मुंबई मॅरथॉन (८)
* मुंबई मॅरथॉन चे हे 16 वे वर्ष आहे . या वेळी मी सहभागी होऊ शकलो नाही. पण दर वर्षी होतो. मॅरथॉन वरती लेख पाहून मला माझा अनुभवपर एक लेख आठवला जो मी 8 व्या मॅरथॉन नंतर लिहिला होता . त्यावेळी पहिल्यांदाच सहभागी झालो होतो. म्हणून हा लेख माझ्या ब्लॉग वर टाकला होता. तोच लेख इथे शेअर करत आहे . * सळसळते चैतन्य , उत्साह, जोश, थ्रिल असेच मी मुंबई मेरेथोन चे वर्णन करेन.!!! ८ व्या मुंबई मेरेथोन मधील व्हील चेअर इवेन्ट चा स्पर्धक असतानाचे सारे अनुभव डोळ्यासमोर तरळत आहेत.
मेरेथोन मध्ये भाग घेण्याची हि माझी पहिलीच वेळ. खरं तर गेल्या दोन तीन वर्षापासून भाग घ्यायची इच्छा होती. पण परीक्षा आणि अभ्यासामुळे वेळ मिळत नव्हता. शेवटी या वर्षी कुठल्याही परिस्थितीत भाग घ्यायचाच असे ठरवले आणि रजिस्ट्रेशन केले.
१३ जानेवारी ला एक्स्पो सेंटर ला जाऊन बेच घेतला. तिथल्या सोयी उत्तम होत्या. माझा वेग तिथे तपासून घेतला. तिथल्या पूजा शर्मा यांनी अतिशय उत्तम रीतीने मार्गदर्शन केले. पार्किंग कुठे करायचे, हे हि समजावून दिले.
शेवटी १६ जानेवारी ला तिथे पोहोचलो. पूजा मादाम आणि इतर सहकार्यांनी आमचे छान स्वागत केले. खरे तर तिथे खूप स्पर्धक एकाच वेळी आलेले होते. तरीही सर्व छान मेनेज केले.
सर्व स्पर्धकांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. माझ्या जुन्या शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक तिथे आलेले होते. सर्वाना भेटून खूप आनंद झाला. आपल्या व्यंगावर सगळ्यांनी मात करून एक नवा आदर्श घालून दिला होता ..अजून एक बेंगलोर चा गात आला होता. त्यांची व्हील चेअर फारच फास्ट होती. तिथला एक स्पर्धक खूप छान वाक्य बोलला, '' life is a celebration. we should enjoy every moment of it" तेव्हाच जाणवले की हेच मुंबई चे स्पिरीट !!!!
ठरल्याप्रमाणे रेस सुरु झाली. बरेच सेलिब्रिटी सुद्धा आम्हाला चीअर करत आमचा उत्साह वाढवत होते. मी सुरुवात मोठ्या उत्साहात केली. पण थोड्याच वेळात माझे हात दुखू लागले. घरात किंवा कॉलनीत व्हील चेअर चालवण्यात आणि रस्त्यावर यात खूप फरक असतो याची जाणीव झाली. लगेचच तो बेंगलोर चा ग्रुप फास्ट पुढे निघून गेला. खरे सांगतो, माझ्या मनात रेस तिथेच सोडण्याचा विचार आला होता. पण पुन्हा मुंबई ने मदत केली. मुंबई च्या स्पिरीट ची पुन्हा प्रचीती आली. ठिकठिकाणी मुंबईकर उभे राहून माझा उत्साह वाढवत होते. तेव्हाच ठरवले, हरलो तरी चालेल, रेस सोडायची नाही. !!
त्यात माझ्या वडिलांनी आणि मित्र हर्षद याने मला खूप मदत केली. त्यामुळे रेस पूर्ण करण्याची सुद्धा जिथे शंका वाटत होती. तिथे मी चौथा आलो !!!
रेस संपल्यावर आयोजकांनी लगेच फळे आणि प्रोटीन बार ची व्यवस्था केली. times group ने माझी मुलाखत घेतली. आणि लगेच दुसर्या दिवशी महाराष्ट्र times आणि times of India ने ती प्रसिद्ध हि केली.
इथे एक मात्र सुचवावेसे वाटते. आमच्या या व्हील चेअर इवेन्ट ला बक्षीस नाही. जर पुढच्या वर्षी आयोजकांनी काही बक्षीस ठेवले तर आमच्या कष्टाचे चीज होईल.
शेवटी हा मेरेथोनचा अनुभव १ अविस्मरणीय अनुभव होता हे मात्र नक्की!!!
ललित लेखनाचा प्रकार
व्हीलचेअर
व्हीलचेअर वरील मॅरेथॉन हे मला कार रेसिंगसारखे वाटले. जितका चालक महत्त्वाचा तितकीच कारही महत्त्वाची ठरते. अर्थात वाहवा चालकाची होत असली तरी कारमधील लहान बदलही मोठे विजय/पराजय घडवून आणू शकतात.
इथेही व्हीलचेअरचे महत्त्व तुम्ही (बेंगळूरच्या टिमच्या उदाहरणाने) अधोरेखीत केलेच आहे. त्याबद्दल अधिक तपशीलात वाचायला आवडेल.
बाकी, पुढील रेससाठी शुभेच्छा! :)
त्यातही बरेच फरक आहेत.
धन्यवाद ऋषिकेश ! व्हीलचेयर मध्ये ही फरक आहेत आणि त्यातही अनेक गमती होतात. पूर्वी मॅरथॉन च्या सुरूवातीला काही लोक motarized व्हीलचेर वापरायचे. कारण बक्षीस जरी नसले तरी नंबर देतात तो आनंद मिळावा म्हणून. नंतर आयोजकांनी त्यावर बंदी घातली. पण तरी manual wheelchair मध्ये सुद्धा फरक पडतोच. उदाहरणार्थ मी उल्लेख केलेला एक ग्रुप जो होता त्यांची व्हीलचेर manual होती पण व्हील वेगळे , जास्त अंतर एका वेळच्या फिरवण्यात जाऊ शकणारे etc. होते . अर्थात त्यांची स्वतची प्रॅक्टिस होतीच त्यात ते ही नाकारता येणार नाही .
बहुतेक यासाठीच या इवेंट मध्ये बक्षीस देता येत नाही. कारण uniformity ठेवता येत नाही. जे स्वता चालवू शकत नाहीत त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर पालक किंवा मित्र असतात. पण अनेक वेळेला स्वता चालवू शकणार्याना सुध्हा त्यांचे पालक ते पुढे जावेत म्हणून सगळे अंतर स्वतच जोरात घेऊन जातात. अर्थात त्यांच्या वेगाने जाणे स्वत: चालवणार्यांना शक्य नाही. त्यामुळेही बक्षीस नसेल . (मला स्वतला हा प्रकार अनेक कारणासाठी आवडत नाही . पुढे जाणे एवढे महत्वाचे आहे ? असो!) बहुतेक म्हणून आयोजकांनी आता नंबर काढणे सुद्धा बंद केले आहे. तुमचे टाइमिंग दिसते त्यावरून स्वतच पडताळून घेऊ शकता. ट्रॉफी आणि सर्टिफिकेट पण आता प्रत्येकाला भाग घेतल्याबद्दल मिळते.
एका चुकीची दुरूस्ती
एका चुकीची दुरूस्ती करत आहे. हे मॅरथॉन चे 16 वे वर्षं नाही. मॅरथॉन 2004 साली सुरू झाली.