साहित्य देवता
आज एक गंमतीशीर दृष्य मनःचक्षूंसमोर साकार झाले.
कल्पना करा हं गणपती अन सरस्वतीचा दरबार भरला आहे. एका कोपर्यात ऐसीवरचे मान्यवर व नवलेखकु, कवि आदि मंडळी गरीबपणे उभी आहेत.
या दरबारात गणपती व सरस्वतीच्या दास-दासी आल्या आहेत. ते कोण तर-गंभीर अशी प्रज्ञा, तिची दुसरी जरा कमी गंभीर मैत्रिण मेधा, अतिशय अवखळ कल्पनाशक्ती अन खट्याळ विनोदबुद्धी ही उभ्या आहेत. वाणी बरीच बिझी(व्यग्र)अन थकलेली दिसतेय. कवित्व शक्ती लक्षपूर्वक ऐकत, नम्रपणे हात बांधून उभी आहे.
विवेक, तारतम्य अन प्रगल्भता, तर्क हे दासही दुसर्या भागात हात जोडून उभे आहेत.
या सर्वांना एकदम हाय-कमांडहून आदेश आहे की ऐसीवरच्या लेखकु, कविंची सर्वतोपरी मदत करायची. त्यांना काय हवं नको ते पहायचं, त्यांनी हाक मारली की लगेच हजर व्हायचं.
पण होतं काय या लहान देवता वरुन आलेला आदेश पाळतात तर खर्या पण...... सोईबरहुकूम मज्जा मजाही करतात, आळसही करतात, अन खोड्याही काढतात! :)
आता हेच पहा ना बॅटॅनी हाक मारली वाणीला, तर प्रज्ञा अन माहीती धाऊन आल्या. तबकात बरेच विचार, आयडीया आणून बॅटॅला पेश केले. बॅटॅनी काही घेतले, काही परत ठेवले.
उसंत सखूंनी अन अस्वलाने कल्पनाशक्तीला हाक मारली तो काय मज्जा दोघीही कल्पनाशक्ती न विनोदबुद्धी एकदम लगालगा धाऊन आल्या. कल्पनाशक्तीने पोतडीतून मस्त मस्त विचार काढून दिले न दिले तोच विनोदबुद्धीने ते घासून पुसून लख्ख केलेही :)
आता बघा हां अजो, गब्बर, चिंंज, मन, अदिती, मेघना अन ऋ यांचेकडे काय चाललय? अरे हे काय तैलबुद्धी अगदी दिमतीला हजर दिसतेय. वा वा! जय हो!! ;)
ग्रेट थिंकर, थत्ते, अजो यांनी बोलावताच अन चौकसबुद्धी हातातील काम टाकून येतेय, हवं नको पहातेय, विवेकजींनी बोलावताच कल्पनाशक्ती तिची रुपकांची पर्स घेऊनच हजर होतेय. क्या बात है!!
घाटपांडेंनी बोलावलं सुद्धा नाही तरी चालतं त्यांनी मागायच्या आतच, तर्क अन चिकीत्साबुद्धी दोघे हसत हसत त्यांना विचार देऊन टाकतात.
पण दुसरीकडे विपरीत चित्र आहे तेही बघून घ्यावे. ;)
मी, काही नवीन कवितापाडक, नवलेखकुं चा घोळका मघापासून कोकलतोय पण कोणीच येत नाहीये :D
का तर म्हणे, नेमके तेव्हाच कल्पनाशक्तीला केस विंचरायचे आहेत अन मेधा फुलांची वेणी बनवत बसलीये. तारतम्य अन विवेकाला पतंग उडवण्यातून फुरसत मिळत नाहीये. छान!! ;) पण आमचा घसा कोरडा पडला आहे, त्याचे काय :( तर्क अन चिकीत्साबुद्धी तर कायमचे रुसलेत असे वाटावे इतके गाल फुगवून बसलेत.
अन हे काय, हे दोघे दोंदील-उदर अन तुंदीलतनू - मंदत्व अन जडत्व मात्र ख्या: ख्या: हसत मजा बघताहेत :) हाकला रे त्यांना. चटोर अन आळशी मेले, खु-शा-ल-चें-डू ;), अंधश्रद्धाळूपणा उगाचच लोचटपणा करतो आहे.
