डिसेंबर दिनवैशिष्ट्य

डिसेंबर दिनवैशिष्ट्य

१०
११ १२ १३ १४ १५
१६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३०
३१

१ डिसेंबर
जन्मदिवस : कवी बा.सी. मर्ढेकर (१९०९), समाजसेविका मेधा पाटकर (१९५४), मादाम तुसॉची स्थापना करणारी शिल्पकार मारी तुसॉ (१९६१), अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार वूडी ॲलन (१९३५), क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (१९८०)
पुण्यस्मरण : गणितज्ञ जी. एच. हार्डी (१९४७), गांधीवादी विचारवंत आचार्य दादा धर्माधिकारी (१९८५), संतसाहित्याचे अभ्यासक, विचारवंत गंगाधर बाळकृष्ण सरदार (१९८८), संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष विजयालक्ष्मी पंडित (१९९०)

---

स्वातंत्र्यदिन : सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक (१९५८)
जागतिक एड्स दिन
राष्ट्रीय लोकशिक्षण दिन
वर्धापनदिन : सीमा सुरक्षा दल (१९६५)
१६४० : पोर्तुगालला स्पेनपासून स्वातंत्र्य. होआव चौथा, पोर्तुगालच्या राजेपदी.
१८३५ : हान्स ख्रिश्चन अँडरसनच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.
१९१९ : गोव्यात दियारिओ दे नॉयते या पोर्तुगीज वृत्तपत्राचा पहिला अंक निघाला.
१९५५ : रोझा पार्क्स या कृष्णवर्णीय स्त्रीने बसमधली जागा सोडण्यास नकार दिला; अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या हक्काच्या चळवळीतील महत्त्वाचा टप्पा.
१९५९ : बारा देशांनी एकत्र येऊन अंटार्क्टिका खंडाचा वापर फक्त विज्ञानसंशोधनासाठी करण्याच्या करारावर सह्या केल्या.
१९६३ : नागालँड भारताचे १६वे राज्य झाले.
१९६५ : भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) ची स्थापना.
१९९७ : बिहारमध्ये रणवीर सेनेच्या कार्यकर्त्यांनी मार्क्सवादी पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या भागात हल्ला करून कनिष्ठ जातीतल्या ६३ लोकांची हत्या केली.
२०१३ : चीनचे पहिले रोव्हर चंद्राच्या दिशेने निघाले.

२ डिसेंबर

जन्मदिवस : चित्रकार जॉर्ज सरा (१८५९), चित्रकार ऑटो डिक्स (१८९१), लेखक व पत्रकार अनंत काणेकर (१९०५), लेखक अ. वा. वर्टी (१९११), गायिका मारिआ काल्लास (१९२३), व्यंगचित्रकार प्रभाकर ठोकळ (१९२७), अभिनेता बोमन इराणी (१९५९), टेनिसपटू मोनिका सेलेस (१९७३)
पुण्यस्मरण : गणितज्ञ व नकाशातज्ज्ञ जेरार्डस मर्कॅटॉर (१५९४), लेखक व तत्त्वज्ञ मार्की द साद (१८१४), लेखक एडमंड रोस्ताँ (१९१८), भारतीय वंशाचा हॉलिवूड अभिनेता साबू (१९६३), लेखक रोमँ गारी (१९८०), कवी फिलिप लार्किन (१९८५), संगीतकार एरन कॉपलंड (१९९०), अभिनेता देवेन वर्मा (२०१४)

---

जागतिक गुलामगिरी निर्मूलन दिन.
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : संयुक्त अरब अमिराती, लाओस.

१६९७ : लंडनच्या सेंट पॉल कॅथेड्रलचे राष्ट्रार्पण.
१८८५ : डॉ. पेपर या पेयाची प्रथम विक्री.
१९१३ : फोर्ड मोटर कंपनीने हलती असेंब्ली लाईन प्रथम वापरली.
१९४२ : एन्रिको फर्मीला पहिली अणुकेंद्रीय साखळी अभिक्रिया चालू करण्यात यश.
१९५६ : क्यूबात क्रांती घडवण्याच्या उद्देशाने फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा क्यूबात दाखल.
१९८२ : पहिली कृत्रिम मानवी हृदयारोपण शस्त्रक्रिया.
१९८८ : बेनझीर भुत्तो पाकिस्तानच्या पंतप्रधान झाल्या. कोणत्याही इस्लामबहुल राष्ट्राच्या त्या पहिल्या महिला राष्ट्रप्रमुख होत.
१९९९ : 'ह्यूमन जेनोम प्रॉजेक्ट'अंतर्गत जगभरातल्या अनेक शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन मानवी गुणसूत्राची रासायनिक रचना शोधून काढली.
२००१ : 'एन्रॉन' कंपनीचे दिवाळे जाहीर.

३ डिसेंबर

जन्मदिवस : लेखक जोसेफ कॉनरॅड (१८५७), नाटककार आणि महाराष्ट्र नाटक मंडळीचे एक संस्थापक सदस्य यशवंत नारायण टिपणीस (१८७६), आधुनिक भारतीय चित्रकलेचे एक जनक चित्रकार नंदलाल बोस (१८८२), स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४), क्रांतिकारक खुदिराम बोस (१८८९), संगीतकार निनो रोटा (१९११), सिनेछायालेखक स्व्हेन नायक्विस्ट (१९२२), ट्यूरिंग पारितोषिकविजेता संगणक संशोधक जॉन बॅकस (१९२४), सिनेदिग्दर्शक जाँ-ल्यूक गोदार (१९३०), 'ब्लॅक साबाथ' गायक ऑझी ऑसबॉर्न (१९४८), नाट्यसमीक्षक व भाषाअभ्यासक मु. श्री. कानडे (१९३१), लेखिका मेघना पेठे (१९५८), अभिनेत्री कोंकणा सेन (१९७९)
पुण्यस्मरण : भिंगनिर्माता कार्ल झाईस (१८८८), लेखक आर. एल. स्टीव्हन्सन (१८९४), चित्रकार पिएर-ओग्युस्त रन्वार (१९१९), कवयित्री बहिणाबाई चौधरी (१९५१), चित्रकार व छायाचित्रकार अलेक्सांद्र रॉडचेंको (१९५६), लेखक माणिक बंदोपाध्याय (१९५६), हॉकीपटू ध्यानचंद (१९७९), अभिनेता देव आनंद (२०११)

---

जागतिक अपंग दिन.

१९१० : निऑन दिव्यांचा प्रथम सार्वजनिक वापर.
१९२७ : लॉरेल-हार्डीचा पहिला चित्रपट प्रदर्शित.
१९६७ : पहिली यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया.
१९७१ : पाकिस्तानचा भारतावर हल्ला.
१९८४ : जगातील प्रमुख औद्योगिक अपघातांपैकी एक असलेल्या भोपाळ वायू दुर्घटनेत हजारो ठार, अनेक जन्मभरासाठी पंगू.
१९८९ : मॉल्टा परिषदेत जॉर्ज बुश (थोरले) आणि मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्याकडून शीतयुद्धाच्या अखेरीचे संकेत.
१९९२ : संगणकाच्या आणि व्होडाफोन नेटवर्कच्या साहाय्याने पहिला 'टेक्स्ट मेसेज' पाठवला गेला.
१९९७ : भूसुरुंगांच्या वापराविरोधात ओटावा करार १२१ राष्ट्रांकडून संमत. अमेरिका, रशिया व चीनचा कराराला विरोध.

