Skip to main content

अनावृत काफिऱ

तुझे शुभ्र, संयत शुकवस्त्र
पाघळतं, विरघळतं
विभ्रमाचा प्रारब्ध तेवढा गतिमान करत ठेवतं
सत्य अन्शा अन्शाने प्रकट होत जातं
आणि माझ्यातला मी मात्र
अनायासेच तू कभिन्न करून ठेचलायस

खिन्न प्रणयाचा सारीपाट
घडी करुन परत आत सारलाय
तुझ्या अमर्त्य अमृताशी एक मर्त्य क्लेश
कायमचा बांधला गेलाय
नुकत्याच कोरड्या केलेल्या मज्जारज्जूंनी

माझ्या किरमिजी बेटावरची
तुझ्या आत्मलिंपणाची नक्षी
पांथस्त सूर्योदयाची

सुबक विप्रलब्ध आविष्कार
अलिखीत उन्मीलीत समाधीकडे नेतो
आणि तू आपल्या करूणेचे उन्माद
शिताफीनं शेवटपर्यंत झेलत राहातेस

ह्रदयंगम अकृत्रिम स्नेहाचा सांजशकून मात्र
तर्जनीने क्षितीज खुणावत राहातो
त्याला सर्वस्वाचे न भूतो लिंपण नाही
ना त्याला स्वत्वाची राखरांगोळी केल्याचा नश्वर आनंद
फक्त काही अंश मत्सर
काही अन्गुळे दंश