शारीरिक
एकच कप
शंभर वर्षांपूर्वी गडकऱ्यांच्या 'एकच प्याला'ने महाराष्ट्रात खळबळ माजवली होती. आता वेळ आली आहे एका आगळ्याच 'कपा'तल्या वादळाची! हा काही चहाचा कप नव्हे. मला सांगायचं आहे 'मेन्स्ट्रुअल कप' म्हणजे ऋतुस्रावाच्या कपाबद्दल. आपल्याकडे मुळातच हा विषय चारचौघातच काय - अगदी चार बायकांतही काढला जात नाही. म्हणूनच गेल्या सहा खेपांच्या वेळी यशस्वीरित्या कप वापरल्यावर मला हा लेख लिहायचे बळ आलं. ह्या विषयाबद्द्ल मी आता 'व्हीस्पर' न करता उघडपणे सांगायला लागले आहे. माझ्या एका मैत्रिणीने दोन वर्षापूर्वी मला "मेन्स्ट्रुअल कप" बद्दल सांगितलं होतं. ही मैत्रीण पर्यावरणासाठी काहीही करायला तयार असते.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about एकच कप
- 60 comments
- Log in or register to post comments
- 40187 views
ऑटीझम अवेअरनेस डे / ऑटीझम अवेअरनेस मंथ
आज काय लिहू कळत नाही. बराच वेळ ऑटीझम अवेअरनेस डे व मंथबाबत काहीतरी लिहीलेच पाहीजे ह्या विचाराने बसले आहे. पण काहीच सुचत नाही. मुलाचा स्प्रिंग ब्रेक चालू असल्याने मागे त्याचा दंगा, कर्कश आवाज काढणे इत्यादी चालू असल्याने ह्या परिस्थितीत काही विचार करून लिहीणे जरा अवघडच.! :)
गेल्या फेब्रुवारीपासून मी ऑटीझमवर लिहीत आहे. अजुनही पुष्कळ लिहीण्यासारखे आहे. मात्र सध्या डोक्यात सैतानाने घर करू नये म्हणून बिझी राहण्याच्या दृष्टीने हजारो व्याप मागे लावून घेतले आहेत. स्वस्थ बसून वाचन/लिखाण होणे सध्या दुर्मिळ बाब बनत चालली आहे. Anyhoo, I am loving' it ! :)
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about ऑटीझम अवेअरनेस डे / ऑटीझम अवेअरनेस मंथ
- 14 comments
- Log in or register to post comments
- 7133 views
आदरांजली - कार्ल जेराझ्झी
कार्ल जेराझ्झी काल गेला. आज बातमी वाचेपर्यंत मला त्याचं नावही माहीत नव्हतं. ती माझीच चूक.
कार्ल जेराझ्झीने १९५१ साली नवीन रेणू आणि त्याचं काम यावर संशोधन प्रकाशित केलं. नोरेथिंड्रोन (norethindrone) असं नाव असणाऱ्या या रेणूने स्त्रियांच्या आणि परिणामतः सगळ्यांच्याच आयुष्यात प्रचंड मोठा फरक घडवून आणला. हा रेणू तोंडावाटे घेण्याच्या संततीप्रतिबंधकाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग. रोज एक गोळी घेतली की अनावश्यक संततीची भीती बाळगण्याचं कारण नाही. पाश्चात्य समाजात या गोळीने क्रांती घडवली. 'द पिल' नावानेच ही गोळी ओळखली जाते.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about आदरांजली - कार्ल जेराझ्झी
- 28 comments
- Log in or register to post comments
- 10543 views
बायोमेडीकल टेस्ट्स व रिझल्ट्स
मागील लेखात आपण वाचले की बायोमेडीकल्/डॅन्/मॅप्स डॉक्टरच्या सांगण्यानुसार बर्याच ब्लड टेस्ट्स करून मग अपॉईंटमेंट दिली ती रिझल्ट्स डिस्कस करण्याची. त्याबद्दल लिहीतेच आहे, परंतू थोडी बॅकग्राउंड बायोमेडीकलबद्दल द्यावी असे वाटते.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about बायोमेडीकल टेस्ट्स व रिझल्ट्स
- 16 comments
- Log in or register to post comments
- 11897 views
थरार..... ! फ़क्त (?) आठ सेकंदांचा !!
मी थोडा चक्रावलोच होतो. यावेळी जानेवारीत होणार्या आमच्या वार्षिक सेल्स मिटींग्जमध्ये एक संध्याकाळ 'नॅशनल वेस्टर्न स्टॉक शो' साठी राखीव ठेवण्यात आलेली होती. 'वेस्टर्न' हा शब्द ऐकला की त्याबरोबर आम्हाला एकतर 'कल्चर' आठवते नाहीतर 'म्युझिक'. त्यात मी जेव्हा अमेलियाला (एक अमेरिकन सहकारी) जेव्हा या तथाकथीत स्टॉकशो बद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली... इट्स रोडीओज विशाल.... ! दुर्दैवाने (हा दोष तिच्या अमेरिकन उच्चाराचाही आहे म्हणा) आम्ही ते रेडीओज असे ऐकले आणि मनातली 'वेस्टर्न म्युझिक' ही संकल्पना अजुन पक्की झाली.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about थरार..... ! फ़क्त (?) आठ सेकंदांचा !!