४ डिसेंबर

जन्मदिवस : कवी सॅम्युएल बटलर (१६१२), लेखक थॉमस कार्लाईल (१७९५), कवी रेनर मारिआ रिल्के (१८७५), राष्ट्रपती आर. वेंकटरमण (१९१०), अभिनेता मोतीलाल (१९१०), पंतप्रधान इंदर कुमार गुजराल (१९१९), कवी व समीक्षक निशिकांत मिरजकर (१९४२), लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो (१९४३), पोलव्हॉल्टपटू सर्गेई बुब्का (१९६३)
पुण्यस्मरण : कवी, गणितज्ञ व तत्त्वज्ञ उमर खय्याम (११३१), कवी अलेक्झांडर ह्यूम (१६०९), तत्त्वज्ञ थॉमस हॉब्ज (१६७९), कवी जॉन गे (१७३२), भौतिकशास्त्रज्ञ लुइजी गॅल्व्हानी (१७९८), कवी गिरीश तथा शंकर केशव कानेटकर (१९७३), तत्त्वज्ञ हाना आरेंट (१९७५), संगीतकार बेंजामिन ब्रिटन (१९७६), चित्रकार ज. द. गोंधळेकर (१९८१), गिटारवादक व संगीतकार फ्रँक झॅपा (१९९३), अभिनेता, निर्माता व रंगकर्मी शशी कपूर (२०१७)

---

भारतीय नौदल दिन.

१७९१ : जगातले पहिले रविवारचे वृत्तपत्र 'द ऑब्झर्व्हर' प्रकाशित.
१८२९ : लॉर्ड बेंटिकने जाहीरनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खुनी ठरवले जाईल असा कायदा केला.
१९६१ : इंग्लंड सरकारच्या राष्ट्रीय आरोग्यसेवेअंतर्गत स्त्रियांसाठीच्या गर्भप्रतिबंधक गोळ्या उपलब्ध. ह्या गोळ्यांनी स्त्रियांच्या आयुष्यात आणि पर्यायाने समाजात लैंगिक व सामाजिक क्रांती घडवली.
१९७१ : भारतीय नौदलाने पाकिस्तानवर हल्ला केला.

५ डिसेंबर

जन्मदिवस : सिनेदिग्दर्शक फ्रिट्झ लँग (१८९०), कवी जोश मलिहाबादी (१८९६), अ‍ॅनिमेशनपटकर्ता वॉल्ट डिस्ने (१९०१), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ वर्नर हाइजेनबर्ग (१९०१), अभिनेत्री नादिरा (१९३२), समीक्षक विलास खोले (१९४४), गायक होजे कारेरास (१९४६), लेखक हनीफ कुरेशी (१९५४)
पुण्यस्मरण : संगीतकार मोत्झार्ट (१७९१), लेखक अलेक्झांडर द्यूमा (१८७०), चित्रकार क्लोद मोने (१९२६), चित्रकार अमृता शेरगिल (१९४१), चित्रकार अवनींद्रनाथ टागोर (१९५१), इतिहास संशोधक कृष्णाजी वासुदेव पुरंदरे (१९५५), नोबेलविजेता वैद्यकशास्त्रज्ञ जोसेफ अर्लँगर (१९६५), समीक्षक म. वा. धोंड (२००७), वास्तुरचनाकार ऑस्कर निएमेयर (२०१२), वंशभेदविरोधी चळवळीचे नेते नेल्सन मंडेला (२०१३)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - थायलंड
जागतिक स्वयंसेवक दिन.

१९३२ : अल्बर्ट आइनस्टाइनला अमेरिकेचा व्हिसा प्रदान.
१९३३ : अमेरिकेतली दारूबंदी उठली.
१९५२ : लंडनवर प्रदूषित धुक्याचे साम्राज्य. यथावकाश धुक्याने १२,००० मृत.
१९५५ : अमेरिकन कृष्णवर्णीयांच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा असलेला माँटगोमेरी बस बॉयकॉट सुरू.
१९५८ : इंग्लंडच्या राणीने जगातील पहिले S.T.D. फोन संभाषण केले.
१९६९ : इंटरनेटचे पूर्वसूरी अर्पानेट कार्यरत.
१९८९ : फ्रान्सच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी. गती गाठून विश्वविक्रम रचला.
२००५ : ब्रिटन : विवाहाशिवाय एकत्र राहणाऱ्या समलिंगी वा भिन्नलिंगी जोडप्यांना विवाहित जोडप्यांप्रमाणे हक्क देणारा नागरी जोडीदार कायदा अस्तित्वात आला.

६ डिसेंबर

जन्मदिवस : प्राच्यविद्या संशोधक मॅक्स म्युल्लर (१८२३), कवी (रेव्हरंड) ना. वा. टिळक (१८६१), गीतकार इरा गर्श्विन (१८९६), नाट्यअभिनेता व गायक जयराम शिलेदार (१९१६), लेखक वसंत सबनीस (१९२३), लेखक कमलेश्वर (१९३२), नाटककार पीटर हांडके (१९४२), सिनेदिग्दर्शक शेखर कपूर (१९४५), टेनिसपटू रिचर्ड क्रायचेक (१९७१)
पुण्यस्मरण : चित्रकार जाँ-बातिस्त-सिमेआँ शार्दँ (१७७९), लेखक अँथनी ट्रॉलॉप (१८८२), गायक व गिटारिस्ट लेड बेली (१९४९), भारतीय घटनेचे शिल्पकार व विचारवंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९५६), मानसशास्त्रज्ञ व विचारवंत फ्रँझ फॅनन (१९६१), क्रांतिसिंह नाना पाटील (१९७६), लेखक अनिल बर्वे (१९८४), गायक व गिटारिस्ट रॉय ऑर्बिसन (१९८८), चित्रकार प्रभाकर बरवे (१९९५), शिल्पकार सेझार (१९९८)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - फिनलंड
आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (भारत)

१७६८ : 'एन्सायक्लोपीडिआ ब्रिटानिका'ची पहिली आवृत्ती प्रकाशित.
१८६५ : अमेरिकन संविधानात केलेल्या बदलानुसार गुलामगिरी बेकायदेशीर ठरली.
१८९७ : परवानाधारक टॅक्सी उपलब्ध असणारे लंडन हे जगातले पहिले शहर बनले.
१९३३ : जेम्स जॉइसची कादंबरी 'युलिसिस' अश्लीलतेच्या आरोपांत निर्दोष सिद्ध (अमेरिका).
१९५३ : व्लादिमिर नाबोकॉव्ह यांनी आपली प्रख्यात कादंबरी 'लोलिता' लिहून पूर्ण केली.
१९९२ : हिंदुत्ववाद्यांनी अयोध्येतली बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. देशभर झालेल्या दंगलींत हजारो ठार. फाळणीनंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात देशभर हिंदू-मुस्लिम दंगली उफाळल्या.

७ डिसेंबर
जन्मदिवस : रोमन राजकारणी व लेखक सिसेरो (४३), चित्रकार व शिल्पकार बर्निनी (१५९८), प्राच्यविद्या संशोधक द्यूपेराँ (१७३१), जादूगार हुदिनी (१८०५), लेखक इंतजार हुसेन (१९२३), विचारवंत व भाषाशास्त्रज्ञ नोम चॉम्स्की (१९२८)
पुण्यस्मरण : कवी भा.रा. तांबे (१९४१), लेखक, पत्रकार, मुंबई पत्रकार संघाचे संस्थापक आणि दैनिक ‘प्रभात’चे संपादक श्रीपाद शंकर नवरे (१९५९), कवी रॉबर्ट ग्रेव्हज (१९८५), अभिनेत्री व लेखिका स्नेहप्रभा प्रधान (१९९३)
---
जागतिक नागरी विमान उड्डयन दिन.
ध्वजदिन (भारत).
१८७७ : एडिसनने पहिल्या फोनोग्राफचे प्रात्यक्षिक दाखवले.
१८८८ : जॉन डनलॉपने हवा भरलेल्या टायरसाठी पेटंट दाखल केले.
१९४१ : दुसरे महायुद्ध - जपानच्या नौदलाने अमेरिकेवर पर्ल हार्बर येथे हल्ला केला.
१९७५ : इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.
१९८८ : सैन्य आणि शस्त्रकपातीची घोषणा करून रशियन अध्यक्ष गोर्बाचेव्ह यांनी जगाला धक्का दिला. सोव्हिएत महासत्तेच्या विसर्जनातला एक टप्पा.
२००१ : अमेरिकन हवाई हल्ल्यांमुळे तालिबानला कंदाहारवरचा ताबा सोडणे भाग पडले.
२००४ : हमीद करझाई अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी.
२००९ : कोपनेहेगन येथे हवामान परिषद सुरू.
८ डिसेंबर
जन्मदिवस : कवी होरेस (६५), पथदर्शी सिनेदिग्दर्शक जॉर्ज मेलिए (१८६१), शिल्पकार कामिय क्लोदेल (१८६४), संगीतकार जीन सिबेलियस (१८६५), चित्रकार दिएगो रिव्हेरा (१८८६), अभिनेता धर्मेंद्र (१९३५), क्रिकेटपटू हेमंत कानिटकर (१९४२), 'डोअर्स'चा गायक व संगीतकार जिम मॉरिसन (१९४३), अभिनेत्री शर्मिला टागोर (१९४४), गायिका शिनीड ओकॉनर (१९६६)
पुण्यस्मरण : गणितज्ञ जॉर्ज बूल (१८६४), 'बीटल' जॉन लेनन (१९८०)
---
विश्व हवामान दिन.
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - रुमानिया, उझबेकिस्तान.

