Skip to main content

मी पप्पा

मी पप्पा
मी पप्पा तू मम्मी!
आपलं बाळ यम्मी यम्मी

बाळ आपलं गोरं गोरं लाल
टाळ्या वाजवून धरतंय ताल

कधी बसतं तर कधी हासतं
कधी रांगतं कधी उभं राहतं

छोटे छोटे तिचे कान
आवाजाकडे वळवी मान

हात तिचे बारीक इवलेसे!
बोटे तोंडात घाली कसे!

नजरेने ती सारे पाही
पण अजून काही बोलत नाही!

- पाषाणभेद

राजेश घासकडवी Sun, 18/03/2012 - 22:15

भातुकलीच्या खेळात म्हटलेली कविता आहे, की खऱ्या बापाने म्हटलेली आहे असा प्रश्न पडला.

पहिल्या कडव्याने ज्या लयीची अपेक्षा केली ती इतर कडव्यांनी पूर्ण केली नाही... काही बदल सुचवतो, विचार करून बघा.

बाळ आपलं गोरं लाल
टाळ्या वाजवून धरतंय ताल

कधी बसतं कधी हासतं
कधी रांगतं, उभं राहतं

छोटे छोटे तिचे कान
आवाजाकडे वळवी मान

हात तिचे इवलेसे!
बोटे तोंडात घाली कसे!

नजरेने ती सारे पाही
बोलत मात्र काहीच नाही!

ऋषिकेश Mon, 19/03/2012 - 11:03

:) 'नेमकी' कविता आहे
आवडली