"भाषण छापा, नाही तर ..." ही सबनिसांची धमकी व साहित्य महामंडळासमोरील धोका
"भाषण छापा, नाही तर ..." ही सबनिसांची धमकी व साहित्य महामंडळासमोरील धोका
.
साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे किंवा खरे तर आपले काही खरे दिसत नाही.
अध्यक्षीय भाषणात त्यांनी त्यांचे छापील भाषण न वाचता भलतेच भाषण केले. अतिशय तावातावाने. कुठल्या साहित्यसंमेलनाचा अध्यक्ष नव्हे, तर कुठल्या तरी कामगार युनियनचा नेता भाषण करतो आहे असा भास होत होता.
त्यांचे छापील भाषण सव्वाशे-दीडशे पानांचे आहे असे म्हणतात. आता ते महामंडळाने छापावे अशी मागणी सबनीसांनी केली आहे. ही मागणी २६ जानेवारीपूर्वी पूर्ण झाली नाही तर ते नंतर पत्नीसह उपोषणाला बसणार आहेत.
आता गंमत अशी आहे की आज सबनीसांचे भाषण सव्वा-दीडशे पानांचे आहे. पुढच्या संमलेनाच्या अध्यक्षाने चार-पाचशे पानांचे भाषण तयार केले, तर तेही महामंडळाने छापावे असा आग्रह धरला तर काय होईल? अशाने तर कोणी आपले एखादे नवीन पुस्तकच भाषणाच्या नावाखाली महामंडळाकडून छापून घेईल.
तेव्हा सबनिसांचे हे भाषण छापण्याचे काय होईल ते होईल, पण पुढच्या वेळी निवडणुकीला उभे राहताना अध्यक्षांचे भाषण अमुकअमुक पानांपेक्षा अधिक मोठे नसावे अशी अट घालण्याचा विचार महामंडळ गंभीरपणे करेल.
आताही धमकी दिली आहे ती सपत्निक उपोषणाची. त्यात पत्नीला गुंतवण्यामागे कोणता हेतु असावा?
आजची त्यांची धमकीदेखील चांगली भारदस्त होती. ''राज्यघटनेने मला जो अधिकार दिला आहे, त्याप्रमाणे साहित्यसंमेलनाचा अध्यक्ष असल्याच्या अधिकारात माझे भाषण महामंडळाने छापलेच पाहिजे'' असे ते म्हणताना ऐकले. यांचे भाषण छापण्याचा आणि राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा काय संबंध? काहीही हं श्री. मात्र त्यावरून नटसम्राटमधल्या “आभाळ पाठीवर घेऊन फिरणा-या हत्तींना विचारून पहा, तेही सांगतील, कोणीही कोणाचं नसतं” या अतिशय भारदस्त पण अर्थ न लागणा-या संवादाची आठवण झाली. कोणीही कोणाचं नसतं, हे कळतं, पण ते हत्तींना का विचारायचे आणि तेदेखील आभाळ पाठीवर घेतलेल्या हत्तींना का विचारायचे ते कळले नव्हते. आताही तसेच आहे. हत्तींच्या कळपाची मानसिकता त्यात दिसते की काय कोणास ठाऊक. पण हे थोडे विषयांतर झाले. मात्र ‘राज्यघटनेने मला जे अधिकार दिलेले आहेत, ......’ हे त्यांचे उद्गार त्यातल्या आवेशासह अजरामर व्हायला हवेत.
त्यावरूनच वाटले, नटसम्राट सिनेमा काढण्यात मांजरेकरांनी थोडी घाई केली. सबनीसांची ओळख आधी झाली असती, तर नाना पाटेकरांना जबरदस्त स्पर्धा निर्माण झाली असती.
एकूण आगामी वर्षात महामंडळाचे व आपलेही काही खरे नाही.
कोणाचे काय आणि कोणाचे काय. तिकडे दिल्लीत दहशतवाद्यांच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम कसा पार पडतो याची मोदींना काळजी तर इकडे सबनिसांच्या धमकीमुळे साहित्य महामंडळाचे अधिकारी गर्भगळीत झालेले.
ललित लेखनाचा प्रकार
हे ललित आहे!!!?? राकु, डुकरीण
हे ललित आहे!!!?? राकु, (स्वसंपादित) अव्याहत धागे प्रसवताय तर त्यांच बाळंतपण योग्य त्या पाळण्यात तरी करा.
=======
१. सदर टिपणी एक सदस्य म्हणून केली होती. त्याचा व्यवस्थापनाशी संबंध नाही.
२. आत्मपरिक्षण केल्यानंतर विनाकारण कुस्ती खेळण्यात हशील न दिसल्याने अनावश्यक मजकूर स्वसंपादित करत आहे. धाग्यांच्या अव्याहत रतीबामुळे झालेल्या त्राग्यातून फार विचार न करता दिल्या गेलेल्या टिपणीबद्दल खेद व्यक्त करतो.
(व्यवस्थापक) ऋ
राकु, तुम्हीही आत्मपरिक्षण केल्यास येथील अनेक सदस्यांसाठी व संस्थळासाठी ते फायद्याचे ठरेल
(सदस्य) ऋ
शीर्षकातून काहीही अर्थबोध झाला नाही
हे ललित आहे!!!?? राकु, डुकरीण
शीर्षकातून काहीही अर्थबोध झाला नाही.