१९४१ : दुसरे महायुद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला उत्तर देण्यास अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध पुकारले.
१९४१ : ज्यूंचे शिरकाण - लॉद्झजवळील चेल्म्नो कंन्संट्रेशन कॅम्पमध्ये कैद्यांना मारण्यासाठी विषारी वायुवाहनांचा उपयोग प्रथमच केला गेला.
१९७६ : 'इगल्स' रॉक ग्रूपचे विख्यात गाणे 'हॉटेल कॅलिफोर्निया' प्रदर्शित झाले.
१९८० : 'बीटल' जॉन लेननची हत्या.
१९८७ : शीतयुद्ध : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रेगन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष गोर्बाचेव्ह यांच्यामध्ये अण्वस्त्रसाठा कमी करण्याविषयी ऐतिहासिक करार.
१९९१ : रशिया, बेलारूस व युक्रेनच्या नेत्यांनी सोव्हिएत संघराज्य विसर्जित केले व स्वतंत्र देशांचे राष्ट्रकुल स्थापन केले.

९ डिसेंबर

जन्मदिवस : कोबॉल भाषेची निर्माती ग्रेस हॉपर (१९०६), कवी जॉन मिल्टन (१६०८), भारताची पहिली महिला छायापत्रकार होमाई व्यारावाला (१९१३), अभिनेता कर्क डग्लस (१९१६), सिनेदिग्दर्शक जॉन कासाव्हेटस (१९२९), अभिनेत्री ज्यूडी डेंच (१९३४), अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (१९४६), अभिनेता जॉन माल्कोव्हिच (१९५३)
पुण्यस्मरण : चित्रकार अँथनी व्हॅन डाईक (१६४१), गणितज्ञ हर्मन वाईल (१९५५), वारकरी संप्रदायाचे अभ्यासक सोनोपंत दांडेकर (१९६८), लेखक वा. दा. गाडगीळ (१९७३), छायाचित्रकार बेरेनीस अ‍ॅबट (१९९१), खगोलशास्त्रज्ञ पॅट्रिक मूर (२०१२)

---

जागतिक भ्रष्टाचारविरोधी दिन.
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - टांझानिया.

१९०० : डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धांची सुरुवात.
१९४६ : स्वतंत्र भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी नेमलेल्या संविधान समितीची पहिली बैठक.
१९६८ : डग्लस एंगेलबर्टने माऊस, हायपरटेक्स्ट आणि ग्राफिकल यूजर इंटरफेस पहिल्यांदा सार्वजनिकरीत्या दाखवले.
१९७३ : जयवंत दळवी यांच्या 'संध्याछाया' नाटकाचा पहिला प्रयोग.
१९७९ : देवीरोगाचे संपूर्ण उच्चाटन. मानवी संसर्गजन्य रोगांपैकी संपूर्ण उच्चाटन झालेला हा एकमेव रोग आहे.
१९८६ : पॅरिसमधले जगप्रसिद्ध ओर्से संग्रहालय खुले.
१९९० : लेक वॉवेंसा पोलंडच्या अध्यक्षपदी.

१० डिसेंबर

जन्मदिवस : गणितज्ञ एडा लव्हलेस (१८१५), कवी निकोलाय नेक्रासोव्ह (१८२१), कवयित्री एमिली डिकिन्सन (१८३०), ड्यूई दशमान ग्रंथवर्गीकरण पद्धतीचा जनक मेलव्हिल ड्यूई (१८५१), इतिहासकार जदुनाथ सरकार (१८७०), वास्तुरचनाकार अडॉल्फ लूस (१८७०), स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते भारतरत्न सी. राजगोपालाचारी (१८७८), लेखक, प्राच्यविद्या संशोधक डॉ. श्री. कृ. बेलवलकर (१८८०), नाट्याभिनेते, गायक बापूराव पेंढारकर (१८९२), पुरातत्त्वज्ञ हसमुख सांकलिया (१९०८), कथाकार सखा कलाल (१९३८), शिल्पकार जसुबेन शिल्पी (१९४८), अभिनेता व दिग्दर्शक केनेथ ब्रॅना (१९६०), अभिनेत्री रति अग्निहोत्री (१९६०), स्क्वॉशपटू जहांगीर खान (१९६३)
पुण्यस्मरण : इतिहासतज्ज्ञ जदुनाथ सरकार (१८७०), नोबेल पारितोषिकाचा जनक अल्फ्रेड नोबेल (१८९६), नोबेल पारितोषिकविजेता नाटककार लुईजी पिरांदेल्लो (१९३६), डॉ. द्वारकानाथ कोटणीस (१९४२), इस्लामतज्ज्ञ व भाषांतरकार अब्दुल्ला युसुफ अली (१९५३), गांधीवादाचे भाष्यकार, 'साधना' साप्ताहिकाचे संपादक आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर (१९५५), सूचिकार शंकर गणेश दाते (१९६४), अभिनेता अशोक कुमार (२००१), संगीतकार श्रीकांत ठाकरे (२००३), कवी दिलीप चित्रे (२००९)

---

जागतिक मानवी हक्क दिन.
जागतिक प्राणी हक्क दिन.

१५१० : आदिलशाहीकडून पोर्तुगीजांनी गोव्यावर कब्जा मिळवला.
१७६८ : 'एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका'च्या पहिल्या आवृत्तीचा पहिला खंड प्रकाशित झाला.
१७९९ : दशमान (मेट्रिक) एककपद्धती स्वीकारणारा फ्रान्स हा जगातला पहिला देश ठरला.
१८६८ : जगातले पहिले वाहतुकीचे सिग्नल लंडनमध्ये बसवण्यात आले.
१८८४ : मार्क ट्वेनची 'हकलबरी फिन' कादंबरी ब्रिटनमध्ये प्रकाशित.
१९०१ : पहिली नोबेल पारितोषिके वितरित.
१९०९ : सेल्मा लागरलॉफ ही नोबेल पारितोषिक प्राप्त करणारी पहिला महिला साहित्यिक ठरली.
१९४८ : संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा संमत केला. त्याप्रीत्यर्थ हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो.
१९६४ : लेखक व तत्त्वज्ञ जाँ-पॉल सार्त्रचा नोबेल पारितोषिक स्वीकारण्यास नकार.
१९८१ : समलिंगी किंवा सुई टोचून घेऊन मादक द्रव्यांचे सेवन करणारे यांच्यात एक नवा रोग पसरत असल्याचे वार्तांकन बीबीसीने केले. यथावकाश हा रोग एड्स म्हणून ओळखला गेला. आजतागायत या रोगाने सुमारे अडीच कोटी बळी घेतले आहेत. सहाराखालच्या आफ्रिका खंडात आज एड्स हा सर्वाधिक मृत्यूंमागचे कारण आहे. अद्याप या रोगावर औषध किंवा लस निर्माण झालेली नाही.
१९८६ : वोले सोयिंका हे नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे पहिले आफ्रिकन साहित्यिक ठरले.
१९९६ : दक्षिण आफ्रिकेचे नवे संविधान कार्यरत. वंशद्वेषाचा काळ समाप्त.

