Skip to main content

चारोळी

बरसात कि एक रात,एक भिगी लडकी,
भिगा बदन, भिगे ओंठ, भिगी जुल्फे,
देखके उसे ऐसा लगा,
"उद्या हिला शंभर टक्के सर्दी होणार".

J) J) J) J) J) J) J) J)

गवि Fri, 20/02/2015 - 16:24

या निमित्ताने रेड एफएम मुंबई या रेडिओ स्टेशनची ती भन्नाट "सन्नी लिओनी के ऑफिशियल संस्कृतिरक्षक" जिंगल आठवली..

इथे लिहावी अन तुनळी एम्बेड करावी का .. की नकोच ?! ;)

आहे मात्र खासच.

गवि Fri, 20/02/2015 - 16:31

In reply to by गवि

आख्ख्या मुंबईने ती रेडिओवर अनेकदा ऐकलेली असल्याने खास लपवण्यासारखे काही नसावे. तरीही चावट द्वयर्थी इ इ आहे अशी वॉर्निंग डिस्क्लेमरादि देऊन इथे टाकतो. सार्वजनिक जागी अजिबातच प्ले करु नये.:

पण हसणे टाळता आले असल्यास सांगा. आय डोंट थिंक यू कॅन रेझिस्ट लाफिंग.

वृन्दा Fri, 20/02/2015 - 20:53

In reply to by गवि

बाप रे :D
अन डेंजरस हे की ती ट्युन अन शब्द डोक्यात बसतात :(
आज सकाळी चालताना ते "बडे बडे - खडे खडे" गुणगुणत जात होते नशीब इथे कोणाला कळत नाही. :D

'न'वी बाजू Fri, 20/02/2015 - 17:49

In reply to by वृन्दा

मुळात चारोळी चार ओळींची असते, तर लिमरिक पाच; लिमरिकचा यमकप्याटर्न अअबबअ असा असतो, त्याला मीटरची निश्चित अशी काही बंधने आहेत (जी नक्की काय आहेत, बोले तो कोणत्या ओळींत नेमक्या किती मात्रा वगैरे, ते मला ठाऊक नाही, परंतु बबवाल्या ओळींच्या मात्रा अअअवाल्या ओळींच्या मानाने बर्‍याच कमी असतात, असे ढोबळमानाने म्हणता यावे.), शेवटच्या ओळीत ट्विस्ट असणे अपेक्षित असते, वगैरे वगैरे.

शिवाय, असे बंधन नसले, तरी बहुतांश लिमरिके ही अश्लील असतात (किंवा, ओढूनताणून कसेही करून (इंग्रजीतून) काहीतरी भयंकर अश्लील लिहू पाहणारी मंडळी ही सहसा लिमरिक या फॉर्मकडे आकृष्ट होतात, असे म्हणू या.), आणि अशी लिमरिके रचू पाहणारी मंडळी ही उत्साहाच्या भरात सहसा मीटरच्या नियमांची आईमाई एक करतात, असे निरीक्षण आहे.

(अवांतर: आज चारोळी म्हणजे लिमरिक का म्हणून विचारताय, उद्या हायकू म्हणजे शार्दूलविक्रीडित का म्हणून विचाराल, परवा सी म्हणजे कोबॉल का म्हणून, तेरवा वरणभात म्हणजे सुकी मासळी का म्हणून... कोठे जाऊन थांबणार हे सगळे??????)

जाता जाता: जरा त्यातल्या त्यात बर्‍या लिमरिकचे काही नमुने, सर्वांच्या(च) आस्वादाकरिता:

There was a young girl of Madras
Who had the most beautiful ass
But not as you'd think
Firm, round and pink
But grey, with long ears, and eats grass.

किंवा, हे किंचित अधिक अश्लील आहे (आधीच बजावून ठेवतोय!):

A honeymoon couple from Nantucket
Went to bed - and did they ruck it!
In the morning said he
"Do you feel like some tea?"
She said "More like a billposter's bucket!"

(समझने वालों को, इ.इ.)

बोला! हे असले काही करून दाखवण्याची ताकद आहे तुमच्या चारोळीत???

..........

हा प्रश्न मला विचारण्यात आलेला आहे.

मद्रासच्या मुलीचे अ‍ॅस, फर्म आणि राउण्ड एक वेळ ठीक आहे, पण, पिंक??????

