Skip to main content

बेख्डेल टेस्ट

हा बेख्डेल टेस्टचा दुवा. एखाद्या कलाकृतीतलं स्त्रियाचं चित्रण पुरेसं स्वतंत्र - व्यापक आहे का, हे तपासण्यासाठी ही चाचणी वापरतात. तिला असलेल्या आक्षेपांबद्दलची ही चर्चा आहे.

***

अशा प्रकारच्या चाचण्या टोकाचे निकष वापरतात, असं समर्थन वर केलं आहे. ते ठीकच. चाचण्या नक्की कशा प्रकारे तयार केल्या जातात, त्या तशा असाव्यात की नसाव्यात याबद्दल मला काही मत नाही. तो शास्त्रातल्या तज्ज्ञांचा विषय आहे.

पण या चाचणीमध्ये असं अध्याहृत आहे की, दोन स्त्रिया एकत्र आल्यानंतर हमखास पुरुषांबद्दलच बोलतात, ज्याला माझा आक्षेप आहे. दुसरं म्हणजे अशा प्रकारची चाचणी फक्त स्त्रीव्यक्तिरेखांकरता अस्तित्वात असावी, हा तपशील बोलका आहे. (अशी चाचणी पुरुष व्यक्तिरेखांसाठी उपलब्ध आहे का? असल्यास माझी चूक सुधारा.) बरं, असली तर असली. ही चाचणी समलिंगी संबंध ठेवणार्‍या स्त्रियांसाठी निरुपयोगी आहे. त्याचं काय करणार?

पुरुषाशिवाय आयुष्य असायला पाहिजे हा काय अट्टाहास पण? पुरुष मानवजातीचा भाग आहेत, तर ते असणारच ना आयुष्यात? इथे काय स्त्रीराज्य आणायचंय का कुणाला?

अतिअवांतरः असंही शक्य आहे की मी या फडतूस चाचणीला फुकटचं महत्त्व देतेय!

(संपादक : एका वेगळ्या धाग्यात ह्या प्रतिसादामुळे सुरू झालेली चर्चा वेगळी काढण्यात आली आहे.)

ऋषिकेश Mon, 10/03/2014 - 17:27

तसं नव्हे, या टेस्टनुसार आधी चित्रपटात स्त्रीयांना दाखवलंच कमी ज्कातं. एक 'नाव' व भुमिका असणारी स्त्रीपात्र कमी असतात, व असलीच तर ती एकमेकांशी दोन पुरूष पात्र विविध विषयांवर जशी बोलतात किंवा वास्तवात दोन स्त्रिया जसं एकमेकांशी बोलतात तसं बोलताना दाखवलं जात नाही.

चिंतातुर जंतू Mon, 10/03/2014 - 17:34

>> पुरुषाशिवाय आयुष्य असायला पाहिजे हा काय अट्टाहास पण? पुरुष मानवजातीचा भाग आहेत, तर ते असणारच ना आयुष्यात? इथे काय स्त्रीराज्य आणायचंय का कुणाला?

स्त्रियांचं चित्रण किती स्टीरिओटिपिकल आहे ते जोखण्यासाठी ती टेस्ट वापरता येईल. म्हणजे दोन स्त्री व्यक्तिरेखांना पुरेशी आयडेंतिटी आहे का, आणि त्या परस्परांत किती व्यापक विषयांवर बोलताना दाखवलंय ह्यावरून ते चित्रण किती स्टीरिओटिपिकल आहे ते ठरवायचं असं काहीसं ते तर्कशास्त्र दिसतंय.

मेघना भुस्कुटे Mon, 10/03/2014 - 17:43

In reply to by चिंतातुर जंतू

स्त्रीचित्रण 'पुरेसं' व्यापक आहे का ते ठरवायला 'पुरुष आहेत का नाहीयेत संदर्भाला' ते जोखून पाहायचं? हुड.

हे म्हणजे हिंदू परंपरांचा निषेध करायला म्हणून शुभप्रसंगी तेराव्याचा खास स्वैपाक रांधण्यासारखं झालं. किंवा मुद्दामहून एकादशीला मटण चापण्यासारखं. मोडायला म्हणून तरी संकेत उधार कशाला घ्यावेत?

पुरुष हा काय निकष आहे का? काहीही.

बॅटमॅन Mon, 10/03/2014 - 17:49

In reply to by मेघना भुस्कुटे

हे म्हणजे हिंदू परंपरांचा निषेध करायला म्हणून शुभप्रसंगी तेराव्याचा खास स्वैपाक रांधण्यासारखं झालं. किंवा मुद्दामहून एकादशीला मटण चापण्यासारखं. मोडायला म्हणून तरी संकेत उधार कशाला घ्यावेत?

शांता शेळक्यांनी उल्लेखिलेला एक प्रसंग आठवला, पुस्तकाचे नाव इसरलो. त्यांची एक मय्त्रिण एकदा त्यांना म्हणाली, मी कै एकादशीबिकादशी मानत नै, उलट तेव्हा मुद्दामहून मटन खाते. शांता शेळके इतकंच म्हणाल्या, की मी एकादशी पाळते, पण न झालं तर जास्ती लोडही घेत नै. इथे तर तूच माझ्यापेक्षा जास्त आग्रहाने एकादशी लक्षात ठेवतेस =)) त्यातली गत आहे ही.

पुरुष हा काय निकष आहे का? काहीही.

वरची वाक्येही जबराट आहेतच, पण हे वाक्य अतिशयच आवडलं. एक आंध्रा थाळी तुला माझ्याकडून लागू.

'न'वी बाजू Tue, 11/03/2014 - 15:48

In reply to by बॅटमॅन

वरची वाक्येही जबराट आहेतच, पण हे वाक्य अतिशयच आवडलं. एक आंध्रा थाळी तुला माझ्याकडून लागू.

पुरुष हा काय निकष आहे का? काहीही.

मी Mon, 10/03/2014 - 17:55

In reply to by मेघना भुस्कुटे

>>स्त्रीचित्रण 'पुरेसं' व्यापक आहे का ते ठरवायला 'पुरुष आहेत का नाहीयेत संदर्भाला' ते जोखून पाहायचं? हुड.

