली. यानंतर दोनच दिवसांनी रोहटक रोड क्यंपात गोळवलकरांनी पाकिस्तान निर्मितीस जबाबदार असलेल्यांना आम्ही नष्ट करु, पाकिस्तानही नष्ट करु अशी जाहीर भुमिका मांडली. याच वेळीस गोळवलकर म्हणाले, हिंदुस्तानात आम्ही मुस्लिमांना राहु देणार नाही. आमचे जेही विरोधक आहेत त्यांना आम्ही संपवुन टाकु....
यानंतर सहाच आठवड्यांत गांधीजींचा खुन करण्यात आला. या प्रकरनी सावरकरांप्रमानेच गोळवलकरांनाही अटक झाली. वर्षभरात त्यांना चांगल्या वर्तनाच्या हमीवर सोडुनही देण्यात आले. आरेसेस वरची बंदीही हटवण्यात आली. गृहमंत्री कोण होते हे सांगण्याची येथे आवश्यकता नाही. असो.
मुद्दा आहे हिंदुत्वाचा. संघ व त्याच्या अनेक शाखा-उपशाखा स्वत:ला हिंदु धर्मीयांचे तारणहार समजतात. तत्वद्न्य आणि समर्थक समजतात. त्यासाठी असंख्य धादांत खोट्या गोष्टी रचुन सांगत असतात. (उदा. हडप्पा/लोथल येथे सापडलेल्या तंदुर भट्ट्यांचे अवशेष हे यद्न्यकुंडांचे अवशेष आहेत...तात्पर्य सिंधु संस्कृती ही वैदिकांनी घडवली. इति. एम. के ढवळीकर. पु. ना. ओक ते वर्तक असेच तारे तोडत असतात.)
हिंदु धर्माच्या ख-या वाढीस संघ हा फार मोठा अडसर आहे हे वारंवार सिद्ध झाले आहे. हिटलरच्या एस.एस. संघटनेची सर्वच मुलतत्वे संघ जपत असतो. सांस्कृतीक दहशतवादात यांचा कोणीही हात धरु शकणार नाही. हिंसक दहशतवादात ते आता कसे पडले आहेत हे गांधी हत्या ते फादर स्टेनच्या हत्येपर्यंत व मालेगांव ते गोवा विस्फोटांपर्यंत दिसुन येते.
मुळात हे हिंदु धर्माचे अंग नाही. आर्यवादी विकृतांना आपली ध्येये विदेशी संस्कृत्यांतुन उचलावी लागतात यातच सर्व आले. हे हिंदु नाहीत. म्हणुन मी मागील लेखात संघाचा हिंदु धर्माशी काहीएक संबंध नाही असे म्हटले होते आणि तेच सत्य आहे असे माझे मत आहे. हे हिंदु मार्गातील मोठे अडथळे आहेत. हे आर्यवादी असुन मेंढ्याची कातडी पांघरत हिंदुंच्या (शैवांच्या) कळपात घुसलेली नुसती लबाडच नव्हे तर विघातक मंडळी आहे.
१९५६ मद्धे प्रसिद्ध पत्रकार व स्तंभलेखक डी. एफ. कारक यांनी गोळवलकारांबाबत (व संघाच्या बाबत) जे विधान केले होते ते असे:
"Golwalkar was a guru of hate, whose life's malevolent work was — as Jawaharlal Nehru so memorably put it — to make India into a "Hindu Pakistan". That project has not succeeded yet, and may it never succeed either."

द्वेषाच्या पायावर खोटे हिंदुत्व रचणारा संघ हा हिंदु धर्माच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे हे नीट समजावुन घ्यावे लागणार आहे. त्याखेरीज हिंदु धर्मासमोरील समस्या संपनार नाहीत. आम्हाला "हिंदु पाकिस्तान" बनवायचा नाहीहे. पण तसे करण्याचा जे प्रयत्न करताहेत त्यांचे बेत हाणुन पाडले पाहिजेत.

field_vote: 
0
No votes yet