Skip to main content

'आँधी'?! छ्या! 'झुळूक'सुद्धा नाही!

नितिन थत्ते Tue, 25/02/2014 - 15:39

तो चित्रपट इंदिरा-फिरोज नात्यावर बेतलेला होता हेच मान्य नाही. त्यातला प्लॉट कुठल्याच प्रकारे इंदिरा फिरोज यांच्याशी समांतर नाही. सुचित्रा सेन आणि तिचे वडील रेहमान दोघे राजकारणी असतात याखेरीज कोणतेच साम्य नव्हते.

चित्रपटाच्या रसिद्धीसाठी तो नुस्खा वापरला होता असे वाटते.

तो इंदिरा गांधीच्या जीवनावर बेतला होता या अपेक्षेने पाहिला असल्यास अपेक्षाभंग होणे साहजिक आहे.

ता.क. - तो त्यांच्या आयुष्यावर बेतला होता असा निर्मात्यांचा क्लेम असेल तर त्यावर बंदी घालणे जस्टिफाइड वाटते.

रमताराम Tue, 25/02/2014 - 16:00

In reply to by नितिन थत्ते

अगदी सहमत. संजीवकुमारचा रोल कोणत्याही अंगाने फिरोज गांधींचा नव्हता. चित्रपटातला पती हा सामान्य कुवतीचा, एक सुरक्षित, बंदिस्त, आखल्या रेघेवरचे आयुष्य जगू इच्छिणारा माणूस आहे, आपल्या पत्नीनेही तेच आयुष्य स्वीकारून धकाधकीच्या आयुष्याचा त्याग करावा अशी त्याची अपेक्षा आहे. त्याचे तिच्यावर निस्सीम प्रेम असले तरी तो सर्वार्थाने तिच्याहून दुबळा आहे. याउलट फिरोज गांधी हे उत्कृष्ट संसदपटू होते. एक अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. खुद्द नेहरुंचे विरोधक आणि अनेक भारतातील भ्रष्टाचाराचे आद्य विसलब्लोअर असा त्यांचा लौकिक होता. यासाठी त्यांनी प्रसंगी काँग्रेस पक्षाशीच नव्हे तर आपल्या पारसी समाजाशीदेखील वैर ओढवून घेतले होते. लोकसभेत ते स्वतंत्र पक्षाचे खासदार म्हणूनही निवडून गेले होते.

तेव्हा ही भूमिका फिरोज गांधी यांच्यावर बेतली आहे हे म्हणणे हास्यास्पद आहे. ती भूमिका पारंपारिक भारतीय मनाच्या पतीच्या स्वरूपात मांडून गुलजारजींनी त्यांच्यातील मतभेदाला नेमके परिमाण दिले आहे इतकेच अन्यथा तात्विक, वैचारिक पातळीवरचे मतभेद असणारे पती-पत्नी दाखवणे, प्रेक्षकांच्या मनात पोचवणे आपल्या सिनेचाहत्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार करता अवघड झाले असते.

नितिन थत्ते Wed, 26/02/2014 - 10:10

In reply to by फारएण्ड

जिवंत (आणि आपल्या क्षेत्रात अजूनही कार्यरत) असलेल्या व्यक्तीविषयी* त्या व्यक्तीच्या कारकीर्दीला घातक असलेले गैरसमज पसरू शकतात.

उदा. संजीवकुमार हा राजकारणाशी कसलाच संबंध नसलेली व्यक्ती दाखवली आहे. प्रत्यक्षात फिरोज गांधी हे राजकारणात संपूर्ण सक्रीय होते. आणि दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले होते.

*जर निर्मात्यांनी तसा क्लेम केला असेल तर बंदी जस्टिफाइड असू शकते असे म्हणणे आहे.

