आजचे दिनवैशिष्ट्य
जन्मदिवस : विचारवंत अॅलेक्सिस द तोकव्हील (१८०५), कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढणारे डॉ. गेरहर्ड हॅन्सेन (१८४१), उद्योगपती जे. आर. डी. टाटा (१९०४), सिनेदिग्दर्शक क्रिस मार्कर (१९२१), शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (१९२२), व्यंगचित्रकार शि. द. फडणीस (१९२५), कवी फ. मुं. शिंदे (१९४८), माहितीपटनिर्माता व दिग्दर्शक केन बर्न्स (१९५३), अभिनेता संजय दत्त (१९५९)
—
मृत्युदिवस : संगीतकार रॉबर्ट शुमान (१८५६), चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉ (१८९०), समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर (१८९१), गीतकार राजा मेहदी अली खान (१९६६), सिनेदिग्दर्शक लुई ब्युन्युएल (१९८३), लेखक बिभूतीभूषण मुखोपाध्याय (१९८७), नोबेलविजेती रसायनशास्त्रज्ञ डोरोथी हॉजकिन (१९९४), अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर (१९९५), स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफ अली (१९९६), प्रकाशक स. कृ. पाध्ये (१९९७), गायक व संगीतकार सुधीर फडके (२००२), अभिनेता जॉनी वॉकर (२००३), सिनेदिग्दर्शक क्रिस मार्कर (२०१२)
—
आंतरराष्ट्रीय संस्कृतिवैविध्य दिन
जागतिक व्याघ्र दिन
१९०७ : सर रॉबर्ट बेडन पॉवेल यांनी इंग्लंडमध्ये आठ दिवसांचा कँप भरवण्याची तयारी सुरू केली. ही स्काऊट चळवळीची सुरुवात मानली जाते.
१९५७ : आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेची (IAEA) स्थापना.
१९५८ : 'नासा' या अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेची स्थापना.
१९६८ : रोमन कॅथलिक चर्चच्या पोपने संततिनियमनावर असणारी बंदी सुरू ठेवली.
१९८० : मॉस्को ऑलिंपिकमध्ये भारताला हॉकीचे सुवर्णपदक.
१९८१ : प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांचा विवाहसोहळा संपन्न. जगभरातल्या सुमारे सत्तर कोटी प्रेक्षकांना हा सोहळा टीव्हीवरून लाईव्ह प्रक्षेपित झाला.
१९८७ : भारत-श्रीलंका शांतता करारावर जयवर्धने आणि राजीव गांधी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
१९८७ : ब्रिटिश पंतप्रधान मार्गरेट थॅचर आणि फ्रेंच अध्यक्ष फ्रॉन्स्वा मितरॉं यांनी इंग्लिश खाडीखाली युरोटनल खोदण्याच्या करारावर सह्या केल्या.
- 432 views