इझी कॅम

Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely.
– Lord Acton
—
त्याची झोप अर्धवट उघडल्यासारखी झाली.
बाहेर अजूनही अंधार होता आणि मुंबईच्या हवेत चक्क हलकीशी थंडी होती.
त्याला थोडी तहान लागल्यासारखी वाटली, कदाचित म्हणूनच झोप चाळवली असावी त्याची.
त्यानं बाटलीतून पाणी प्यायलं आणि परत अंगावर गुरगटून चादर ओढली.
मग तो उपडा झाला.
खाली त्याला सेमी इरेक्शन आल्यासारखं झालं.
मग त्यानं उपडं पडूनच बेडला थोडंसं घासलं. छान वाटलं त्याला.
त्याच्या मनात आठवणी तरळल्या.
आधी त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडच्या.
गर्लफ्रेंड नव्हेच खरं तर.
तिनं त्याला फ्रेंडझोनच केलेला कायम, कधीच हात लावून दिला नव्हता.
म्हणूनच कदाचित त्याची इच्छा अजूनही तशीच लसलसती राहिलेली...
आता तो पूर्णच ताठ झालेला आणि बेडला जोरात घासू लागला.
अर्ध्या-पहिल्या-दुसऱ्या-तिसऱ्या बेसवर आयुष्यभरात तो थोड्या-फार मुलींबरोबर गेलेला.
थोड्याच, खरं तर, फार नव्हे.
त्या सगळ्या सटासट त्याच्या मनी तरळू लागल्या.
त्यांना मनसून तो अजून जोरात घासू लागला.
इतक्यात त्याला "मनसून" शब्द पंकज भोसलेच्या कोणत्यातरी नव्वद-रंजनी सुरस कथेत आहे हे आठवून खुद्कन हसू आलं आणि त्या डिस्ट्रॅक्शननी त्याचा जोर कमी झाल्यासारखा.
त्याला थोडं भान आल्यासारखं.
त्यानं त्याची रूम आणि आईच्या रूममधला स्लायडिंग डोअर बघितला. तो व्यवस्थित बंद होता.
तिकडून त्याची नजर घड्याळाकडे गेली.
च्यायची सहा वाजले होते. बायको उठली असणार तिच्या शिफ्टला पुण्यात.
आणि अचानक त्याला वरच्या सिक्युरिटी कॅमेऱ्याची आठवण आली आणि त्याचं इरेक्शन परत अर्ध्यावर आलं.
वरती लाल ठिपका लुकलुकत होता.
त्याला थंड झाल्यासारखं वाटलं, अपराधीसुद्धा आणि मग मात्र त्याला जेन्युइनली बायकोची आठवण आली.
तिच्याबद्दल प्रेमही दाटून आलं. आणि परत तो हार्ड झाला.
मग उताणा झाला आणि स्वतःशी खेळत राह्यला.
माँ चुदाये कॅमेरा त्यानं मनातल्या मनात म्हटलं आणि तो ताठत-लुळावत बायको आणि इतर एक्सेसच्या आठवणी मनसत राह्यला आणि कधीतरी फायनली रिलीज होऊन परत श्रांत झोपून गेला.
—
उन्हं डोळ्यावर आली आणि त्याची झोप संपल्यासारखी झाली.
तेवढ्यात वरून आकाशवाणीसारखा आवाज आला, "निक्या गुड मॉर्निंग"
त्यानं उपड्यानेच वर कॅमेऱ्याच्या दिशेनं बायकोला हात करत "गुड मॉर्निंग" म्हटलं आणि तो उठला.
मुंबई उपनगरातल्या त्याच्या आईच्या छोट्याश्या फ्लॅटमध्ये तो आला की बाहेर हॉलमध्ये झोपायचा.
मध्ये एक स्लायडिंग डोअर आणि त्या डोअर पाठच्या बेडरूममध्ये आई आणि केअर-टेकर छायाताई झोपत.
उठल्याउठल्या त्यानं चादर फेकली आणि धडपडत शॉर्ट्स शोधली.
तसंही कोणी धाडकन दरवाजा उघडला नसता.
मुंबईच्या मॅचबॉक्स घरांचा एक प्रोटोकॉल असतो तो इकडेही पाळला जायचा.
सकाळी उठल्यावर तो बर्थ डे सुटात असतो हे सगळ्यांना न बोलताही माहीत होतं.
त्यानं समोरच्या फ्रेंच विंडोच्या काचेत देह प्रेमाने न्याहाळला.
पोट किंचित सुटलं असलं तरी पूर्ण नग्न असताना ते जवळपास (त्याला तरी) सपाटच वाटत होतं.
हात पाय त्याचे छान लांबसडक होते बिपाशा बसूसारखे.
टॉर्सोही वर्षानुवर्षांच्या स्विमिंगच्या कृपेने व्ही म्हणता येईल असा.
काही क्षण तो स्वतःवर खुश होत राहीला आणि मग त्यानं सावकाश शॉर्ट्स चढवली.
बायको बघत असेल का बहुतेक नाही.
कॅमेऱ्यात त्याला चेक करण्यात तिला फारसा रस नव्हता.
