Skip to main content

आमंत्रण - जीवनशाळांचा बालमेळा!

जीवनशाळांच्या मुलांचं दरवर्षी एखादं संमेलन भरत असतं. त्याला नाव असतं 'बालमेळा'. त्यात या शाळेतील मुलं विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असतात. त्याजोडीनेच त्यांचा क्रीडामहोत्सवही असतो.

यंदा हा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यातील आमलीबारी येथे, गुरूवार दि. २ फेब्रुवारी २०१२ ते शनिवार दि. ४ फेब्रुवारी २०१२ या दिवसात होणार आहे. या निमित्ताने नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे सर्वच सुहृदांना आमंत्रण दिले आहे.

ज्यांना कोणाला या कार्यक्रमाला उपस्थित रहायचे असेल त्यांनी खालील नंबरवर संपर्क करावा आणि पुढील माहिती विचारावी. मात्र, मेळ्याच्या पाच दिवस आधी पर्यंत नावे द्यावीत म्हणजे व्यवस्था करणे शक्य होईल.

योगिनी खानोलकर : ९४२३९४४३९०
विजयाताई चौहान : ९८२०२३६२६७

अजून काही असल्या बिपिन कार्यकर्ते आणि श्रावण मोडक यांना सामायिक व्यनिद्वारेही संपर्क करू शकता.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 12/01/2012 - 22:01

आमंत्रणाबद्दल धन्यवाद.
पण 'आमु आखा'च्या सुरूवातीला तू लिहील्याप्रमाणे तिथे जाऊन काय करायचं याबद्दल शंका असल्यामुळे शक्य असतं तरी येण्याचा विचार केला नसता.

ऋषिकेश Fri, 13/01/2012 - 10:41

निमंत्रणाबद्दल आभार.. फेब्रु - एप्रिल काहिहि जमणे कठीण आहे :(
अशीच माहिती देत रहा.. कधीतरी (लवकरच) यायच आहे हे नक्की