Skip to main content

एकांतात

एकांतात
विचारशून्य शांततेच्या
भयप्रद अवस्थेत
मी धावलो फेसबुक च्या
निळ्या पांढऱ्या स्क्रीनवर
व्यक्त होण्याच्या तलफेचा
एक डोस घ्यायला
फेकून एक पोस्ट
पित सुटलो लाईक्स
शोषून घेतल्या कमेंट्स
आणि गिळत राहिलो फोटोज
विनोदी रटाळ वैचारिक
ऐतिहासिक राजकीय
सामजिक वगैरे पोस्टी
एकत्र चिवडल्या
आणि खाऊन टाकल्या
आता कसं भरलय डोकं मस्त
अहाहा आता बसलीय जोरात किक

तिरशिंगराव Sun, 17/07/2016 - 13:53

ऐतिहासिक राजकीय
सामजिक वगैरे पोस्टी
एकत्र चिवडल्या
आणि खाऊन टाकल्या

आणि पर्सनल गोष्टी
ज्या मेसेज करायच्या
त्या लिहिल्या टाईमलाईनवर
अगदी मोबाईल नंबर सकट

अतिशहाणा Tue, 19/07/2016 - 18:36

सक्काळी सक्काळी ऐसीची किक बसल्याशिवाय मलाही 'होत' नाही.