Skip to main content

पडद्या मागची व्यथा

रंगविले मुखवटे अनेक
स्वत:चा चेहरा मात्र
रंगविला न कधी.

तालावर नाचविल्या
मंचावर कठपुतळ्या.
नाचायला मला
मिळालच नाही.

मान नटसम्राटाचा
मिळतो बाहुल्यांना.
दंश पराजयाचा
मलाच का मिळावा.

पडद्या मागची व्यथा
कळेल का कुणाला
रंगमंचावर मिळेल का?
कधी मान सूत्रधाराला.

*राजकारण शोधण्याचा प्रयत्न करू नये ;)