** खात्री **
सर,
तुम्ही फारच विकलांग झाला आहात!
अलिकडे बर्याचदा तुम्ही
या देवळाच्या पायरीवर
नाही तर त्या चौकातल्या बाकावर
कुणाला तरी शोधत असता.
जेव्हा जेव्हा मी तुम्हाला
बघतो तेव्हा अजिबात थांबावसं
वाटतं नाही की
चवकशी कराविशी वाटत नाही.
कारणे अनेक आहेत,
पण तो प्रसंग अजुनही चांगला
लक्षात आहे.
"अरे! तुझी स्वप्नं भंग पावली!"
असं तुम्ही बसमध्ये एकदा
भेट झाली तेव्हा हिणवले होते...
कदाचित
माझ्या स्वप्नांमध्ये
तुम्हाला काही वाटा नव्हता
म्हणुन असेल.
पण असो
काळ असा ना तसा,
आज ना उद्या,
न्याय करतो
तुमची भिरभिरती नजर
बघुन माझी
खात्री पटली आहे.
अरुण जोशींशी सहमत
मला तरी माझा सर्वात मोठा विजय हा वाटतो की - शत्रूलाही आपल्या मानस-प्रार्थनेत सामील करुन घेता आले. डूख धरला तर वीष आपल्यामध्येच भिनत रहाते.
अनेक वर्षे फक्त स्वतः व कुटुंबियांकरता प्रार्थना केल्यानंतर एक सुंदर "सरमन" वाचले. त्या सरमनचा मुख्य मुद्दा हाच होता की प्रार्थना एकट्या तुमच्याकरता करु नका. जगाला (आपलं जग केवढसं असतं) सामील करुन घ्या. प्रार्थनेचा हेतूच तो असतो.
तेव्हापासून फलश्रुती वाचताना मनोमनी "आज मला भेटलेले व/अथवा माझ्या विचारपरीघात आलेले सर्व लोक" अशी प्रार्थना घडते.
पैकी जर शत्रूच तुमच्या विचारपरीघात सतत येत असेल तर अर्थ एवढाच की त्या व्यक्तीला सदबुद्धी जास्त निकडीची आहे अन तुमच्या प्रार्थनेतून ती पोचली पाहीजे.
"शुभं करोति" मध्ये देखील शत्रूविनाशाय नसून "शत्रूबुद्धी विनाशाय" अशी वाक्यरचना आहे.
मला मी बदला घेतोय असं वाटतं.
मला मी बदला घेतोय असं वाटतं नाही. मी त्या व्यक्तीकडे जाऊन हेतुतः विपन्नावस्थेची जाणीव करून दिली तर त्याला बदला म्हणता येईल. आणी ते मी नक्कीच करणार नाही.
पण अलिकडेच प्रा. एम व्ही कामत (आय आय टी पवई ) निवर्तले. तेव्हा ब-याच जणांची मळमळ बाहेर पडली होती. त्याला बदला म्हणता येईल का? मळमळीचा निचरा होणं एकंदर स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक नसतं का?
चिरपरिचय
एकाच अल्प आणि अप प्रसंगामुळे जन्मभर लक्षात ठेवलेला माणूस वा प्रदीर्घ परिचयाच्या माणसाचे एकच अपवर्तन - आणि त्यानंतर त्याच्याबद्दल जेव्हा केव्हा आठवणीत येईल तेव्हा, जेव्हा केव्हा पुढे येईल तेव्हा या कवितेतल्या प्रमाणे केलेले खुनशी वर्तन इतके आवश्यक नसावे. अशा आठवणी जपल्या तर जग कसे वाईट आहे असे निराशेच्या क्षणी जास्त प्रकर्षाने वाटते. असो.