फारएण्ड Wed, 26/02/2014 - 11:46

In reply to by नितिन थत्ते

जिवंत व कार्यरत व्यक्तीवर चित्रपट काढू नये असा काही कायदा किंवा संकेत आहे काय? हे खरेच विचारतोय, खोचकपणे वगैरे नाही. सरकारने बंदी घातली तर काहीतरी कायद्याचा संदर्भ दिला असेलच (जरी आणीबाणीत घातली होती). कदाचित लिखित कायदा नसेल पण सहसा पाळला जाणारा संकेत असेल. मला कल्पना नाही.

घातक गैरसमज पसरवणारे चित्रपट काढू नयेत हे मान्य आहेच, पण बंदी घालणेही बरोबर वाटत नाही. उलट जिवंत व्यक्ती सहज खंडन करू शकते चुकीच्या गोष्टींचे.

मन Tue, 25/02/2014 - 16:22

चित्रपट इंदिरांबद्दल नाहिच. तो बनवला आहे कुणा बिहारी राजकारणी स्त्रीबद्दल; नाव विसरलो.
रिलिजपूर्व प्रसिद्धी गिमिक म्हणून अल्लाद अल्लद इंदिरांचा संबंध सूचित केला गेला.
जसे रामूचा "सरकार" बाळासाहेबांबद्दल आहे अशी अफवा होती,
रामूचाच "सरकार २ " राज ठाकरेंबद्दल आहे अशी कंडी पिकवण्यात आली व
प्रकाश झा ह्याचा " राजनीती" सोनियांबद्दल आहे असं भासवण्यात आलं, तसं ते प्रसिद्धीतंत्र मुद्दाम केलं गेलं असावं.
मागाहून चित्र स्पष्ट झालच.
आता असे करणे चूक की बरोबर, हा मुद्दा वेगळा आहे.
(मला ते चूक वाटते.)

मिसळपाव Tue, 25/02/2014 - 16:51

असं बघा, मी जर उद्या तुम्हाला "दोन विरही जिवांमधल्या उत्कट/हळूवार भावना उलगडून दाखवणारा हा चित्रपट बघाच" असं सांगून अमिताभ-जयाचा शोले बघायला सांगितला तर तुमची काय प्रतिक्रिया होईल?. तसंच काहिसं झालंय इथं.

....हा सिनेमा इंदिरा-फिरोज नात्यावर व त्यातील तणावांवर आधारलेला आहे हे सर्वश्रुत आहे....

हे वाक्य खरं म्हणजे

....हा सिनेमा इंदिरा-फिरोज नात्यावर व त्यातील तणावांवर आधारलेला आहे हे हा समज सर्वश्रुत आहे....

असं हवं. गाणी उत्तम आहेत आणि संजीव कुमारचा अभिनय चपखल आहे म्हणालात त्यात सगळं आलं.

बरं ते जाउंदे. अप्रतिम गाणी आणि सुरेख कथा दोन्ही (एकाच चित्रपटात!) अनुभवायची असली तर 'ईजाझत' बघा. विशेषतः गाण्याचे शब्द कथेला अनुरूप असल्याचं उत्तम उदाहरण. (मला कल्पना आहे हे थोडं अवांतर होतंय. भजनाला मंडळी जमावीत आणि "बुवांचा बागेश्री एकदा ऐकाच तुम्ही" म्हंटल्यासारखं ! पण अगदिच सिंफनीचा संदर्भ देत नाहीये तोपर्यंत चालावं मला वाटतं)

'न'वी बाजू Tue, 25/02/2014 - 18:21

In reply to by मिसळपाव

('आँधी' पाहिलेला नाही, पण...)

असं बघा, मी जर उद्या तुम्हाला "दोन विरही जिवांमधल्या उत्कट/हळूवार भावना उलगडून दाखवणारा हा चित्रपट बघाच" असं सांगून अमिताभ-जयाचा शोले बघायला सांगितला तर तुमची काय प्रतिक्रिया होईल?.

या वाक्याबद्दल --/\--.

(अवांतर: 'शोले' ('अमिताभ-जया'चा) पाहिलेला आहे. (अतिअवांतरः कितीदा, हे सांगणे कठीण आहे.) म्हणूनच ही दाद.)