तिचा "पर्सन ऑफ इंटरेस्ट" वेगळाच होता.
त्यानं धडधडत्या छातीनं चौघांचा व्हाट्सॲप ग्रुप उघडला.
नशीब आज काही आग लागली नव्हती... अजूनतरी.
छाया ताईंनी टाकलेलं आईचं आजचं बी. पी., आईचा गुड मॉर्निंग आणि त्याला चक्क बायकोचा लाईक.
ठीकच म्हणजे,
"मिडिऑकर इज गुड इन फॅक्ट इट्स ग्रेट"
त्यानं हायसं वाटून "गुड मॉर्निंग गर्ल्स"चा मेसेज टाकला आणि तो दिवसात बुडून गेला.
पण संध्याकाळी बायकोचा फोन आला आणि त्यानं आवाजावरूनच ओळखलं की काहीतरी बॉम्ब फुटणार.
तसंच झालं, "तुझा इव्हीनिंग स्क्रम कॉल झाला की मला व्हिडिओ कॉल करा सगळ्यांनी", ती तिच्या ठेवणीतल्या खास गारेगार आवाजात म्हणाली.
स्क्रम कॉल त्यानं भिरभिरतच घेतला. आणि व्हिडिओ कॉल केला.
"तुझ्या आईनं परत कांड केलंय चहा पिताना. का दिला कालचा शिरा ताईंना? आपलं ठरलंय ना शिळंपाकं कोणीच खायचं नाही म्हणून मग का करते ही बाई असं?"
आईच्या डोळ्यांत खिन्न राग, छायाताई भेदरलेल्या.
"अगं पण छायानंच मला सांगितलं तिला शिरा आवडतो म्हणून विचार तिला."
छायाताई होकारार्थी आणि नकारार्थी मान एकाचवेळी हलवत राह्यलेल्या.
"त्या घाबरतात हो तुम्हाला. त्या होच बोलणार. सोडा ही चिंधिगिरी."
बायको ताडताड बोलत राह्यली.
आईनी तिचं फायनल हत्यार काढलं. "मी मरून जाईन तर बरी तुम्हा सगळ्यांची सुटका होईल."
"कशाला? मीच जाते कुठे तरी! तुम्ही बसा तुमचं घर आणि पैसा घेऊन."
दोघी आपापल्या परीने तंडत राह्यल्या.
त्याला कोण बरोबर-चूक कळेना.
त्याचं डोकं हळूहळू कलकलू लागलं.
त्याच्या सॉफ्टवेअर इंजिनीअर मेंदूनं अपराधी वाटून घेत काही ऑप्शन्स हळूच तपासून पाह्यले.
'आई गेली तर होतील का गोष्टी खरंच सिम्पल? खरंच करतेय का आई चिंधिगिरी?' एक आवाज हळूच खुसफुसला.
'का मागावा डिव्होर्स?' दुसरा फिसफिसला.
'अर्धे पैसे द्यावे लागले तर जगू शकू का आपण? का लग्नाआधीच प्री-नप् करायला हवं होतं?'
'च्यायची, इंडियात प्री-नप् होतं तरी का?'
दोन्ही बायका वितंडत राह्यल्या, छायाताई चुळबूळ करत गप्प, आणि तो भरकटत ऑप्शन्स तपासत राह्यला.
आई गेल्यावर तिची आठवण येत राहील त्याचं काय?
वीस वर्षांपूर्वी गेलेला बाबा अजून त्याच्या स्वप्नात यायचा आणि मग अख्खा दिवस खिन्न जायचा.
रादर, बाबा असत्या तर गोष्टी बॅलन्स राह्यल्या असत्या का?
किंवा आपण बेबी केला असता तर?
बायकोची तीच रिझेण्टमेण्ट असेल का? पण तिनं तर मान्य केला होता हा डिंकचा प्लॅन.
थोडी हाफ हार्टेड होतीच ती हे मान्य करताना.
शेवटी आईपणाची आस असतेच का बाईला? की नॉट नेसेसरी?
त्याचं तर आईशी याहून कनेक्शन होतं; अजूनही आहे.
त्या दिवशी पुण्यात 'साबर बोंडं' बघितल्यावर सुद्धा खूप आठवण येऊन लगेच फोन केलेला आपण आईला.
मग आई गेलेली चालेल का आपल्याला?
बऱ्याच उशिरा लग्न व्हायच्या आधी तो नेहमी म्हणायचा की,
"ह्या बाईशी माझी अशी काही अमेझिंग केमिस्ट्री आहे की ही माझी आई नसती तर लग्नच केलं असतं मी तिच्याशी."
पण लग्न सुद्धा त्यानं उशीरा पण खूप मनापासूनच केलं होतं.
हे ताडताड थुंकी उडवत बोलणारं बायकोचं व्हर्जन त्याला आवडत नसे पण तीच तर होती त्याला आणि तो तिला.
येनकेन प्रकारेण बहुतेक सगळेच मित्र दुरावले होते त्याचे.
