एक तो सैतान आहे
हातोडा
एक तो सैतान आहे
बाईकवरचा पाईक आहे
नाही नाव, गाव कसले?
स्थेटोस्कोपचा थाट आहे
माहितीचा पूर येता
ज्ञानाची वाट आहे
टंकताना भारंभार पोष्टी
हलते खाली खाट आहे
त्रिशूळ ॐकार विषवल्ली
चरखा मात्र चाट आहे
नाचविण्याची धमकी देणे
सद्ध्या सवय हॉट आहे
विचार लै कृती पूज्य
शून्य त्याला थॉट आहे
बोलघेवडा बोलबच्चन
डोक्याला हा शॉट आहे
कुण्या एका पंचेवाल्याचा
खानदेशी भाट आहे