ट्रोजन युद्ध भाग १- पूर्वपीठिका.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
आत्ताच आपला लेख वाचला. मस्त
आत्ताच आपला लेख वाचला. मस्त आहे!!! थर क्र. ७ अ हे होमरचे ट्रॉय असावे असा बहुतांश लोकांचा तर्क आहे खरा. आणि हे सर्व आवर्जून जाऊन पाहणे म्हणजे जबराच!! मान गये :)
बीबीसीची एक डॉक्युमेंटरी पाहिली त्यात हिटाईट रेकॉर्डमध्ये एका बेक्ड क्ले टॅब्लेटवर सरळ लिहिलेले आहे- "अलेक्सान्द्रॉस, प्रिन्स ऑफ विलुसा". उत्खनन केलेले ट्रॉय, पायलॉस येथील गुलाम स्त्रियांची सापडलेली नोंद आणि ही पॅरिसची नोंद पाहून मला तरी तो पुरावा एकदम निर्णायक वाटतो.
लेख तत्काळ उडवावा.
लेख तत्काळ उडवावा.
सदर लेखक नुसताच पहिला लेख टाकून उत्सुकता चाळवून नंतर त्याविषयावर पोबारा करतात.
ह्या निंद्य कामात ऐसी ने तरी सहभागी होउ नये असे वाटते.
(पब्लिश करायचाच असेल तर ह्यांच्याकडून पाच पन्नास हजार रुपये डिपॉझिट मह्णून ठेवून घ्यावेत. ठराविक मुदतीत पुढील लेख न आल्यास डिपॉझिट जप्त व्हावे.)
रोचक लेखमाला.बरीच पात्रं आणि
रोचक लेखमाला.
बरीच पात्रं आणि त्याची अजब नावं यामुळे परत एकदा सावकाश वाचावा लागेल.
मला अधुनमधुन रामायण का जाणवतय? म्हणजे ते तीन देवी, सफरचंद मुळे कौसल्या, कैकयी आठवल्या. हरणाची शिकार आहेच. वहीनीमधे इंटरेस्ट असलेला भाऊ...आणि मुख्य म्हणजे पळवून नेलेल्या बायकोला परत आणण्यासाठी समुद्र ओलांडुन केलेलं युद्ध.
पुभाप्र.
"तर वहिनीच्या मिषाने ट्रॉयवर
"तर वहिनीच्या मिषाने ट्रॉयवर कब्जा करत येईल म्हणून अॅगॅमेम्नॉनने सर्व ग्रीसमधील फौजा जमवून ट्रॉयवर स्वारी केली" यातल्या 'मिषाने' शब्दाचा अर्थ काय? मी याच अर्थ 'अॅगॅमेम्नॉनला वहीनीत इंटरेस्ट होता' असा घेतला... चुकलं बहुतेक...
बाकी विकीलिँकस् दिल्या ते छान केलंत. धन्यवाद.
क्लास
इतक्या मोठ्या पटावरच्या इतिहासातल्या काही गोष्टी, काही नावं ऐकून ठाऊक होती. हे सारं मुळातून वाचण्याचीही इच्छा होती. ते सगळं एकत्र, सोप्या भाषेत इथे आमच्यापर्यंत आणल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
@अस्मिता - तुमचे निरीक्षण बरोबर आहे. Comparative mythology नावाच्या विद्याशाखेत या साम्यस्थळांचा अभ्यास होतो. जोसेफ कॅम्पबेलचं या विषयावरचं लेखन वाचनीय आहे. माणसाला ज्या गोष्टींचा अचंबा वाटतो, भय वाटतं, हर्ष होतो; त्या साधारण सारख्याच असतात. याचंच प्रतिबिंब निरनिराळ्या संस्कृतींतल्या बोधकथांतील साम्यात पडलेलं दिसत असावं.
+१ http://mr.upakram.org/node/3233
http://mr.upakram.org/node/3233 हा माझा उपक्रमावर एक धागा मध्यपूर्वेतील संस्कृतींबाबत. त्यात नोहा-मनू ह्यांच्या कथेचा उल्लेख होता.
तिथे प्रतिसादंतून समजलेली रोचक गोष्ट म्हणजे ह्याच लायनीवरच्या गोष्टी चीनी आणि मायन संस्कृतीतही आहेत.