कोणाशी ब्येक्कार भांडण झालेलं; कोणी त्याला आता अजिबातच मोजत नसलेला; कोणी ऐन चाळिशीतल्या हार्ट अटॅकनं उडलेला; आणि एकानं तर उडीच मारलेली थेट.
रोज रात्री सगळं येऊन बायकोलाच तर सांगायचा तो.
आणि ते फेसबुकवरचे साधेसुधे, डुडु-बुबूचे फोटो बघितले की अपार प्रेम दाटून यायचं त्याला त्याचं काय?
मॅरेज इज फकींग कॉम्प्लिकेटेड.
की सरळ एक तिसरा फ्लॅट घ्यावा मुंबई-पुण्याच्या मध्ये? आणि करावं वर्क फ्रॉम होम??
मग अक्कल येईल ह्या दोन्ही मूर्ख बायकांना.
पण परवडेल का ते?
की निखिलसारखं सरळ १२ व्या मजल्यावरून...
कधीतरी कॉल कट झालेला.
आई खिन्न, ताई अजून भेदरलेल्याच.
व्हॉट्सॲपवर बायकोचे सटासट मेसेजेस :
'मला कधीच जस्टीस देत नाहीस',
'आईचीच बाजू घे',
'तिलाच घेऊन बस', इत्यादी, इत्यादी.
त्यानं जेवण झाल्यावर आईला बेडरूममध्ये बोलावलं.
आणि तिचा क्लास घ्यायचा प्रयत्न केला जे त्याला कधीच नीट जमायचं नाही.
त्याला समोर जे माणूस आहे त्याचा पॉईंट जेन्युइनली खरा वाटत राहायचा.
आताही आई कळवळून सांगत राह्यली की तिनं शिरा छायाताईंना चिपकवला नाही.
आणि आधी बायको कशी चांगली होती आणि आत्ता अचानक कशी बदललीय वगैरे.
पण तूही केलंस ना बिच्, खालच्या नंदाताईकडे.
काय गरज होती तुला तिला सांगायची, "हिलाच नकोय बाळ! मजा करायला पाहिजे नुसती"
तुला माहितीय माझा डिसिजन आहे तो पहिल्यापासून.
तिनं तिच्या सुनेला सांगितलं आणि तिनं जुईला.
तुम्ही चौघींनीही एकमेकांबद्दल बिच् करून काशी घातलीय.
त्याच्यातल्या सॉफ्टवेअर आर्किटेक्ट्ला रहावेना त्यानं पडलेलं पेन घेऊन तरातरा टांगलेल्या कालनिर्णय वर फ्लोच काढला.

आणि मग त्याला हसूच यायला लागलं.
श्या कुठून कुठे आलो आपण यार.
फकिंग मॅरेज!
फकिंग भवसागर!!
फकिंग बिची गर्ल्स!!!
आई परत रडायला लागलेली.
"तो सिक्युरिटी कॅमेरा काढ बाबा", ती तळतळून बोलली.
त्यानं तिला थोपटलं आणि हॉलमध्ये येऊन सोफ्यातून बेड ओपन केला.
मन काही थाऱ्यावर नव्हतं; झोप येईना.
कोणीतरी बरेच दिवस जॉर्ज ऑर्वेलचं १९८४ रेकमेण्ड केलं होतं.
त्यानं ते किंडलवर उघडलं,
सुरुवात साधारण अशी होती,
"The telescreen received and transmitted simultaneously. Any sound that Winston made, above the level of a very low whisper, would be picked up by it; moreover, so long as he remained within the field of vision … he could be seen as well as heard … There was of course no way of knowing whether you were being watched at any given moment."
"You had to live — did live, from habit that became instinct — in the assumption that every sound you made was overheard, and, except in darkness, every movement scrutinized."
पुढे काही त्याला वाचवेना.
त्यानं सरळ पॉर्न उघडलं तसाही अंधार होता आणि माँ चुदाये कॅमेरा.
—
दोन दिवसांनी तो पुण्यातल्या घरी पोचला. बायकोनं थंड पोलाइट तरीही राग – प्रेमाचा परफेक्ट बॅलन्स असलेलं स्वागत केलं.
आणि त्या बॅलन्सबद्दल त्यानं बायकोला मनोमन दाद दिली.
त्याचं हे प्रशस्त प्रकाशात न्हायलेलं, शाईसारख्या निळ्या आणि कॅरमच्या महागड्या हस्तिदंती स्ट्रायकरसारख्या ऑफ व्हाईट भिंतींचं घर त्याला खूप आवडायचं.
पण अशीच अन्बन् राहिली तर होईल का आपला डिव्होर्स? हे घर तर तिला द्यावं लागेल बहुधा.
काय करू आपण जास्त मिस? घर की बायको?? घर मिस करणं मटेरिअलस्टिक होईल की नाही?
आपण गिल्टी वाटून घ्यायला हवं का? असे काय काय विचार करत तो बाथरूममध्ये शिरला.
बाथरूममध्ये त्याची वाळत टाकलेली स्विमिंगची कॅप दिसली आणि तो थरथरला.