बॅटमॅन Sat, 21/02/2015 - 03:15

In reply to by 'न'वी बाजू

असली लिमेरिके तर आमच्याकडे मोरोपंती काळापासूनच आहेत, हेच अज्ञातकर्तृ उदाहरण पहा.

यतिनें न वागवावा चित्तांत अल्पहि मोड कामाचा |
सुरतीं घातक जैसा युवदांपत्यासि मोडका माचा ||

बाकी 'सर्व भाषांची जननी' संस्कृतातही अनेक ज्ञानहेमकण सापडतीलच. ते एक असो.

तूर्त तुम्ही उपस्थित केलेल्या पिंकापत्तीबद्दल बोलावयाचे झाले तर पीडनोत्तर पिंक का बरे होणार नाही?

धनंजय Sat, 21/02/2015 - 05:10

In reply to by 'न'वी बाजू

लिमरिकचे "शुद्ध" स्वरूप म्हणजे
त्र्यक्षरी अनापेस्ट गण, बहुधा सर्व गण अनापेस्ट नसतात. परंतु त्र्यक्षरी गण खास ( ललगा-ललगा... / लगाल लगाल... /)
३-३-२-२-३ गणांच्या ओळी,
ओळींत यमके अअबबअ

विकिपीडियामधून लक्षणपद :
Writing a | Limerick's | absurd, |
Line one and | line five rhyme | in word, |
And just as | you've reck'ned |
They rhyme with | the second; |
The fourth line | must rhyme with | the third. |

धनंजय Sat, 21/02/2015 - 06:50

In reply to by 'न'वी बाजू

अनापेस्ट म्हणजे तीन अक्षरांचा संच, अनुक्रमे वजन "लघु-लघु-गुरु" असे.
अगदी "नियमित" लिमरिक चा नाद-लय येणेप्रमाणे :

ललगा ललगा ललगा
ललगा ललगा ललगा
ललगा ललगा
ललगा ललगा
ललगा ललगा ललगा

असे क्वचितच असते.

त्यातल्या त्यात असे असते :

लगा ललगा ललगा (इट् 'वॉझ् | सच् अ 'शेम् | दॅट् द 'मॅन् |)
लगा ललगा ललगा (वॉझ् 'बेंट् | ऑन् द 'सैड् | ऑव् द 'कॅन् |)
लगा ललगा (ही 'हॅड् | यू कुड् 'से | )
लगा ललगा (बिन् 'ड्रंक् | थ्रू द 'डे |)
लगा ललगा ललगा (अँड 'देन् | डिड् द 'ट्विट् | हिट् द 'फॅन् |)

अमुक Sat, 21/02/2015 - 09:36

In reply to by धनंजय

उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद.
देवनागरीत लघु-गुरू हे र्‍हस्व-दीर्घाशी, अकारान्त-आकारान्ताशी जोडले आहेत. म्हणजे लिपी ही किती काळ अक्षराचा ध्वनी लांबवायचा हे दर्शविते. इंग्रजीत तसे नाही.
उदाहरणार्थ, तुम्ही दिलेल्या ओळींत
लगा ललगा गा (इट् 'वॉझ् | सच् अ 'शेम् | दॅट् द 'मॅन् |)
हे उदाहरण पाहा. दॅट् आणि मॅन् यांचे स्पेलिंग, उच्चार (आणि देवनागरी लिखाणही !) समान आहे. तरी त्यांचे उच्चार - दॅट् आणि मॅsन् असे केल्याशिवाय अनुक्रमे लघु आणि गुरू असे वर्गीकरण शक्य नाही. म्हणून प्रश्न आहे की तिथे इंग्रजीत लघु-गुरू ठरविण्यासाठी काही ठोस नियम आहे का ?

धनंजय Sat, 21/02/2015 - 10:38

In reply to by अमुक

इंग्रजी ही त्यातल्या त्यात "स्ट्रेस टाइम्ड" भाषा आहे.
परंतु गणांची नावे त्यांनी ग्रीक-लॅटिनातून घेतली आहेत.
ऱ्हस्वाच्या ठिकाणी निराघात, दीर्घाच्या ठिकाणी साघात, असा बदल मानून गणांची नावे तीच वापरतात.
स्ट्रेस टाइम्ड भाषांमध्ये वैशिष्ट्य हे, की अनेक निराघात अक्षरे एकापाठोपाठ एक आल्यास ती भराभर उच्चारून, पुढचे साघात अक्षर ठेक्यात येण्याची प्रवृत्ती असते.