According to Neda Ulaby, the test still resonates because "it articulates something often missing in popular culture: not the number of women we see on screen, but the depth of their stories, and the range of their concerns.

हे मला थोडंफार पटतयं, पुरुष हा तीनतला एक निकष आहे व त्याचे कारण स्पष्ट आहे. नाही?

मी Mon, 10/03/2014 - 17:59

In reply to by मेघना भुस्कुटे

दुव्याप्रमाणे -

What is now known as the Bechdel test was introduced in Alison Bechdel's comic strip Dykes to Watch Out For. In a 1985 strip titled "The Rule",[12][13] an unnamed female character says that she only watches a movie if it satisfies the following requirements:
१. It has to have at least two women in it,
२. who talk to each other,
३. about something besides a man.[13][14]

चिंतातुर जंतू Mon, 10/03/2014 - 17:59

In reply to by मेघना भुस्कुटे

>> मोडायला म्हणून तरी संकेत उधार कशाला घ्यावेत?
पुरुष हा काय निकष आहे का? काहीही.

व्हर्जिनिआ वूल्फच्या शब्दांत -

But almost without exception they are shown in their relation to men. It was strange to think that all the great women of fiction were, until Jane Austen's day, not only seen by the other sex, but seen only in relation to the other sex. And how small a part of a woman’s life is that.

- A Room of One's Own (१९२९)

म्हणजे हा संकेत उधार घेण्याचा प्रकार म्हणता येणार नाही बहुतेक, तर असलेले संकेत तपासण्याचा किंवा त्यांविषयी शंका उपस्थित करण्याचा म्हणता यावा.

मेघना भुस्कुटे Mon, 10/03/2014 - 18:14

In reply to by चिंतातुर जंतू

उदाहरण चुकलं असेल. मला म्हणायचंय ते असं - नाती हा माणसाच्या आयुष्याचा एक भाग असतो. कोणत्याही स्त्री व्यक्तिरेखेचं चित्रण करताना नाती येणारच ना? ही स्त्री ५० टक्क्याहून जास्त वेळा स्ट्रेट असणार आणि परिणामी पुरुष असणारच. ती स्त्री स्ट्रेट नाही, असं गृहित धरलं, तरीही बाप, भाऊ, मित्र, मुलगा, सहकारी यांपैकी कुणीतरी पुरुष असणार. असू द्यावा. त्याला इतकं महत्त्व देण्याचं काय कारण?

गौरी देशपांडेच्या साहित्यातल्या नायिकांवरही बरेचदा हा आक्षेप घेतला जातो - की त्यांच्या आयुष्यात पुरुष महत्त्वाची भूमिका बजावतात. हो, बजावतात. मग? त्यानं त्या विशिष्ट स्त्रीचं स्वातंत्र्य / खंबीरपणा / संपूर्णत्व धोक्यात येतं काय लगेच? पुरुष म्हणजे काय कुणी विषाणू नाहीत ना इतक्या साक्षेपानं टाळायला?

मला ही टेस्ट पुरुषांना अनाठायी महत्त्व देणारी वाटली.

चिंतातुर जंतू Mon, 10/03/2014 - 18:17

In reply to by मेघना भुस्कुटे

>> मला ही टेस्ट पुरुषांना अनाठायी महत्त्व देणारी वाटली.

टेस्ट पुरुषांना अनाठायी महत्त्व देतेय की (वर दिलेल्या वूल्फच्या उद्धृतानुसार) कथनात्मक कलाप्रकार स्त्रियांच्या विश्वात पुरुषांना फार महत्त्व असल्याचं दाखवतात?

अनुप ढेरे Mon, 10/03/2014 - 18:20

In reply to by मेघना भुस्कुटे

कोणत्याही स्त्री व्यक्तिरेखेचं चित्रण करताना नाती येणारच ना?

पुरुष नाती येऊच नयेत अशी चाचणी नाहिये. चाचणी फक्त एवढीच आहे की २ स्त्री पात्रं, पूर्ण चित्रपटात एकमेकींशी थोडी वाक्य तरी 'पुरुष' या विषयाला न धरता बोलतात का?

आबा Mon, 10/03/2014 - 18:59

In reply to by मेघना भुस्कुटे

:) ऊदाहरण भारी आहे, पण

सहसा कोणतीही मानसशास्त्रीय "टेस्ट" अशी टोकाची परिस्थीती गृहीत धरूनच करतात* !
एखाद्याने ठरवलं तर क्वांटीफाय करता येईल (की आधीच केलंय माहीत नाही)

* उदा.
१) निर्णयप्रक्रीया समजण्यासाठीची ट्रॉली टेस्ट
२) डिस्गस्ट (किळस) प्रोफायलिंग साठीची टेस्ट

अनुप ढेरे Mon, 10/03/2014 - 23:03

In reply to by आबा

चाचणी टोकाची आहे असं नाही वाटत. शेकडो चित्रपटात एखादी स्त्री दुसर्‍या स्त्रीशी 'पुरुष' हा विषय सोडून काहीच बोलत नाही असं असणं टोकाचं आहे.
दुसर्‍या बाजूनी विचार करू. चित्रपटांमध्ये दोन पुरुष एकमेकांशी 'स्त्री' हा विषय सोडून बोलताना दिसतात का? तर हो. म तो विषय काहीही असेल. राजकारण, भांडण, मारामार्‍या, गरीब-श्रीमंत अन्याय, खेळ, संगीत वाट्टेल त्या विषयांवर बोलताना, थोडा का वेळ होइना, दिसतील. जर पुरुषाचं चित्रिकरण वास्तववादी१,२ असू शकतं तर स्त्रीयांचं का नसावं?

१- वास्तवात दोघही एक्मेकांच्या मित्र/मैत्रिणींशी विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीसंबंधांना सोडून कधीतरी बोलतात म्हणून वास्तववादी म्हटलं.
२- चित्रपट वास्तववादी असावाच का हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे.

