Skip to main content

'बस नहीं चलता…!' - डेढ़ इश्किया

सविता Mon, 13/01/2014 - 15:53

सकाळ मध्ये आज रिव्ह्यू "छान" म्हणून आलाय... आणि सहसा सकाळचे रिव्ह्यूज माझ्या मताशी जुळणारे असतात त्यामुळे पाहणार हे नक्की!

तसाही किमान सिडी आणून पाहणार होतेच आता थेटरात जाणे जास्त सिरियस्ली घेतेय. इश्किया आवडला होता शिवाय अगदी डाय हार्ड फॅन नसले तरी माधुरी आवडते, इतक्या वर्षांनी तिचा सिनेमा येतोय ("आजा नच ले" मी मोजत नाही) छोडने का नही!

सानिया Tue, 14/01/2014 - 03:15

विशाल भारद्वाजांच्या चित्रपटांची संगीत ही एक महत्वाची बाजू असते. त्याबद्दलही ऐकायला आवडेल. चित्रपटशी संगीताशी नाळ कशी जुळली आहे?

'जगावे सारी रैना' बघायची प्रचंड उत्सुकता आहे. 'हमरी अटरीया'ने अ‍ॅपेटायजरचे काम केले आहे. रेमोही मला आवडतो.

अतीमेकपचे म्हणाल तर मला वाटते, टि.व्हीवरच्या मालिका बघून एव्हाना प्रेक्षकांची नजर मेली असेल. चुकून एखादी मालिका बघण्याचा योग आलाच, तर केवळ मेकपवरून मला आजकाल कळू लागलय, सुष्ट कोण आणि दुष्ट कोण ते!

राजन बापट Tue, 14/01/2014 - 03:49

In reply to by सानिया

>>> अतीमेकपचे म्हणाल तर मला वाटते, टि.व्हीवरच्या मालिका बघून एव्हाना प्रेक्षकांची नजर मेली असेल. चुकून एखादी मालिका बघण्याचा योग आलाच, तर केवळ मेकपवरून मला आजकाल कळू लागलय, सुष्ट कोण आणि दुष्ट कोण ते!

ते सुष्ट नि दुष्ट चे माहिती नाही.. पण या सर्व अति-मेकप-धारी गंगाभागीरथी स्त्रिया "पुष्ट" मात्र आहेत असे एका वर्तुळात ऐकले.
(निषेध ! निषेध !! मिसॉजिनिस्ट ऑब्जेक्टीफिकेशनचा तीव्र वगैरे वगैरे)

ॲमी Tue, 14/01/2014 - 07:21

विशालबद्दल जे लिहिलय ते मान्य आहे. पण 'चित्रपट इतर कोणापेक्षाही जास्त दिग्दर्शकाचा असतो' हेमावैम. त्यामुळे इश्कियाच श्रेय विशाल ला देणे ठीक वाटत नाहीय.

मुक्ता_आत्ता Tue, 14/01/2014 - 13:01

In reply to by ॲमी

तुम्ही म्हणता ते मान्य आहे. परंतु मी विशालला संपूर्ण श्रेय द्यायचं म्हणून लेख लिहिलाच नाहीये - विशालच्या सिनेकृतींमधली वैशिष्ट्ये सांगण्यासाठी लिहिला आहे. त्या प्रत्येकच सिनेमाला विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवण्यात कितीतरी जणांचा हातभार असणार हे उघड आहे. परंतु त्यांना सांधणारा, त्यांच्या आणि स्वतःच्या अतरंगी कल्पनांना फुलवत चित्रपट निर्माण करणारा तो विशालच आहे.

अनुप ढेरे Tue, 14/01/2014 - 11:56

लेख आणि पिच्चर दोन्ही आवडले.

अवांतरः मेहेमुदाबादच्या नवाबाची एक विट्रेंष्टींग गोष्ट आहे. त्याचे वडील फाळणीनंतर भारत सोडून गेले. पण त्यांची बायको आणि मुलगा (सद्य नवाब) नाही गेले. त्यांची वडिलोपार्जित जमीन सरकारने Enemy Property Act, 1968, खाली जप्त केली. हा आत्ताचा नवाब २५-३० चाललेली केस जिंकला आणि ५००० कोटी रुपयाच्या जमिनीचा मालक ठरला. पण अजूनही कायदेशीर मारामाऱ्या चालू आहेत.

http://www.thefreelibrary.com/Prince+profits+as+enemy+property+Act+put+…

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 14/01/2014 - 23:59

विशालचे चित्रपट आवडतात.

आयुष्य'नामक अंदाधुंद (केऑस) दर्शकांसमोर विविधप्रकारे उभी करण्याचा ध्यास विशालच्या कृतींनी घेतलेला दिसतो.

हे पटलं.