११ डिसेंबर
जन्मदिवस : संगीतकार हेक्टर बर्लिओझ (१८०३), आधुनिक जीवाणूशास्त्राचा जनक नोबेलविजेता जीवशास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक (१८४३), कवी सुब्रह्मण्य भारती (१८८२), सिनेदिग्दर्शक मानोएल द ओलिव्हेइरा (१९०८), भाषाशास्त्रज्ञ ना. गो. कालेलकर (१९०९), नोबेलविजेता लेखक नागिब महफूझ (१९११), नोबेलविजेता लेखक अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन (१९१८), अभिनेता दिलीपकुमार (१९२२), लेखक राजा मंगळवेढेकर (१९२५), राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (१९३५), बुद्धिबळाचे जगज्जेतेपद पाच वेळा जिंकणारा विश्वनाथन आनंद (१९६९)
पुण्यस्मरण : इतिहासकार के. एम. पणिक्कर (१९६३), लेखक जी. ए. कुलकर्णी (१९८७), गीतकार प्रदीप (१९९८), प्राच्यविद्या अभ्यासक रा. ना. दांडेकर (२००१), गायिका भारतरत्न एम. एस. सुब्बलक्ष्मी (२००४), सतारवादक व संगीतकार भारतरत्न पं. रवी शंकर (२०१२)

---

जागतिक पर्वत दिन.
वर्धापनदिन : युनिसेफ (१९४६)

६३० : मुहम्मदाच्या नेतृत्वाखाली मुसलमानांचा मक्केवर कब्जा.
१८८६ : फूटबॉल क्लब आर्सेनलने आपला पहिला सामना खेळला.
१९९७ : प्रदूषणकारी वायूंचे उत्सर्जन आटोक्यात आणण्यासाठी क्योटो कराराला जगाची मान्यता.
२००१ : चीनचा जागतिक व्यापार संघटनेत प्रवेश.
२०१३: परस्परसंमतीने सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले सम/भिन्नलिंगी शरीरसंबंध कायदेशीर ठरवणारा दिल्ली उच्च न्यायालयाचा २००९ सालचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला.

१२ डिसेंबर

जन्मदिवस : लेखक गुस्ताव्ह फ्लॉबर्ट (१८२१), चित्रकार एडवर्ड मुंक (१८६३), समाजशास्त्रज्ञ डॉ. गो. स. घुर्ये (१८९३), संपादक व मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ. ना. भालेराव (१९०२), सिनेदिग्दर्शक यासुजिरो ओझू (१९०३), समीक्षक खं. त्र्यं. सुळे (१९०४), लेखक व्हासिली ग्रॉसमन (१९०५), गायक नट फ्रँक सिनात्रा (१९१५), चित्रकार हेलन फ्रॅंकेंथेलर (१९२८), नाटककार जॉन ऑसबॉर्न (१९२९), अभिनेता रजनीकांत (१९५०), क्रिकेटपटू युवराज सिंग (१९८१)
पुण्यस्मरण : कवी रॉबर्ट ब्राउनिंग (१८८९), अभिनेता डग्लस फेअरबँक्स (१९३९), कवी मैथिली शरण गुप्त (१९६४), 'संस्कृतिकोश'कार पं. महादेवशास्त्री जोशी (१९९२), चित्रकार पॉल कॅडमस (१९९९), लेखक जोसेफ हेलर (१९९९), तत्वज्ञानाचे अभ्यासक व संपादक विश्वास पाटील (२००२), कवी निरंजन उजगरे (२००४), लेखक त्र्यं. वि. सरदेशमुख (२००५), शेतकरी नेता शरद जोशी (२०१५)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : केनिया

१९०१ : पहिला मानवनिर्मित रेडिओ संदेश अटलांटिक सागरापार पाठवला गेला. ह्या प्रयोगात नोबेलविजेता संशोधक मार्कोनी सहभागी होता.
१९११ : ब्रिटीशांनी भारताची राजधानी कोलकाताहून दिल्लीला हलवली.
१९३० : परदेशी मालाविरुद्ध निदर्शनात बाबू गेनू हुतात्मा.

१३ डिसेंबर

जन्मदिवस : तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व लेखक श्रीनिवास दीक्षित (१९२०), लेखक विद्याधर पुंडलिक (१९२४), लेखिका सरिता पदकी (१९२८),
पुण्यस्मरण : गणितज्ञ व लेखक अल-बिरुनी (१०४८), तत्त्वज्ञ मेमोनिडेस (१२०४), चित्रकार व शिल्पकार दोनातेल्लो (१४६६), लेखक व कोशकार सॅम्युएल जॉन्सन (१७८४), चित्रकार व्हासिली कांडिन्स्की (१९४४), चित्रकार निकोलस रोअरिक (१९४७), अभिनेत्री स्मिता पाटील (१९८६), स्वातंत्र्यसैनिक शिरुभाऊ लिमये (१९९६), लेखक व सामाजिक कार्यकर्ते कबीर चौधरी (२०११)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : माल्टा

१६४२ : न्यूझीलंडचा शोध.
१९८१ : 'सॉलिडॅरिटी' चळवळीमुळे कम्युनिस्ट सरकार पडेल ह्या भीतीपोटी पोलंडमध्ये मार्शल लॉ जाहीर.
२००१ : पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाच अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.
२००३ : भूमिगत इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला अमेरिकेने पकडले.

१४ डिसेंबर
जन्मदिवस : खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे (१५४६), योगाचार्य बी.के.एस.आय्यंगार (१९१८), अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक राज कपूर (१९२४), दिग्दर्शक श्याम बेनेगल (१९३४)
पुण्यस्मरण : गीतकार शैलेंद्र (१९६६), कवी ग.दि. माडगूळकर (१९७७), नाटककार फ्रीडरिक ड्यूरेनमॅट (१९९०), लेखक डब्ल्यू.जी. सीबॉल्ड (२००१), अभिनेता पीटर ओ टूल (२०१३)

---

१९०० : मॅक्स प्लॅन्कने क्वान्टम सिद्धांत (पुंजवाद) मांडला.
१९३९ : लीग ऑफ नेशन्समधून रशियाची हकालपट्टी.
१९४६ : संयुक्त राष्ट्रसंघाने आपले मुख्य कार्यालय न्यूयॉर्कमध्ये उभारण्याचा ठराव संमत केला.
१९८१ : गोलान टेकड्यांवर इस्राएलचा ताबा.
१९९५ : बॉस्निया, सर्बिया व क्रोएशियादरम्यान करारान्वये बाल्कन युद्धाची समाप्ती.

१५ डिसेंबर
जन्मदिवस : वास्तुरचनाकार ग्युस्ताव्ह आयफेल (१८३२), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ हेन्री बेकरेल (१८५२), संशोधक व लेखिका इरावती कर्वे (१९०५), माजी निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन (१९३२), फुटबॉलपटू बाइचुंग भुतिया (१९७६)
पुण्यस्मरण : चित्रकार योहान व्हरमीर (१६७५), गिटारवादक फ्रान्सिस्को टारेगा (१९०९), स्वातंत्र्यसेनानी व स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल (१९५०), अभिनेता चार्ल्स लॉटन (१९६२), अ‍ॅनिमेशनपट निर्माता वॉल्ट डिस्नी (१९६६)
---
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन :
१७९१ : अमेरिकेच्या संविधानाची पहिली १० कलमे संमत झाली. त्या निमित्ताने हा दिवस 'बिल ऑफ राइट्स' दिवस म्हणून साजरा केला जातो.
१९११ : 'नवी दिल्ली'चा पायाभरणी समारंभ राजा पंचम जॉर्ज ह्याच्या हस्ते झाला.
१९६१ : नाझी क्रूरकर्मा अडॉल्फ आईकमनला पंधरा आरोपांखाली मृत्युदंड. आरोपांमध्ये ज्यूंचे शिरकाण, मानवतेविरूद्ध गुन्हे वगैरेची गणना.
१९९३ : ब्रिटन आणि आयर्लंडदरम्यान शांतता करार संमत झाला.
१९९४ : नेटस्केप नॅव्हिगेटर ह्या इंटरनेट ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित.
२००० : चेर्नोबिलची अणुभट्टी अखेर कायमस्वरूपी बंद.