आबा Tue, 11/03/2014 - 04:16

In reply to by अनुप ढेरे

तो उपप्रतिसाद मेघना यांना दिला होता
इथे कसा आला कोणास ठाऊक
आणि त्यात म्हणायच असं आहे की,

जेंडर बायस ठरवण्यासाठीच्या चाचणीमध्ये
"दोन स्त्रीया पुरुषांविषयी बोलतात का?" हा निकष वापरला जातो...
एकही संवाद पुरुषांविषयी नसेल, तर चाचणी पास, अथवा नाही,
अश्या पद्धतीने निकाल दिला जातो
हे टोकाचे निकष झाले
परंतू हेच योग्य आहेत, बर्‍याच चाचण्यांमध्ये असेच निकष वापरतात

गब्बर सिंग Tue, 11/03/2014 - 05:38

In reply to by आबा

"दोन स्त्रीया पुरुषांविषयी बोलतात का?" हा निकष वापरला जातो...

मनोबा, एक पिंक टाकतोय. रागावू नका हो.

पुरुषांबद्दल बोलण्यासारखं काय असतं ? बायका असल्या फालतू विषयावर वेळ दवडत नाहीत.
पुरुषांना उगीचच असे वाटत अस्ते की ही माझ्याबद्दल विचार करते .... अन ती माझ्याबद्दल "मैत्रिणींस सांगते तुझी अमोल योग्यता". पण तसं काहीही नस्तं.

(वरील डायलॅग हे माझ्या बायको चे प्लस तिच्या बेस्ट फ्रेंड चे आहेत. बायकोची ही बेस्ट फ्रेंड कराटे ब्लॅक बेल्ट आहे व स्वत:चा रिटेल डिस्ट्रिब्युशन्चा व्यवसाय एकटी चालवते.)

Nile Tue, 11/03/2014 - 06:11

पुरुषाशिवाय आयुष्य असायला पाहिजे हा काय अट्टाहास पण? पुरुष मानवजातीचा भाग आहेत, तर ते असणारच ना आयुष्यात? इथे काय स्त्रीराज्य आणायचंय का कुणाला?

मला वाटतं, मुद्दा असा आहे की, दोन स्त्रीयांना पुरुषांशी निगडीत बोलताना दाखवणे हा एकप्रकारे स्टीरीओटाईप झाला. जसं हायस्कूल कॉमेडी असेल तर तिच्यात एक ठराविक सूत्र असतं तसंच. (अशी नेहमीची सुत्रं वापरली की कलाकृतीत कल्पकपणा राहत नाही, हा माझा आक्षेप.) थोडक्यात, दोन स्त्रिया बोलत असतील आणि त्या पुरुषांबद्दल असलेल्या आकर्षणाबद्दलच बोलत नसतील तर त्यात काहीतरी वेगळेपण आहे (काय बोलतात वगैरेंवरून ती कलाकृती काय दर्जाची हे ठरविण्याचा वाव तुम्हाला आहेच), स्टीरीओटाईपपेक्षा वेगळे पणा आहे. (हे एका प्रकारे, दोन स्त्रिया एकत्र आल्या की पुरुषांबद्दल बोलतात असे नाही, असे म्हणणे आहे.)

अर्थात, एकंदरीट टेस्ट वगैरे ठिक आहे. पण ही टेस्ट 'पास' झालं म्हणजे कोणतीही कलाकृती चांगली आहे असे कोणी समजू नये हे महत्त्वाचं. म्हणजे दोन स्त्रिया मासिकपाळीबद्दल बोलताना दाखवल्या म्हणून ती टेस्ट पास होईलही पण म्हणजे स्टिरीओटाईपिंग झालं नाही असं नाही. (अर्थात, ज्याप्रकारे दोन स्त्रियांनी पुरुषांबद्दल बोललेलं दाखवणं 'गैर' नाही, तसंच त्यांनी मासिकपाळीबद्दलही बोलणं गैर नाहीच.)

नगरीनिरंजन Tue, 11/03/2014 - 17:16

In reply to by Nile

शंभर टक्के सहमत.
शिवाय,

म्हणजे दोन स्त्रिया मासिकपाळीबद्दल बोलताना दाखवल्या म्हणून ती टेस्ट पास होईलही पण म्हणजे स्टिरीओटाईपिंग झालं नाही असं नाही.

हे तर आहेच, पण त्यातली एक स्त्री "पाळी चुकली" असे म्हणाली तर टेस्टही पास होईलच असे नाही.

राजेश घासकडवी Tue, 11/03/2014 - 17:03

ही किंवा यासारखी चाचणी म्हणजे पुरुषांना विरोध किंवा स्त्रीराज्य आणणं या टोकाच्या पद्धतीने मी पाहत नाही. फूलप्रूफ नसली तरी या चाचणीवर पास होणाऱ्या कलाकृती व न होणाऱ्या कलाकृती यांची तुलना रंजक ठरेल. मला वाटतं ९० टक्केहून अधिक कलाकृती या चाचणीवर उतरणार नाहीत. याच चाचणीत जर स्त्री बदलून पुरुष ठेवलं तर ९९ टक्केहून अधिक कलाकृती पास होतील. आकडा नक्की काय असेल हे महत्त्वाचं नाही, पण इतका प्रचंड फरक आहे हेच आपल्या स्त्री व पुरुष यांच्याबद्दलच्या अपेक्षांविषयी खूप काही सांगून जातं. स्त्रियांचा कल नात्यांवर अधिक बोलण्याकडे असू शकतो. पुरुषांचा कल नात्याव्यतिरिक्त साध्यांबद्दल बोलण्याकडे अधिक असू शकतो. पण हा कल काही मात्रांचा न ठेवता कथा-चित्रपटांमध्ये ज्या प्रमाणावर ध्रुवीकरण दिसतं ते खचितच एकांगी आहे.

