Skip to main content

मंगळ आणि गुरू युती

ग्रहांच्या युती अधूनमधून होत असतात. आज पहाटे गुरू आणि मंगळ एकमेकांच्या अत्यंत जवळ, म्हणजे साधारण एक तृतियांश अंश कोन इतके जवळ आले. हे अंतर इतके लहान आहे की डोळ्यांनी पाहता गुरू आणि मंगळ हे एकच 'तारा' असल्याप्रमाणे भासतात.

फोटोत गुरूचे चार मोठे चंद्रही स्पष्ट दिसत आहे. मंगळापेक्षा गुरू सध्या जवळजवळ वीसपट प्रकाशमान आहे. गुरूचे चंद्र मंगळापेक्षाही कमी प्रकाशमान आहेत.


(चित्रावर क्लिक केल्यास मोठे चित्र दिसेल. )

पुर्वी मी गुरू आणि शुक्र युतीचा फोटो टाकला होता. युती वगैरे विषयांवर तिथे थोडीफार चर्चा झाली होती. इच्छुकांनी ती इथे वाचावी.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 06/01/2018 - 20:00

एक तृतियांश अंश म्हणायचंय का?

तुलना करण्यासाठी - अर्धा अंश म्हणजे सूर्य किंवा चंद्राच्या पूर्ण बिंबाचा व्यास.

चिमणराव Sat, 06/01/2018 - 21:12

पंधरा वर्धन /मॅग्निफिकेशन ठेवले बाइनो/टेलिचे तर गुरुचे चंद्र दिसतात आणि गुरु - मंगळ अंतर तीन अंश असेल तर फोटोत /एका फ्रेममध्ये सर्व येतात.
ज्योतिषातली युति म्हणजे तीन अंशांचे अंतर.

मागे एकदा गुरु - शुक्र जवळ आले होते तेव्हा गुरुचे दोन चंद्र आणि शुक्राची कलाही एकाचवेळी पाहिलेले आठवले.