Skip to main content

माझ्या श्वासांचं अस्तित्व...

दूरवरच्या एखाद्या निर्मनुष्य बेटावर, मला न एकटंच अडकायचंय...
वेडं समजाल कदाचित मला, पण त्या जांभळ्या आसमानाखाली निवांत बसायचंय...
त्या भयाण शांततेत माझ्या दरेक श्वासाच्या अस्तित्वाला, खूप जवळून अनुभवायचंय...
आजच्या ह्या जीवघेण्या कोलाहलात हरवलेल्या एका निरागस जीवाला, पुन्हा हुडकून काढायचंय...

- सुमित