काही विस्कळित नोंदी
- आम्ही होस्टेलसाठी नाटकं करायचो त्यात मुद्दाम स्त्रीपात्रविरहित नाटकं शोधायचो. आणि भरपूर सापडायची...
- मेधा पाटकरांवर अशी कथा लिहिता येईल ज्यात त्या एकच महत्त्वाचं स्त्रीपात्र आहेत कारण त्यांचा लढा पुरुषांनी भरलेल्या व्यवस्थेविषयी आहे/होता.
- ही टेस्ट सुधारता येईल हे निश्चित. सुधारण्याची गरज आहे का? बहुधा नाही, कारण या अत्यंत साध्यासोप्या चाचणीतूनच सत्याची बरीचशी कल्पना येते.

मेघना भुस्कुटे Tue, 11/03/2014 - 17:14

In reply to by राजेश घासकडवी

मला वाटतं, चाचणी फसवी आहे. या चाचणीवर 'बिनधास्त' हा चंकुचा सिनेमा तपासला तर हाती काय लागतं?

अनुप ढेरे Tue, 11/03/2014 - 17:34

In reply to by मेघना भुस्कुटे

त्यात कॉलेजच्या राजकारणावर बोलणार्‍या, नवी पिढी, संस्कार आदींवर संवाद असल्याचं स्मरतय. सो तो चित्रपट पास होईल.

मन Tue, 11/03/2014 - 17:12

अलिकडे काय पाहिलत? मध्ये कोणत्या तरी एका भागात gravity ह्या चित्रपटात सहजतेने प्रमुख पात्र स्त्री व्यक्तिरेखा दाखवणं रोचक वाटलं असं मी लिहिलं होतं.

मला वारंवार जाणवलेली गोष्ट म्हणजे कैक गोष्टी साध्या विचारानेही जाणवतात; त्या मी कशाबशा खरडतो.
पण मग ऐस्३ईवरचे विद्वान त्यासाथी आधीच उपलब्ध असलेली terminology,संज्ञा हिचा उल्लेख करतात.
उदा :- russels teapot, survivor bias, कधी स्टॉकहोम सिंड्रोम, व आता ही टेस्ट.

म्हणजे जगभरात नावाजली गेलेली उदाहरणं मला स्वतंत्रपणे सुचली होती.
पण ती ह्यापूर्वी काही मोठ्या लोकांनी म्हटली म्हणून त्यांची वाहवा.
आणि मनोबाला फार्फार तर एख्खादं "रोचक" .
बस्स. इतकच?

बॅटमॅन Tue, 11/03/2014 - 17:21

In reply to by मन

म्हणजे जगभरात नावाजली गेलेली उदाहरणं मला स्वतंत्रपणे सुचली होती.
पण ती ह्यापूर्वी काही मोठ्या लोकांनी म्हटली म्हणून त्यांची वाहवा.
आणि मनोबाला फार्फार तर एख्खादं "रोचक" .
बस्स. इतकच?

पैलेपणाचा मान हो, बाकी कैच नै. तसं तर मलाही न्यूटन, रामानुजन, आर्किमिडीस, इ. लोकांच्या काही शे/हजार वर्षांनंतर जन्माला आल्याचं दु:ख होतंच की. एखादा गणिती नियम सुचला तरी साल्यांनी सगळं अगोदर केलेलं असतंच *&%$$#!!!

मेघना भुस्कुटे Tue, 11/03/2014 - 17:33

In reply to by बॅटमॅन

नंदा खर्‍यांचं पुस्तक आहे ते. ट्युरिंगनं भारतात राहून संगणक हुडकला असता नि आजूबाजूला भारतीय लोक असते तर काय झालं असतं अशी कल्पना करून लिहिलेली गोष्ट. त्यात ट्युरिंगच्या टीममधले बरेच शिकाऊ तंत्रज्ञ बरेच गणिती शोध नव्यानं लावतात नि ते कुणीतरी आधीच लावलेत म्हणून खट्टू होतात, तेव्हा ट्युरिंग त्यांना दिलासा देतो - "वेलकम टु दी क्लब! मीपण असे कितीतरी शोध असेच नव्यानं लावलेत!"

बॅटमॅन Tue, 11/03/2014 - 17:35

In reply to by मेघना भुस्कुटे

रोचक कथा आहे खरी!

बाकी, स्वतंत्रपणे गोष्टी सुचण्याबद्दल म्हणाल तर त्याला महत्त्व असतेच-पण ते व्यक्तिसापेक्ष जास्त. कलेक्टिव्ह समाजज्ञानात ते ज्ञान अगोदर बसलं असेल तर मग तादृश महत्त्व न वाटणं क्रमप्राप्त आहे.

साहिर Tue, 11/03/2014 - 17:36

In reply to by मेघना भुस्कुटे

तंत्रज्ञ बरेच गणिती शोध नव्यानं लावतात नि ते कुणीतरी आधीच लावलेत म्हणून खट्टू होतात, तेव्हा ट्युरिंग

भारतात आणि नविन शोध? कल्पना करताना थोडेतरी तारतम्य बाळगायला हवे.

बॅटमॅन Tue, 11/03/2014 - 17:37

In reply to by साहिर

भारतात आणि नविन शोध? कल्पना करताना थोडेतरी तारतम्य बाळगायला हवे.

असे शेरे मारले म्हणून तुमचा मुद्दा बरोबर ठरत नाही. :) असो.

मन Tue, 11/03/2014 - 17:37

In reply to by मन

माल्थस वगैरेचे थेरम तर मला लै लै आधीच सुचले होते.
पण असं जाहिर बोललं तर पब्लिक "फेक्या मारुन र्‍हायलाय" म्हणू शकते म्हणून "अरे मलाही स्वतंत्रपणे सापडलं होतं ते" हे सुद्धा सागायचा संकोच वाटतो.

मेघना भुस्कुटे Tue, 11/03/2014 - 17:42

In reply to by मन

सुचू शकतं की. त्यात काय? 'बाराला दहा कमी' या अणुबॉम्बनिर्मितीचा इतिहास लिहिणार्‍या पुस्तकात लेखकद्वयानं असं नोंदलं आहे की - एका ठिकाणी काही कारणानं न लागू शकलेला शोध त्याच काळात दुसर्‍या देशाशी कोणताही संपर्क नसताना लागला, अशी परिस्थिती त्या काळात एकापेक्षा जास्त वेळा ओढवली.

