ज्योतिषविषयक फुटकळ , उथळ, मौजमजेचा कौल
हा मौजमजेचा ,उथळ, फुटकळ धागा आहे. मी तर म्हणते काही क्षण तरी समस्त ऐसीकरांनी त्यांचे अभ्यासू, व्यासंगी अन गंभीर मुखवटे काढून या धाग्यावर दंगा करुन धाग्याला, ४ चांद लावावेत. :)
"www.theastrologyplace.uk" ही ज्योतिषविषयक, माझी आवडती, नंबर १ साईट आहे. इथे मजेशीर खेळ सापडला, एक कौल घेतला होता की १२ राशींना पर्याय दिला की त्या सेक्स च्या ऐवजी काय निवडतील तर कोणती रास काय निवडेल? अर्थात उत्तरे खेळीमेळीने घ्यावीत. तसेच हे लक्षात असू द्यावे की तुमची सूर्य रास एक असेल पण अनेक ग्रह एखाद्या राशीत असतील तर ती दुसरी रास प्रभावी ठरेलही. तीच गोष्ट शुक्राच्या राशीबद्दल. सहसा शुक्र अन चंद्र रास आवडीनिवडी अन मनाचा, कल दाखवितात. लग्न रास fasade किंवा तुम्ही जगाला जो मुखवटा दाखवता त्याची निदर्शक असते
ऐसीकरांना ही विनंती की जर तुमचे उत्तर जुळत असेल तर कृपया रास सांगून सर्वांची करमणूक करावी. अर्थात नाही जुळले तरी रास सांगीतली, काय गोष्ट प्रिफर करता ते उत्तर सांगीतले तरी चालेल.
मी सुरुवात करते. मिथुन लग्न अन वृश्चिक स्टॅलिअम (एकाच राशीत ३ किंवा अधिक ग्रह) असल्याने उत्तरे पटली आहेत ;) अधिक प्रश्न विचाराल तरी, याहून अधिक माहीती मिळणार नाही.
____________________
तुम्ही डॅशिंग अन लढाऊ (याला दुसर्या शब्दात भांडखोर म्हणतात ;)) मेष राशीचे असाल तर सेक्स च्यापेक्षा अधिक, तुमच्या आवडीच्या स्पर्धात्मक खेळातील खेळातील नैपुण्य मिळवण्यावर भर द्याल किंवा ते तुम्हाला आवडेल.
.
रसिक, अन पैशाच्या बाबतीत भाग्यवान वृषभ असाल तर माळ्यावरती धूळ खात पडलेलं अत्यंत मौल्यवान, दुर्मिळ पेंटींग सापडले तर हरखून जाल.
.
बोलघेवडे अन फुलपाखरी मिथुन असाल तर प्रत्यक्ष सेक्स पेक्षा sex-chat ला प्राधान्य द्याल (प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट!! ; ))
.
हळवे(याला दुसर्या भाषेत रडे म्हणतात ;)) अन फूडी कर्क असाल तर चॉकलेट खाल्ल्याने वजन कमी होते असा शोध लागलेला तुम्हाला आवडेल.
.
दमदार, आत्मविश्वासी सिंह राशीचे असाल तर हातात भारी गोल्ड कार्ड असताना, एक पूर्ण दिवस लंडनमध्ये/फ्रान्स मध्ये शॉपिंगमध्ये घालविणे खूप आवडेल.
.
रुक्ष, हिशेबी पण नम्र अन वेलमॅनर्ड कन्या राशीचे असाल तर अगदी कमी वेळेत, शब्दकोडे पूर्ण सुटण्याला प्राधान्य द्याल. (कन्या राशीला सर्वात जास्त विशेषणे दिलेली आहेत. माझी सर्वात लाडकी रास आहे - Point to be noted ;))
.
रसिक तूळ असाल तर बर्फावरच्या स्केटींगमध्ये तुमच्या देशातील जोडीने सुवर्णपदक जिंकलेले तुम्हाला आवडेल.
.
Dark & sultry वृश्चिक असाल तर सेक्स पेक्षा अन्य काहीही आवडणार नाही Nothing! ; )
.
तत्वज्ञानी धनु राशीचे असाल तर कोण्या सेल्समनला युक्तीवादात हरवलत तर धन्य वाटेल.
.
गंभीर मकर असाल तर कोण्या मामा-मावशीने मृत्यूपत्रात १० खोल्यांचा बंगला ठेवल्याची बातमी कळावी अशी इच्छा कराल.
.
विक्षिप्त कुंभ राशीचे असाल तर तुम्हाला ऑटोमॅटिक इस्त्री मशीनचा शोध लागणे महत्त्वाचे वाटेल.
.
स्वप्नाळू मीन राशीचे असाल तर सेक्स विषयी फँटसाइझ करणे पसंत कराल.
ओके.
:) ओके.
ह्म्म्म पेंटींग म्हणजे "पैसे मिळवण्याची सुवर्णसंधी" असे ब्रॉडली म्हणता येईल.
जसे कर्क राशीस सेक्स खालोखाल "खाण्यापीण्याची चैन" अतिप्रिय असा अध्याहृत अर्थ आहे. चॉकलेट हे फक्त निमित्त. जसे चंद्र दाखवायचा असेल तर आपण फांदीकडे बोट करतो तसे. याला काहीतरी "शाखा-चंद्र न्याय" म्हणतात तसे.
खरं आहे...