१६ डिसेंबर

जन्मदिवस : संगीतकार बीथोव्हेन (१७७०), लेखिका जेन ऑस्टेन (१७७५), तत्त्वज्ञ जॉर्ज सँटायाना (१८६३), चित्रकार व्हासिली कांडिन्स्की (१८६६), भौतिकशास्त्रज्ञ वॉल्टर माइसनर (१८८२), नाटककार नोएल कॉवर्ड (१८९९), मानववंशशास्त्रज्ञ मार्गारेट मीड (१९०१), लेखक आर्थर सी. क्लार्क (१९१७), प्रहसन (फार्स) नाट्याभिनेता बबन प्रभू (१९२६), लेखक फिलिप के. डिक (१९२८), लेखक व रेखाटनकार क्वेंटिन ब्लेक (१९३२), लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे (१९३३), अभिनेत्री लिव्ह उलमन (१९३८)
पुण्यस्मरण : परिकथालेखक ग्रिम बंधूंपैकी विलहेल्म ग्रिम (१८५९), कोशकार चिं. ग. कर्वे (१९६०), लेखक सॉमरसेट मॉम (१९६५), अभिनेता ली व्हॅन क्लीफ (१९८९), लेखक विलिअम गॅडिस (१९९८), सर्कस सम्राट बंडोपंत देवल (२०००), अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे (२००४ )

---

बांगलादेश विजय दिन.
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : बहारीन, कझाकस्तान.

१६८९ : इंग्लंडच्या नागरिकांना नागरी आणि राजकीय हक्क देणारे विधेयक (बिल ऑफ राइट्स) इंग्लंडच्या संसदेमध्ये मंजूर.
१७७३ : बॉस्टन टी पार्टी.
१९०३ : मुंबईच्या ताज महाल हॉटेलचे उद्घाटन.
१९३२ : ’प्रभात’चा ’मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
१९७१ : भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती, बांगलादेशची निर्मिती.
१९७२ : विजय तेंडुलकर लिखित आणि जब्बार पटेल दिग्दर्शित 'घाशीराम कोतवाल' नाटकाचा पहिला प्रयोग पुण्याच्या भरत नाट्य मंदिरात झाला.
२०१२ : दिल्लीत एका तरुणीवर बसमध्ये निर्घृण सामूहिक बलात्कार व अत्याचार. तरुणीचा यथावकाश मृत्यू. प्रक्षुब्ध जनता रस्त्यावर उतरली. अखेर सरकारने बलात्कार कायदा बदलला.

१७ डिसेंबर

जन्मदिवस : शास्त्रज्ञ हंफ्री डेव्ही (१७७८), लेखक फोर्ड मॅडॉक्स फोर्ड (१८७३), लेखक य. गो. जोशी (१९०१), चित्रकार पॉल कॅडमस (१९०४), लेखक व हिंदुत्वाचे अभ्यासक स. ह. देशपांडे (१९२४), अभिनेता जॉन अब्राहम (१९७२), अभिनेता रितेश देशमुख (१९७८)
पुण्यस्मरण : कवी व तत्त्वज्ञ रुमी (१२७३), अभिनेते व नाटककार विष्णु हरी औंधकर (१९४२), अभिनेते व नाटककार मधूसूदन कालेलकर (१९८५), लेखिका मार्गेरित यूर्सनार (१९८७), अभिनेते डॉ. श्रीराम लागू (२०१९)

---

१९०३ : राइट बंधूंचे पहिले मोटारचलित विमानोड्डाण.
१९२८ : भगत सिंग, राजगुरू व सुखदेव यांनी साँडर्स या ब्रिटिश पोलिसाची हत्या केली. यथावकाश त्यांना या हत्येसाठी मृत्युदंड ठोठावण्यात आला.
१९३८ : लीज माईट्नर, ऑटो हान व फ्रिट्झ स्ट्रासमन यांनी अणुकेंद्राच्या विघटनाविषयी विवेचन केले. अणुउर्जेला प्रत्यक्षात आणण्यासाठी ही घटना कळीची मानली जाते.
१९६१ : गोवा मुक्तिसंग्राम - भारतीय सैन्याने गोव्याला पोर्तुगालपासून मुक्त केले.
१९८९ : 'सिंपसन्स' मालिकेचा पहिला भाग प्रसारित.
२०१० : मुहम्मद बुआझिझीने स्वतःला पेटवून घेतले. ट्युनिशिआतील क्रांतीची आणि यथावकाश 'अरब स्प्रिंग'ची ही सुरुवात ठरली.

१८ डिसेंबर

जन्मदिवस : प्राच्यविद्यापंडित हाइनरिक रॉथ (१६२०), विदूषक जोसेफ ग्रिमाल्डी (१७७८), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ जे. जे. थॉमसन (१८५६), लेखक साकी (१८७०), चित्रकार पॉल क्ली (१८७९), सिनेदिग्दर्शक ज्यूल दासँ (१९११), साहित्यिक व समीक्षक रमेश तेंडुलकर (१९३०), समीक्षक स. शि. भावे (१९३१), 'रोलिंग स्टोन्स'चा गिटारिस्ट कीथ रिचर्डस (१९४३), सिनेदिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग (१९४६), पत्रकार बरखा दत्त (१९७१), टेनिसपटू अरांक्झा सांचेझ व्हिकारिओ (१९७१)
पुण्यस्मरण : 'थोरले माधवराव पेशवे' नाटकाचे लेखक नाटककार विनायक जनार्दन कीर्तने (१८९१), सिनेदिग्दर्शक रॉबर्ट ब्रेसाँ (१९९९), लेखक शौकत सिद्दिकी (२००६), विचारवंत व लेखक वाक्लाव हावेल (२०११)

---

जागतिक स्थलांतरित दिन.
अरब भाषा दिन.
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - नायजर, कतार

१७७७ : अमेरिकेत पहिला 'थँक्सगिव्हिंग' सण साजरा.
१९१६ : व्हर्दँ येथे पहिल्या महायुद्धातील आणि मानवी इतिहासातील एका प्रदीर्घ आणि रक्तरंजित लढाईत फ्रेंच सैन्याने जर्मन सैन्याचा पराभव केला. नऊ महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या या लढाईत दोन्ही बाजूंचे मिळून अंदाजे सात ते नऊ लाख मृत.
१८९२ : चायकॉव्हस्कीच्या 'नटक्रॅकर' या नृत्यनाट्याचा पहिला प्रयोग.
१९४४ : 'ल मोंद' दैनिकाचा पहिला अंक प्रकाशित.
१९५८ : 'स्कोअर' हा जगातील पहिला दूरसंचार उपग्रह अमेरिकेने प्रक्षेपित केला.
१९८७ : पर्ल या संगणकीय भाषेची पहिली आवृत्ती सादर.
२००६ : संयुक्त अरब अमिरातीत पहिली निवडणूक.
२०१० : ट्युनिशिआत आणि पर्यायाने अरब देशांत 'अरब स्प्रिंग' क्रांतीचा आरंभ.

