Skip to main content

चुलीबाई

चुलीबाई माझी सान
ल्हानशी मैत्रीण
नको गं वैरीण
होऊ जन्मी

डोळ्यातल्या झऱ्याची गं
वाट तुझ्यापुढे आहे
थेंब थेंब वाफ राहे
तुझ्यातही

चुलीबाई गं तुला
हवीत लाकडे
माझ्यापासची हाडे
ओली होतं

चुलीबाई तू गं
पोटापुरती नाही
गुजगोष्टींनाही नाही
अंत माझ्या

जन्मभरी तू जळशी
झोपेतही मला जाग
माझ्या चितेसाठी आग
ठेवून जा..

ऋषिकेश Thu, 22/03/2012 - 09:42

वा! ठेकेदार ग्रामिण ढंगातली कविता आवडली!

ऐसी अक्षरेवर स्वागत! येत रहा लिहित रहा! :)