अलीकडे काय पाहिलंत?

नाटक, चित्रपट, चित्रप्रदर्शन प्रकारच्या धाग्यांसाठी.

अलीकडे काय पाहिलंत? - २४

जुन्या धाग्यात १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.
***

कुणाशी तरी बोलताना, सहज राजा गोसावींची आठवण झाली, म्हणून तू नळीवर 'लाखाची गोष्ट' पुन्हा पाहिला. राजा गोसावींचा सहजसुंदर अभिनय, गोड गाणी आणि ग.रा. कामतांच्या त्या दोन मुली! नवीन पिढीने पाहिला नसेल तर एकदा पहावा.
मुलीच्या बापाचे काम, ग.दि. माडगुळकरांनी झकास केले आहे. थोर माणूस!

अलीकडे काय पाहिलंत?

टीव्हीएफ (द व्हायरल फीवर) या ऑनलाईन निर्मिती संस्थेने प्रदर्शित केलेल्या मालिका कोणी पाहतं का ?

अरुणभ कुमार आणि त्याच्या काही साथीदारांनी चालवलेली ही संस्था गेल्या काही वर्षांपासून जास्ती करून बॉलीवूड, मालिका, न्यूज चॅनल्स यांचं विडंबन करण्यासाठी जास्त प्रसिद्ध होती. त्यांचे टीएमओ ..... (द मेकिंग ऑफ .....) या शीर्षकाचे असलेले विडीयो युट्यूब वर बरेच पसंद केले गेले. त्यांचे आणखीही बरेच विनोदी व्हिडियो आहेत. या संस्थेतील बरेच कलाकार आणि दिग्दर्शक हे आयआयटीयन्स आहेत. स्वत: अरुणभ कुमार हा आयआयटी मधून बाहेर पडलाय.

अलीकडे काय पाहिलंत? - २३

रघुराम राजन यांनी दिलेले रामनाथ गोएंका भाषण. पण सध्याचा आर्थिक (भारतीय व जागतिक) वातावरणाबद्दल ची त्यांची टिप्पणी. जरा जास्तच टेक्निकल आहे. (मला यातल्या काही गोष्टी समजल्या नाहीत. पण तरीही त्यांनी अर्थशास्त्राची पार्श्वभूमी नसलेल्यांच्यासाठी काही वाक्ये पेरलेली आहेत. )
.
.
.

आपण सारे गुलाम आहोत का?

1. "All men are created equal" has been called an "immortal declaration," and "perhaps [the] single phrase" of the American Revolutionary period with the greatest "continuing importance". अमेरिकन राज्यघटना हे उच्चरवाने सांगते ...

2. असे असताना आज जगात जे चित्र दिसते त्यानुसार आपण सर्वजण पैशाचे व पर्यायाने पैसेवाल्यांचे गुलाम आहोत .

3. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की ज्याला या पृथ्वीतलावर जगण्यासाठी प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते .

4. महिला त्याच पुरुषाला जोडीदार बनवतात ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे व जो त्या पैशाने भरपूर भौतिक सुखे (?) देवू शकेल

अलिकडे काय पाहीलत - २२

जुन्या धाग्यात १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.
***
काल "राही मतवाले" हे तलत मेहमूद यांचे गाणे ऐकून, त्यांचा व सुरैय्याचा "वारीस" हा १९५४ चा सिनेमा पाहीला. एकदम खूप आवडला. सशक्त व नाट्यमय कथा, अतिशय गोड गाणी. तलत मेहमूद देखणे दिसतातच पण डायलॉगमध्ये त्यांचा मृदू आवाज .... ओह माय गॉड!! साध्या बोलण्यातही, इतका मृदू, मखमली आवाज. सिनेमा फार छान आहे.
.
यु ट्युबवर सापडेल.
.

रिंगण - कामातुराणाम्

ज्यांना आसक्त तर्फे दरमहा भरणारे "रिंगण" माहीत नसेल त्यांच्यासाठी हे सांगणे अगत्याचे ठरेल की दर महिन्याच्या दुसर्‍या शनिवार/रविवारी सुदर्शन रंगमंच, पुणे इथे 'रिंगण' या कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारच्या साहित्याचे अभिवाचन अनेक मान्यवरांतर्फे केले जाते. या रविवारच्या रिंगणात 'कामातुराणाम्' नावाचा प्रयोग होणार आहे असे समजताच या प्रयोगाला हजेरी लावायचीच असे ठरवले होते. त्यात माधुरी पुरंदरे, हृषीकेश जोशी व किरण यज्ञोपवीत हे तिघे अभिवाचन करणार असल्याने एका मर्यादेहून चांगला कार्यक्रम होईल याची खात्री होती. उत्सुकता होती की या वेळी नक्की कोणत्या वेच्यांचे अभिवाचन असेल.

अलीकडे काय पाहिलंत - २१

जुन्या धाग्यात १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.
***

काल 'मुव्हीज-नाऊ प्लस' ह्या चॅनल वर 'शेफ' सिनेमा पाहिला. मागच्या वर्षी भारतात थेटरात आला होता तेव्हाच पहायचा होता पण दुर्दैवाने जमलं नव्हतं आणि असे सिनेमे आठवड्यापेक्षा जास्त चालत नाहीत इथे. भारतीय सिनेमागृहात हॉलीवूड म्हणजे सुपरहिरो, हॉरर, अ‍ॅक्शन, स्काय-फाय, कॉमेडी हेच जोमात चालतं असं माझं मत. असो, ह्या सिनेमाबद्दल आधी ऐसीवर लिहीलं आहे का? असल्यास वाचायला आवडेल.

अलीकडे काय पाहिलंत - २०

जुन्या धाग्यात १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.
***

काल यशवंत नाट्यमंदिरात "अ फेअर डील" हे नाटक पाहिले. आवडले. कॉलेजात जाणार्‍या मुलीच्या हाती चुकून आपल्या (अर्थातच मध्यमवयीन) आईची रोजनिशी लागते. ती वाचल्यावर तिला असे लक्षात येते की आपल्या आईचे तिच्यापेक्षा वयाने बर्‍याच लहान असलेल्या एका तरुणाशी लफडे (अफेअर - अ फेअर - Smile )चालू आहे. त्यानंतर घडणारी ही गोष्ट. ज्यांना नाटक पाहायचे असेल त्यांचा रसभंग होऊ नये म्हणून कथेविषयी ह्याहून अधिक लिहीत नाही.

अलीकडे काय पाहिलंत - १९

जुन्या धाग्यात १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.
***

'रायबेशे' आणि 'ढाली' नावाचे दोन नृत्यप्रकार आज पहिल्यांदाच पाहिले. फारच वेगळे वाटले. ही दोन्ही बंगालमधली लोकनृत्यं आहेत. नृत्य महोत्सवात सादर होत होती म्हणून नृत्यं म्हटलं, पण त्यात नृत्याव्यतिरिक्त गाणी होती, कसरती होत्या, युद्धसदृश प्रसंग होते.

अलीकडे काय पाहिलंत - १८

जुन्या धाग्यात १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.

***

'पर्मनंट रुममेट' नावाची भारतातील पहिली वेब-सिरीज बघितली.(याबद्दल इथे वाचता येईल).

पाने

Subscribe to RSS - अलीकडे काय पाहिलंत?