(इंडो-युरोप आणि भूमध्य सागराच्या प्रभावाने मध्य्पूर्वही एकमेकांना सांस्कृतिकदृष्ट्या अधिक जोडलेली दिसते असे मला वाटे. चायनीज हे त्या कालात भौगोलिक सलगतेच्या अभावाने तुटल्या तुटल्यासारखे होते असा माझा समज. पण इथे हे कनेक्शन दिसतं. शिवाय मायन्स म्हणजे तर पाsssर वेगळाच खंड झाला की.)
असो.
असे साम्य दिसते हे खरे.
अलिफ्-लैला(अरेबियन नाइट्स), पंचतंत्र, बौद्धांच्या जातककथा, इसापनिती ह्या सगळ्या बेमालूम मिसळल्यात. शिवाय सॉक्रेटिस- कन्फ्युशिअस - गौतम बुद्ध ह्यांच्या नावावर सांगितल्या जाणार्या कथा,मुल्ल नसीरुद्दीन्च्या कथा,तेनालीराम -बिरबल ह्यांच्या कथा ह्या सगळ्या एकमेकांत इतक्या मिसळून गेल्यात की कुठलं वरिजनल हे ओळखणं आम पब्लिकला कठीण व्हावं. ह्य सगळ्यात समान धागा दिसतो बर्याचदा.
प्रलय
>>> म्हणजे नोआह/मनूच्या प्रलयकथांसारखे?
हो, प्रलयाची कल्पना उत्तर अमेरिकेतल्या रेड इंडियन जमातींपासून ते सुमेरियन संस्कृतीतल्या गिल्गामेशच्या मिथकापर्यंत, नोआहपासून ते मनूपर्यंत दिसून येते. इहलोक आणि परलोक यांच्या सीमेवर असणारं एखादं कैलास पर्वतासारखं प्रतीक (Axis mundi) हेही अनेक संस्कृतींत आढळणारं एक सामयिक मिथक. गॅब्रिएल गार्सिया मार्केसच्या लेखनात डोकावणारी अनेक स्थानिक मिथकं बहुतेक म्हणूनच परिचयाची वाटून जातात.
धन्यवाद बॅटमॅन, नंदन
धन्यवाद बॅटमॅन, नंदन :-)
ग्रिकांमधे एक शंकरासारखा देव आहे असं वाचलेलं, डोक्यावर चंद्र, हातात त्रिशुळ असलेला. जसजसे लोक एका ठिकाणाहुन दुसरीकडे जातात (म्हणजे आर्य भारतात आले त्याटाइप) तसंतसा एकाच लोककथे मधे वेगवेगळा मसाला टाकण्यात येतो आणि एकाच ढाच्यातुन वेगवेगळ्या कथा तयार होतात.
बाकी खूप पूर्वी (म्हणजे कधी एके काळी आम्ही लहान होतो तेव्हा :-) ) सकाळ पुणे आवृत्तीत उन्हाळ्याचा सुट्टीत लहान मुलांसाठी एक पान यायचे. त्यात होमर, ओडीसी, इलियड बद्दल वाचलेले.
होमर आंधळा होता. ग्रिक देवता पर्वतावर राहतात. आणि मनुष्य पायथ्याशी. आणि त्या देवता अधुनमधुन मनुष्यवस्तीत येतात, लग्न वगैरे करतात, मुलं जन्माला घालतात, परत पर्वतावर जातात. लै मज्जा होती कै कै :-D
ग्रीकांमध्ये देवांचे दोन
ग्रीकांमध्ये देवांचे दोन मुख्य संघ आहेतः
१. टायटन्स.
२. ऑलिंपियन्स.
ऑलिंपियन्स हे खरेतर टायटन्सचीच पोरेबाळे. होत. पण त्यांच्यात "टायटॅनोमॅची" म्हणजेच मोठे युद्ध झाले, त्यात टायटन्सचा पराभव झाला आणि ऑलिंपियन्सचे राज्य सुरु झाले. या ऑलिंपियन्समध्ये सगळ्यात प्रमुख होता झ्यूस ऊर्फ जोव्ह-त्यांचा इंद्र. त्याचे सख्खे भाऊ म्हणजे पोसायडन ऊर्फ वरुणदेव आणि हादेस ऊर्फ यमराज. यांच्या देवता आपल्या फेव्हरीट भक्तासाठी देवता लैच कष्ट घेतात, पार ऑलिंपसपर्यंत गार्हाणी नेतात.