तशा मलाही कितीतरी गोष्टी आधीच सुचल्या आहेत की. फक्त मी न लिहिता त्या इतर कुणीतरी लिहिल्या म्हणून माझं श्रेय गेलं. पहिलेपणा आपल्याकडे नाही म्हणताना, श्रेयही आपल्याला न मिळणं न्याय्यच. त्यानं आपलं स्वयंभू शहाणपण काय कमी होत नाही! ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/03/2014 - 18:51

In reply to by मन

ऐस्३ईवरचे हा शब्द 'ऐसीवरचे' असा असावा. या शब्दात ३ हा आकडा कसा आला याचं कोडं काही केल्या सुटत नाहीये. कधी योग्य अक्षराऐवजी शेजारचं बटण दाबलं जातं, कधी शिफ्ट बटण दाबायचं राहतं किंवा ठराविक शुद्धलेखनाच्या चुकांचे पॅटर्न्स दिसतात. पण या शब्दात ३ कसा येईल हे सुचलेलं नाही. या प्रश्नाचं उत्तर मांडताना काही मूलभूत सिद्धांत मांडता आला तर कदाचित मनोबाला फार चांगल्या श्रेणी का मिळत नाहीत याचंही उत्तर सापडेल.

आदूबाळ Tue, 11/03/2014 - 19:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

३ नंतर ee हाणला. :)

अजून थोडं (शेरलॉकहोम्सी) सैद्धांतिक पेट्रोलः
- मनोबांची बोटं जाड असावीत
- मनोबांना अनेक वर्षांचा मराठी टंकनाचा सराव आहे
- मनोबांच्या विचारांचा वेग टंकनापेक्षा जास्त आहे. (भरभर बोलतात का?)

Nile Tue, 11/03/2014 - 21:28

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ऐस्३ईवरचे हा शब्द 'ऐसीवरचे' असा असावा. या शब्दात ३ हा आकडा कसा आला याचं कोडं काही केल्या सुटत नाहीये

मन यांना त्यांच्या पासवर्डमध्ये 'E' च्या जागी ३ वापरायची सवय आहे.

-निळोबा होम्स्

राजन बापट Wed, 12/03/2014 - 05:04

सहज चूष म्हणून या चाचणीमधे उत्तीर्ण होतील अशी मराठी कलाकृतींमधली उदाहरणं मनातल्या मनात शोधायला लागलो.

- जीएंच्या "प्रदक्षिणा" कथेमधे शांताक्का नि जान्हवी यांचे अगदी त्रोटक संवाद त्यांच्या बालपणीच्या आठवणींबद्दलचे आहेत.
- जीएंचीच "चैत्र" ही कथा आठवली. यामधे अगदी निश्चितपणे कथेचा एक मोठा भाग तीन स्रियांमधल्या प्रसंगांनी व्यापलेला आहे.
- 'वीज म्हणाली धरतीला ' या शिरवाडकरांच्या नाटकातले जुलेखा आणि झांशीच्या राणीच्यामधले प्रदीर्घ संवाद.
- 'चारचौघी' नाटकातले आई-मुलींचे काही संवाद पुरुषांचे संदर्भ नसलेले आहेत. (धाकट्या मुलीची कॉलेजस्पर्धा वगैरे)
- 'सोनाटा' हे एलकुंचवारांचं नाटकच पुरुषपात्रविरहित आहे. नाटकाचा मोठा भाग पुरुषांचा संदर्भ नसलेला आहे.
- गौरी देशपांडे यांच्या अनेक कथांची उदाहरणे
- कविता महाजन यांच्या "भिन्न" नावाच्या कादंबरीतले अनेक संवाद.

इतर शेकडो निघतीलच. मला मात्र हा चूष म्हणून मनात मनात केलेला आठवणींचा खेळ आवडला. एकंदरीत लेखिकांच्या लिखाणांची उदाहरणे सहजपणे आठवली. लेखकांची आठवायला अधिक प्रयास पडले. (यात आश्चर्य नाहीच)

राजन बापट Wed, 12/03/2014 - 05:12

In reply to by राजन बापट

यावरून काही महिन्यांपूर्वी एका मित्राने टाकलेला हा फोटो आठवला. फोटो पाहिल्यावर मला कॅप्शन म्हणून सुचल्या इंदिरा संतांच्या ओळी :

"मैत्रिणी जमतात तेव्हा,
प्राजक्ताने फुले ढाळावी, तशा ढळतात
संसारातील गुजगोष्टी. सुखाच्या. दु:खाच्या."

नंदन Wed, 12/03/2014 - 05:54

In reply to by राजन बापट

ह्या प्रसिद्ध छायाचित्रकाराचे ('अफगाण गर्ल' फेम) असेच एक छायाचित्र आठवले -

धनंजय Fri, 14/03/2014 - 01:24

(मी प्रतिसाद वाचलेले नाहीत, तेथे सर्व स्पष्ट झाले असेल, तर क्षमस्व.)

> पण या चाचणीमध्ये असं अध्याहृत आहे की, दोन स्त्रिया एकत्र आल्यानंतर हमखास पुरुषांबद्दलच बोलतात,
माझ्या मते या चाचणीचे अध्याहृत जवळजवळ तुम्ही म्हणता त्याच्या विपरित आहे.

या चाचणीचे अध्याहृत असे, की वास्तविक आयुष्यात दोन स्त्रिया एकत्र आल्या, तर त्या फक्त पुरुषांबद्दल बोलत नाहीत.

ज्या कलाकृतींमध्ये स्त्रियांचे वास्तव चित्रण नसते, पण पुरुष-दृष्टिकोनातून चित्रण अस्ते, त्या कलाकृतींमध्ये मात्र (वास्तवाशी विपरित) स्त्रिया फक्त पुरुषांबाबत बोलतात. या चाचणीतून फक्त पुरुषांबाबत बोलणार्‍या स्त्रियांचे चित्रण "वास्तवाच्या विपरित" ठरते. तुम्ही म्हणता तसे अध्याहृत अस्ते, तर अशा स्त्रियांचे चित्रण उलट सुसंगत ठरू लागले असते.

