Skip to main content

प्रोडक्ट

'मी' नावाच्या 'प्रोडक्ट'ला,
धारदार एकाकीपणाचं वेष्टण आहे,
त्यातला जिन्नस 'एक्सपायर' होत नाही,
जोवर तुम्ही ते 'रैपर' 'स्क्रेच' करत नाही,
'लकी ड्रॊ' सुद्दा आहे त्यात एक,
ज्याच्या 'विनर'ला काहीच गवसणार नाही,
माहीत आहे?

तरीही कापू म्हणतो हा 'टेट्रापेक' एकदाचा,
पाहीन तरी,
किती 'प्रिझर्वेटीव्हज' आहेत
किती 'न्यूट्रियंट्स' आहेत
अथवा उगाच,
नुसताच आपला बुडबुडा भरलेला असायचा

एरर इन क्वालिटी कंट्रोल
ऎबनोर्मल डिसट्रीब्यूशन

मार्केट मधे मात्र पोकळ डब्यांनाच चलती आहे,
नुसता चकचकीत, गुलाबी असला तरी चालेल,
चालेलच हे प्रोडक्ट

सिलीकोन भरलेली,
टंच,
आधीची,
झोप-झोप झोपून सपाट झालेली,
गादी