१९ डिसेंबर

जन्मदिवस : लेखक जाँ जने (१९१०), गायिका एडिथ पिआफ (१९१५), अभिनेता ओम प्रकाश (१९१९), समीक्षक व भाषाअभ्यासक वसंत वऱ्हाडपांडे (१९२७), माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील (१९३४), सिनेछायालेखक व दिग्दर्शक गोविंद निहलानी (१९४०), क्रिकेटपटू रिकी पाँटिंग (१९७४)
पुण्यस्मरण : तत्त्वज्ञ अल-गझाली (११११), लेखिका एमिली ब्राँटे (१८४८), चित्रकार जे. एम. डब्ल्यू. टर्नर (१८५१), अभिनेता मार्चेल्लो मास्ट्रोइयानी (१९९६)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - झांजिबार
गोवा मुक्ती दिन

१८४३ : 'अ ख्रिसमस कॅरोल' ही चार्ल्स डिकन्सलिखित कादंबरी प्रकाशित.
१९०५ : लंडनमध्ये पहिली रुग्णवाहिका सेवा सुरू.
१९२७ : रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान व रोशन सिंग या क्रांतिकारकांना देहदंड.
१९६१ : भारताने दमण आणि दीव पोर्तुगालकडून काबीज केले.
१९८४ : हाँगकाँगचा ताबा १९९७मध्ये चीनला देण्याचे ब्रिटनने कबूल केले.
१९८६ : कम्युनिस्ट सत्तेचे विरोधक आंद्रे साखारोव यांची सहा वर्षांच्या अंतर्गत हद्दपारीनंतर गोर्बाचोव्ह यांनी मुक्तता केली.
२०१० : सचिन तेंडुलकरने पन्नासावे कसोटी शतक झळकावले.
२०१० : राहुल द्रविडच्या कसोटी क्रिकेटमध्ये १२००० धावा पूर्ण.

२० डिसेंबर
जन्मदिवस : चित्रकार पीटर द हूक (१६२९), नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती (१९४०), सिनेदिग्दर्शक किम की डूक (१९६०)
पुण्यस्मरण : लेखक, समाजसुधारक व भारतीय छपाईतंत्रात महत्त्वाचे बदल आणणारे उपेंद्रकिशोर रॉयचौधरी (१९१५), समाजसुधारक गाडगे बाबा (१९५६), लेखक जॉन स्टाइनबेक (१९६८), संगीत दिग्दर्शक कनु रॉय (१९८१), लेखक कार्ल सेगन (१९९६), लेखक लिओपोल्ड सेंघोर (२००१), पोलीसकथालेखक व. कृ. जोशी (२००४), कवी अरुण कांबळे (२००९), अभिनेत्री नलिनी जयवंत (२०१०), लेखक सुभाष भेंडे (२०१०)

---

मानवी ऐक्यभाव दिन.

१८१२ : ग्रिम बंधूंच्या परिकथांच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित.
१९४२ : दुसरे महायुद्ध - जपानने कोलकातावर बाँबहल्ला केला.
१९४६ : फ्रँक काप्राचा लोकप्रिय नाताळचित्रपट 'इट्स अ वंडरफुल लाइफ' प्रदर्शित.
१९७१ : झुल्फिकार अली भुत्तो पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी रुजू.
१९८८ : मतदानाचे किमान वय २१वरून १८वर आणणारी ६१वी घटनादुरुस्ती संसदेत मंजूर.
१९९५ : नाटोचे शांतिसैन्य बॉस्निआमध्ये दाखल.
१९९६ : 'अ‍ॅपल'मधून बाहेर पडल्यानंतर स्टीव्ह जॉब्जने निर्माण केलेली 'नेक्स्ट' कंपनी 'अ‍ॅपल'मध्ये विलीन. आजच्या मॅक ओएस आणि आयओएस या प्रणालींमधील काही भाग 'नेक्स्ट'मधून आला.

२१ डिसेंबर
जन्मदिवस : चित्रकार मासाकिओ (१४०१), उद्योजक भालचंद्र दिगंबर गरवारे (१९०३), नोबेलविजेता लेखक हाइनरिश ब्यल (१९१४), ज्ञानपीठविजेते लेखक यू.आर. अनंतमूर्ती (१९३२), रेडिओ निवेदक अमीन सयानी (१९३२), बालसाहित्यिक दत्ता टोळ (१९३५), टेनिसपटू क्रिस एव्हर्ट (१९५४), क्रिकेटपटू के. श्रीकांत (१९५९), सिनेअभिनेता गोविंदा (१९६३)
पुण्यस्मरण : लेखक बोकाचिओ (१३७५), पार्किन्सन्स व्याधीचा अभ्यासक जेम्स पार्किन्सन (१८२४), लेखक एफ. स्कॉट फिट्झजेराल्ड (१९४०), इतिहास संशोधक, चरित्रकार न. र. फाटक (१९७९)

---
१८९८ : मारी आणि पिएर क्यूरी यांना रेडिअमचा शोध लागला.
१९०९ : अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅकसनचा खून केला.
१९१३ : पहिले शब्दकोडे 'न्यू यॉर्क वर्ल्ड' मध्ये प्रकाशित.
१९६५ : सर्व प्रकारच्या वांशिक भेदभावाविरोधात धोरणाचा मसुदा आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मंजूर.
१९८८ - लॉकरबी बॉम्बिंग - लिबियमध्ये अतिरेक्यांनी पॅन ॲम कंपनीच्या विमानात बॉम्बस्फोट घडवला. २७० ठार.

२२ डिसेंबर
जन्मदिवस : गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन (१८८७)
पुण्यस्मरण : लेखिका जॉर्ज एलियट (१८८०), संगीतकार वसंत देसाई (१९७५), गीतकार पी. सावळाराम (१९९७)
---
गणित दिन (भारत).
१८५१ : रुड़की येथे भारतातली पहिली मालगाडी धावली.
१९५३ : राज्य पुनर्रचनेसाठी उच्चाधिकार समिती स्थापन. ह्यातून पुढे भाषावार प्रांतरचना झाली.
१९७२ : अँडीज पर्वतराजीत विमान कोसळल्यानंतर दहा आठवड्यांनी १४ प्रवासी जिवंत सापडले. त्यांनी काही काळ मानवी मांसावर गुजराण केली होती.
१९८९ : आठवडाभर चाललेल्या दंगल व जाळपोळीनंतर हुकूमशहा निकोलाइ चाउसेस्क्युने रूमेनियाचे अध्यक्षपद सोडले. शीतयुद्धाच्या अखेरीला कम्युनिस्ट राष्ट्रे कोसळण्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा.
१९८९ : बर्लिनचे ब्रॅन्डेनबर्ग गेट ३० वर्षांनी खुले. पूर्व आणि पश्चिम जर्मनीची फाळणी संपुष्टात.

२३ डिसेंबर

जन्मदिवस : समीक्षक सेंट बव्ह (१८०४), लेखक जिउसेप्प तोमासी दी लँपेडुसा (१८९६), माजी पंतप्रधान चरण सिंग (१९०२)
पुण्यस्मरण : संगीत नाटकांतील गायक व अभिनेता गणपतराव बोडस (१९६५), कोंकण रेल्वेचे जनक अ.ब. वालावलकर (१९७०), कलासंग्राहक पेगी गुगेनहाइम (१९७९), गायिका नूरजहाँ (२०००), माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव (२००४), कवी गंगाधर महाम्बरे (२००८)

---

वर्धापनदिन : विश्वभारती विद्यापीठ (शांतिनिकेतन)

१९३८ : आधुनिक काळातील पहिला coelacanth अवशेष सापडला.
१९४० : हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमान कारखाना वालचंद हिराचंद यांनी म्हैसूर राज्यात सुरू केला.
१९४७ : बेल लॅबमध्ये प्रथमत: ट्रांझिस्टरचे प्रदर्शन.
१९५४ : डॉ. हॅरिसन व डॉ. मरे यांनी पहिले मानवी मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले.
१९७९ : सोव्हिएत सैन्याने अफगाणिस्तानची राजधानी काबूल काबीज केली.

