Skip to main content

मराठी अनुवादकांसाठी

नमस्कार मंडळी,

साहित्याचा अनुवाद, तांत्रिक भाषांतर, यंत्रसिद्ध भाषांतर (मशीन ट्रान्स्लेशन) अशा विविध विषयांत रस असलेल्या व्यावसायिक व हौशी अनुवादकांना एकत्र आणून त्यांच्यात अनुवादविषयक विचारांचे आदानप्रदान घडवून आणावे या उद्देशाने https://groups.google.com/forum/?hl=en&fromgroups#!forum/marathi-anuwad… हा गुगलग्रुप निर्माण करण्यात आला आहे. हा कट्टा आंतरजालावर असल्याने, सदस्यांना फारसा वेळ व श्रम खर्च न करता इतर अनुवादकांपर्यंत पोहोचता येईल व त्यांच्यातील चर्चेला गती प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे.

या कट्ट्यावर पुढील स्वरूपाची पत्रे पाठवता येतील-
१. अडलेल्या शब्दांची/वाक्यांची भाषांतरे सुचवण्याची विनंती.
२. स्रोत संहितेतले न कळलेले शब्द, सांस्कृतिक संदर्भ यांचे अर्थ वा यांबद्दल अधिक माहिती पाठवण्याची विनंती.
३. अनुवादकांसाठीच्या कार्यशाळा, अनुवादकांनी चालवलेल्या अनुदिनी, अनुवादासंबंधीची पुस्तके, शब्दकोश यांबद्दलची माहिती.
४. अनुवादप्रक्रियेचा एखादा पैलू, अनुवादनातील एखादी विशिष्ट समस्या (उदा. विशेष नामांचे भाषांतर वा लिप्यंतर) यांविषयीचे विचार व त्यावर अधिक चर्चा करण्याचे आवाहन.
५. एखाद्या प्रकाशित अनुवादाचे परीक्षण वा त्यावरील मते.

अनुवादासारख्या रोचक विषयावर आपल्याकडे बोलण्यासारखे खूप असेल हे नक्की. त्यामुळे मराठी अनुवादकांच्या या इ-कट्ट्यावर सर्वांचे स्वागत आहे. येथे सदस्यत्व घेण्यासाठी जीमेल आयडीने लॉग इन करून https://groups.google.com/forum/?hl=en&fromgroups#!forum/marathi-anuwad… या दुव्यावर जावे व "Apply to join group" यावर टिचकी मारावी.

धन्यवाद.

सहज Tue, 27/03/2012 - 10:19

सदस्यत्वासाठी नोंदणी केली आहे.

राधिका Tue, 27/03/2012 - 13:20

In reply to by मेघना भुस्कुटे

वरच्या उजव्या कोपर्‍यात 'मेंबर्स' असे लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक केले, तर इतर सदस्य दिसत आहेत.

राधिका

परिकथेतील राजकुमार Tue, 27/03/2012 - 11:53

नोंदणी केली आहे.

अवांतर :- ह्या धाग्याने एका जुन्या याहू ग्रुपची आठवण करून दिली. ;)

राधिका Tue, 27/03/2012 - 13:21

येथील माहिती पाहून लगेच ग्रुपचे सदस्यत्व घेणार्‍या सर्वांचे आभार. :)

राधिका