मुक्ता_आत्ता Tue, 25/02/2014 - 21:32

In reply to by मिसळपाव

प्रतिक्रिया दुसऱ्याच व्यक्तीला का दिल्या जात आहेत? काहीतरी सोलिड घोळ झालाय.

मुक्ता_आत्ता Tue, 25/02/2014 - 21:33

In reply to by मिसळपाव

..तो केवळ एक समज नाहीये. कृपया माझी स्वतंत्र प्रतिक्रिया पहावी. खाली कुठेतरी असेल. बाय द वे 'इजाजत' पाहिलेला आहे. अतिशय आवडला होता. *** ही प्रतिक्रीया 'मिसळपाव'साठी आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 25/02/2014 - 21:57

In reply to by मुक्ता_आत्ता

ही प्रतिक्रिया अवांतर आहे, पण मुक्ता मन्दार आणि इतर कोणाला हाच प्रश्न पडला असेल तर सुटेल म्हणून इथेच लिहीते आहे.

धाग्याखाली प्रतिक्रियांची संरचना ठरवणारे काही पर्याय आहेत. त्यात Display:Threaded असं ठेवलं की प्रतिक्रिया ज्या प्रतिक्रियांना म्हणून दिलेली असेल तिथे तिरकी दिसेल. तसंच, आपल्या प्रतिक्रियेला कोणी उत्तर देत नाही, (तिरकी प्रतिक्रिया) तोपर्यंत ती संपादितही करता येईल.

नगरीनिरंजन Tue, 25/02/2014 - 16:53

मला आवडला ब्वा कारण मी तो चित्रपट म्हणून पाहिला चरित्रपट म्हणून नाही. :-)
तो इंदिरा गांधींच्या आयुष्यावर आधारित आहे यावर पाहायच्या आधीही कधीच विश्वास बसला नव्हता.

मन Tue, 25/02/2014 - 16:57

ननि व मिसळपाव ह्यांनी माझा प्रतिसाद न वाचताच प्रतिसाद दिलेत काय?

नगरीनिरंजन Tue, 25/02/2014 - 19:39

In reply to by मन

प्रतिसाद वाचला आणि ती माहिती नवीन आहे. पण त्याआधीही कधी विश्वास बसला नाही असे म्हणायचे होते. इंदिरा गांधींच्या (किंवा त्याच तोडीच्या नेत्याच्या) आयुष्यावर प्रचारकी नसलेला आणि उत्तम गाणी व हळुवार प्रसंग असलेला चित्रपट भारतात तरी बनू शकत नाही असे काहीतरी डोक्यात फिट्ट आहे.

घनु Tue, 25/02/2014 - 17:20

तो कोणाच्या आयुष्यावर बनवला आहे ते माहित नाही (आणि जाणून घेण्यात रसही नाही) पण सिनेमा आवडला, छान आहे. तुमच्या दोन मुद्द्यांशी सहमत
१. संजीव कुमार ह्यांचा अभिनय अतिअति उच्च दर्जाचा आणि उत्कृष्ट - हे.वे.सां.न.ला.
२. सुचित्रा सेन ह्यांच्या अभिनयाचं जे काही कौतुक केलं जातं त्यामानाने मला तरी ह्या सिनेमा मधे तसं काही जाणवलं नाही. खुपच नाटकी अभिनय वाटला मला. सुचित्रा सेन चा केवळ हाच सिनेमा पाहिला असल्याने आवरतं घेतो. पण त्यांच्या ऐवजी अभिनयाच्या दृष्टीने त्या काळातल्या शर्मिला, स्मिता, शबाना, जया (जया कदाचित उंची मुळे राजनैतिक हस्ती म्हणून जास्त प्रभावी वाटली नसती) ह्यांनी ही भुमिका जास्त उत्तम वठवली असती असे वाटून गेले.

