Skip to main content

क्लिक !

मोठ्या आकारात फोटो पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 18/03/2012 - 01:22

पहिल्या फोटोतला लाल/गुलाबी रंग कशामुळे आलेला आहे?

मला दुसरा फोटो आवडला; झाडाच्या कलण्याची दिशा विरूद्ध असती तर अधिक आवडला असता.
चौथ्या फोटोतलं फूल खूप पाहिल्यामुळे असेल, पण फारसं आवडत नाही. पण एकदम मोठा गुच्छ वगैरे असेल तर आवडतो.

राजेश घासकडवी Sun, 18/03/2012 - 03:07

तिसऱ्या फोटोतला डावीकडचा भाग आवडला. काळ्यापांढऱ्या पाचोळ्यावर एकच पान आपला विटलेला का होईना, पण रंग टिकवून आहे.

फोटोंवर काय प्रकारचं संस्करण (प्रोसेसिंग) केलं याची माहितीही द्यावी.

Nile Wed, 21/03/2012 - 08:25

In reply to by राजेश घासकडवी

तिसर्‍या फोटोल सिलेक्टीव्ह कलर फोटोग्राफी म्हणतात.

फोटोशॉप किंवा तत्सम सॉफ्टवेअर्स वापरुन कोणताही फोटो सिलेक्टीव्ह कलर फोटो मध्ये सहजतेने बदलता येतो. सॉफ्टवेअर वापरताना एकाच फोटोची कॉपी करुन ती वर लावतात. वरचा फोटो ब्लॅक अँड व्हाईट करतात आणी त्यातील हवा तो भाग पारदर्शक करून खालचे रंगीत चित्र एक्स्पोज केले जाते.

नविन येणार्‍या अनेक कॅमेर्‍यांमध्ये ही सोय फोटो घेतानाच करता येते. कॅमेरा फोकस केल्यावर हवे ते रंग आधीच निवडायचे. २-३ +काळा+पांढरा असे रंग निवडून कॅमेरा फोटो घेतो.

दुसर्‍या फोटोची निवड आवडली पण फोटोमध्ये प्रकाश फार झाला आहे. झाडापुढचा संपूर्ण परिसर अंधारात आहे. सूर्य उलट्या दिशेला असताना फोटो घेतला तर कदाचित जास्त चांगला यावा.