- 6 comments
- Log in or register to post comments
- 5402 views
विपश्यना: माझा प्रत्यक्ष अनुभव: अद्ययावत
मी मिसळपाववर एका प्रश्नाचे उत्तर दिले आहे. माझ्या मते ज्यांना विपश्यनेची काहीच माहीती नाही त्यांना ती या लेखातुन होउ शकेल. तो उतारा जसाच्या तसा ईथे देत आहे. मी प्रथमच ईकडे लेख टाकतोय. जर नियमात बसत नसेल तर काय योग्य असेल ती कारवाई करावी.
लेख आवडला पण आचरणात आणणे कठीण आहे. कारण माफ करणे म्हणजे काय ? त्या व्यक्तीशी आपण अगदी नीट वागलो, जुन्या गोष्टी पुन्हा त्याच्यासमोर उगा़ळल्या नाहीत, अगदी वागण्यातूनही काही दाखवलं नाही, तरी ते आपल्या मनातून इरेज करणं अशक्य आहे.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about विपश्यना: माझा प्रत्यक्ष अनुभव: अद्ययावत
- 128 comments
- Log in or register to post comments
- 48924 views
अॅकलेशिया कार्डिया - सुटका-४
लिक्विड डाएट वर घरी पाठवल्यावर आपण यावर चार आठवडे कसे काढणार असे वाटत होते. कारण खालचा अर्धवट घसरलेला स्टेंट अर्धा अन्ननलिकेत आणि अर्धा जठरात लोंबत होता. त्यामुळे जठरावरचा वॉल्व्ह कायमचा उघडाच राहिला होता. काहीही द्रव पदार्थ प्यायला की थोड्याच वेळांत गॅसेस होऊन ते वर येऊ लागत. अर्ध्या तासात ते कमी होत. त्यानंतरच पलंगावर आडवे होता येत असे. रात्रीच्या वेळी तर, दर दोन तासांनी जाग येऊन उठून बसावे लागे आणि दोन घोट पाणी प्यायल्यावर ढेकरा कमी झाल्यावर परत झोपता येत असे. तर अशा तर्हेने, चार आठवड्यांनंतर या क्षेत्रांतील एका तज्ञ डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळाली.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about अॅकलेशिया कार्डिया - सुटका-४
- 36 comments
- Log in or register to post comments
- 7383 views
अॅकलेशिया कार्डिया -रोग व उपचार-३
अॅकलेशिया कार्डिया (Achalasia Cardia) हा एक अन्ननलिकेचा व त्याच्या जठरावरील जोडणीच्या मधे जो स्नायुंचा वॉल्व्ह असतो त्याच्या क्रिया नीट न चालण्याचा रोग आहे. साधारणपणे लाखांत एका माणसाला हा होतो. अन्ननलिकेच्या खालच्या व जठरावरच्या वॉल्व्हला Lower Esophagal Sphincter (LES) असे म्हणतात. आपल्या अन्ननलिकेची व या एलईएस ची हालचाल मोटर सेन्सर नर्व्हसमुळे होत असते. म्हणून आपण कुठलीही खाद्यवस्तु चावून गिळली की त्या घासाची अन्ननलिकेतली हालचाल खालच्या दिशेने आकुंचन्-प्रसरण या तत्त्वावर होते. त्याचवेळेस, खालचा वॉल्व्ह उघडतो आणि खाऊन झाल्यावर आपोआप बंद होतो. त्यानंतर जठराचे काम चालू होते.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about अॅकलेशिया कार्डिया -रोग व उपचार-३
- 4 comments
- Log in or register to post comments
- 2354 views
अॅकलेशिया कार्डिया-एक जिवंत अनुभव-२
पूर्वसूत्रः - कोणीतरी परफोरेशन असे म्ह्टल्याचे ऐकू आले.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about अॅकलेशिया कार्डिया-एक जिवंत अनुभव-२
- 18 comments
- Log in or register to post comments
- 6543 views
विद्यार्थ्यांची दुपारची जेवणे अर्थात मिड डे मिल
नुकत्याच बिहारमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर मीडियाचे व त्यायोगे जनतेचे लक्ष 'शाळेतील दुपारच्या जेवणावर' अर्थात 'मिड डे मिल' योजनेकडे वळले आहे. जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी व दु:खदायक आहे. या निमित्ताने ही योजना काय आहे? ती कशी राबवली जाते वगैरे शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि तेव्हा मिळालेली माहिती सर्वांसमोर ठेवतो आहे. खरंतर, घटना घडून जाऊन काही दिवस उलटले आहेत पण माहिती जमवून टंकन करण्यात थोडा अधिक वेळ गेल्याने काहिशा शिळ्या झालेल्या पण अर्थातच महत्त्वाच्या विषयावर लिहावे असे ठरवले. या निमित्ताने या योजनेशी संबंधित विषयांवर चतुरस्र चर्चा होईल अशी अपेक्षा आहे.
योजना:
- Read more about विद्यार्थ्यांची दुपारची जेवणे अर्थात मिड डे मिल
- 32 comments
- Log in or register to post comments
- 11622 views