तुम्ही दिलेला विकिपीडिया दुवा सांगतो :

...she

only watches a movie if it

satisfies the following requirements:[8]

It has to have at least two women in it,
who talk to each other,
about something besides a man.

म्हणजे या चाचणीनुसार पुरुषांव्यतिरिक्त अन्य गोष्टींबाबतसुद्धा बोलणार्‍या स्त्रिया असल्या, तरच चित्रपट (त्या पात्रानुसार) बघणालायक आहे.

म्हणजे अध्याहृत असे आहे, की स्त्रिया एकमेकांशी पुरुषांव्यतिरिक्त अन्य गोष्टींबद्दल जरूर बोलतात. हे तुम्हाला भासलेल्या अध्याहृताच्या बिलकुल विपरित आहे.

मेघना भुस्कुटे Fri, 14/03/2014 - 10:57

In reply to by धनंजय

अध्याहृत असे आहे, की स्त्रिया एकमेकांशी पुरुषांव्यतिरिक्त अन्य गोष्टींबद्दल जरूर बोलतात.

जर हे अध्याहृत असतं, तर अशा प्रकारची चाचणी घेण्याची गरज का भासली असती?

मेघना भुस्कुटे Fri, 14/03/2014 - 15:56

In reply to by अनुप ढेरे

हम्म. यावर मला काही युक्तिवाद सुचत नाहीय. अजून काय काय खेकटी काढता येतील उकरून. पण जाऊ दे, इतकी काय महत्त्वाची चाचणी नसावी ही. आपण काय कुणाला ही चाचणी वापरायची शिफारस करणार नाही, वापरणार्‍याकडे फार आदरानं पाहू शकणार नाही, एवढं नक्की.

धनंजय Fri, 14/03/2014 - 18:58

In reply to by मेघना भुस्कुटे

> जर हे अध्याहृत असतं, तर अशा प्रकारची चाचणी घेण्याची गरज का भासली असती?
कारण स्त्रियांचे असहाजिक वागणे असलेले चित्रपट बघण्यात येतात. आणि ते अ-साहजिक आहे, हे दाखवून द्यायचे असते म्हणून चाचणी उपयोगात येते.
------------------------------
आता युक्तिवाद कळण्याकरिता समांतर वैद्यकीय चाचणीचे उदाहरण देतो :
"या व्यक्तीच्या लघवीमध्ये ग्लुकोज साखर आहे का?" अशी रासायनिक चाचणी करतात.
(समांतर बेख्डेल : "या चित्रपटात स्त्रियांच्या आपसात फक्त-पुरुषांबाबत संवाद आहेत काय?" अशी बेख्डेल चाचणी.)

याचे अध्याहृत असे असते, की "सामान्यपणे/स्वास्थ्य असल्यास लघवीमध्ये ग्लुकोज सापडत नाही."
(समांतर बेख्डेल : अध्याहृत "साहजिक बोलण्यात स्त्रियांच्या आपसात फक्त-पुरुषांबाबत संवाद होत नाही.")

परंतु असे दिसते, की काही व्यक्तींच्या लघवीत ग्लुकोज आढळते, आणि ते लोक सामान्य लोकांपेक्षा अधिक धोक्यात असतात, उपचार करण्यालायक असतात.
(समांतर बेख्डेल : परंतु असे दिसते, की काही चित्रपटांत स्त्रियांच्या आपसात फक्त-पुरुषांबाबत संवाद होतो. असल्या चित्रपटांत स्त्रियांचे चित्रण एककल्ली असते, आणि टीका करण्यालयक असते.)

चाचणी केल्यावर जर लघवीत ग्लुकोज सापडले, तर "हे स्वस्थ व्यक्तीकरिता अयोग्य आहे" असा निष्कर्ष काढता येतो.
(समांतर बेख्डेल : चाचणी केल्यावर जर स्त्रियांच्या आपसात फक्त-पुरुषांबाबत संवाद आढळला, तर "हे साहजिक संवादाकरिता अयोग्य आहे" असा निष्कर्ष काढता येतो.)

"हे अयोग्य आहे" असा निष्कर्ष काढला मग त्या व्यक्तीचा उपचार वगैरे करण्याबाबत विचार होऊ शकतो. चाचणीत ग्लुकोज सापडले नाही, तर ग्लुकोज-विवक्षित उपचाराची गरज नाही, असा मार्ग सयुक्तिक होतो.
(समांतर बेख्डेल : "हे अयोग्य आहे" असा निष्कर्ष काढला मग त्या चित्रपटात स्त्रियांचे चित्रण अ-साहजिक आहे, अशी टीका करण्याबाबत विचार होऊ शकतो. चाचणीत स्त्रियांच्या आपसात फक्त-पुरुषांबाबत संवाद आढळला नाही, तर स्त्रियांचे चित्रण अ-साहजिक आहे, अशी टीका न करणे सयुक्तिक होतो.)

अर्थात, ग्लुकोज नाही म्हणजे त्या व्यक्तीची लघवी अन्य बाबतीतही निरोगी आहे, असा निष्कर्ष काढता येत नाही - उदाहरणार्थ लघवीत प्रथिने असू शकतात. त्याकरिता उपचार वेगळे असतात. पण म्हणून ग्लुकोजजी चाचणी निरुपयोगी होत नाही.
(समांतर बेख्डेल : अर्थात स्त्रियांच्या आपसात फक्त-पुरुषांबाबत संवाद आढळला नाही, म्हणजे चित्रपट अन्य बाबतीतही साहजिक आहे, असा निष्कर्ष काढता येत नाही - उदाहरणार्थ त्याच चित्रपटात घरगुती नोकरांचे चित्रण असमतोल असू शकेल. पण म्हणून "स्त्रियांचा संवाद एककल्ली चितारला आहे का?" ही चाचणी निरुपयोगी होत नाही.)

-----
कदाचित मला नीट समजलेले नसेल.