> दमदार, आत्मविश्वासी सिंह राशीचे असाल तर हातात भारी गोल्ड कार्ड असताना, एक पूर्ण दिवस लंडनमध्ये/फ्रान्स मध्ये शॉपिंगमध्ये घालविणे खूप आवडेल.
हे अगदी खरं आहे, आणि लंडनमधल्या दुकानदारांना हे माहित असतं. सिंह राशीचे लोक अॉगस्टमध्ये जन्माला येतात, याचाच अर्थ त्यांच्या आयांची गर्भधारणा नोव्हेंबरात होते. जगातल्या सिंह राशीच्या लोकांची संख्या वाढावी यासाठी लंडनमधली सगळी डिपार्टमेंटल स्टोअर्स नोव्हेंबरात मुद्दाम स्पर्मिसाइडल जेली, कंडोम वगैरे जिनसा गायब करतात. (ज्यांना ह्या वस्तू हव्याच असतात त्यांना वाकडी वाट करून स्कॉटलंडला जावं लागतं. तिथले लोक जास्त गरीब आहेत, त्यामुळे त्यांना शॉपिंगमध्ये इतका रस नसतो.)
त्या
त्या http://www.theastrologyplace.uk/ साईटवरती, राशीच्या आवडीची/प्रकृतीची गाणीही आहेत. मलाही एकदा हिंदी गाण्यांचे राशींनुसार कंपायलेशन करुन तसा धागा काढायचा आहे. बघू कधी जमतं ते. अर्थात ते गाणे, त्या राशीकरता कसे फिट्ट बसते त्याचा ज्योतिषाच्या अंगाने तर्क सांगीतला जाईल.
_____
खालील अतिव सुंदर गाणे हे १००% स्वप्नील "मीन" राशीचे. कारण "अल्कोहोलिझम" हा इश्यु जलराशींचाच अन त्यातल्या त्यात "मीनेचा" कारण - 'एस्केपिझम'
यातील स्वप्नाळूपण अन अध्यात्माकडे झुकणारे तत्वज्ञान देखील मीनेची मक्तेदारी. A neptunian song!
ह. ह. पु. वा.
आजचं भविष्य आवडलं. मेषवाल्यांसाठी राजकीय टोला आहे काय?
मेष : संयम ठेवा, ‘अच्छे दिन’ येतील.
वृषभ : चौथ्या सीटसाठी भांडू नका.
मिथुन : नाक्यावर उभे राहून गावगप्पा मारू नका.
कर्क : जाहिरातबाजीला भुलू नका.
सिंह : स्वत:च्या मनाने औषधे घेऊ नका.
कन्या : लवकर झोपा, लवकर उठा.
तूळ : कुचाळखोरपणा बरा नव्हे.
वृश्चिक : भरपूर वाचन करा.
धनु : अंधानुकरण करू नका.
मकर : प्रॉपर्टी खरेदी करण्याबाबत विचार करा.
कुंभ : एखादी तीर्थयात्रा करा.
मीन : छान पदार्थ बनवून मित्रमंडळींना खिलवा.
आजकाल जरा कमी काव्यात्मकता
आजकाल जरा कमी काव्यात्मकता आहे तिथे.
http://saamana.com/2014/April/23/bhawishyawedh.htm
ह्या URL मध्ये तारखा मागेपुढे करून पहा.. दणादण लिहिलं आहे :ड
+१
'मणोरंजणासाठी' यापूर्वी संपादकीयच वाचायचो. सामणामध्ये इतरही काही मणोरंजणपर वाचणीय आहे हे दाखवूण दिल्याबद्दल या ठिकाणी या माध्यमातूण आपले आभार माणणेत येत आहे.
अशक्य हसतोय राव. =))
मेष : इच्छातृप्तीसाठी अंगमेहनत आवश्यकच.
मेष : अंधारात दिवा लावताना सावध राहा.
कन्या : केस रंगविल्याने मनाचा रंग पालटत नाही.
पैशाच्या बाबतीत भाग्यवान
पैशाच्या बाबतीत भाग्यवान व्हायची वाट
:) फार रिलेटिव्ह संकल्पना आहे. कालच स्टिव्हन सांगत होता, डेव्हचे २ काँडोज, १ घर व १ केबिन आहे. ४३ वर्षे नोकरी करुन तो आता रिटायर होतोय अन तो स्टिव्हनला म्हणत होता - मला केबिन विकावी लागेल की काय अशी चिंता वाटते. Will I be alright?
हाहाहा आम्ही या चिंतेवर काल अफाट हसलो.
मी आतापर्यंत पाहीलेले सर्व वृषभ, गब्बरच (ऐसी चे सदस्य गब्बर नाहीत तर मराठी शब्द वापरला आहे. सॉरी दुसरा शब्दच सापडला नाही) पाहीलेत :)
मिथुन आणि मीन
यांच्यापैकी कमीतकमी एक आणि कदाचित दोन्ही माझी सूर्यरास नाही.
यांच्यापैकी कमीतकमी एक आणि कदाचित दोन्ही माझी चंद्ररास नाही.
यांच्यापैकी कमीतकमी एक आणि कदाचित दोन्ही माझी लग्नरास नाही.
परंतु यांपैकी दोन्ही राशींमध्ये माझ्या जन्माच्या वेळेला नवग्रहांपैकी एक तरी ग्रह होता, याची संभवनीयता खूप म्हणजे खूपच आहे. परंतु तीन-किंवा अधिक ग्रह असण्याची संभवनीयता कमी आहे.
मला माझी रासच माहिती नाही.
मला माझी रासच माहिती नाही. भारतीय पद्धतीप्रमाणे बहुधा कुंभ आहे.