.
.
ललित लेखनाचा प्रकार
कठीण आहे!
एकावेळी एकच स्ट्रिप.. तीही प्रिस्क्रिप्शनशिवाय इथे मिळणार नाही..
असल्या गोळ्या इंड्या मधे फकस्त एकाच आजाराच्या असतात. अन त्या बहुधा केमिस्टाकडे नसतात. सायकिअॅट्रिस्ट लोक स्वतःच डिस्पेन्स करतात त्या.. बाकी काय वाट्टेल ते. अगदी केटॅमिन(इंजेक्शन द्वारे भूल द्यायचे औषध) सुद्धा दारूत घालून प्यायला विकत मिळते. बार मधे. केमिस्ट दूर राहू द्या.
थँक्स.पण ठाणे ते पवई असा
थँक्स.पण ठाणे ते पवई असा सॅंपल एरिया घेऊ.कोणत्याही दुकानात जाऊन क्लोनाझेपाम मागा,उदा झॅपिझ.लहान दुकानांत ती ठेवत नाहीत. सर्व मोठे केमिस्ट ठेवतात.99 टक्के अनोळखी केमिस्ट विना प्रिस्क्रिप्शन देत नाहीत.नेहमीचा ओळखीचा केमिस्ट एखादी स्ट्रिप विना प्रिस्क्रिप्शन देतो.
आडकित्तासर,तुम्ही डॉक्टर असल्याने तुम्हाला काही खाचखळगे दिसणारच पण एवढी खात्री असू द्या की मी फ़िक्शनमधेही फ़ॅक्चुअल चुका आटोकाट टाळत असतो.
मुख्य म्हणजे ऐकीव माहितीवर माझ्या कथाकल्पना बेस्ड असूच शकत नाहीत. मला कल्पना आहे की अवैधरित्या कोणतेही ड्रग मिळतेच,पण कथानायक अजून त्या स्टेजला नाहीये की काहीही करुन कोणतेही द्रव्य मिळवेलच. :) अजूनही डॉक्टरांचं समुपदेशन आठवतोय भाबडा.. यावरुन लक्षात येईलच.तज्ञ प्रतिक्रियेबद्दल पुन्हा धन्यु.. :)
क्षमस्व!
रसभंग करायचा नव्हता.
फक्त समुपदेशन आठवणारा. प्रिस्क्रिप्शन गोळ्या खाणारा हा नायक मानासोपचारतज्ञाकडे उपचार घेतोय, असे कुठे स्पष्ट म्हटले नव्हते, ते म्हणून पाहिले इतकेच. ते बरोबर निघाले काय?
बादवे: आजकाल प्रॅक्टिस न चालणार्या सायिकिअॅट्रीस्टलाच समुपदेशन वगैरे करायला वेळ असतो. बाकी एकतर नॉन मेडिको समुपदेशक नोकरीस ठेवतात, किंवा फक्त गोळ्या विकून किंवा झटके देऊन (हो. आजही देतात) काम चालवतात.
फायदा क्या है?
धनश्याम ठक्कर यांचे काहि शेर वाचले होते. या निमित्ताने ते शोधावेसे वाटले.. इथे काहि शेर देतो आहे. पूर्ण गझल इथे वाचता येईल
मय-भरे ख्वाब दिखाने से फायदा क्या है?
सिर्फ अंगूर चखाने से फायदा क्या है?
तेरी तनहाई में भी दिल को तअल्लुक तेरा,
इश्क पर जोर लगाने से फायदा क्या है?
लेखन चांगलं झालं आहे
हा अर्धवट ठेवणं हा त्यावर अन्याय होईल. इतर कुठच्या कुठच्या लाटा आहेत, का याच एकीची त्सुनामी होणार अशी उत्सुकता लागून राहिली आहे.
>>शहाळ्यात सर्रकन सुरी आणि मलई बळ्ळकन बाहेर.. शी... मेंदू..बाहेर येईल आता विचार करुन...
वगैरे काही वाक्यं चांगली झाली आहेत. एकंदरीत मांडणी छान आहे. काही वाक्यं थोडी अर्धीकच्ची वाटली.
>>काळाने कमी होण्याऐवजी चटका वाढत कसा जातोय? ती हवीच.. काही झालं तरी हवी हा कसला भलता रेटा मनाचा..
मनातल्या चालू विचारांऐवजी थोडी पुस्तकी वाटली.
प्रथमपुरुषी नरेटर, त्यात चालू वर्तमानकाळ... ही जोडी परिणामकारक ठरू शकते, पण हाताळायला कठीण असते. कथेसाठी अत्यावश्यक आहे का?
असं काय करता ?
मे बी नाही मस्ट बी कंटीन्यूड!