उद्या अडल्ट डायव्हिंग क्लबची प्रॅक्टिस होती आणि तो पहिल्यांदाच टॉप फ्लोअरवरून जम्प मारणार होता.
त्यानं उगीच जम्प मारत असल्यासारखे हात-पाय बाथरूममध्येच ताठ केले आणि तो गरम पाण्यात तंद्रीत गात्रं सैलावत राह्यला.
तो केस पुसत बाहेर आला बायको फोनमध्ये टक लावून बघत होती, "बघितलंस त्या खालच्या बिच् नंदाताईनं छायाताईंना चहाचा कप दिला आत ठेवायला. तुझ्या आईच्या मैत्रिणींची पण कामं करायची का छायाताईंनी? त्या केअर टेकर आहेत आपल्या नोकर नव्हेत."
बायकोची परत थुंकी उडायला लागली.
"बोलतो मी आईशी", तो क्षीणपणे बोलला.
"पण ऐक ना, नको करू मॉनिटर एवढ्या छोट्या गोष्टी. ते करतील हँडल त्यांचं लाईफ मुंबईत. तूच त्रास करून घेतेयस आणि मलासुद्धा देतेयस", तो चिरकला.
"मॉनिटर नको करू तर काय? त्या बिचाऱ्या छायाताईंना वापरून घेते तुझी आई. आपण पैसे देतो म्हणजे काय विकत नाही घेतलं त्यांना. स्वभावच तिचा आहे तसा. जुईला बाळ नको, मजा मारायचीय; असं सांगत फिरते सगळ्यांना. का नाही बोलली, तुझा डिसिजन आहे म्हणून?"
"अगं, पण सगळ्यांना माहितीय तो माझा कॉल आहे म्हणून आणि तू मला सपोर्ट केलंस थँक्स."
"पण बिल माझ्यावर फाटतं ना."
"मी फेसबुकवर टाकतो बस! बाळ न करण्याचा निर्णय माझा आहे म्हणून"
त्यानं वातावरण हलकं करण्याचा फोल प्रयत्न केला.
"नाही तू टाकच", तिच्या डोळ्यांतून घळघळ पाणी व्हायला लागलेलं.
त्याला समोर जे माणूस आहे त्याचा पॉईंट जेन्युइनली खरा वाटत राहायचा.
आणि आता समोर बायको होती.
सिक्युरिटी कॅमेरा उडवायचा विषय काढण्याची त्याची हिंमत अर्थातच झाली नाही.
हे कॅमेऱ्याचं तालिबानसारखंच झालं च्यायला! क्युअर इज वर्स दॅन डिसीज.
तो आधी नाही नाहीच म्हणत होता सिक्युरिटी कॅमेऱ्याला.
तेव्हा आई तुलनेने बेटर होती म्हणून तिनंही 'खर्च नको', शिवाय 'प्रायव्हसी हवी' म्हणत केअरटेकर ताईसुद्धा ठेवू दिल्या नव्हत्या.
पण एकदा तो पुण्यात असताना तिथे मुंबईत आई पडली आणि दोन तास एकटी तळमळत राह्यली.
खालची नंदाताई येईपर्यंत आई अशीच. ते नंदाताईचे उपकारच खरं तर.
पण भलतंच स्केरी होतं ते सगळं. त्याला तर आई जातेय असंच वाटलेलं.
मग बायकोनंच पुढाकार घेऊन केअर टेकर अरेंज केला होता आणि त्यांच्यावर आणि आईवर लक्ष ठेवायला इझी-कॅमसुद्धा.
त्यानंही तेव्हा काळजीनं होकार दिलेला पण बायको काही आठवड्यांत कॅमेऱ्याशी ऑब्सेस झाल्यासारखीच.
आता हा कॅमेऱ्याचा अल कायदा आपल्या लग्नाचा ट्विन-टॉवर घेऊनच कोसळणार.
जेवणं त्यांची नरमगरमच झाली आणि दोघं झोपायला आत गेले.
बायको गप्प गप्पच पाठ करून झोपली आणि पाच मिनटांत घोरू लागली.
सकाळी सातची शिफ्ट होती तिची.
तो मात्र थोडा वेळ लॅपटॉपवर काहीबाही चाळत राहीला आणि त्याला नील आर्ते नावाच्या ब्लॉगरची 'ब्लॅक मिरर' सिरीजविषयीची पोस्ट दिसली,
काहीशी अशी :
खास करून एका एपिसोडनं (एन्टायर हिस्टरी ऑफ यु) एक जो ज्ञानाचा ब्रम्हकण दिलाय ना तो सांगायलाच हवा इथे माउली:
कसं आहे ना की आपलं आणि आपल्या पार्टनरचंही एक आयुष्य असणारे...
एकमेकांना माहीत नसलेलं...
आणि ते तसंच असू द्यावं...
तो कॅन ऑफ वर्म्स न उघडेललाच बरा.
एकमेकांच्या काही बाजू रिस्पेकटफुली अंधाऱ्या राहू द्याव्यात.
मोह पडलाही असेल त्या माणसाला कदाचित... एखाद्या रात्री...