सन्जोप राव Tue, 25/02/2014 - 18:28

कुसुमाग्रजांच्या लिखाणात की बोलण्यात 'व्हेन स्मॉल पीपल बिगिन टु कास्ट लाँग शॅडोज, इट इज टाईम फॉर दी सन टु सेट' असे वाचले होते. गुलजार, सुचित्रा सेन यांच्याबाबत असे 'डिसमिसिव्ह' शैलीत लिहिलेले वाचून ते आठवले. येशूचे एक प्रसिद्ध वाक्यही आठवले.
आता कुसुमाग्रज कोण? ते काही मला खास लेखक / कवी वगैरे वाटले नाहीत बुवा. नटसम्राट तर प्रचंड पोशाखी आणि नाटकी होते.... असले काही आले तर नवल वाटणार नाही.

तिरशिंगराव Tue, 25/02/2014 - 19:49

थत्ते आणि रमताराम यांच्याशी सहमत. सुचित्रा सेन यांचा त्या चित्रपटातील अभिनय सर्वोत्कृष्ट नव्हता, त्यांचा चांगला अभिनय बघायचा असेल तर जुना देवदास बघावा म्हणजे त्यांनी उभी केलेली 'पारु' स्मरणांत राहील.
आँधी बद्दलच बोलायचे तर त्यातील गाणी, संवाद, अभिनय हे सर्वच त्यावेळी खूप आवडले होते. अर्थातच, इंदिरा गांधी-फिरोज हा चष्मा न लावता हा चित्रपट पाहिला होता.
त्याकाळचे बरे सिनेमेही त्यांत 'लुंगी डान्स' टाइप प्रकार नसल्यामुळे जास्त आवडायचे.

मनीषा Tue, 25/02/2014 - 20:17

ऑधी सिनेमा मला आवडला होता. आणि त्यातली गाणी तर खूपच श्रवणीय आहेत.

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. इंदिरा गांधीं चे काही साम्य आढळत नाही हे खरं आहे.

मला वाटते साम्यं, म्हणजे दिसण्याचे साम्यं किंवा त्यांच्या चरित्रातील तंतोतंत घटनाक्रम असा अर्थं नसेल बहुदा.

एक राजकीय महत्वाकांक्षी असलेली स्त्री ... तिचे आयुष्यं, संघर्षं आणि तिने केलेला अथवा तिला करायला लागलेला त्याग या बाबतचे साम्यं अभिप्रेत असावे.

या चित्रपटातील "तुम आ गये हो, नूर आ गया है.." आणि "तेरे बिना जिंदगीसे शिकवा .." या गीतातील दोघांचा (संजीव कुमार आणि सुचित्रा सेन) अभिनय किती संयत आणि तरीही बोलका वाटतो.

मुक्ता_आत्ता Tue, 25/02/2014 - 21:18

ही प्रतिक्रिया त्या सर्वांसाठी आहे ज्यांना हा सिनेमा इंदिरा-फिरोज यांना डोक्यात ठेऊन बनवला होता याबद्दल शंका/संभ्रम आहे: कृपया या सिनेमाचे 'विकीपेडिया पेज' वाचा. इंदिरा गांधींच्या सत्ताकालात या सिनेमावर बंदी आणली होती. पण सिनेमा रिलीज होतेवेळी आणि इंदिरा यांचा पराभव होऊन सिनेमावरची बंदी उठवली गेल्यानंतरही गुलजार यांचं असंच म्हणणं आहे की त्यांनी हा चित्रपट याच जोडप्याला केंद्र स्थानी ठेऊन केला होता. ..आता तुम्हाला खुद्द सिनेमा तयार करणाऱ्या माणसापेक्षा काही वेगळं म्हणायचं असेल तर गोष्ट वेगळी! धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 25/02/2014 - 22:01

In reply to by मुक्ता_आत्ता

तसं असेल तर गुलजार यांच्या डोक्यात फिरोज गांधीची भलतीच वेडीवाकडी प्रतिमा होती. इंदिरा-फिरोज नात्यात कडवटपणा आल्यानंतरही इंदिरा गांधींना फिरोज यांचा नातेबाह्य राग नव्हता. आणि गुलजार यांनी फिरोज यांच्या काल्पनिक व्यक्तिरेखेला फारच सामान्य बनवण्याचा राग आल्यामुळे इंदिरा गांधींनी चित्रपटावर बंदी आणली.

