Skip to main content

विरक्तरसाची मात्रा

विरक्तरसाची मात्रा

कवी - सर्व_संचारी

पुष्कळ पाहिले देश
खूप झाले मुक्काम
जड झाले सामान

पुष्कळ झाली यात्रा
जरा घ्यावी विरक्तरसाची मात्रा

जिओग्राफी, ओर्थोग्राफी
मेमोग्राफी, टोपोग्राफी
बायोग्राफी, पोर्नोग्राफी
उदंड झाले हस्तमैथुन
तुटेल न
शिस्नावरची नस
च्यायचा… विरक्तरस.

नुसताच साचलाय गाळ
वाहत नाही गंगा
देहबुद्धी झाली
घेतला लाइफशी पंगा
चला! या जन्मीचं नाव सांगा
गेल्या जन्मीचं गोत्र
या जन्मी गाढव
गेल्या जन्मी कुत्रं

आता तरणोपाय एकच
विरक्तरस मात्र

पुरे झाले मराठी लेखक
नि पुस्तकांच्या ओळी
पेन म्हणजे बंदूक खरी
त्यातून सुटते आता
इंग्रजी गोळी

पोरे झाली
शिंकली, पादली, हसली, वाढली
उत्क्रांतीची शाळाच भरली
कंठ फुटला, फुटली गाणी
छोट्या खिशात गोट्या
मोठ्या खिशात नाणी
DNA ची सारणी
कुठे गेला तो मैकदा
कुठे हरवली वारुणी
धौम्य ऋषीच्या शेतामध्ये
आडवा पडला आरुणी
शेतातल्या बिळातून
उंदीर निघाले सतरा
हरि ओम तत्सत्
विरक्तरसाची मात्रा

………

सा प प सा सा प प सा
विरघळू लागले तानपुरे
घुमू लागली विलम्पत
मैफल झाली सुरू
बैस आता
स्वस्थ, मौन
गर्भाच्या आकारात
सुरांच्या मखरात

बस्

विसर आता तो
विरक्तरस

विशेषांक प्रकार

बॅटमॅन Sat, 02/11/2013 - 04:10

कविता आवडली. अशा फॉरम्याटमध्ये कविता करायला पुनरेकवार इन्स्पिरेशन या कवितेने मिळाली, धन्यवाद!

तिरशिंगराव Sat, 02/11/2013 - 10:15

कविता आवडली.

सा प प सा सा प प सा
विरघळू लागले तानपुरे
घुमू लागली विलम्पत
मैफल झाली सुरू
बैस आता
स्वस्थ, मौन
गर्भाच्या आकारात
सुरांच्या मखरात

हे विशेष आवडले. विलम्पत चा अर्थ समजला नाही. तुम्हाला विलंबित म्हणायचे होते का ?

सर्व_संचारी Sat, 02/11/2013 - 13:27

तिरशिंगराव : हो विलम्बित च परन्तु त्याला - बिलम्पत पर्यायाने कधी कधी विलम्पत सुद्धा म्हणतात , अर्थातच हे मी प्रत्यक्ष कुठल्याश्या मैफलीत (गरवारे हाल मधलीच असावी)ऐकले आहे, आणि इथे विलंबित असे म्हणून त्याची लय किंचित बिघडली असती, म्हणून बिलम्पत छान वाटले.
:)

आडकित्ता Sat, 02/11/2013 - 22:29

दिवाळी अंकासाठी निवडली आहे,
म्हणजे चांगलीच असावी.

आपल्याला काय शष्प समज्त नाय बा त्यातलं.

(कवितेतील शब्दांशी अनुरुप असा प्रतिसाद लिवण्यासाठी त्यात शष्प घातलंय. धन्यवाद!)