बोले तो, हे भले ललित नसेलही, पण म्हणून राकु डुकरीण नेमके कसे? (स्पीशीज आणि जेंडर, दोहोंचीही लिंक लागली नाही.)
बाकी, नेमकॉलिंगबद्दल पर से आक्षेप नाही; लेजिटिमेट टीकेत नि अभिव्यक्तिस्वातंत्र्यात त्यास स्थान असू शकते. (उदा., 'राजा भिकारी!') पण मग त्यामागील मुद्दा एक तर स्वयंस्पष्ट असावा, किंवा मग त्याचे स्पष्टीकरण जोडलेले असावे. (जसे की, 'माझी टोपी घेतली! ढुम् ढुम् ढुमाक!') अन्यथा ते नेमकॉलिंग निरर्थक अत एव प्रभावहीन ठरते, असे सुचवावेसे वाटते.
कदाचित ऋ ला डुकरीण खुप पिल्ले
कदाचित ऋ ला डुकरीण खुप पिल्ले जन्माला घालत असते म्हणुन राकुंशी तुलना केली असेल कारण राकु खूप धागे जन्माला घालतात. तसेच डुकरीण डुकरांना जन्माला घालते तसेच राकुंचे धागे डुकरांसारखे किळसवाणे/घाणेरडे आहेत असे कदाचित ऋला म्हणायचे असेल. हे माझे इंटरप्रिटेशन, कदाचित ऋला वेगळे म्हणायचे असेल.....
टिप : डुकरांची बदनामी अजिबात करत नाहीये. राकुंशी तुलना केल्यामुळे एखाद्या डुकरीणीने मानहानीचा दावा लावू नये म्हणुन आत्ताच स्पष्टीकरण देतीय.
(अवांतर)
टिप : डुकरांची बदनामी अजिबात करत नाहीये. राकुंशी तुलना केल्यामुळे एखाद्या डुकरीणीने मानहानीचा दावा लावू नये म्हणुन आत्ताच स्पष्टीकरण देतीय.
हे ठीकच आहे. पण उलटपक्षी, राकुंशी तुलना केल्यामुळे आपला गौरव झाला, असे एखाद्या डुकरिणीस (फॉर व्हॉटेवर रीझन; डुकरिणींचे मन मी काय जाणावे?१) वाटून (१) अभिमानाने तिची कॉलर२ ताठ झाली, आणि (२) त्याबद्दल तिने तुमचे आभार मानले३, या शक्यतेबद्दल काही विचार (अथवा मनाची तयारी वगैरे) करून ठेवली आहेत काय?
..........
१ डुकरिणींबद्दल येथे बहुत सारे तज्ज्ञ असावेत, असे वाटते (चूभूद्याघ्या); कदाचित तेच काही खुलासा करू शकतील, असे वाटते.
२ किंवा डुकरिणींचे जे काही ताठ होत असेल ते. (चूभूद्याघ्या; तज्ज्ञांनी खुलासा करावा(च).)
३ हायपॉथेटिकल सिच्युएशन.
एक तर ललित या शब्दाचा
ललित या शब्दाचा तुम्हाला काय अर्थ अपेक्षित आहे ते सांगा. त्याप्रमाणे वरील पोस्त त्यात कशी बसत नाही हे सांगा. नाहीतर तुमच्या या हलकट कमेंटबद्दल माफी मागा. तुमची लायकी याआधीही दाखवलेली आहे, त्यामुळे चवताळून या थराला जाऊन बोलत आहात हे स्पष्ट दिसते आहे. कमेंट करताना मनाची नाहीच ते कळलेले आहेच, जनाची तरी ठेवा, कारण ती येथे सर्वांसमोर उघडी पडते आहे याचेही भान तुम्हाला नाही.
इथले मालक आणि त्यांचे संपादक कोणत्या थराला जात आहेत याची नोंद घ्यावी.
(अवांतर)
मात्र त्यावरून नटसम्राटमधल्या “आभाळ पाठीवर घेऊन फिरणा-या हत्तींना विचारून पहा, तेही सांगतील, कोणीही कोणाचं नसतं” या अतिशय भारदस्त पण अर्थ न लागणा-या संवादाची...
"It's like Shakespeare. Sounds great, but does not mean a thing." - P.G. Wodehouse.
...आठवण झाली. कोणीही कोणाचं नसतं, हे कळतं, पण ते हत्तींना का विचारायचे आणि तेदेखील आभाळ पाठीवर घेतलेल्या हत्तींना का विचारायचे ते कळले नव्हते.
पॉइंट आहे खरा.
सबनीसांचा भाषण छापा हा हट्ट
सबनीसांचा भाषण छापा हा हट्ट आणि राकुंचा पर्सनल ब्लॉग असल्यासारखा रोजच्या रोज नवेनवे धागे सॉरी फुसके बार काढण्याचा हट्ट. एक मूर्खपणा आणि दुसरा अभिव्यक्तीचा लढा!