(पुपुल जयकर यांनी लिहीलेल्या इंदिरा गांधी चरित्रात फिरोज यांची व्यक्तिरेखा रमताराम यांच्या वरच्या प्रतिसादात आलेली आहे, तशीच आहे.)

मन Tue, 25/02/2014 - 22:30

In reply to by मुक्ता_आत्ता

गुगलून पाहिल्यावर विकीपेडियातील पहिलाच परिच्छेद व गुलजार दोघांच्या उद्धृतांत तारकेश्वरी सिन्हा व इंदिरा गांधी, असा दोघांचा उल्लेख असल्याचं दिसलं.
मूळ गुल्जारची मुलाखत पाहिली नाही.

फारएण्ड Wed, 26/02/2014 - 05:34

In reply to by मुक्ता_आत्ता

विकीवरचे पान वाचले. गुलजार यांनी इंदिरा गांधींच्या पर्सनॅलिटी सारखी व्यक्तिरेखा दिली होती असे दिसते, त्यांच्या जीवनावर आधारित नव्हे. हे विकीवरचेच वाक्य
Gulzar said the film had no semblance with the personal life of then Prime Minister, Indira Gandhi. He wanted to make film about modern Indian politician, and so he modeled the character on Indira Gandhi and to some extent on noted parliamentarian from Bihar, Tarkeshwari Sinha. [1]

मात्र आताही जर या सिनेमाची जाहिरात त्यांच्या जीवनावरचा चित्रपट म्हणून होत असेल तर ते चुकीचे आहे.

राजन बापट Tue, 25/02/2014 - 21:29

मुद्दा एकंदरीत काही काळ जुन्या असलेल्या कलाकृती - विशेषतः सिनेमे - नव्या काळात कसे दिसतात असा दिसतो आहे. "डेटींग एलिगंटली" असा एक वाक्प्रचार इथे आठवतो. तो व्यक्तींइतकाच कलाकृतींनाही लागू होत असावा.

फारएण्ड Wed, 26/02/2014 - 05:37

In reply to by राजन बापट

मात्र त्यात "वेळच्या वेळी" त्या कलाकृती पाहणार्‍यांना व तसे न पाहणार्‍यांना ते वेगळे दिसतात, हा ही एक भाग आहे. उदा: अमर अकबर अँथनी जेव्हा रिलीज झाला तेव्हापासून अनेक वेळा पाहणार्‍याला त्याची जी मजा आत्ता पाहतानाही येते ती तो आता पहिल्यांदाच पाहणार्‍याला कदाचित येणार नाही. मी 'अंदाज अपना अपना' हा जेव्हा रिलीज झाला तेव्हा पाहिला नव्हता. नंतर अनेक वर्षांनी पाहिला. त्यामुळे त्याचा जो कल्ट आहे त्यांना तो जसा आवडतो तेवढा मला आवडत नाही.

राजन बापट Wed, 26/02/2014 - 08:07

In reply to by फारएण्ड

एखाद्या कलाकार/लेखक/दिग्दर्शकाच्या कारकीर्दीकडे मागे वळून पहाताना त्याने/तिने अमुक एका कामात अमुक चांगलं केलंय, अमुक गोष्ट जमली आहे अशी चर्चा होते. गुलजारच्या बाबत तर हे होतंच. गाण्याचे शब्द, आरडी/लता/आशा/किशोरच्या जमून आलेल्या समीकरणामुळे चिरस्मरणीय झालेली गाणी हे सर्वात आधी येतं. "आनंद" सारख्या सिनेमातले संवाद येतात नि मग कुठेतरी दिग्दर्शक येतो. त्याची कुठली एक फ्रेम दीर्घकाल स्मरणात राहिली असेल का याची शंका येते.