आता राघा नवलेखकुंच्या मदतीला धावून येतात. राघा म्हणतात - मुलांनो त्या जडत्व अन मंदत्वांचं खाणं आधी तोडा!! रुथलेसली तोडा. माजलेत साले. तेच उत्तम खाणे तैलबुद्धीला द्या, उंची कपडे कल्पनाशक्तीस द्या, विनोदबुद्धी खट्याळ आहे तिला खूष ठेवा. अन मुख्य म्हणजे पुस्तके वाचा, विदा जमवा, विचार-विचार करायला शिका.
एवढं करा न मग बघा या देवता कशा हाकेला धावून येतील :)
आम्ही सगळे माना डोलावतो अन ऐसीवर येऊन लॉगिन करतो.
तेजाजी, ज्यांचे नीरीक्षण केले
तेजाजी, ज्यांचे नीरीक्षण केले आहे त्यांच्याबद्दल मांडले आहे. सर्व विचार वैयक्तिक नीरीक्षणातून आलेले आहेत. त्यामुळे जर कोणास वगळले असेल तर ती त्यांच्या गुणावशेषांची कमी नसून माझे नीरीक्षणातील लिमिटेशन्स आहेत असे प्रांजळपणे मांडू इच्छिते.
कोणालाही हायलाईट करायचा हेतू कधीच नव्हता/नसतो. मलाही पूर्वी वाटायचे मला का वगळले, मी ही आहे इथे. पण मग मग लक्षात आलं की त्यावेळी मनःपटलावर ज्यांचा प्रभाव असतो ती ती पात्रे आपोआप साकार होतात. हे लेखक मुद्दाम करत नाही.
तेव्हा समजून घावे ही विनंती. धिस इज जस्ट अ फीबल आऊटलेट ऑफ क्रिएटीव्हीटी. अशा प्रकारच्या लेखनात बर्याच कमतरता असतात. पण एक १००% की कोणाला वगळण्याचा अंतस्थ हेतू नसतो.
तेजाजी त्याकरता मला आपले
तेजाजी त्याकरता मला आपले प्रतिसाद अन लेख वाचून, अभ्यास करावा लागेल :) तेव्हा मला आपल्यावर कोणत्या गुणावशेषाचा पगडा आहे ते कळेल. पुढच्या वेळेला नक्की :)
आपला प्रांजळपणा आवडला.
मला मान्य आहे की अशा प्रकारच्या लेखनामुळे काल्पनिक का होईना पण "ग्रुपमधून एक्स्क्लुड" केल्याची भावना येऊ शकते.
माझ्याकडून मी अशा प्रकारचे लेखन थांबवते आहे.
पण बाँडींग हे दोन्ही बाजूंनीच होते. जितके तुम्ही ग्रुपवर व्होकल रहाल तितके लोकांचे लक्ष जाईल, त्यांना तुमचे व्यक्तीमत्व कळून येईल. तेव्हा एवढच म्हणेन येत रहा, लिहीत रहा. मेक रिपल्स, मेक वेव्हज :)
________
खरं सांगायचं तर मी इतकी इमोशनल आहे की पूर्वी असे लेख आले रे आले की मला माझं नाव नसल्याचा राग येऊन मी लगेच ५/४ वगैरे रँकिंगच्या लेखांना १ द्यायचे न खाली ओढायचे :)
पण जेव्हा मी असा पहीला लेख लिहीला तेव्हा क्रिएटीव्हीटीचे जे समाधान मिळाले त्यातून ती र्अॅटिट्युड बदलली. असो.
________
अजून एक म्हणेन तुम्ही असा लेख लिहून पहावा. मग बघा आपल्या लेखात, कोणत्या आय डींचा ठळकपणे प्रेझेन्स जाणवतो. ते तेच असतील - (१) एक तर जे रिपल्स उठवतात किंवा (२) ज्यांच्याशी तुम्ही खवतून /व्यनितून बोलता अन जे तुम्हाला जवळचे आहेत.
अर्थात सगळे रिपल्स उठवणारे किंवा तुम्हाला जवळचे लेखात अंतर्भूत होतीलच असे नाही. पण एक नक्की जे अंतर्भूत होतील ते वरील २ प्रकारात मोडतीलच.
असो!!!
कौलशक्ती कुठेय!!
कौलपाडक- कौलपडीक- कौलपीडक समाजातर्फे कौलशक्तीचा समावेश देवतांमध्ये न केल्याबद्दल ह्या वर्षी आम्ही गणपतीला अनुराधा पौडवालच्या आरत्या ऐकवणार आहोत.
बाकी लेखात आपलं नाव बघून बरं वाटलं, खोटं का बोला? :D
शाळेत कसे नेहमी चमकणारे विद्यार्थीच बोर्डावर दिसत. कधी काळी 'वक्रुत्व' स्पर्धेत वगैरे ३रा नंबर आला तरच माझं नाव तिथे दिसे. ते दिवस आठवले!
