Skip to main content

छोटेमोठे प्रश्न

मनातले छोटे मोठे विचार आणि प्रश्न - भाग १

प्रत्येकाच्या मनात रोज कितीतरी विचार येतात. त्यातले बरेच सारे विचार रोजच्या आयुष्याशी निगडीत असतात. इतर काही मात्र केवळ आपल्यालाच पडत आहेत असे वाटते. त्यामुळे ते विचार योग्य आहेत कि नाही असे तर वाटतेच पण असे विचार पडणेही योग्य आहे कि नाही असेही वाटते. सहसा असले विचार प्रश्नरुपी असतात, क्वचित कल्पनारुपी असतात. समोरच्याला त्यांत रस असेल कि नसेल म्हणून आपण प्राधान्याने ते चर्चेस घ्यायचे टाळतो. तहीही ते विचार अधूनमधून मनात रुंजी घालतच असतात. कधी संकोच नडतो तर कधी पुढचा त्यावर चर्चा करू शकेल इतका सक्षम नसेल असे वाटते. ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत ते पुन्हा पुन्हा मनात येत राहतात.

नास्तिक असणे हे एक चिरंतन मूल्य

माणूस हा एक ‘रॅशनल’ प्राणी आहे असे आपण आपल्या लहानपणापासून घोकत असलो, तरी कित्येकाच्या आयुष्यात रॅशनॅलिटीचा मागमूसही नसतो, हा आपल्या नित्याचा अनुभव आहे. या रॅशनॅलिटीवर इतकी धूळ का साचली आहे, हेही एक न सुटणारे कोडे ठरत आहे. रॅशनॅलिझमचा मूळ गाभाच परमेश्वर या संकल्पनेची चिकित्सा करणे हा असतो. हीच चिकित्सा आपल्याला नास्तिकतेपर्यंत पोचवते.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

मातीचे घरटे

काळ्या चिमण्यांच्या जोडीनं गॅलरीत लाईटच्या बोर्डावर छानसे मातीचा घरटं बनवले आहे. मी मातीचे घरटे पहिल्यांदाच पाहिलं. आता अंडे पण आहेत बहुतेक कारण गॅलरीत जायची चोरी झालीय कारण डोक्यावर चिवचिव करून घिरट्या घालतात. कोणत्या चिमण्या मातीचे घरटे बनवतात? माहिती असल्यास सांगावे.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

कौन बनेगा करोडपती

जगजित हा एक 20-22 वर्षाचा तरूण. त्याला अगदी बालपणापासून गाण्याची आवड. त्याचा आवाजही बऱ्यापैकी होता. त्यातही गजल प्रकार त्याचा अत्यंत आवडीचा. मोठमोठ्या गजल गायकांचे गजल तो हुबेहूब गायचा. मित्र तर त्याला जगजितसिंग म्हणूनच हाक मारायचे. शाळा-कॉलेजच्या वा घरगुती कार्यक्रमात त्याची हजेरी असायची. घरातले, इतर नातेवाईक, शेजारी-पाजारी, मित्र-मैत्रिणी त्याच्या गाण्याचे कौतुक करायचे. टीव्हीवरील कार्यक्रमात एक-दोनदा तो भागही घेतला होता. आई-वडीलसुद्धा त्याच्या गाण्याला उत्तेजन द्यायचे. शाळा-कॉलेज संपल्यानंतर त्याला आपणही मोठा गायक होण्याची स्वप्नं पडू लागली.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

कॉमन सेन्स’च्या दुःखद निधनाच्या निमित्ताने..

‘आज आपण एका वेगळ्या दुखवट्याच्या निमित्ताने येथे जमलेलो आहोत.
आज आपल्यातील व आपल्या बरोबर अनेक वर्षे साथ दिलेल्या ‘कॉमन सेन्स’ या अगदी जवळच्या मित्राच्या अकाली मृत्युमुळे झालेले दुःख जाहीरपणे व्यक्त करण्यासाठी आलो आहोत. तो किती वयाचा होता याची आपल्याला कल्पना नाही. कारण त्याचा जन्म दाखला सरकारी फायलीतून केव्हाच गायब झाला आहे.