विशेषकरून जेंडर रोल्सच्याबाबत गुलजार फारच पोलिटिकली इनकरेक्ट ठरतो. त्याच्या नायिका वर्षानुवर्षं वाट काय पहातात आणि इतरही काय काय. असो.

एकंदरीतच तात्कालिक लोकप्रियता किंवा अगदी तत्कालीन समीक्षकांची वाहवा जरी मिळाली तरी काळ हा खानेसुमारी घेत असतो आणि एखाद्या मोठ्या पटावर ती ती कलाकृती किती उठून दिसते हा प्रश्न रहातोच. "आँधी"च्या तुलनेत "इजाज़त" या सिनेमाचा उल्लेख इथे आलेला आहे तो या बाबत यथार्थ वाटतो. आँधी प्रमाणे इजाज़त मधली गाणीही उत्त्तमच होती; पण गाणी वजा केल्यानंतरही अनेकांना इजाज़त सिनेमा अर्थपूर्ण किंवा काव्यात्म वाटतो. आँधीचं तसं दिसत नाही. माझ्या मते गुलजारच्या जमून आलेल्या पटकथा-संवादाबरोबरच, अशोक मेहता यांची सिनेमॅटोग्राफी सुद्धा या सिनेमाला दशकानुदशकांनंतर ताजी ठेवायला कारणीभूत ठरली.

त्यामुळे, एखादी कलाकृती, एखादा कलाकार जरी आवडत असला तरी त्याचं सर्वच आवडणार नाही आणि विशेषकरून त्याच्या जुन्या कृती अनुभवताना चिरस्थायी मूल्यांपेक्षा स्मरणरंजन अधिक कारणीभूत ठरू शकतं. एकेका दशकाचा "रिट्रॉस्पेस्क्टीव्ह" घेताना, बर्‍याच गोष्टी वजा होतात. ठराविक गोष्टीच नोंद ठेवण्यासारख्या रहातात.

सन्जोप राव Wed, 26/02/2014 - 12:47

In reply to by राजन बापट

हा ज्याच्या त्याच्या अभिरुचीचा, आवडीनिवडीचाही प्रश्न आहे.वर्षानुवर्षे वाट पहाणार्‍या गुलजारच्या नायिका पोलिटिकली इनकरेक्ट असतील तर मग लांबून भयंकर उच्च प्रेम करणार्‍या शरदबाबूंच्या नायिकांना तर मंडपाबाहेर उष्ट्या पत्रावळींसाठीचीही जागा द्यायला नको. सेल्फ डिस्ट्रक्शन मध्ये एका पिढीची वाट लावणार्‍या देवदासला तर खांबाला बांधून खळ्ळ फट्यक फटके द्यायला हवेत. खांडेकरांचे आदर्शवादी नायक-नायिका पायपुसण्यासारखे वाटायला हवेत. एवढेच काय तर उदकाचिया आर्ति मधली बोकिलांच्या नायिकेलाही फारफार तर 'काठावर पास' असे म्हणता येईल.
असे न्यायाधिशाच्या खुर्चीत बसून बोलणे -किंबहुना स्वतःच्या खुर्चीलाच न्यायाधिशाची खुर्ची करणे- फार सोपे असते. आंधी मधल्या गाण्याचे शब्द, आरडी/लता/आशा/किशोरच्या जमून आलेल्या समीकरणामुळे चिरस्मरणीय झालेली गाणी हेच आंधीचे बलस्थान आहे असे म्हणणे म्हणजे उत्तम खानावळीत जेवायला जाऊन वाढप्याच्या धोतराची करवतकाठी किनार लखलखलखीत होती याचे कौतुक करण्यासारखे आहे. 'आंधी' हा गुलजारच्या सर्वश्रेष्ठ चित्रपटांपैकी का आहे,'आंधी' मधली गाणी सोडूनही 'आंधी'त बघण्यासारखे, लक्षात ठेवण्यासारखे काय आहे यावर एक मोठा लेख लिहिता येईल - अगदी स्मरणरंजन टाळूनही. पण तूर्त एखाद्या खोलीत सडका उंदीर आहे म्हटल्यावर तिथून निघून जाणे हा पलायनवाद असला तर असो बापडा, हे धोरण असल्यामुळे लेखनसीमा.