----
साघात अक्षर कुठले ते भाषेच्या ओळखीतून, किंवा शब्दकोशातून कळते. पदात फारफारतर एकच साघात अक्षर असते, वगैरे ढोबळ नियम असतात, खरे. परंतु सर्वनामे वगैरे कधी पूर्ण निराघात होतात, ते भाषेच्या चांगल्या ओळखीनंतरच कळते

वृन्दा Mon, 23/02/2015 - 20:56

हाहाहा this one is funny too. नेटवर बर्‍याच आहेत. पण ही एकच देतेय - ;)

I had me a wench from East Broint
Who bade me her skin to anoint
The girl had arthritis
And so I decided
She wouldn't mind one more stiff joint.

धनंजय Tue, 24/02/2015 - 04:31

वसते मिरजेत लता
नसते गरजेत स्वता
पण नाक कसे
पटकन् खुपसे
कुठली गुपिते कळता

---

पुलियावरती सविता
सुचते तिजला कविता
"लुगडं सुकलं
फिरुनी भिजलं
नदियामधि तूच व्हता"

(पुलिया - छोटा पूल ; नदिया - छोटी नदी ; व्हता - "होता"चे ग्रामीण बोलीतील [येथे ग्राम्य] रूप)
(सवितेला नक्की सर्दी होईल. म्हणून हा प्रतिसाद या धाग्यात सुसंदर्भ मानावा.)

'न'वी बाजू Tue, 24/02/2015 - 19:04

In reply to by बॅटमॅन

@आदूबाळ, @बॅटमॅन,

अ‍ॅज़ फार अ‍ॅज़ आशय गोज़, प्रयत्न स्तुत्य आहे, परंतु तेवढा तो मीटर जमला तर घासूनपुसून घ्या ब्वॉ. (अमूकच मीटर पाहिजे असे नाही, कुठलाही मीटर चालेल, पण तो धड असू द्या. तूर्तास म्हणजे लयीत म्हणताना मध्येच अडखळल्यासारखे होते. असो.)

बॅटमॅन Tue, 24/02/2015 - 19:06

In reply to by 'न'वी बाजू

काय की. तूर्तास तरी दोन्ही पांचोळ्या कटावलाईक चालीत म्हणून पाहता बसताहेत तशा.

'न'वी बाजू Tue, 24/02/2015 - 19:11

In reply to by बॅटमॅन

'आणि ताशेरे'मध्ये अंमळ धडपडायला झाले. असो.

(अवांतर: तूर्तास दोघांसही उत्तेजनार्थ 'मार्मिक' दिलेली आहे. मीटर सुधारल्यास सुधारित प्रतिसादांस 'भडकाऊ' देईन. प्रॉमिस! (लौंग के तेल वाला!))

बॅटमॅन Tue, 24/02/2015 - 19:13

In reply to by 'न'वी बाजू

हम्म, रैट्ट. ते झाले खरे.

"खौचट शेरे
आणिक येरे"

ही दुरुस्ती केलेली आहे.

आदूबाळ Tue, 24/02/2015 - 19:24

In reply to by 'न'वी बाजू

अहो नबा कसला हो मीटर
If you say I'll deter
श्रेणीखेचक
काव्यवेचक
टॉम डिक हॅरी न* पीटर

--------
*पायमोडका न. मला टायपता आला नाही.

अनुप ढेरे Tue, 24/02/2015 - 22:40

In reply to by आदूबाळ

'खाते' या सदरात 'मिळालेल्या श्रेणी' असा एक ट्याब आहे. त्याच्याच जोडीला मिळालेल्या श्रोणी, म्हणजे तुमचा किती प्रतिसादांना ती जागा दाखवली गेली, हे देखील टाकावं का?

बॅटमॅन Wed, 25/02/2015 - 15:17

In reply to by 'न'वी बाजू

मी लिहिले,
मजजवळी कवण?
ती त्याजजवळी
न मजजवळी
दिल तिये तोडिले मम.

व्याकरणात चुका असू शकतात, नव्हे असतीलच बहुधा. कारण पहिलाच प्रयत्न आहे.