पण आपण त्या विद्रुप सत्याच्या मेडुसाकडे बघून नात्याचा दगड करणार...?
की त्या चुकार क्षणाच्या आगे आणि मागे जीवाला जीव देणारं आपलं माणूस जपणार??
हे ज्याचं त्यानं ठरवायचं...
माझं ठरलंय!
थँक्स टू ब्लॅक मिरर!!!
हे पटलंच त्याला एकदम.
उदाहरणार्थ,
त्याचेही तर एकदा मैत्रीणीला केलेले चावट मेसेजेस पकडले होते जुईनं, लग्नाच्या आरंभी;
आणि बहुतेक शिक्षा म्हणून तीही गेली होती तिच्या देखण्या बॉसबरोबर अहमदाबादला एक रात्र.
पण त्यानं काही खोदलं नव्हतं. फिट्टमफाट समजून विसरून गेला होता तो.
आणि नंतर नंतर तर त्याला लग्न मनापासूनच आवडू लागलं होतं.
त्यामुळे त्यानं पुन्हा काही तसा भ्रमर स्टंट अजिबातच केलं नव्हतं. वॉज नॉट वर्थ इट!
जुईला दाखवायला पाहिजे 'एन्टायर हिस्टरी ऑफ यू' एकदा. कदाचित कॅमेरा काढू देईल ती.
त्याला एकदम सरसरून झोप आली आणि तितक्यात जुईनं त्याचा पाय आपल्या पायावर ओढून घेतला आणि अर्धवट झोपेतच बोलली, "यु वोन्ट लिव्ह मी ना?"
तो तिला बिलगून शांत झोपून गेला. उद्या सकाळी डायव्हिंग करायचं होतं.
—
सकाळी जाग आल्या आल्या नर्व्हसनेस आणि एक्साइटमेन्ट दोन्ही सरसरून आल्या त्याच्यावर.
नर्व्हसनेस थोडा जास्तच.
डी डे!
मागची जवळ जवळ दोन वर्षं त्याचे डायव्हिंगचे क्लासेस चालू होते.
तो अर्थात काही प्रोफेशनल ॲथलीट नव्हता त्याचं वयही राहिलं नव्हतं कॉम्पिटिटीव्ह डायव्हिंगचं.
पण तो १० मीटरचा बोर्ड त्याला बोलवत राह्यचा ये-ये करून.
वेळात वेळ काढून ऑन-ऑफ जमेल तशी प्रॅक्टिस करायचा तो.
मध्ये आई पडल्यावर तीन महिने ऑलमोस्ट ब्रेकच झालेला.
पण आता परत तो थोडा ट्रॅकमध्ये आला होता.
त्याच्या जम्प्स १ मीटर – ३ मीटर – ५ मीटर – ७.५ मीटरवरून परफेक्ट नसल्या तरी ठीकठाक जात होत्या.
आणि मागच्या वेळीच तुषारला त्याच्या कोचनं सांगितलं होतं.
"सर नेक्स्ट टाइम १० मीटर से जम्प मारेंगे. आय थिंक यु आर रेडी."
तेव्हाच त्याला थरारल्यासारखं झालं होतं.
१० मीटर प्लॅटफॉर्म म्हणजे डायव्हर्सचा होली ग्रेलच.
तंद्रीतच तो फटाफट तयार होऊन पूलवर पोचला.
वॉर्मअप – शॉवर – मग दोन लॅप. सगळं फटाफट करून तो जम्पला तयार झाला.
१ मीटरवरून त्यानं मारल्या चार-पाच. परफेक्ट गेल्या.
मग ३ मीटरवरून तीन. छान गेल्या
मग ५ मीटर वरून तीन. चांगल्या गेल्या.
५ मीटरपर्यंत त्याची नजर आता बसल्यासारखीच झालेली.
भीती नाहीच वाटायची, प्युअर जॉय.
पण साडेसातला मात्र थोडा नर्व्हसनेस यायचा अजूनही.
साडेसात म्हणजे जवळजवळ दहाच.
ताज आणि ओबेरॉय ऑलमोस्ट सेमच आहेत ना. तसंच.
साडेसातची पहिली उडी छान गेली.
दुसरी थोडी अंडर गेली. ओठ दाताखाली चावला गेल्यासारखा झाला पण नथिंग बिग! चलता है.

तो पाण्यातून बाहेर आला आणि त्यानं तुषारकडे बघून दोन्ही हातांनी दहाची खूण केली.
तुषारनी अंगठा दाखवून संमती दिली.
त्यानं मोठा श्वास घेऊन पायऱ्या चढायला सुरुवात केली.
साडेसातपर्यंत तो झपाझप गेला मग त्याला धाप लागल्यासारखी झाली.
४८चा होता तो सो ते साहजिकच.
त्यानं साडेसातवर १० सेकंद ब्रेक घेतला आणि तो पुढे चढला.
१० मीटर प्लॅटफार्मच्या शेवटच्या पायरीवर कसलीतरी बाऽऽ रीक पांढरी सुंदर फुलं आली होती.
त्यांना हळूच त्यांना शिवलं. आणि तो प्लॅटफॉर्मवर आला.