बरोबर, मीही तोच उच्चार ऐकला
बरोबर, मीही तोच उच्चार ऐकला आहे, पण जरा स्पेलिंगवाईज जावे म्हटले ;) बाकी ग्रीक स्पेलिंग Ἅιδης आहे, सबब उच्चार एदिस असा आहे. हिडीसपणाचे कनेक्शन माझ्या मनातही तेव्हाच बसले होते :)
आणि पर्सी जॅक्सनची सीरिज माहिती नाही, पाहतो. ओडिसीपण पाहतो. क्लॅश ऑफ द टायटन्स पाहिला, आवडला.
वसंत पंचमी
आज सकाळमधे व्हॅलेन्टाईनच्या निमित्ताने माधुरी सौंदलगेकर ह्यांच्या लेखात अॅफ्रोडाइट व अॅडोनिस ह्यांची कथा आली आहे. आज वसंत पंचमी, भारतात काही ठिकाणी सुखी दांपत्य-जिवनासाठी रती-मदनाची पुजा केली जाते हे व्हॅलेन्टाईनच्या आसपास व्हावं हा विशेष योगायोग, लेखिकेने सकाळमधे अॅफ्रोडाइट व अॅडोनिसला रती व मदनाची उपाधी दिली आहे. वसंत पंचमीला सरस्वतीचीपण पूजा केली जाते.
आत्ताच वाचला
ट्रॉय सिनेमा बघितला होता. मात्र या सगळ्या 'इतिहासा'ची गुंतागुंत माहीत नसल्याने विशेष कळला नव्हता.
मला नेहमी एक प्रश्न पडत आलेला आहे. योद्धा-नायक अनेक कथानकांमध्ये येतो. अकिलीस काय किंवा अर्जुन काय. पण अर्जुनाची वैयक्तिक वन ऑन वन युद्धं प्रसिद्ध आहेत. अकिलीसचं जे मी वाचलेलं आहे त्यावरून तो सेनापती असावा असं वाटतं. म्हणजे आपल्या नेताजी पालकर सारखा. तर यापैकी जास्त खरं कुठचं?
हिते पण तोच प्रकार. अकिलीसने
हिते पण तोच प्रकार. अकिलीसने ट्रॉयला येताना ५० जहाजे आणली होती आणि त्यांत टोटल २५०० सैनिक होते. सेनापतीसारखे लढून त्याने १२ शहरे अन ११ बेटे ग्रीकांच्या ताब्यात आणली असा एक उल्लेख वगळता डीटेल उल्लेख नाहीत. इलियडात खुद्द अकिलीसच्या लढण्याचा उल्लेख हा हेक्टरला मारले तितपतच येतो. बाकी योद्ध्यांचीही तीच कथा. इलियडची काही द्रोण-पर्वासारखी वाटणारी बुक्स जी आहेत, त्यांमध्येही मुख्यतः वैयक्तिक १-ऑन-१ लढायांचाच उल्लेख जास्त आहे. सैन्याच्या ग्रूपचे उल्लेख आहेत, उदा. ग्रीक आणि ट्रोजनांच्या फॅलँक्सेसचे वर्णन आहे, नाही असे नाही. पण भर आहे तो वैयक्तिक हाणामारीच्या वर्णनावरच जास्त.
आता यावरून काय खरे-खोटे हे कसे ठरवणार? इतकी मोठी सेना होती तर ग्रूपने मारामारी केल्याशिवाय पर्यायच नाही. पण वैयक्तिक हाणामारीची वर्णने वाचली, की भारी वाटते, ऐकणार्याला जरा चेव येतो, शिवाय मुख्य मुख्य योद्ध्यांना वर्णनात महत्व जास्त असते, म्हणूनही फोकस तसा असेल. मला तरी असे वाटते.
ट्रॉय शहर कोठे होते?
ट्रॉय शहर डार्डनेल्स खाडीच्या पूर्व किनार्यावर गॅलीपलीच्या - पहिल्या महायुद्धातील प्रसिद्ध युद्धक्षेत्र - समोरील किनार्यावर आहे असा पुरातत्त्व शास्त्रज्ञांचा तर्क आहे आणि गेली १००-१२५ वर्षे तेथे उत्खनन करून ९ थरांची एक प्राचीन वसाहत प्रकाशात आणण्याचे काम चालू आहे. त्या थरांपैकी एक म्हणजे होमरचे ट्रॉय असावे.
दीड वर्षांपूर्वी मी ते उत्खनन पाहण्यासाठी इस्तनबूलहून गेलो होतो. त्यावर आधारित असा माझा लेख 'उपक्रम'च्या २०११ च्या दिवाळी अंकात तीन भागांमध्ये http://diwali.upakram.org/node/147 येथपासून पाहता येईल.