बाकी लेखात आपलं नाव बघून बरं
बाकी लेखात आपलं नाव बघून बरं वाटलं, खोटं का बोला? (दात काढत)
:) धन्यु धन्यु!!!
ह्या वर्षी आम्ही गणपतीला अनुराधा पौडवालच्या आरत्या ऐकवणार आहोत.
=)) आई ग!!!!
कधी काळी 'वक्रुत्व' स्पर्धेत वगैरे ३रा नंबर आला तरच माझं नाव तिथे दिसे.
वक्रुत्व =)) फुटले!!!
___________
वक्रुत्व वरुन आठवलं - लाज वाटते पण सांगते ..... कारण लाजेमुळे आम्ही कधी कोणती गोष्ट केली नाही असे झाले नाही मग आत्ता तरी का व्हावे? ;)
नॉट टू मेनी इयर्स बॅक, एक बोलणं चाललं होत की व्होकॅब्युलरी वाढवा. वगैरे वगैरे.
मी बोलले - येस येस आय वाँट टू इन्क्रीझ माय वोकॅब्युलरी :(
=)) मग घरी गेल्यावर विचार करताना वाटलं च्यायला इन्क्रीझ कसली इम्प्रूव्ह करतात ना व्होकॅब्युलरी :(
लेकीन तीर निशानेसे निकल चुक्या था :)
व्होकॅब्युलरी
व्होकॅब्युलरी वाढवणे वगैरे- अगदी! झेपलंच नाही कधी. मुद्दाम तशी पुस्तकंही आणली होती पण ते म्हणजे विटॅमिनच्या गोळ्या खाऊन सुदृढ होण्यासारखं झालं.
इन्क्रीझ तर काय मी पण म्ह्टलंय बरेचदा, तेव्ढंस चूक नाही वाटत!
अवांतर -
परवाच जॉनी गद्दार पाहीला, त्यात धर्मेंद्रचं इंग्रजी ऐकलं. देवा!
हिंदी - मै उसे नही छोडूंगा
धरम इंग्रजी किंवा धंग्रजी : I won't leave him.
प्रत्यवांतरप्रश्नावली
साहेब,
१.आपण जॉनी गद्दार पाहीला आहे का? नसल्यास पहावा. त्यातलं धर्मेंद्रचं शेषाद्री हे क्यारेक्टर कमालीचं जमलं आहे.
२. आपण धर्मेंद्रला इतर ठिकाणी इंग्रजी बोलताना ऐकलं आहे का? नसल्यास the burning train किंवा त्याचे ९०च्या काळातले सिनेमे पहावेत. मग श्रीराम राघवनने त्याला असं इंग्रजी बोलायला का लावलं असेल हे कळणं फार अवघड नाही!
३. आपण कथालेखक/दिग्दर्शकाला मधे का बरं आणलंत?
४. तुम्ही माझ्या प्रतिक्रियेतल्या अवांतर मुद्द्यालाच पकडून प्रतिप्रश्न का विचारलेत?
५. हे आपलं उगाच, ४ ऐवजी ५ हा आकडा बरा दिसतो म्हणून, बाकी काही दम नाहीये ह्या मुद्द्यात.
हे आपलं उगाच, ४ ऐवजी ५ हा
हे आपलं उगाच, ४ ऐवजी ५ हा आकडा बरा दिसतो म्हणून, बाकी काही दम नाहीये ह्या मुद्द्यात.
खी: खी: मस्त!!!
या वरुन सन्जोपरावांच्या एका मस्त मस्त बहारदार लेखातील हा उतारा आठवला-
स्त्रोत - http://sanjopraav.wordpress.com/2007/02/23/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%…
“सह्याद्रीच्या दगडादगडावर इथल्या स्वातंत्र्यसैनिकांचे रक्त सांडले आहे,इथल्या मातीच्या कणाकणावर इथल्या क्रांतिकारकांचा घाम सांडला आहे, इथल्या फत्तराफत्तरावर इथल्या शहिदांचे…” इथे काहीतरी सांडवून सर्वसाक्षीला तो तिय्या जमवायचा होता. पण ते न जमल्याने तो उगीचच खाकरला “शहिदांचे अं…..नाव कोरलेले आहे. पण आज या शहिदांची याद कोणाला आहे? जो तो आपल्या ह्याच्यात आहे. =))
छानच.
छानच.