वारा जास्तच भण्ण होता इथे.
एक कावळा एजवर बसला होता. त्यानं संशयानं एक क्र्यांव केलं आणि तो उडून गेला.
त्यानं एकदा मगाशी उललेल्या ओठावर जीभ फिरवून खारी चव घेतली एक मोठ्ठा श्वास घेतला आणि तो एजवर आला.
छाती त्याची अजूनही थाडथाड उडत होती. पायऱ्या चढल्यामुळे की गांड फाटल्यामुळे की दोघांमुळे कोण जाणे च्यायला.
डावीकडे मुळा (की मुठा?) नदी बऱ्यापैकी स्वच्छ दिसत होती. उन्हात पाणी चमचम करत होतं. उजवीकडे जॉगर्स पार्कला अजूनही काही लोक धावत होते.
आणि सरळ खाली पूलचं अशक्य सुंदर नीलमण्याच्या कलरचं पाणी.
संथ पोहणारे काही लोक.
ह्या सगळ्या माहौलचा राजाच असल्यासारखं वाटलं त्याला.
आणि मग त्याला बायको आणि आईची सिच्युएशन आठवून झाकोळल्यासारखं झालं.
तोल जातो की काय?
फकिंग फोकस भेंचोत.
ही आपली बॉडी आणि आपण तिचे.
जम्प करताना आपण म्हणजे बॉडी आणि बॉडीच फक्त.
मनानं तिचं ऐकायचं चुपचाप.
त्याची भीती, सगळे कोलाहल, घरचे ताण अचानक निवल्यासारखे झाले.
खालून तुषारनं गो अहेडची खूण केली.
त्यानं सरळ समोर दिसणाऱ्या सोसायटीतल्या एका खिडकीचा पॉईंट पकडला.
डोळे खिडकीतल्या वाळत टाकलेल्या निळ्या जीन्सवर फिक्स केले आणि उडी मारली.
तो खाली जात जात राहीला.
जीन्स दिसत दिसत नाहीशी झाली.
थोडं उशीरा त्यानं हात पकडून बॉडी ताणली आणि तो साट्टकन पाण्यात घुसला.
गोट्यांना हलका फटका बसला पण उडी बरीच छान गेली होती.
तो आनंदानं थुयथुयत तळातून वर आला आणि त्यानं पाण्याबाहेर डोकं काढून तुषारकडे बघितलं.
तुषारनी अंगठा आणि पहिलं बोट चिकटवून छानची खूण केली आणि तो बाकी स्टुडंट्सकडे वळला.
तो खुशीच्या मंद मंद नशेत पाण्यावर सैलावून तरंगत राह्यला.
त्याच्या स्वतःच्याच शरीराविषयी त्याला अपार प्रेम दाटून आलं.
काही क्षण त्यानं ती आनंदाची-यशाची नशा भिनू दिली आणि मग एका छान रिदममध्ये दोन्ही हातांवर शरीर तोलून तो सपकन पूलच्या कट्ट्यावरून वर आला.
बाजूच्याच आऊट डोअर शॉवरमध्ये तो मनसोक्त भिजत राह्यला.
स्वतःच्याच खांद्यांवरून, मानेवरून, डोक्यावरून, थोड्या गोलसर पोटावरून, मांड्यावरून, कुल्ल्यांवरून तो मायेनं, अभिमानानं हात फिरवत राह्यला.
समोरच्या जांभळाच्या झाडातून एक उन्हाचा खेळकर कवडसा त्याच्या चेहेऱ्यावर पडला.
क्षणभर त्याला घरच्या इझी-कॅमची आठवण झाली.
उन्हाचे काही किरण त्याच्या डोक्यातही लखलखल्यासारखे झाले.
—
पुढच्या आठवड्यात मुंबईत आल्यावर त्याचं छायाताईंशी मंथली वन-ऑन-वन झालं.
"आई थोड्याफार विचित्र वागतात कधी पण आम्हाला पेशंटच्या अशा वागण्याची सवय असते. एकंदरीत ठीक आहेत गोष्टी आमच्यात. पण तो सिक्युरिटी कॅमेरा काढा दादा! आई भेदरलेल्या असतात आणि मलासुद्धा कसं तरीच होत राहतं. काही तरी चूक होईल नी ताईंचा कधीही आवाज येईल अशी भीती वाटत राहते सतत.
आणि हो शिऱ्याचं मात्र मीच सांगितलं होतं आईंना आंघोळ घालताना. मला नाही वाटलं त्याचं एवढं कांड होईल. सॉरी दादा. तुमचं मात्र दोन्हीकडून मरण आहे."
"ठीक आहे ताई करू आपण काही तरी", तो काहीशा तंद्रीत म्हणाला.
त्याच्या मनातला खुंटा मात्र बळकट झाल्यासारखा.
"बोलावू आता आईंना आतून? खाली जातो आम्ही चालायला", छायाताईंनी विचारलं.
त्यानं मान डोलावली आणि आणि तो युट्यूब म्युझिकमध्ये छानसं गाणं शोधू लागला.
