Skip to main content

तो एक लाज-पुत्र

थोडी पार्श्वभूमी-इथे एका कालीज(कॉलेज) कन्यकेने एका रोड-रोमिओमुळे त्रस्त होऊन काही मैतरणींना हाताशी घेऊन,त्याला धडा शिकवला आहे...(खरं म्हणजे प्रस्तुत प्र-संग आमच्या शालीन वयात,आमच्या पल्याडच्या कालीजात आखो-देखे घडलेला होता, तो आज त्या कॉलेजला काही कामानिमित्त भेट दिल्यामुळे स्मृतिपटलावर आला...म्हणुन म्हटलं आलाय बाहेर..तर त्याला जमेल तसा मांडावा)

तो एक लाज-पुत्र,मी ही-रान्टी फूलं।
चारिन मी ,मी त्याला ग्राउंडची माती/धूळ॥धृ॥

कंठात बगळ्याचे हाड,केसात उवांची जाळी
अंगाला सार्‍या बरबटुन शाई,घालीन चपलांची माळ।१।

खाशील का पुंन्हा माती..?करशील का उचापती..?।
ताई गं ताई म्हणुन सॉरी,भरशील नळावरी चूळ।२।

काढीन तूझी घाण,ये गं ये... तुही हाणं।
सुखी रे सुखी कालीज सारे,चुटकीत मी करीन।३।