Skip to main content

तिथे ओठंगून उभी

रानपाखरांची घरे
अंगीखांदी जे माळते
असे झाड फुलताना
पान पान किल्बिलते

क्षितीजाशी विझताना
चांदणे जे उसासते
त्याचे पहाटे पहाटे
अनवट गाणे होते

ओढे ओहोळ पिऊन
नदी खळाळत जाते
ऐलपैलतीरी रात्री
पाण-पैंजण वाजते

फुफाटल्या मातीवर
मृग शिंपण घालते
घमघम अत्तराची
कुपी मग ओसंडते

नाद-शब्द-ताल-गंध
जिथे जिव्हारी भिडते
तिथे ओठंगून उभी
एक कविता असते

भांबड Tue, 12/06/2018 - 15:58

उदय, छान कविता.
१४, मोबाईलवरुन टंकताना ऱ्या ला पटवनं लै वैताग आणतं जिथं र्या लगेच हाती लागतं. बाकी कशात काय जाऊ शकतं तो आपापला प्रश्नै.