वैद्यकीय अध्याहृत असे असले, की "सामान्यपणे/स्वास्थ्य असल्यास लघवीमध्ये ग्लुकोज सापडत नाही," पण उपचार-करण्यालायक-लोकांत मात्र ग्लुकोज सापडते, तर लघवीमध्ये ग्लुकोजची चाचणी करणे तर्कदुष्ट ठरते -- असा काही युक्तिवाद आहे काय?
(प्रकार अ) ज्या लोकांना "डायबीटीज/लघवीत साखर बगैरे सर्व खोटे आहे, उपचाराची गरजच नाही" असे वाटते, ते लोक ग्लुकोज-चाचणी करणार्‍या डॉक्टरांकडे आदराने पाहू शकणार नाही, हे मला कळते.
(प्रकर ब) पण ज्या लोकांना "काही लोकांना डायबिटीज असतो, तो गंभीर प्रकार आहे, आणि उपचार करण्याकायक आहे" असे मानणारे लोक लघवीत-ग्लुकोज चाचणी करणार्‍या डॉक्टरांची चिकित्सापद्धत आदराने ग्राह्य मानतात.

बेख्डेल चाचणीबाबत तुमचा युक्तिवाद प्रकार-अ पद्धतीचा आहे काय? म्हणजे "काही चित्रपटांत स्त्रियांचे अ-साहजिक चित्रण होते, हे खोटे आहे, आणि टीकेची गरज नाही, म्हणून चाचणीची गरज नाही, चाचणी करणार्‍यांची पद्धत आदरास पात्र नाही." असा युक्तिवाद आहे काय?

Urine Dipstick Analysis http://www.patient.co.uk/doctor/urine-dipstick-analysis

वरील वैद्यकीय चाचणीचे उदाहरण समजताना वाचकाला कदाचित हा भागही विचारार्ह वाटेल :
False positive results: seen when high levels of ketones are present.[16] Also seen in patients taking levodopa.[17]
False negatives: seen where SG is elevated, in uricosuria and in patients taking ascorbic acid.

धनंजय Tue, 08/04/2014 - 18:07

In reply to by धनंजय

कुठल्या दिशेला विचारांना चालना मिळावी म्हणून उद्धरण दिले आहे, हे कळत नाही.

दुव्यावर अन्यत्र म्हटले आहे की :
Nearly all glucose filtered by the glomeruli is reabsorbed in the proximal tubules and only undetectable amounts appear in urine in healthy patients. Above the renal threshold (10 mmol/L) glucose will appear in urine. The test relies upon reaction of glucose with glucose oxidase on dipstick to form hydrogen peroxide which causes colour change. This is specific to glucose and no other sugar.
Useful screen for diabetes mellitus.

False positive results: seen when high levels of ketones are present.[16] Also seen in patients taking levodopa.[17]
False negatives: seen where SG is elevated, in uricosuria and in patients taking ascorbic acid.

येथे चाचणी कधीकधी चुकीचे निकाल देत असली, तर पुष्कळदा (उपयोगी असावे इतके) बरोबर निकाल देत, असा निर्देश दिसतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/04/2014 - 04:24

Films that pass the Bechdel test perform just as well at the box office as those that fail

मेघनाला कदाचित हा भागही विचारार्ह वाटेल -
The Oscar-winning film Gravity, which centres almost entirely on Sandra Bullock's floundering astronaut, does not pass the test, because Bullock fails to speak to another woman once in the course of the Alfonso Cuarón space drama's 93-minute running time.

धनंजय Tue, 08/04/2014 - 17:55

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कुठल्या दिशेला विचारांना चालना मिळावी म्हणून उद्धरण दिले आहे, हे कळत नाही.

संदर्भासह वाक्य असे आहे :
Overall just 53% of surveyed movies made between 1970 and 2013 passed the test, though FiveThirtyEight pointed out that Bechdel's criteria do not always make for the perfect barometer of gender equality. The Oscar-winning film Gravity, which centres almost entirely on Sandra Bullock's floundering astronaut, does not pass the test, because Bullock fails to speak to another woman once in the course of the Alfonso Cuarón space drama's 93-minute running time.

येथे "do not always"चा उपयोग "पुष्कळदा पण नेहमीच नाही" असा वापरलेला दिसतो आहे. "ग्रॅव्हिटी"चे उदाहरण क्वचित सापडणारे अपवाद म्हणून दिल्यासारखे वाटते.

इतकेच नव्हे तर, टेस्ट वापरून वर्गीकरण केलेल्या चित्रपटांचे विश्लेषण केलेले आहे. स्तंभाचा मुख्य मुद्दा सांगणारे भरतवाक्य असे आहे "Movies which pass the "Bechdel test" are just as likely to be profitable than those which do not, contrary to received thinking in Hollywood, according to a comprehensive new survey." या प्रास्ताविक वाक्यात "सर्वेक्षणात वापरलेली चाचणी निष्कर्ष काढण्यासाठी अयोग्य असल्यामुळे पुढे या चाचणीचे निष्कर्ष अमान्य करण्यात येतील" असा काहीच निर्देश दिसत नाही.

"ग्रॅव्हिटीचा अपवाद सांगितल्यानंतर स्तंभातील वाक्ये येणेप्रमाणे :
The survey did find that more movies are passing the test over time. In the past few years, adaptations of young adult novels such as Twilight, The Hunger Games and Divergent, have found huge box-office success with female-fronted material. The animated hit Frozen, which this weekend became the highest-grossing film of its type of all time, easily passes the Bechdel test, with a plot that centres on two princesses forced to separate when one develops terrifying powers.

या वाक्यांमध्ये "ग्रॅव्हिटीबाबत चाचणी चुकत असल्यामुळे सर्वेक्षणातील वरील नोंदी अर्थशून्य होऊ लागतात" असा काही सूर दिसत नाही. उलट असा सूर दिसतो की वरील नोंदींमध्ये चाचणी बहुतेक योग्य वर्गीकरण करते, आणि म्हणून Twilight, The Hunger Games, Divergent, Frozen चित्रपटांबाबत निष्कर्ष नोंदण्यालायक आहेत.