२४ डिसेंबर

जन्मदिवस : बुद्धिबळपटू इमॅन्युएल लास्कर (१८६८), नोबेलविजेता लेखक हुआन हिमेनेझ (१८८१), साहित्यिक व समाजसुधारक साने गुरुजी (१८९९), चित्रकार पिएर सूलाज (१९१९), अभिनेत्री अ‍ॅव्हा गार्डनर (१९२२), गायक मोहम्मद रफी (१९२५), लेखक व पत्रकार अंबरीश मिश्र (१९५५), अभिनेता अनिल कपूर (१९५९)
पुण्यस्मरण : दर्यावर्दी वास्को द गामा (१५२४), लेखक डब्ल्यू. एम. थॅकरे (१८६३), कवी लुई आरागाँ (१९८२), नाटककार जॉन ऑसबॉर्न (१९९४), अभिनेता तोशिरो मिफुने (१९९७), नोबेलविजेता नाटककार हॅरॉल्ड पिंटर (२००८), पुरोगामी विचारवंत भा. ल. भोळे (२००९)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - लिब्या.
भारतीय ग्राहक दिन.

१८१८ : 'सायलेंट नाईट' या प्रख्यात ख्रिसमस कॅरलचे पहिले सादरीकरण.

२५ डिसेंबर

जन्मदिवस : वैज्ञानिक आयझॅक न्यूटन (१६४२), स्वातंत्र्यसैनिक व शिक्षणतज्ज्ञ मदन मोहन मालवीय (१८६१), स्वातंत्र्यसैनिक व पाकिस्तानचे संस्थापक मुहम्मद अली जीना (१८७६), अभिनेता हंफ्री बोगार्ट (१८९९), लेखक क्वेंटिन क्रिस्प (१९०८), चित्रकार-शिल्पकार लुईज बूर्ज्वा (१९११), विज्ञानलेखक डॉ. चिं. श्री. कर्वे (१९१४), संगीतकार नौशाद (१९१९), माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (१९२४), लेखक कार्लोस कास्तानेडा (१९२५), सारंगीवादक राम नारायण (१९२७), सिनेनिर्माता व दिग्दर्शक इस्माइल मर्चंट (१९३६), लेखक रा. रं. बोराडे (१९४०), अभिनेत्री हाना शिगुला (१९४३), सिनेदिग्दर्शक मणि कौल (१९४४), गायिका अ‍ॅनी लेनॉक्स (१९५४)
पुण्यस्मरण : समाजसुधारक श्री. म. माटे (१९५७), कवी त्रिस्तान झारा (१९६३), अभिनेता व सिनेदिग्दर्शक चार्ली चॅप्लिन (१९७७), चित्रकार जोन मिरो (१९८३), माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग (१९९४), कवी म. म. देशपांडे (२००५), नाट्यदिग्दर्शक, अभिनेते व निर्माते सत्यदेव दुबे (२०११), अभिनेत्री साधना (२०१५)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - काइद-ए-आझम दिन (पाकिस्तान)

३५४ : पोप लायबेरियसने ख्रिस्तजन्माची तारीख २५ डिसेंबर म्हणून मुक्रर केली.
१७५८ : खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅलीने वर्तवल्याप्रमाणे हॅलीचा धूमकेतू अवतीर्ण झाला.
१९२७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले.
१९८९ : कम्युनिस्ट रोमानियाचे नेते निकोलाई चाउचेस्कू व त्यांची पत्नी यांना देशद्रोही ठरवून त्यांना गोळ्या झाडून देहदंड.
१९९१ : शीतयुद्धाची अखेर करण्यात मोलाचा हातभार लावणारे नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा. सोव्हिएत युनियनची अखेर.

२६ डिसेंबर

जन्मदिवस : गणितज्ञ चार्ल्स बॅबेज (१७९१), शिक्षणतज्ज्ञ खान बहादुर अहसानुल्ला (१८७४), लेखक हेन्री मिलर (१८९१), क्रांतिकारक उधम सिंग (१८९९), समाजसेवक बाबा आमटे (१९१४), समीक्षक व भाषांतरकार प्रभाकर माचवे (१९१७), समीक्षक व वाङ्मयाचे अभ्यासक द. दि. पुंडे (१९३४), समाजसेविका डॉ. मेबल आरोळे (१९३५), अभिनेत्री लालन सारंग (१९३८)
पुण्यस्मरण : सम्राट बाबर (१५३०), शिक्षणतज्ज्ञ व कोशकार एच. ड्ब्ल्यू. फाउलर (१९३३), स्वातंत्र्यसैनिक व लेखक यशपाल (१९७६), सिनेदिग्दर्शक हॉवर्ड हॉक्स (१९७७), प्राणिअभ्यासक डायॅन फॉसी (१९८५), माजी राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा (१९९९), अभिनेता जेसन रॉबर्डस (२०००)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : स्लोव्हेनिआ

१८९८ : फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस येथे पिएर व मारी क्युरी यांनी रेडिअम या नव्या मूलद्रव्याचा शोध लावल्याचे जाहीर केले.
१९६३ : बीटल्सची "I Want to Hold Your Hand" व "I Saw Her Standing There" ही गाणी प्रदर्शित. बीटल्सच्या अफाट लोकप्रियतेची ही सुरुवात ठरली.
१९८२ : 'टाइम' मासिकाची Man of the Year ही उपाधी 'personal computer'ला बहाल केली गेली.
२००४ : हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ ९.३ रिश्टर तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव, इ. १३ देशांतील लाखो मृत्युमुखी.

२७ डिसेंबर

जन्मदिवस : खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ योहानस केपलर (१५७१), गणितज्ञ जेकब बर्नुली (१६५४), कवी मिर्झा ग़ालिब (१७९७), शास्त्रज्ञ लुई पाश्चर (१८२२), इतिहास संशोधक भास्कर वामन भट (१८७६), कोंकण रेल्वेचे जनक अ.ब. वालावलकर (१८९७), स्वातंत्र्यसैनिक व शिक्षणसंस्था संस्थापक पंजाबराव देशमुख (१८९८), अभिनेत्री मार्लीन डीट्रिच (१९०१), साक्षेपी संपादक व प्रकाशक श्री. पु. भागवत (१९२३), लेखिका सुमती देवस्थळे (१९२४), अभिनेता जेरार दर्पादिअ (१९४८), अभिनेता सलमान खान (१९६५)
पुण्यस्मरण : अभियंता व वास्तुरचनाकार गुस्ताव्ह आयफेल (१९२३), कवी ओसिप मँडेलस्टॅम (१९३८), चित्रकार मॅक्स बेकमन (१९५०), लेखक व संपादक देवदत्त नारायण टिळक (१९६५), गायिका मालती पांडे-बर्वे (१९९७), चित्रकार हेलन फ्रँकेन्थेलर (२०११)

---

वर्धापनदिन : जागतिक बँक (१९४५), आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष (१९४५)

५३७ : इस्तंबूल येथील हागिया सोफिया या प्रख्यात धर्मस्थळाचे बांधकाम पूर्ण.
१८३१ : चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोसला जाण्यास निघाला. डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या मांडणीचा पाया या सफरीत घातला गेला.
१९११ : काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात 'जन गण मन' प्रथम गायले गेले.
१९२७ : लेऑन ट्रॉट्स्कीची रशियातील कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी. स्टॅलिनचा पक्षावर ताबा.
१९३२ : न्यू यॉर्कमधील प्रख्यात 'रेडिओ सिटी म्यूझिक हॉल' खुले.
१९४५ : कोरिआची द. कोरिआ व उ. कोरिआ अशी फाळणी.
१९७८ : ४० वर्षांच्या हुकूमशाहीनंतर स्पेनमध्ये लोकशाहीची स्थापना.
१९७९ : सोव्हिएत युनियनचा अफगाणिस्तानवर हल्ला.
१९८५ : रोम आणि व्हिएन्ना विमानतळांवर पॅलेस्टिनी दहशतवादी हल्ला; १६ ठार.
२००७ : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची गोळ्या घालून हत्या.

