निष्ठुर कली मन अन कीर्तन मायेचे
khilaji
निष्ठुर कली मन अन कीर्तन मायेचे
संसार निर्धार आधार बीजाचे II
बीज बोयी मानव , वात्सल्य केवळ त्या चौकटीत
घृणा वाढे ती सदैव, करी मंथन विद्येचे II
कल्लोळ माजे दुःख होता जीवाला
हर्षात जवळी तो मद्याचा प्याला II
कसा आलो जन्मी , ते अज्ञात सारे
प्रबळ झालो , त्याचे श्रेय लुटे रे II
जननि भासे पापी , जिने जन्म दिधला
तू बीज बोताक्षणी तिला विसरला II
कुठे फेडीशी हे पांग, सांग तू रे वैष्णवा
अनाथ होशी निर्गमनि नरकातसुद्धा II
{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }
आवडली.
आवडली.