३_१४ विक्षिप्त अदितींना वेगळा संदर्भ जाणवतो का? त्यांच्या मते स्तंभलेखकाचे मुद्दे असे आहेत, की
१. ग्रॅव्हिटीच्या चुकलेल्या वर्गीकरणामुळे आपल्याला असे कळते की चाचणी साधारणपणे चुकीचा निर्देश देते,
२. Twilight, The Hunger Games, Divergent, Frozen बाबत चाचणी जो निर्देश देते तोही त्यामुळे संशयास्पद आहे.
३. "The survey found the average gross return for a film that passed the test was $2.68 (£1.61) for each dollar spent, compared to just $2.45 (£1.47) for a film that failed the test." हा सर्वेक्षणातला ताळा निरर्थक आहे, कारण "ग्रॅव्हिटी"च्या उदाहरणावरून आपल्याला असे कळते, की मुळात वर्गीकरणच सदोष आहे.

स्तंभ वाचताना वरीलपैकी कुठलेच निर्देश मला प्रकर्षाने जाणवत नाहीत. उलट अपवाद सांगूनही "असे अपवाद फार थोडे असल्यामुळे चाचणी वापरलेले सर्वेक्षण बहुतेक अर्थपूर्ण आहे" असाच संकेत स्तंभलेखकाच्या सुरात दिसतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/04/2014 - 19:50

In reply to by धनंजय

"असे अपवाद फार थोडे असल्यामुळे चाचणी वापरलेले सर्वेक्षण बहुतेक अर्थपूर्ण आहे" असाच संकेत स्तंभलेखकाच्या सुरात दिसतो.

याबाबत सहमत आहे.

पण स्त्री-पात्र मध्यवर्ती असून, ती स्त्री फक्त पुरुषांबाबत बोलत नसूनही 'ग्रॅव्हीटी'सारख्या, अपवादात्मक चित्रपटांमधे चाचणी अपुरी पडते. वरच्या मधुमेहाच्या उदाहणाचा विचार करता, लघवीत साखर सापडत असली तरी क्वचित काही म्युटेशन सापडतं ज्यामुळे निरोगी माणसाच्या लघवीत साखर असूनही माणूस पूर्णतः निरोगी असू शकतो. असं म्यूटेशन असणारे लोक खूपच कमी असतील, असू शकतील. एवढंच.

धनंजय Tue, 08/04/2014 - 23:35

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बेख्डेल टेस्ट मध्ये उतरणार नाही असे आणखी एक उदाहरण "व्हजायना मोनोलॉग्स". येथे सर्वच बोलणे स्वगत असल्यामुळे "स्त्रीपात्रे एकमेकींशी बोलतात" या चाचणीखाली नापास होते.

माझ्या मते ज्या ठिकाणी चाचणी लागूच करू नये अशा चौकटी म्हणजे (१) (व्हजायना मोनोलॉग्स सारखे) "फक्त स्वगते", (२) (ग्रॅव्हिटीसारखे) एकच स्त्री आणि एकच पुरुष अशी मुख्य पात्रे, वगैरे कृती.

१. It has to have at least two women in it, (अट : जर कथेत पुरुष नसल्यास कमीतकमी दोन, आणि पुरुष असल्यास कमीतकमी तीन वा अधिक पात्रे असतील तरच हे कलम सार्थक आहे)
२. who talk to each other (अट : जर त्या कलाकृतीच्या चौकटीत संवाद असतील तरच हे कलम सार्थक आहे)
३. about something besides a man. (वरील दोन्ही अटी पूर्ण झाल्यासच या कलमाला काही अर्थ आहे.)

माझ्या मते हा चाचणीचा दोष नाही. (लघवीसाठीच्या, पण रिकाम्या/पाण्याने/पेट्रोलने भरलेल्या काचपात्रात ग्लुकोजची चाचणी केली आणि चाचणीचे उत्तर निरर्थक आले, तर तो चाचणीचा दोष मानता येत नाही. चाचणीसाठी लघवी असावी ही अट मानावी लागते.)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/04/2014 - 23:43

In reply to by धनंजय

ही चौकट आणि त्यातून काही कलाकृती वेगळ्या काढणं हे जास्त ग्राह्य वाटलं. 'व्हजायना मोनोलॉग्ज'चं उदाहरणही पटलं. अशीच एखादी 'कास्ट-अवे' कलाकृतीही निघू शकेल.

पण मुद्दा क्र १ मधलं पुरुष नसल्यास दोन, असल्यास तीन किंवा अधिक हे नीटसं समजलं नाही. पुरुष असल्या-नसल्यास कोणत्याही दोन स्त्रियांमधले संवाद, अशी चौकट पुरणार नाही का?

धनंजय Wed, 09/04/2014 - 03:11

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझा हा तर्कटपणा अंकगणिती सिद्धांताकरिता आहे.

जर पुरुष असेल, आणि दोनच पात्रे असतील, तर दोन स्त्रीपात्रे असणे शक्यच नाही. जास्तीत जास्त एकच स्त्रीपात्र असू शकेल. त्यामुळे जर पुरुष असेल, आणि दोन स्त्रीपात्रांकरिता वाव हवा, तर पात्रसंख्या कमीतकमी तीन लागेल - मगच चाचणीसाठी दोन स्त्रियांमध्ये संवाद घडू शकतो. मात्र दोन पात्रे, दोन्ही स्त्रीपात्रे असतील, तर संवादांची चाचणी करण्यासाठी पुरे आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 17/09/2014 - 21:12

In reply to by धनंजय

उत्तम बातमी.

गेल्या आठवड्यात मिळालेली ही एक यादी - 20 Great Films With Multiple Female Leads That Pass The Bechdel Test

मी या यादीतला फक्त बोल्बर (Volver) पाहिला आहे; तो फारच आवडला होता. बाकीचे काही नेटफ्लिक्स स्ट्रीमिंगवर आहेत; लवकरच पाहिले पाहिजेत.

रुची Wed, 17/09/2014 - 21:26

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ते बेख्डेल टेस्ट वगैरे सोडून दिले तरी या यादीतले अनेक सिनेमे खूप चांगले आहेत. मी यातले १० एक सिनेमे पाहिले आहेत त्यावरून ही यादी बनविणार्यांनी चांगले सिनेमे निवडले आहेत असे वाटते.