ऋषिकेश Wed, 26/02/2014 - 13:09

In reply to by सन्जोप राव

>>'आंधी'त बघण्यासारखे, लक्षात ठेवण्यासारखे काय आहे यावर एक मोठा लेख लिहिता येईल

प्रकटः अरेच्या! आम्हाला कसे नाही दिसले?
स्वगतः त्यासाठी चित्रपट पूर्णपहावा लागतो मिष्टर!
प्रकट: असेल ब्वॉ! मला तर जांभया आवरत नव्हत्या. नुसत्या गाण्यांसाठी अख्खा चित्रपट पाहणे शिक्षा वाटली.
स्वगतः शेवटी तुझी समज, जाण वगैरे ती केवढीशी, तुला काय समजणार या थोरामोठ्यांच्या लै भारी रचना
प्रकटः हं असेल ब्वॉ! गप्पच बसणे योग्य!

प्रतिसादः रावसाहेब, हे बघण्यासारखे काय आहे त्यावर लेख खरोखरच येऊ दे. किमान नवी दृष्टी लाभण्याची शक्यता निर्माण होईल!

तिरशिंगराव Wed, 26/02/2014 - 15:46

In reply to by सन्जोप राव

पण तूर्त एखाद्या खोलीत सडका उंदीर आहे म्हटल्यावर तिथून निघून जाणे हा पलायनवाद असला तर असो बापडा, हे धोरण असल्यामुळे लेखनसीमा.

विसुनाना Thu, 27/02/2014 - 11:39

तो इंदिरा-फिरोज यांच्यावरचा चित्रपट नाही हे तर स्पष्टच आहे. कदाचित दिग्दर्शकाने महत्त्वाकांक्षी राजकारणी स्त्री म्हणून इंदिरेचे-तारकेश्वरी सिन्हांचे काही अंश उचलले असतील फारतर.

शिवाय एक राजकीयदृष्टया महत्वाकांक्षी पत्नी आणि तिच्या आकांक्षेमुळे व्यथित झालेला, राजकारणात अजिबात रस नसलेला, आपले प्रेमाचे दिवस न विसरलेला इगोस्टिक पती' या नात्यातला संघर्ष >>>>>>> असेही या चित्रपटाबाबत म्हणता येणार नाही.

नात्यातला तो संघर्ष ओसरून गेल्यानंतर घडलेल्या घटनांचा हा पट आहे असे माझे मत आहे. उलट त्या दोघांनाही आपापले इगो त्याक्षणी सोडून एकत्र यावे वाटते. पण मग त्यांच्या परिस्थितीने त्यांना जखडले आहे. संघर्ष असलाच तर उत्कट प्रेम विरुद्ध परिस्थिती असा आहे. जणू एक बडा ख्याल असलेला , एक गहरा ठहराव असलेला काव्यात्म चित्रपट आहे. मला हा चित्रपट अत्यंत आवडलेला आहे. तो पुन्हा-पुन्हा बघताना त्यातली मजा आणखी वाढत जाते. (कदाचित वयाची एक मर्यादा ओलांडल्यानंतर त्यातली गंमत-जर्म कळत असावी.)

विवेक पटाईत Sat, 01/03/2014 - 20:12

आणीबाणीत सिनेमा वर बंदी घातल्या मुळे गैर समाज निर्माण झाले. शिवाय सिनेमा बर्यापैकी पाहण्यासारखा होता. गाणे चांगले चालले होते.