—
दुसऱ्या दिवशी:
जुई आणि आई भेदरून गप्प बसलेल्या आणि तो ताडताड बोलत राह्यलेला.
जुईला त्यानं पुण्यावरून तडकाफडकी बोलावून घेतलेलं तिघांच्या अर्जंट फॅमिली मीटिंगसाठी.
छायाताईंना खाली पाठवून दिलेलं.
"इझी-कॅम के माँ की चूत. माझा नागडा व्हिडिओ व्हायरल झालाय.
काल मी नाचत होतो आई आणि ताई खाली गेल्यावर. नाय नाचू शकत मी माझ्या घरी?
ह्या बघा कमेंटस,
- अंकल फिटनेस अच्छा है, खाली थोडा ॲब्स बनाओ. भाभी को बोलो राईस मत दो.
- डूड इज डान्सिंग लाईक नो वन इज वॉचिंग. फ्रॉम हिज मूव्हज आय थिंक इट्स ब्लूज म्युझिक. विश सिक्युरिटी कॅम्स हॅड साऊंड.
- दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
- डॅड बॉड
- DILF
- ही इज हाय लाईक शीट, टॉवेल छुटा पता भी नही चला.
- कॅन यू डू धिस ॲट माय बॅचलरेट पार्टी? डी एम मी युवर कॉस्टींग.
- स्मॉल पी पी फॉर धिस टॉल गाय.
काय करू सांगा कुठे लपू? कसा जाऊ कामावर? की सोडून देऊ सगळं आणि मारू निखिलसारखी उडी?
दोघी हमसाहमशी रडत राह्यलेल्या.
तरी जुईनं रडता रडता विचारलंच, "पण सिक्युरिटी फुटेज लीक झालं कसं?"
"मी केलं", तो ओरडला, "ह्या बघा इझी कॅमच्या डे झीरो सिक्युरिटी व्हल्नरेबिलीटीज!"
त्यानं लॅपटॉपवर इकॉनॉमिक टाइम्सचं पेज उघडलं.
मोठ्ठी बातमी होती पहिल्याच पानावर.
"Easy-Cam Security Footage Hacked for Almost 2% of its Subscribers!"
जुई परत रडायला लागली आणि आईनं तिला जवळ घेतलं.
तिनंही चक्क सासूच्या कुशीत डोकं खुपसलं.
"जातोय मी", तो फुसफुसला.
दोघी त्याच्या अंगाला झटू लागल्या.
अरे मूर्ख बायांनो, जीव द्यायला नाही चाललोय. जरा जाऊन बसतो स्टारबक्समध्ये; येईन तेव्हा येईन.
पण येईन डोकं शांत झालं की.
फोनबिन करत बसू नका; जरा एकटं सोडा मला.
त्यानं शूज घातले, गाडीची चावी उचलली.
मग अचानक तो परत आला त्यानं स्टूल घेतलं वर चढून कॅमेरा उपसून काढला.
आणि पायानं त्याचा दिवाळीच्या पहिल्या अंघोळीच्या चिराट्यासारखा चेंदा-मेंदा करून तो दार आपटून निघून गेला.
—
त्यानं कोल्ड कॉफीचा घुटका घेत अमेझॉन क्लाऊडचं इसी-२ मशीन बंद केलं त्याच्यावरच इकॉनॉमिक टाइम्सचं फेक लोकल वेबपेज चालू होतं.
उगीच वायफळ खर्च नको. जॉब जाईल बहुतेक.
नागड्या सॉफ्टवेअर इंजिनीअरची मीम ऑलरेडी दिसू लागली होती.
त्याच्या लॅपटॉप वरचं ईटीसी / होस्टमधलं मॅपिंग त्यानं सध्या तरी तसंच ठेवलं
(3.7.211.217 www.economictimes.com)
तितक्यात एक मेसेज फेसबुक मेसेंजरवर झळकला,
"डूड इज दॅट रिअली यू इन द क्लिप? ऑनलाईन मराठी बिग बॉस करेगा क्या? ऑफर देख लो एक बार"
कदाचित प्रॅन्क असेल किंवा नसेलही. Either ways, he didn’t care!
दोनतीन ओन्ली फॅन्स पेजच्या ऑफर पण आल्या होत्या मेलवर.
बघूया पुढचं पुढे.
आता मात्र त्याला खदाखदा हसू येत होतं.
खालच्या ह्या कमेंटला रिप्लाय केल्याशिवाय त्याला रहावेना.
- डूड इज डान्सिंग लाईक नो वन इज वॉचिंग. फ्रॉम हिज मूव्हज आय थिंक इट्स ब्लूज म्युझिक. विश सिक्युरिटी कॅम्स हॅड साऊंड.
येस इट्स ब्लूज. सॉन्ग फ्रॉम साउंडट्रॅक ऑफ धिस ब्युटीफूल मूव्ही "सिनर्स"
सॉन्ग नेम: लास्ट टाईम (आय सीन द सन).