त्यानी वेळोवेळी आपल्याला दिलेल्या सूचना व सल्ला यांच्यामुळे तो कायमचाच आपल्या स्मरणात राहील. कारण त्याच्या सूचना व सल्ले फारच बहुमूल्य व अफलातल्या असत. कठिण प्रसंगातून निभावून जाण्यासाठी त्याच्या सूचना फार उपयोगी पडत होत्या.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

अत्युत्कृष्टतेचा पाठलाग करणे हितावह ठरेल का?

जे जे काही आपण करतो ते अत्युत्कृष्ट (perfect) असायलाच हवे, आपल्या जीवनाची घडण उच्च श्रेणीचीच असायला हवी, असे एक आपले स्वप्न असते. परंतु प्रत्यक्ष जीवनात टक्के टोणपे खात असताना आपला स्वप्नभंग होतो, पदरी निराशा येते, आपण दुःखी होतो व कुढत कुढत जीवन जगू लागतो. त्यामुळे उत्कृष्टता, प्राविण्य, उच्च श्रेणी, परिपूर्णता या गोष्टी बकवास वाटू लागतात व आपणही चार चौघासारखे सुमार, सामान्य प्रतीचे राहिल्यास बिघडले कुठे म्हणत, आहे त्यात समाधान मानून आयुष्याची पानं उलगडू लागतो. कदाचित या मागे आपण उच्च श्रेणीचा बळी ठरू नये ही एक सुप्त इच्छा असेल.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

ऐसा भी होता है!

सर्व टीव्ही चॅनेल्सवर दिवसभर ‘रोपण माणसा’चीच चर्चा होत होती. मुळात त्याचे नाव सुभाष सारेपाटील असे होते. परंतु चॅनेल्सवर तो ‘रोपण माणूस’ म्हणूनच ओळखला जात होता. मुंबईच्या एका नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनच्या वेळी ‘अल्पशी चूक’ झाल्यामुळे त्याच्या जनुकांमध्ये – विशेषकरून stem cell मध्ये – काही बदल झाले होते. हे जनुकं आता त्याच्या शरीरातील कुठल्याही अवयवातील मृत पेशींना ताबडतोब जिवंत करत होत्या. त्याची प्रत्यक्षरित्या खात्री करून घेणेसुद्धा शक्य झाले होते. त्याचे एखादे बोट कापले तरी 2-3 दिवसात त्या जागी दुसरे बोट तयार होऊन तुटलेल्या बोटाची जागा भरून काढत होती.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का?

सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो की हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे. पण तो मला पडलेला नाही. वसुधाने(बायको) मानसिक समुपदेशक म्हणून काम करायला सुरुवात केल्यापासून एक एक वल्ली येऊन भेटतात त्यातल्याच एकाने विचारलेला हा प्रश्न! आता बायकोकडे येणाऱ्या रुग्णांबद्दल लिहिणे नैतिकतेला धरून नसल्याने त्याबद्दल जास्त लिहित नाही पण या प्रश्नाने विचार चक्र सुरु झाले.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

अनवट

गजेंद्र अहिरेंचा अनवट चित्रपट पहायचा आहे. Youtube, amazon वर शोधून बघितला, भेटत नाही. कसा मिळवायचा?
इथे कुणी पाहिला आहे का?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

बिनऔषधाचे उपचार

मेडीकल सायन्समध्ये असा एक सिद्धांत आहे की, ज्यात प्रत्यक्ष औषध न देता काहीही औषधी घटक नसलेल्या गोळ्या दिल्या जातात. यातील काही रुग्ण खरोखरच बरेही होतात. आपण औषध घेतले आहे, आपण आता बरे होणार असे त्यांचे मन सांगते आणि त्यावर शरी काम करते.

या सिद्धांताबद्दल कोणाला काही माहिती आहे का? स्वत:च असे उपचार करण्याचे काही तंत्र आहे का?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स