सर आले दुरुनी (विडंबन)
विदेश
(चाल: स्वर आले दुरुनी )
सर आले दुरुनी
गेल्या सगळ्या त्या मैतरणी ||
खुर्चीत उसासे साऱ्यांचे
होस्टेलमधील त्या पोरांचे
कुजबुजही नव्हती पोरींची
धुसफुसही नव्हती कोणाची
ऐशा रमलेल्या त्या स्थानी ||
वर्गात मनोरथ किति रचले
गालावर हासू पाघळले
काही हृदयातचि ते घुसले
बाणांतुनी स्पंदन जाणवले
झेली सुंदर मैत्रीण कुणी ||
प्रतिसाद सरांचा तो न कळे
अवसान परी का पूर्ण गळे
संधीच न मिळता पोरांचे
घबराट पुन्हा सर ते दिसले
चहाडी चुगली का केली कुणी ||
(पूर्व प्रसिद्धी- शब्दगाssरवा २०११)
वा वा!
तुमचे विडंबन पघुन आम्हाला आमच्या स्वर आले दुरुनी ची आठवन झाली. असो गेले ते दिन गेले!