घननीळ वाजवी बासरी
anant_yaatree
ये पुन्हा, भेदून ये स्थल-काल-पटलाला, इथे
ये जरा, ऐकू पुन्हा ती शब्दविरहित भाषिते
ये इथे, स्पर्शू पुन्हा चल जाणिवेची ती मिती
जी दिसे स्वप्नात, सरत्या जागृतीच्या शेवटी
ये इथे, ऐकू पुन्हा, घननीळ वाजवी बासरी
दूर मग बरसून येऊ तप्त मरूभूमीवरी
सुंदर!
खूप दिवसांनी दिसलात... उत्तम कविता!