Skip to main content

गुळाचा गणपती.

सर्वप्रथम इथे (म्हण्जे या सायटीवर) कलादालन नसल्याने संस्थापक अन संयोजक मंडळाचा तीव्र निषेध (एकवेळ पाकिस्तानविरुद्ध भारत युनोमधे कमी तीव्र निषेध नोंदवत असेल, पण माझा जास्त तीव्र आहे)

सभासदांच्या उपजत कलागुणांना वावभर वाव कसा मिळावा म्हणतो मी.

तर निषेध नोंदवून धागा मौजमजेत डकवतो आहे. गुळापासून केलेली कलाकृती असल्याने पाकृ मधे टाकायचा विचार होता. पण म्हटलं गणपती आहेत, तर धार्मिक मधे टाकू. पण तो ही विभाग नाही :( मग काय करू कसं करू ही धुसफुस करत शेवटी मौजमजेत टाकलाय.

तर. आमच्याकडे होणार्‍या प्रत्येक लग्नात (मुलीकडून) रुखवतावर गुळाचा गणपती करूण देण्याची जबाबदारी मजकडे असते. त्याप्रकारे एका भेलीतून कोरून बनवलेला गणपती पहा कसा दिसतोय :

IMG0179A IMG0178A

पांशा: हा गणपती त्या मुलाकडच्यांसाठी एक प्रचंड रॅगिंग असतो. कसे ते सांगा पाहू?

राजेश घासकडवी Sat, 12/11/2011 - 18:49

तुमची सर्जरीचं कौशल्य इथे उपयोगी पडलेलं दिसतंय. :)

गुळाचा गणपती बघितल्याबरोबर 'एक गळ्यात पडलाच आहे, हा दुसरा.' असं मुलीला म्हणत असतील.

मोहनराव Sat, 12/11/2011 - 18:54

मस्त आहे कलाकृती!!
सर्वप्रथम इथे (म्हण्जे या सायटीवर) कलादालन नसल्याने>>
+१ सहमत. कृपया संस्थापक मंडळाने यावर विचार करुन उपाययोजना करावी,

प्रियाली Sat, 12/11/2011 - 19:41

सही हं डागदर! आवडली कला.

गुळाचा गणपती बनवताना चुकला तर गुळाचा खडा तोंडात घालून चघळायचीही सोय होत असावी. उत्तम!

धनंजय Sat, 12/11/2011 - 20:38

मस्तच दिसतो आहे गुळाचा गणपती.
(एकदम गोरागोरा आहे गूळ.)
वराचीच पूजा आणि वराचीच रेवडी उडवता काय. (गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य.)

पैसा Sat, 12/11/2011 - 21:55

आम्हाला नेहमीच आवडतात. हा कसा अपवाद असेल? पण नंतर त्या गणपतीचं काय करायचं या विचाराने सासरच्या मंडळींची झोप उडत असेल!

नितिन थत्ते Sun, 13/11/2011 - 09:50

In reply to by आडकित्ता

गणपती गूळ म्हणून 'वापरून' टाकता येणार नाही आणि मुंग्या वगैरेंची डोकेदुखी होणार.

ता. क. गणपती मस्त आहे.

नितिन थत्ते Sun, 13/11/2011 - 12:09

In reply to by आडकित्ता

गणपतीला एका तबकात ठेवावे.

रोज पाण्याने आंघोळ घालावी.
ते तबकातले पाणी तीर्थ म्हणून प्यावे (डायबेटिस नसणार्‍याने).

काही दिवसांनी गणपतीचा प्रश्न सुटलेला असेल. :)

आडकित्ता Mon, 14/11/2011 - 14:04

In reply to by नितिन थत्ते

तिकडचं रिसेप्शन अन रुखवत प्रदर्शन संपल्यावर सुमारे ६-८ दिवसांत तिकडून फोन येतोच.
घाबर्‍या घाबर्‍या. की अहो, तो गुळाचा गणपती.. त्याचं काय करू?
मग मनातल्यामनात खुदखुदू हसून सांगावे-
"पातेलीत पिण्याचे पाणी घेऊन त्यात गणपती बोळवा. ४-५ दिवसांत पाणी सुकून उरलेला गूळ गणपतीचा प्रसाद म्हणून नेहेमीच्या वापरास घेता येतो."

(खरेतर प्रतिष्ठापना केलेली नसल्याने त्या मूर्तीस नेहेमीचा गूळ समजून सरळ वापरताही येते, पण शेवटी भावनांचा प्रश्न असतो, अन गणपती बोळवायचा असतो, तो पात्रात बोळवला तरी चालते हे सगळ्यांना ठाऊक असते.)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 15/11/2011 - 05:16

गुळाच्या उरलेल्या भेलीचं काय केलंत?

सर्वप्रथम इथे (म्हण्जे या सायटीवर) कलादालन नसल्याने

स्वारी शक्तिमान. सोय केली पण उपलब्ध करून द्यायला विसरले. कलादालन आलेलं आहे आणि धागा तिथे हलवला आहे.

मोहनराव Tue, 15/11/2011 - 13:59

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कलादालन आलेलं आहे आणि धागा तिथे हलवला आहे.>>

कलादालन सदर काढल्यामुळे आता चांगली सोय होइल कलाकार मंडळींची!!

आडकित्ता Tue, 15/11/2011 - 14:52

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गट्टम होते, कारण लग्नघरात हे कोरिव काम करीत असतांना आजूबाजूला कमीतकमी ७-८ पिल्लू लोक्स कायम असतात. अन कोरलेले तुकडे खाल्ले तर मामा रागावत नाही, हे समजलं, की शून्य मिन्टात ते गायब होतात ;)

टीपः
१. धागेपे पंगा ऐवजी नवीन दालन उघडल्याबद्दल धन्यवाद!
२. शक्तीमानला इम्पोर्टेड गेंड्याच्या कातडीचा नवा युनिफॉर्म टाकलाय शिवायला.

दिलतितली Tue, 22/11/2011 - 15:07

"गोडुला गंपती गुलाचा" असा दिसतोय.. तुमचा हा गणू बघून आता मात्र मला इच्छा होतेय कि वाचावेच तुमचे "माझे डॉक्टर होणे" :)