२८ डिसेंबर
जन्मदिवस : लेखक ग.त्र्यं. माडखोलकर (१८९९), गणितज्ञ व संगणकतज्ज्ञ जॉन फॉन नॉयमन (१९०३), अनेक सुपरहीरोजचा निर्माता स्टॅन ली (१९२२), उद्योजक धीरूभाई अंबानी (१९३२), अभिनेत्री मॅगी स्मिथ (१९३४), उद्योजक रतन टाटा (१९३७), अभिनेता डेन्झेल वॉशिन्ग्टन (१९५४), 'लिनक्स'चा जनक लिनस टोरव्हाल्डस (१९६९)
पुण्यस्मरण : संगीतकार हुस्नलाल (१९६८), ज्ञानपीठविजेते कवी सुमित्रानंदन पंत (१९७७), पत्रकार व लेखक विलिअम शायरर (१९९३), विचारवंत मे.पुं. रेगे (२०००), लेखिका व विचारवंत सूझन सॉन्टॅग (२००४)

---
वर्धापनदिन : भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस (१८८५)
१६१२ : गॅलेलियोने नेपच्यून ग्रहाची नोंद केली परंतु त्याचे वर्गीकरण 'स्थिर तारा' असे केले.
१८९५ : ल्युमिए बंधूनी कारखान्यातील मजूर बाहेर पडत असल्याचा देखावा चित्रित करून तो पॅरिस येथे ३५ प्रेक्षकांसमोर दाखविला. तिकीट लावून केलेला सिनेमाचा हा पहिला खेळ होता.
१९७३ : नोबेलविजेता रशियन लेखक अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन याचे 'गुलाग आर्किपेलागो' फ्रान्समध्ये प्रकाशित झाले.

२९ डिसेंबर
जन्मदिवस : गायक व अभिनेता मास्टर दीनानाथ मंगेशकर (१९००), अभिनेता राजेश खन्ना (१९४२), क्रिकेटपटू डेव्हिड बून (१९६०)
पुण्यस्मरण : चित्रकार जॅक-लुई डेव्हिड (१८२५), गायक व संगीतज्ञ पं. ओंकारनाथ ठाकूर (१९६७), डॉ. आंबेडकरांचे सहकारी सुधारक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड (१९७१), सिनेदिग्दर्शक आंद्रे तारकॉव्हस्की (१९८६)
---
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : मंगोलिया
वर्धापनदिन :
१८९१ : थॉमस अल्वा एडिसनने रेडिओसाठी पेटंट मिळवले.
१८९१ : बास्केटबॉल हा नवा खेळ अस्तित्वात आला.
१९७५ : स्त्रियांना समान हक्क व वेतन देण्यासाठी ब्रिटिश संसदेत कायदा मंजूर.
१९८४ : पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकींत राजीव गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला निर्विवाद बहुमत.
१९९८ : ख्मेर रूजच्या नेत्यांनी कंबोडियातील वंशहत्येबद्दल जगाची माफी मागितली. या प्रकारात १० लाखांहून अधिक माणसांना मारण्यात आले होते.
२००५ : बेंगलुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेत गोळीबार. एक शास्त्रज्ञ ठार, ४ जखमी.

३० डिसेंबर

जन्मदिवस : लेखक रुडयार्ड किपलिंग (१८६५), 'भारतीय विद्या भवन'चे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक कन्हैय्यालाल मुन्शी (१८८७), चरित्रकार व इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार (१९४१), सी++ संगणकीय भाषेचा निर्माता ब्यार्न स्ट्राउस्ट्रप (१९५०), गोल्फपटू टायगर वूड्स (१९७५)
पुण्यस्मरण : रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईल (१६९१), कवी रेनर मारिआ रिल्के (१९२६), छायाचित्रकार व चित्रकार एल लिसित्झ्की (१९४१), नोबेलविजेता लेखक रोमँ रोलाँ (१९४४), सिनेदिग्दर्शक यिरी ट्रिंका (१९६९), अंतराळतज्ज्ञ डॉ. विक्रम साराभाई (१९७१), गांधीवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक व लेखक शंकरराव दत्ताराम देव (१९७४), कवी दुष्यंत कुमार (१९७५), शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार (१९८१), संगीतकार एन्. दत्ता (१९८७), लेखक रघुवीर सहाय (१९९०), कवी मंगेश पाडगावकर (२०१५)

---

१७८८ : मद्रासवर फ्रेंच सैन्याचा ताबा.
१८०३ : अंजनगाव-सुर्जी येथे शिंदे व इंग्रज यांच्यात तह.
१९११ : फ्रान्समध्ये जगातील पहिला क्रॉस (अकाउंट पेई) चेक वापरला गेला.
१९२२ : सोविएत संघराज्याची स्थापना.
१९२४ : एडविन हबलने विश्वात अनेक आकाशगंगा असल्याचं सिद्ध केलं.
१९२७ : आशियातील सगळ्यात जुनी भुयारी रेल्वे - गिंझा लाईन - टोक्योमध्ये सुरू.
१९४३ : नेताजी सुभाषचंद्र बोस यंनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज फडकावला.
१९४७ : काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांसमोर नेण्यात आला.
१९५३ : अमेरिकेत जगातील पहिला रंगीत दूरचित्रवाणी संच विक्रीला उपलब्ध.
२००६ : इराकी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांना देहदंड.

३१ डिसेंबर

जन्मदिवस : चित्रकार हेन्री मातिस (१८६९), चित्रकार मॅक्स पेकस्टाईन (१८८१), कवी हरिवंशराय बच्चन (१९०७), गायक मल्लिकार्जुन मन्सूर (१९१०), अभिनेता अँथनी हॉपकिन्स (१९३७), अभिनेता बेन किंग्ज्ली (१९४३), गायिका डॉना समर (१९४८)
पुण्यस्मरण : चित्रकार ग्युस्ताव कूर्बे (१८७७), भौतिकशास्त्रज्ञ अलेक्सांद्र पोपोव्ह (१९०५), इतिहास संशोधक वि. का. राजवाडे (१९२६), लेखक मार्शल मॅकलुहान (१९८०), गायक व अभिनेते छोटा गंधर्व (१९८७), तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, 'आजचा सुधारक'चे संस्थापक संपादक दि. य. देशपांडे (२००५), लेखिका वंदना विटणकर (२०११)

---

१६०० : ब्रिटनच्या राणीने ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीला भारतीय उपखंडात व्यापारासाठी अधिकृत परवानगी आणि एकाधिकार दिले.
१८०२ : वसईचा तह - दुसऱ्या बाजीरावाने तैनाती फौजा स्वीकारल्या.
१८७८ : कार्ल बेंझने टू स्ट्रोक इंजिनसाठी पेटंट मिळावे यासाठी अर्ज केला.
१८७९ : एडिसनने आपल्या लाइट बल्बचे जाहीर प्रदर्शन केले.
१९७४ : भारत व पोर्तुगाल यांच्यात पुन्हा राजनैतिक संबंध प्रस्थापित.
१९८३ : AT&T Bell System कंपनीचे अमेरिकन शासनातर्फे विभाजन.
१९८४ : इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली.
१९९२ : कम्युनिझमच्या अंतानंतर चेकोस्लोव्हाकिआचे चेक व स्लोव्हाक प्रजासत्ताकांत शांततापूर्ण विभाजन.
१९९३ : ब्रॅन्डन टीना या प्रवाही लैंगिक अस्मितेच्या (ट्रान्सजेंडर) व्यक्तीची अमेरिकेत हत्या करण्यात आली; एखाद्या अस्मितेच्या तिरस्कारातून केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांविरोधात कायदे करण्याचे दडपण यानंतर प्रबळ झाले.
१९९९ : मौलाना मसूद अझर आणि इतर दहशतवाद्यांच्या सुटकेनंतर इंडियन एअरलाइन्सच्या IC ८१४ विमानाचे अपहरण नाट्य संपुष्टात.