त्यानं गाण्याची लिंक आणि त्याच्या आवडत्या ओळी टाकल्या
Last time I seen the sun
I was free and on the run
My sins and all I've done
Don't forget me
And let me see the dawning (yeah)
It's not so far away
All my life, I've been waitin'
For a day like today
आणि तो शांतपणे कोल्ड कॉफीचे घुटके घेत राह्यला.
कथा ठीकठीक आहे
कथा एकंदर ठीकठीक आहे. आई-बायको-मुलगा/नवरा या त्रिकोणातील सनातन तणावांचे चित्रण चांगले जमले आहे.
फ्लोचार्टने फिस्सकन हसू आले. (त्या दृष्टीने, ते टेक्निक यशस्वी झाले, म्हणायला हरकत नसावी.)
एकंदर विचार करता, कथा ‘चांगली’ या सदरात जाऊ शकली असती, परंतु…
एक सूचना आहे. पात्राच्या तोंडी फ-शब्दाचा वापर टाळावा. (पात्राच्या तोंडी फ-शब्दाच्या वापराबद्दल, per se, आक्षेप नाही, परंतु) त्याने अपेक्षित परिणाम साधत नसून, उगाच भलताच परिणाम साधून विरस होतो आहे.
बोले तो, आजच्या तरुणाईची lingo, झालेच तर, भारतीय कॉर्पोरेट जगतातील पुरुषांची lingo, वगैरे दर्शविण्याकरिता प्रस्तुत फ-शब्द प्रस्तुत पात्राच्या तोंडी घातला असावा, असा कयास (बहुधा) बांधता यावा. (चूभूद्याघ्या.) एरवी कदाचित ते जमूनही गेले असते, परंतु…
१. याअगोदरचे तुमचे स्वतः एक नॅरेटर म्हणून (विशेषतः तुमच्या टॅक्सीचालनप्रयोगाच्या संदर्भातले) लिखाण (दुर्दैवाने) अगोदर वाचनात आलेले आहे. (ते लिखाण एरवी कितीही उत्कृष्ट असले, तरी, प्रस्तुत संदर्भात त्याचे पूर्ववाचन हे दुर्दैवीच म्हणावे लागेल.) त्या लिखाणात तुमच्या स्वतःच्या नॅरेशनमध्ये प्रस्तुत फ-शब्दाची रेलचेल आहे. (ठीक आहे, तुमची lingo आहे. त्याबद्दल आक्षेप नाही.) त्यामुळे होते काय आहे, की, प्रस्तुत भाषा ही प्रस्तुत पात्राच्या तोंडची न वाटता प्रस्तुत लेखकाच्या तोंडची वाटते. (आपली स्वतःची भाषा लेखक पात्राच्या तोंडी घुसवू पाहात आहे, असा भास होतो.)
२. त्यातसुद्धा, का, कोण जाणे, परंतु, प्रस्तुत फ-शब्दातील ‘फ’ हा दंत्योष्ठ्याऐवजी पूर्णपणे ओष्ठ्य उच्चारला जात आहे, असे एक चित्र (उगाच) डोळ्यांसमोर उभे राहते. (कदाचित देवनागरीतून लिहिल्यामुळे तसे होत असेल. कोणास ठाऊक.) त्यामुळे, स्वतःला उगाच आंग्लाळलेले म्हणून प्रॉजेक्ट करू पाहणाऱ्या काही जातींतील एरवी ममव पुरुष जसे एरवी मराठीतून बोलताना शिव्या तेवढे इंग्रजीतून (मराठी उच्चार-आघातांसहित) देतात, तशातला फील येतो. वास्तविक, प्रस्तुत पात्र हे कॉर्पोरेट जगतात वावरणारे आहे. चांगले शिकलेसवरलेले असावे, पगारही बहुधा बऱ्यापैकी मिळवीत असावे. (थोडक्यात, काहीसे ज्याला उच्चभ्रू म्हणण्याची प्रथा आहे, तशातले असावे.) परंतु, अशामुळे उगाच डाउनमार्केट (किंवा, सोप्या मराठीत सांगायचे, तर, घाटी. किंवा, खरे तर, घाटीचोट.) प्रतीत होते. नि मग विरस होतो.
(अर्थात, याला, फ-शब्द रोमनमधून लिहिणे, किंवा फ-शब्द (देवनागरीतूनच, परंतु) नुक्त्यासहित लिहिणे, हे उपाय नव्हेत. त्याने फक्त फ्लो बोंबलतो; अन्य काहीही साध्य होत नाही. त्यापेक्षा, फ-शब्द पूर्णपणे टाळलेला काय वाईट?)
बाकी, नील आर्ते नामक एका ब्लॉगरच्या ब्लॉगपोष्टीचा उल्लेख मनोरंजक आहे. (‘दावू वाचुनि आमुच्याच ब्लॉगपोष्टी आम्हीच रस्त्यामधे’?) अर्थात, असाच प्रकार वुड्डहौससाहेबानेसुद्धा एके ठिकाणी करून पाहिलेला आहे (गरजूंनी The Clicking of Cuthbert नावाची गॉल्फकथा वाचून पाहावी.), त्यामुळे… You are in good company, एवढेच म्हणू इच्छितो.
बाकी चालू द्या.